Wednesday, 13 July 2022

Guru

 


*!!  गुरु पोर्णिमा  आहे तरी आपल्यासाठी पोर्णिमे संदर्भात थोडी महत्वपूर्ण माहिती देत आहे !*

*आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा हा मंगलदिन आहे. ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.*

*गुरूंचे अनेक प्रकार आहेत. १) पृच्छक गुरु, २) चंदन गुरु, ३) अनुग्रह गुरु, ४) कर्म गुरु, ५) विचार गुरु, ६) वात्सल्य गुरु, ७) स्पर्श गुरु.* 

     *दत्तभक्तांसाठी हा पूण्यपावन दिवस !* 

*गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।*

*गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः॥* 

*“जो जो जयाचा घेतला गुण । तो म्यां गुरु केला जाण ।* *अवधूतांनी २४ गुरु केले. या चोविसांचे महत्व तीन प्रकारांत आहे. एक सदगुण अंगीकारासाठी गुरू, दोन अवगुण* *त्यागासाठी गुरु आणि तीन ज्ञानप्राप्तीसाठी गुरु. म्हणजे ‘गुरु’ हे लौकिक दॄष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील.*

*‘गुरुचरित्र’ या ग्रंथात श्री गुरुंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरुंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्व सांगितले आहे.*


*या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतो. वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे साधक - पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात..परंतु*

   *खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे*

*गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वच नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही.*

     *कलीने ब्रह्मदेवांना ‘गुरु’ शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला, की ‘ग’ कार म्हणजे सिध्द होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या जगाचे पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरुंच लागतो.*   

     *कैलास पर्वतावर भगवान शंकराने पार्वतीमातेसह पारमार्थिक संवादात जगाच्या उद्धाराविषयी बोलताना गुरुंचे महत्व सांगितले आहे.. त्यास गुरुगिता असे म्हणतात..* 


   *गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व गुरुंमध्ये आपले सदगुरु आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरु साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात यत्किंचितही बदल, फेरफार करत नाही. परंतु तो भोग सोयीने (सहजतेने) भोगण्याची तरतूद मात्र निश्चितपणे करतात. भोगाची तीव्रता कमी करतात.* 

   *आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सदभावाने सदगुरु चरणाची सेवा करावी.*

*जेव्हा साधकाला अनुग्रह होतो तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो.* *ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।*

*मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥* *सदगुरुंचा सहवास हा सुमधुर असतो. ते चालते-बोलते ईश्वराचे अंशच असतात.*

     *मित्रांनो साधकाने कोणत्याही गुरुंची निंदा करू नये. तसेच आपल्याही गुरुंची निंदा कोणी केलेली ऐकू नये. तिथून निघून जावे. गुरुनिंदा करणे म्हणजे महापाप होय. गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्यशक्ती आहे.* 

*गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे !*


*जय श्री गुरुदेव दत्त*🙏🙏 

*ऊॅं नमो नारायण*🙏🙏

गुरू देव

 सर्व तीर्थक्षेत्रे तुझ्या चरणी आहेत.

हे गुरुदेव, तुझ्या चरणी नमस्कार असो.

आई गौरी लक्ष्मी हृदयात आहे,

शारदा कंठात आहे.

जो कोणी तोंडाने शब्द उच्चारतो,

तो शब्द सिद्ध होतो.

गुरु ब्रह्मा आहेत, गुरु विष्णू आहेत,

भगवान शंकर तुझ्या चरणी आहेत.

हे गुरुदेव, तुझ्या चरणी नमस्कार असो.


आई जन्मदाता

आहेस, कर्म देणारी तू आहेस.

तुम्ही देवाशी जोडले आहात,

तुम्ही नशिबाचा निर्माता आहात.

आजारी मनाला आजारी शरीर मिळते,

विश्रांती तुमच्या चरणी असते.

हे गुरुदेव, तुझ्या चरणी नमस्कार असो.


दुर्बलांना बलवान बनवा,

मूर्खाला सद्गुणी परमेश्वर बनवा.

