सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 11 July 2022
वरी आरोग्य sudhari
आपल्या कडे उपासाच्या दिवशी भगर सेवन करतात.भगरी बद्दल जाणून घ्या।
*भगरीचे आरोग्यासाठी फायदे...❗*
भगर म्हणजेच *‘वरीचे तांदूळ’* हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.
सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.
पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.
आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.
खरंतर भगर हे काही धान्य नाही. भगर म्हणजे शेतात आपोआप उगवणाऱ्या गवताच्या एका प्रकारच्या बिया.
हिंदीमध्ये याला ‘सामा चावल’ म्हणतात.
शिजलेल्या भगरीची चव सुद्धा काहीशी भातासारखीच असते.
भगर हे पटापट वाढणारे पीक आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ‘बी’ पेरल्यापासून केवळ पंचेचाळीस दिवसात भगरीचे पीक तयार होते.
भगर हे अख्या भारतभर उपासाच्या दिवशी केले जाते, पण ते केवळ उपासापुरते मर्यादित न ठेवता इतर वेळेस पण खाण्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण आता बघणार आहोत.
जाणून घेऊयात भगरीत असलेली पोषकद्रवे आणि त्याचा आपल्या शरीराला होणारा उपयोग
*१. जास्त प्रमाणात प्रोटीन*
भगरीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यापेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात. जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा अंगात शक्ती येते.
कॅलरी कमी असल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सुद्धा भगर उपयुक्त ठरते.
*२. फायबर रिच फूड*
भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात.
आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्हायला फायबरची गरज असते.
म्हणूनच आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पचनाच्या तक्रारी कमी होतात.
भगर पचायला हलकी असते. भगर खाल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो दूर होतो, गॅसेस होत नाहीत आणि अपचनामुळे पोट दुखत असेल तर ते सुद्धा दुखायचे कमी होते.
आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पोट भरल्याची भावना सुद्धा लवकर येते आणि जास्त वेळासाठी टिकून राहते. त्यामुळे जेवण कमी जाते पण पोट भरते
या कारणामुळेच वजन कमी करायचे असेल तर भगर हा एक चांगला पर्याय आहे.
*३. लो ग्लायसेमिक इंडेक्स*
भगर हे ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ आहे. ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ म्हणजे असे अन्न ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि असलेले कार्बोहायड्रेट पचायला अतिशय सोपे असते.
यामुळे सुद्धा वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भगर फायदेशीर आहे.
*‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’* असलेल्या अन्नामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
मधुमेह असणाऱ्या लोकांना या प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.
अर्थातच मधुमेह असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर असते.
*४. ग्लूटेन फ्री*
भगरीत ग्लूटेन नसते. ग्लूटेन म्हणजे आपण खातो त्या धान्यात आढळणारा एक चिकट पदार्थ.
आपण ज्या धन्याच्या पिठाला मळतो त्यात ग्लूटेन असते, उदाहरणार्थ गव्हाचे पीठ. पिझा, पास्ता, ब्रेड यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते.
ग्लूटेनमध्ये काही पोषक द्रव्ये नसतात, काही लोकांना ग्लूटेनची ऍलर्जी सुद्धा असते.
ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्यांना पोटात दुखणे, अपचन यासारखे त्रास होतात.
अशांसाठी भगर जे पूर्णपणे ग्लूटेन फ्री आहे हा एक उत्तम पर्याय आहे, जो पचायला हलका आहे हे आपण वर बघितलेच आहे.
*५. जास्त प्रमाणात आयर्न*
भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते. म्हणूनच आपल्याला जर ऍनेमियाचा त्रास (शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) सरल तर शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी भगर उपयोगी आहे.
इतर कोणत्याही धान्यात असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात आयर्न भगरीतून मिळते.
साधारण १०० ग्राम भगरीतून १८.५ एमजी आयर्न मिळते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी भगर हा आयर्नचा सर्वोत्तम स्रोत आहे.
*६. व्हिटॅमिन्स आणि खनिजे यांचे प्रमाण जास्त*
भगरीत व्हिटॅमिन ‘सी’, ‘ए’ आणि ‘इ’ जास्त प्रमाणात असतात.
तसेच भगरीत खनिजे सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.
*७. सोडियम फ्री फूड*
भगरीत सोडियम नसते ज्यामुळे बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो.
*८. भरपूर अँटिऑक्सिडंट्स*
साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.
अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातल्या पेशींची फ्री रॅडिकल्स नावाच्या धोकादायक मॉलिक्यूल पासून संरक्षण करतात.
मोठी माणसे भगर जरी उपसाला खात असले तरी बाळाला पहिल्यांदा बाहेरचे अन्न देताना, अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून भगरीची खीर करून दिली तर बाळासाठी तो उत्तम पोषक आहार ठरतो.
