सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 26 July 2022
भवताल
भवताल कट्टा ४९
विषय .
आफ्रिकी चित्ता भारतात आणावा का? आणि आव्हाने !!
(चित्ता... जगातील सर्वांत वेगवान प्राणी. हा प्राणी गेल्या शतकात भारतातून विलुप्त झाला. आता आफ्रिकेतील चित्ता भारतात आणला जाणार आहे. त्याची पार्श्वभूमी, इतिहास, आव्हाने समजून देणारा कट्टा...)
वक्ते -
रवी चेल्लम
वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आणि संवर्धन क्षेत्रातील वैज्ञानिक
शुक्रवार, २९ जुलै २०२२; सायं. ७ ते ८.३०
सहभागासाठी :
झूम लिंक -
https://bit.ly/3PVp60b
Meeting ID: 870 9794 8561
Passcode: 572045
किंवा
पोस्टरवरील QR code स्कॅन करून
किंवा
भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह.
पेजची लिंक -
https://facebook.com/bhavatal/
संपर्कासाठी :
bhavatal@gmail.com
--
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
राज्यात पूरस्थिती नियंत्रणासाठी
एनडीआरएफ आणि एसडीआरएफची 14 पथके तैनात
मुंबई,दि.26 : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मुंबईत (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, एनडीआरएफ अशी एकूण १२ पथके तैनात आहेत.
नांदेड-१, गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती
राज्यात १ जून पासून आज पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३०९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत व १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.
****
,डॉक्टरांकडे जाता?
*डाॅक्टरकडे जाताय...* तर
*एकदा वाचाचं !!!*
*ADR म्हणजे अडवर्स ड्रग रिअक्शन - संपूर्ण जगामध्ये मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण ADR आहे.*
आपण जी अलोपॅथिक औषधी घेतो त्यांचा आपल्या शरीरावर प्रतिकूल प्रभाव पडतो व शरीर हळू हळू रुग्ण होत जाते.
सर्वच प्रगत देशांमध्ये जिथे सर्वाधिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, आय.सी. सी.यु. युनिट्स आहेत, मल्टीस्पेशिअलिटी हॉस्पिटल आहेत, नेओनेटलॉजि युनिट्स आहेत तिथे लोकांचे आरोग्य खराब आहे असे UNO 2007 च्या सर्वेक्षनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या स्टॅटिन्स या औषधामुळे दरवर्षी 11 लाख लोकांना मधुमेह (Diabetis) होतो.
आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगात खळबळ उडूवून दिली आहे, त्या पुस्तकाचे नाव आहे *"ओव्हर डोस अमेरिका"* या पुस्तकाचे लेखक डॉ.जॉन अब्राहमसन या सुप्रसिद्ध अमेरिकन लेखकाने संपूर्ण जगाला पुराव्यानिशी हे दाखवून दिले आहे की, अमेरिकेसहित संपूर्ण जगाचे स्वास्थ्य अलोपॅथिक औषधांमुळे कसे खालावत चालले आहे. लेखक हे सुप्रसिद्ध हॉर्वर्ड स्कूल ऑफ मेडिसिन चे मानद सदस्य आहेत.
अँटिडिप्रेसंट औषधी, Antiboitics, कोलेस्टेरॉल च्या औषधी यामध्ये साक्षी बदलवून आकड्यांचा भयंकर उलट फेर करून सर्व जगाला भ्रमीत केले जात आहे.
आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे *"DEATH BY PRESCRIPTION"* या पुस्तकाचे लेखक सुविख्यात अमेरिकन डॉक्टर *Dr Ray Strand* आहेत.
आज *संपूर्ण जगामध्ये मृत्यूचे सर्वात मोठे कारण हार्टअटॅक अथवा अपघात नसून उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या अलोपॅथिक औषधी आहेत* हे Dr Ray Strand यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे....
*जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची काळजी व जबाबदारी स्वतः घेणार नाही, तोपर्यंत डॉक्टर व हॉस्पिटल काहीच करू शकणार नाहीत.* इतर कोणत्याही कारणांपेक्षा औषधांच्या दुष्परिणामांनी मरणाऱ्यांची संख्या पाचपट जास्त आहे.- Dr.B.M.Hegde (पद्मभूषण) MD, FRCP (London)
लोकांना असे वाटते की, ऑलोपॅथिक चिकित्साविज्ञान हे ज्ञान व प्रक्रियांचे सुव्यवस्थित क्षेत्र आहे. परंतु हा केवळ एक भ्रम आहे. हे एक अत्यंत अपूर्ण व अनेक दोषांनी युक्त विज्ञान आहे. ऑपेरेशन व उपचारा दरम्यान मानवी शरीरात घडणाऱ्या जैव रासायनिक प्रक्रिया धोकादायक व अनिश्चित असतात - डॉ. अतुल गावंडे (HOD, सर्जरी डिपार्टमेंट - बोस्टन युनिव्हर्सिटी)
हेल्थ चेकअपच्या नावाने एक जबरदस्त व्यापार व भ्रष्ट व्यवस्था अस्तित्वात आहे. लोकांना असं वाटत असेल की पृथ्वीवर जीवंत राहण्यासाठी ऑलोपॅथिक चिकित्सा / औषधी / रक्त - लघवी तपासण्या व हायटेक सर्जरी व टेक्नॉलॉजि आहे तर हे साफ चुकीचे आहे Famous डॉ. B M हेगडे येथे नमूद करतात, की देवाची कृपा आहे की,हे *ऑलोपॅथिक चिकित्सा विज्ञान फक्त 100-150 वर्ष जुने आहे* & त्यामुळे मानव जात अजून पृथ्वीवर जीवंत आहे.