देवकमल आणि वंशी यांनाही ज्ञानाचे दोन वरदान,

गुरु.

हे महान दाता, हे महान ज्ञानी,

मी सकाळ संध्याकाळ तुझ्या चरणी राहीन.

हे गुरुदेव, तुझ्या चरणी नमस्कार असो.


कर्ता हे करू शकत नाही,

परंतु गुरू हे सर्व करू शकतात.

नऊ ब्लॉकमध्ये सात बेटे,

माझ्या गुरूपेक्षा कोणीही मोठा नाही.


सर्व पृथ्वी कागदाची असावी,

लेखन सर्व वनीकरण आहे.

समुद्राला शाई द्या,

पण गुरुचे गुण लिहू नका.


सर्व तीर्थक्षेत्रे तुझ्या चरणी आहेत.

हे गुरुदेव, तुझ्या चरणी नमस्कार असो.

सुप्रभात



 

भवताल


 

भवताल

 बदललेल्या पावसाची कोकणची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ४४)

कोकणात पावसाचे वेळापत्रक हे अगदी ठरलेले असायचे. त्यात सहसा बदल झाल्याचे आठवत नाहीत. त्यानुसारच सर्व तयारी, कामे व्हायची. गेल्या पंचवीस वर्षांत मात्र पावसाचे सगळे वेळापत्रकच बदलल्याचे जाणवते. विजा पडण्याचे प्रमाण वाढले. पावसाळा भीतिदायक वाटू लागला. चार महिनेच पाऊस पडण्याचे दिवस संपले, एखाद्-दुसऱ्या वर्षाचा अपवाद वगळला तर दर महिन्यात पाऊस पडतो आहे...

पाऊस म्हटले की कोकणची आठवण येते. तिथल्या धो-धो पावसाचे आकर्षण सर्वांनाच असते, पण त्यातही आता बदल झाले आहेत. या बदलांच्या वर्णनातून कोकणच्या पावसाची खरीखुरी गोष्ट समजते!

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Konkan-Rain

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४४ वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


पुरस्कार

 राज्यपालांच्या हस्ते दिया मिर्झा, अफरोज शहा मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित.

            मुंबई, दि. 12 : पर्यावरण रक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा तसेच मुंबईतील वर्सोवा सागरी किनारा स्वच्छता मोहीमेचे नेतृत्व करणारे पर्यावरण कार्यकर्ते अफरोज शहा यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे 'मदर तेरेसा स्मृती पुरस्कार २०२१' प्रदान करण्यात आले.

            पर्यावरण सेवा ही ईशसेवा असून त्यातून माणसाला आत्मिक समाधान लाभते. दिया मिर्झा व अफरोज शहा यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी पर्यावरण संवर्धन कार्यात पुढाकार घेतल्यामुळे अनेक युवक पर्यावरण रक्षण - संवर्धनाच्या कार्याशी जोडले जातील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

            पुरस्कार रूपात दिया मिर्झा व अफरोज शहा यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

            कार्यक्रमाला हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष अब्राहम मथाई व सुसान अब्राहम प्रामुख्याने उपस्थित होते. सानिया शेट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

००००

Governor presents Mother Teresa Memorial Award to Dia Mirza, Afroz Shah.

            Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Mother Teresa Memorial Award for 2021 to actor and UN Goodwill Ambassador for Environment Dia Mirza and 'UN Champion of the Earth' awardee Afroz Shah at Raj Bhavan Mumbai on Tuesday (12 July).

            The awards instituted by the Harmony Foundation were presented to Dia Mirza and Afroz Shah in recognition of their outstanding work for the protection of the environment.

            Speaking on the occasion, Governor Koshyari said service to the environment is service to God. He said association of well known personalities such as Dia Mirza and Afroz Shah with the environment protection movement will encourage more people to work for the preservation of the environment.

            Founder of Harmony Foundation Abraham Mathai and Susan Abraham were present. Sania Shetty conducted the proceedings.

0000


पर्जन्य



 

Featured post

Lakshvedhi