कारण ती पचायला अतिशय हलकी असते.
भगरीसारखे इतके सकस अन्न, फक्त उपवासासाठी न वापरता त्याचा रोजच्या आहारात उपयोग झाला पाहिजे.
सुंदर माझे कार्यालय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
'सुंदर माझे कार्यालय अभियान' पुरस्काराचे वितरण
'सुंदर माझे कार्यालय' उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयात कार्यक्षमपणे राबवावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर, दि.10 :- सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेला 'सुंदर माझे कार्यालय' हा उपक्रम स्तुत्य असून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात हा उपक्रम कार्यक्षमपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित 'सुंदर माझे कार्यालय अभियान' अंतर्गत विजेत्या कार्यालयास पारितोषिक वितरणाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी आमदार तानाजी सावंत, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर आणि पोषक असल्यास शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. याचा फायदा प्रशासनाला आणि सामान्य जनतेला होतो, यामुळे प्रशासनाचे काम सुलभ, पारदर्शी आणि गतिमान होण्यास मदत होवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण होते.
शासनाचे धोरणात्मक निर्णय समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी महसूल विभागाची आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महसूल विभाग कार्यक्षम असला पाहिजे. शासनाची अनुकूल प्रतिमा निर्माण करण्यासाठी दैनंदिन कामकाजात गतिमानता आली पाहिजे. शासन आणि प्रशासन सोबत मिळून काम केल्यास राज्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, राज्य प्रगतीपथावर जाईल, असे श्री.शिंदे म्हणाले. 'सुंदर माझे कार्यालय' हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी, आदर्शवत ठरेल.
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 15 फेब्रवारी 2022 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत 'सुंदर माझे कार्यालय' हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये कार्यालयीन स्वच्छता, प्रशासकीय बाबी यावर अधिक भर दिला. स्पर्धेमध्ये 308 तलाठी कार्यालये, 80 मंडळ अधिकारी आणि 12 तहसील कार्यालये सहभागी झाली होती. या अभियानामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यामध्ये सकारात्मकता येऊन 125 तलाठी सजामध्ये 90 टक्के ई-पीक पाहणी पूर्ण झाली. 499 तलाठी सजामध्ये 100 टक्के सातबारा वाटप, 26 मंडळ अधिकारीस्तरावर 80 टक्के वसुली झाली. यातून सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट सेवेचा लाभ मिळाला. तसेच लोकसहभागही लाभला. लोकसहभागातून 7 तलाठी आणि 3 मंडळ अधिकारी कार्यालयांचे नव्याने बांधकाम केले. मोडकळीस आलेल्या 33 तलाठी व 8 मंडळ अधिकारी कार्यालयाचेही बांधकाम केले. कार्यालयात सोयी-सुविधा, स्वच्छता असल्याने नागरिक, कर्मचारी समाधान व्यक्त करीत आहेत. त्यामुळे अभियान इतरांसाठी प्रेरणादायी, आदर्शवत ठरेल, असा विश्वास श्री.शंभरकर यांनी व्यक्त केला.
पुरस्कारप्राप्त कार्यालये
■ तलाठी कार्यालय प्रथम क्रमांक रत्नदिप माने, तलाठी सजा, वडाळा, ता. उत्तर सोलापूर, द्वितीय क्रमांक दीपक ठेंगील, तलाठी सजा, मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर, तृतीय क्रमांक प्रिती काळे, तलाठी सजा, वेणेगाव, ता. माढा, चतुर्थ क्रमांक खंडू गायकवाड, तलाठी सजा पुळूज, तालुका पंढरपूर.
■ मंडळ अधिकारी कार्यालय -प्रथम क्रमांक सुजित शेळवणे, मंडळ अधिकारी कार्यालय, लऊळ, ता. माढा. द्वितीय क्रमांक- चंदू भोसले, मंडळ अधिकारी कार्यालय, अकलूज, ता. माळशिरस आणि तृतीय क्रमांक रवींद्र शिंदे, मंडळ अधिकारी कार्यालय, भाळवणी, तालुका पंढरपूर.
■ तहसील कार्यालय: प्रथम क्रमांक जगदीश निंबाळकर, तहसीलदार, तहसील कार्यालय माळशिरस तसेच अभिजीत पाटील, तहसीलदार, तहसील कार्यालय सांगोला आणि अमोल कुंभार, तहसीलदार, दक्षिण सोलापूर यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.
यावेळी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी गजानन गुरव, सुमीत शिंदे, हेमंत निकम, चारुशिला देशमुख, संबंधित तहसीलदार उपस्थित होते.
........
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...




