सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 14 July 2022
राज्यपालांच्या उपस्थितीत गुरुवारी आरोग्य कोशाचे प्रकाशन व नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसमवेत आरोग्य विद्यापीठाचा सामंजस्य करार
मुंबई, दि. 13 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण शिल्पकार चरित्रकोशातील ‘आरोग्य कोशाचे’ प्रकाशन व नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसमवेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सामंजस्य करार या कार्यक्रमांचे सह्याद्री राज्य अतिथीगृहात गुरुवारी 14 जुलै 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार असून कार्यक्रमास वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे उपमुख्यमंत्री रॉजर कुक, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड टेम्पलमन, युनिर्व्हसिटी ऑफ नॉटे डेम ऑस्ट्रेलियाच्या प्रति-कुलगुरु प्राध्यापिका सेलमा अलिक्स, कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण शिल्पकार चरित्रकोशातील आरोग्य कोशाचे प्रकाशन करण्यात येणार असून या आरोग्य कोशात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींची थोडक्यात माहितीचा समावेश आहे. या आरोग्य कोशात सुमारे 550 पेक्षा अधिक चरित्रनायकांचा समावेश करण्यात आला असून विद्याशाखानिहाय ते वर्गीकृत करण्यात आले आहेत. प्रकाशित करण्यात येणारा आरोग्यकोश शिक्षक, विद्यार्थी व अभ्यागतांकरीत उपयुक्त असणार आहे. तसेच या कार्यक्रमात आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ नॉट्रे डेम ऑस्ट्रेलिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या करारातंर्गत शिक्षणाकरीता आंतरराष्ट्रीय धोरणात्मक मूल्यानुसार संबंधित विषयांमधील तज्ञांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थी आणि कर्मचारी गतिशीलतेसाठी संधी वाढवणे, आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्य मजबूत करणे, विद्यापीठ संसाधने आणि सुविधांच्या परस्पर विनिमयासाठी प्रक्रिया सुरू करणे, उच्च दर्जाचे शिक्षण आणि संशोधन संदर्भात जागरूकता वाढविणे आदी बाबींचा समावेश असणार आहे.
शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर महत्वपूर्ण असून आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असून आरोग्य सेवा क्षेत्रात उदयोन्मुख तंत्रज्ञान-आधारित प्रतिबद्धता आणि उपक्रम तयार करण्यासाठी कार्य करण्यात येणार आहे. हेल्थकेअर क्षेत्रातील संभाव्य क्षेत्रे ज्यामध्ये सहकार्य करू शकतात अशा मॉडेलद्वारे आरोग्य सेवा वितरण सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखाली रिमोट हेल्थकेअर उपाय, रुग्णांची काळजी, प्रयोगशाळा, वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण आदी बाबींचा यात समावेश असणार आहे.
विद्यापीठातील वैद्यकीय इतिहास संग्रहालयाचे नुतनीकरण करण्यात येणार असून केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालय अंतर्गत कार्य करणारे अहमदाबाद येथील नॅशनल डिझाईन संस्थान समवेत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या करारानुसार कामाचे तीन टप्पे असून पहिल्या टप्प्यात वैद्यकीय इतिहास संग्रहालय पुनर्विकासासाठी आवश्यक मूल्यमापन आणि योजना तयार करण्यात येणार आहेत दुसऱ्या टप्प्यात संग्रहालयाची संकल्पना आणि रचना तसेच अंतीम टप्प्यात संग्रहालयास मूर्त रुप देण्यात येणार आहे. आरोग्य शिक्षण व संशोधनासाठी शिक्षक, विद्यार्थी व अभ्यागतांना माहितीसाठी विद्यापीठ आवारातील संग्रहालय महत्वपूर्ण असणार आहे.
मलबारहिल मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात सकाळी 11.00 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
राष्ट्रपती निवडणूक
राष्ट्रपती निवडणूक - २०२२ साठी जय्यत तयारी
निवडणूक पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक
मुंबई, दि.१३ : राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी सर्व विभागांनी काटेकोरपणे नियोजन करून, सुरक्षा व्यवस्था, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, पासेसची व्यवस्था, नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश याबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश निवडणुकीच्या अनुषंगाने उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले.
