Thursday, 21 July 2022

अंतर निरंतर

 शेवटी अंतर तेवढचं राहीलं !

🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄

लहानपणी, लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं... आपण ही खावं..., ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाहीं... 

मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली...

     😢 शेवटी अंतर तेवढच राहीलं 😪

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे...

मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले... सुती कपडे महाग झाले.

       😢 शेवटी अंतर तेवढच राहिलं 😪


🦢🦢🦢🦢🦢🦢🦢

लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची,... शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची... 

मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले...

   😢 शेवटी अंतर तेवढच राहिलं 😪

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा, काळा चहा मिळायचा... अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो... वाटायचं आपणही प्यावा पण ?

आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.

 😢 शेवटी अंतर तेवढच राहिलं 😪

⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चार चाकी मधून फिरताना बघायचो, वाटायचं, आपणही फिरावं, आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना बघितले की वाटत...

  😢 शेवटी अंतर तेवढंच राहीलं 😪

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं... 

आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावल्या 

  😢 शेवटी अंतर सारखच राहतं...😪

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लहानपणी चाळीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं, आज तीच मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट / विपशना ) मध्ये राहतात तेंव्हा 

  😢 शेवटी अंतर सारखंच राहतं... 😪

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

_आता कळलं...हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं जसा आहे, तसाच राहाणार... कुणाचं पाहून बदलणार नाही..._

म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी म्हंटले होते ,

ठेविले अनंते तैसेचि राहावे, 

चित्ती असू द्यावे समाधान ...

🌻🌼🌻🌼🌻🌼🌻

मित्रांनो खूष रहा, समाधानी राहा, वाट्याला आलेले जिवन खुप सुंदर आहे, त्याचा मनमुराद आनंद उपभोगा. 

कुणाचं *दुसऱ्याचे पाहून* आपल्या स्व-आनंदाची व्याख्या बदलवू नका.

स्व देशी अपना o

 


Imp डिसिजन

 मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्कभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

            मुंबई, दि. 21 : केंद्र सरकारच्या डिजिटल आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साधण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने युएसएसडी अर्थात असंरचित पूरक सेवा डेटा आधारित मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवा पूर्णपणे नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे भारत राजपत्र दि. 7 एप्रिल 2022 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.

            यापूर्वी मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांच्या प्रत्येक युएसएसडी सत्राकरिता 50 पैसे शुल्क आकारणी केली जात होती. या निर्णयामुळे ही सेवा आता पूर्णपणे नि:शुल्क झाली आहे. तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधा नसणारे फोन वापरणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना डिजिटल बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या डिजिटल आर्थिक समावेशन या उपक्रमाला चालना मिळणार आहे, तसेच युएसएसडी देवाण-घेवाणीच्या संख्येवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

            डिजिटल आर्थिक सेवांवरील असंरचित पूरक सेवा डेटा (युएसएसडी) शुल्क कमी केल्याने शासनाच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. हा निर्णय डिजिटल आर्थिक समावेशनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असेही भारत सरकारच्या राजपत्रात नमूद करण्यात आले आहे.

00



 


                                                                           

नागरी संरक्षण

 बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, पालघर येथील

नागरी संरक्षण स्वयंसेवक आपत्कालीन कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज.

            मुंबई, दि. 21 : मुंबई शहरातील नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांना नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्य बजावण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच दिनांक 18 जुलै 2022 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या प्रशिक्षण केंद्रामार्फत 200 नागरी संरक्षण स्वयंसेवकांना आपत्ती निवारणाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

            नागरी संरक्षण दलाच्या ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, पालघर, जिल्हा पातळीवरील स्वयंसेवकांना जिल्हा आपत्ती निवारण केंद्राशी संपर्कात राहून विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये तसेच पावसाळ्यातील पूर परिस्थितीमध्ये बचाव व मदतकार्य करण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे निर्देश नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने देण्यात आले आहेत.

            मुंबईमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये व शनिवार व रविवारी समुद्रकिनाऱ्यावर व चौपाटीवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. तसेच भरती व ओहोटी दरम्यान अपघात रोखणे आवश्यक असते. या परिस्थितीत मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, वर्सोवा चौपाटी, गोराई या ठिकाणी नागरिकांना चौपाटीवर जाण्यापासून रोखण्यासाठी, होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच बचाव व मदतकार्य करण्यासाठी नागरी संरक्षण स्वयंसेवकांना सकाळी व संध्याकाळी अशा दोन पाळ्यांमध्ये कर्तव्य देण्यात येणार आहे.

            नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, नाशिक येथील गोदावरी नदीच्या परिसरातील गाडगे महाराज पूल, नेहरु चौक, घारपुरे घाट, रामकुंड, कपालेश्वर मंदिर अशा परिसरातील अति धोक्याचे व वर्दळ असलेल्या ठिकाणी नागरिकांच्या रक्षणाकरिता 16 जुलै 2022 पासून निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी संरक्षण दलातील 50 स्वयंसेवकांना कर्तव्य देण्यात आले आहे.

             ही कार्यवाही राज्य नागरी संरक्षण संचालनालयाचे संचालक ब्रिजेश सिंह,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ प्रशासिक अधिकारी प्रशासन व धोरण डॉ. रश्मी करंदीकर, नागरी संरक्षणचे अतिरिक्त नियंत्रक संजय जाधव, बृहन्मुंबईचे वरिष्ठ प्रशासिक अधिकारी (चालन व भांडार) पो. रा. सांगडे व इतर नागरी संरक्षण दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.

            याद्वारे नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी प्रशिक्षित मनुष्यबळ नागरी संरक्षण स्वयंसेवक हे आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनास उपलब्ध होणार असून त्यामुळे जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यामुळे प्रशासनाला मोलाचे सहकार्य लाभणार आहे, असे नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले कळविले आहे.

०००००


अति वृष्टी

 अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार ४८० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

 

             मुंबईदि. २१ : राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.

          रत्नागिरी  जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा दिनांक ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ०६ वा. ते सायंकाळी ०७ वा. पर्यंत अवजड वाहनाच्या एकेरी वाहतुकीसाठी सुरु राहणार असूनसायंकाळी ०७ वा. ते सकाळी ०६ वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

            नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात सध्याची पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. तसेच वर्धाप्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून, नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात  SDRF ची एक टीम तैनात करण्यात आली आहे.

         चंद्रपूर जिल्ह्यात सध्या पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच चंद्रपूरवरोरा व भद्रावती येथील नागरीकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. तसेच Army चे ०१ पथक, NDRF चे ०१ पथक, SDRF ची ०१ पथक व स्थानिक पथकाच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.

         वर्धा जिल्ह्यात जिल्ह्याची सद्याची पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. यवतमाळ जिल्ह्यात जून ते आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील ११० महसूल मंडळापैकी ९५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सध्या पूरपरिस्थिती आटोक्यात आहे.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १६ तुकड्या तैनात

               मुंबई (कांजूरमार्ग १घाटकोपर १) -२पालघर -१रायगड- महाड- २ठाणे-२रत्नागिरी-चिपळूण -२कोल्हापूर-२सातारा-१चंद्रपूर-१  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१गडचिरोली-१चंद्रपूर-१ अशा एकूण  तीन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)  च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

            राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज  सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

*****



 


Ye रे ये रे पावसा


 

कशी झोकात


 

Featured post

Lakshvedhi