मानवी प्रतिकार क्षमता किंवा आजार ठीक करण्याची अंगभूत क्षमता यांवर अलोपॅथिक डॉक्टरांचा विश्वास नाही. चिकित्सा जगतातील व्यापारीकरणामुळे टेक्नॉलॉजिमुळे चिकित्सेला बाजाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
हृदयरोग व कॅन्सर यामध्ये सर्वाधिक टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. हे दोन विभाग प्रचंड पैसा कमविण्याचे साधन बनले आहेत. बायपास, कॅन्सर, अँपेंडिक्स, मणक्याचे ऑपेरेशन, सिझेरिअन, गर्भाशय काढण्याचे, कृत्रिम गुडघेरोपनाचे ऑपरेशन हे गरज नसतांना सर्रास केले जाणारे व त्याद्वारे प्रचंड पैसा उकळण्याचे साधन बनले आहे.
अलोपॅथिक चिकित्सा पद्धती निदान (Dignosis) च्या बाबतीत अचुक आहे असे म्हटले जाते परंतु हा सुद्धा एक भ्रम आहे. त्यात चलाखी, कृत्रिमपणा अधिक असतो.
अनावश्यक रक्त - लघवी तपासणी, X-Ray, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, MRI, एन्डोस्कोपी, अँजिओग्राफी ई. अनेक तपासण्या करण्यासाठी रुग्णांना बाध्य केले जाते. *यापैकी 90% तपासण्यांची रुग्णांना गरज नसते. डॉक्टर स्वतः आपल्या अनुभव व कौशल्याच्या आधारे योग्य निदान करू शकतात.* जे शेकडो तपासण्यांपेक्षा जास्त अचूक असू शकते. *या तपासण्यांमागे किती % कमिशन मिळते हे अमीर खानने सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमात जगजाहीर केले आहे.* यात काही अपवाद नसतील असे नाही.
अनावश्यक व्हॅक्सिनेशनचा धंदाही फार जोमात आहे. अनेक लसी अनावश्यक असून या लसींची विश्वासाहार्यता आपल्या देशात अगदीच कमी आहे. औषधी कंपन्या लसीकरणाच्या नावाने अब्जावधी रुपयांचा नफा कमवितात. *मेडिकल सायन्सच्या इतिहासात लाखो लोकांचा बळी या अनावश्यक लसीकरणामुळे गेला आहे.*
औषधी कंपन्या आपली औषधं लिहावी म्हणून डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात रोख, भेटवस्तू, विदेश दौरे प्रायोजित करतात. रुग्णांना जास्तीत जास्त औषधं लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अनावश्यक औषधांच्या दुष्परीणामामुळे रुग्णाच्या शरीरावर घातक दुष्परिणाम होऊन रुग्णांचा जीव व पैसा दोन्हीवर गदा येते. रुग्ण मात्र याबद्दल अनभिज्ञच राहतात.
Unreasonable Profit Making हा फंडा मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलनी अवलंबलेला असून, अनावश्यक ऑपरेशनची मालिकाच आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्यामुळे अनेक ऑपरेशनचा दुरुपयोग सर्रास होतांना दिसून येतो. खुप कमाई असल्यामुळे अनेक शहरांत सुपरस्पेसिलिटी व मल्टीस्पेसिलिटी हॉस्पिटलची साखळीच निर्माण होत आहे. मोठी कार्पोरेट घराणी आता या व्यवसायात उतरली आहेत.
*रुग्णाचा आजार किती गंभीर आहे हे रुग्णाच्या नातेवाईकांना अतिशय चांगल्या पद्धतीने पटवून दिले जाते (तो तसा नसतांना) त्याला विचार करायला वेळही मिळू न देता महागडी ऑपरेशन e.g. Bypass, Angioplasty करायला भाग पाडले जाते.*
असे अनावश्यक ऑपरेशन करतांना किंवा उपचार करतांना रुग्ण दगावला अथवा अधिक गंभीर झाला, तर हॉस्पिटल कोणतीही जबाबदारी न घेता पॆसे मात्र पूर्ण वसुल करतात. अनेक वेळा असे दिसून आले आहे की, सामान्य आजारांकरिता केलेल्या अनावश्यक उपचार अथवा ऑपरेशनमुळे रुग्णाला जीव गमवावा लागला आहे.
व्यवस्थेच्या मुळापर्यंत पसरलेला हा भ्रष्टाचार थांबवणे शासकीय यंत्रणेला शक्य नाही. कारण त्याच भ्रष्ट वृत्तीने ही यंत्रणाही किडलेली आहे.
*स्वतःचे स्वास्थ्य अबाधित राहील अशा आरोग्यदायी सवयी सर्वांनी आत्मसात करायला हव्यात.*
*_डॉ निलेश वंजारी, MBBS - Boston University-*
Monday, 25 July 2022
महानगर पालिका
नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीप्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची 13 ऑगस्टला प्रसिद्धी
मुंबई, दि. 25 (रानिआ) : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 22 ऑगस्ट 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रारुपाच्या स्वरुपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 22 ऑगस्ट 2022 पर्यंत संबंधित ठिकाणी हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 2 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.
-0-0-0-
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...