विधानभवन येथे, राष्ट्रपती निवडणुक २०२२ पूर्वतयारी बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे बोलत होते. यावेळी विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था मिलिंद भारंबे, शासन मुद्रण व लेखन सामुग्री संचालनालयाचे संचालक रूपेंद्र मोरे, विद्युत कार्यकारी अभियंता सुनीता रावते, वाहतूक पोलीस उपायुक्त महेश पाटील, विधानभवन सुरक्षा व्यवस्थाप्रमुख अर्जुन शिवकुमार, गृह विभागाचे उपसचिव संजय खेडकर, आरोग्य सेवा संचालक डॉ.साधना तायडे, मुंबईचे विमानतळ सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त राज तिलक, नागरी विमान वाहतूक महानिदेशालयाचे प्रादेशिक उपायुक्त अशोक सातवसे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अवर सचिव सुभाष नलावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता रेश्मा चव्हाण यावेळी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे म्हणाले, राष्ट्रपती निवडणुकीकरिता दिनांक १८ जुलै,२०२२ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वा.या कालावधीत विधान भवन, मुंबई येथे मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी आवश्यक सुरक्षाव्यवस्था गृह विभागाने द्यावी. राष्ट्रपती निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेटी व इतर साहित्य वाहनाने विधान भवन ते मुंबई विमानतळ (टर्मिनल-२) येथे नेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सुरक्षा व्यवस्था तसेच वाहनासाठी विधान भवन, मुंबई ते मुंबई विमानतळ असा "स्वतंत्र मार्ग" राखीव ठेवावा जेणेकरून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.आरोग्य विभागाने या निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सेवक यांची नेमणूक करावी. सुरक्षा अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेचे छायाचित्रण व व्हिडीओ चित्रीकरण करणारे प्रतिनिधी यांना विमानतळाच्या अंतर्गत भागात प्रवेश देण्याबाबत संबंधितांना विशेष प्रवेशपत्र देखील देण्यात यावेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी दिल्या.
विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत म्हणाले, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण मुंबईने राष्ट्रपती निवडणुकीकरीता अधिकारी व मतपेटी यांची सुरक्षा विषयक तपासणी न होता थेट विमानात प्रवेश मिळण्याबाबत विमानतळ येथील नियुक्त अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबईने भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या अनुषंगाने मतदान कक्ष (आकार २१ x २१ x २१) तयार करावा, मतपेटीस लावावयाचे स्टीकर्स बनविणे, मतदारांकरिता सूचना देणारे फ्लेक्स बनविण्यात यावेत अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. अग्निशमन विभागाने अग्निप्रतिबंधक उपाययोजना व सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक ठिकाणची व्यवस्था तसेच विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी बैठकीत करण्यात आल्या.
दिलखुलास
‘दिलखुलास’ कार्यक्रमातडॉ. रेवत कानिंदे यांची मुलाखत
मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जे. जे. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवत कानिंदे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरूवार दि. 14 जुलै व शुक्रवार 15 जुलै 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, त्यासाठी त्यांच्यावर कोणताही आर्थिक ताण येऊ नये यासाठी राज्यात महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना आरोग्याच्या सुविधा प्राप्त होत आहेत. या योजनेविषयी सविस्तर माहिती डॉ. कानिंदे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली.
सुप्रभात
:🙏
*सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी...*
*पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून..*
*आणि*
*दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून.....*
*विश्वास हा किती छोटा शब्द आहे,*
*वाचायला सेकंद लागतो,*
*विचार करायला मिनीट लागतो,*
*समजायला दिवस लागतो,*
*आणि*
*सिध्द करायला संपूर्ण आयुष्यचं लागतो*
*🙏शुभ सकाळ🙏*
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...


.jpg)