सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 10 July 2022
कोकणची माणसं
कोंकणातील मुली ज्या कोंकणी मुलांना लग्नात नकार देतात आणि घाटावरच्या मुलांन सोबत लग्न करून जातात ( नव्याची नवलाई नऊ दिवसाची ) मग पश्चाताप करतात त्यांनी मन लावून वाचा आणि विचार करा कोकणात जन्म घेण्याचं आपल्या हातात नसतं पण त्या नंत्तर ही कोंकणी होण्याचं सौभाग्य मात्र नक्की मिळू शकतं 🙏🙏🙏
कोकणातला शेतकरी आत्महत्या का करत नाही याचे उत्तर 👇🏻👇🏻. मराठवाड्यातील आपल्या शेतकऱ्यांनी तसेच आम जनतेने हे जगणे जाणले तर बऱ्याच समस्या कमी होतील.
एका प.महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी महिलेची पोस्ट ।।
*मेरे कणकण में कोकण समाया मितवा*
माझं जन्म गाव, शिक्षण सगळं सांगली जिल्ह्यातील आहे. पण माझी कर्मभूमी रत्नागिरी कोकण आहे.. जन्मभूमी म्हणून ओढ आहे, पण मी कोकण शिवाय जगू शकत नाही... मी रत्नागिरी शिवाय राहू शकत नाही... कारण, कारणं तर खूप आहेत..
कोकणात सगळ्या चालीरीती आहेत ना त्या सगळ्या मानवाला खुश ठेवणाऱ्या आहेत, जगण्याचा सोहळा करणाऱ्या आहेत...
इथला बाप कधी हुंडा देत नाही, अन हुंडा घेत नाही... त्यामुळे मुलीला जन्म देण्यापूर्वी तपासणी करत नाही.. जन्माला येईल ते अपत्य तेवढ्याच प्रेमाने वाढवतो...
इथं मुलींना सासुरवास नसतो, सून नोकरी करणारी असेल तर, सासू तिच्या हातात डबा तयार करून देते, किंवा सासरे डबा पोचवायला ऑफिस मध्ये येतात हे मी स्वतः पाहिले आहे...
इथली लोकं खूप कष्टाळू आहेत, एक ग्लास तांदुळाच्या पिठीची 20 भर आंबोळ्या टाकून घर जेवू घालते इथली बाई..
फणसाच्या अठीळा शिजवून प्रोटीन देते सगळ्या घराला..
इथला शेतकरी, रस्त्यावर दूध ओतणार नाही, निषेध म्हणून ते दूध गावभर फुकट पोहचवून येईल!
आंब्याचं नुकसान झालं तर रस्त्यावर आंबे नाही फेकणार.. त्याला अन्न म्हणजे पूर्णब्रह्म आहे हे माहीत आहे!
पुरात, वादळात नष्ट झालीत झाडं.. वीजेच्या तारा तुटल्याने महिना महिनाभर वीज नव्हती... पण, आरडाओरडा न करता, एकमेकांना श्रमदानातून नवीन झाडांची लागवड केली...
एकदा पीक गेलं की शेतकऱ्यांचं एक वर्षाचं नुकसान होतं.. पण, इथं वादळात, 60-70 वर्षांची झाडं उन्मळून पडली, तरीही चिकाटीने नवीन बाग रोवली...
मागच्या वादळातली बाब.. कोरोनामुळे वाहतुकीवर निर्बंध होते, वादळामुळे सगळं ठप्प... मनात विचार केला, की याच जनतेने दिलेल्या महसूल करामधून दरमहा पगार मिळतो, त्यातला थोडा भाग त्यांच्यासाठी देऊ! मग आम्ही ZP तल्या कर्मचाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एका रात्रीत 2.50 लाख रुपये वर्गणी जमा केली, अन त्या लोकांपर्यंत पोचलो अन त्यावेळी त्यांच्या मनातलं जाणलं, हृदय जाणलं!
त्यांचं म्हणणं एकच,"माझ्या पणजोबाची बाग, त्यांनी लावली म्हणून मी खाल्ली, आता मी लावली तर माझे वारस खातील..."
इथं मुलगा मुलगी भेदच नाही, पोरापोरींना समान न्याय आहे... मुलीने प्रेम प्रकरण केले तर खानदान की इज्जत जाते वगैरे असे प्रकार इथे फारसे दिसत नाहीत! पोराने परजातीतील मुलीशी लग्न केलं म्हणून त्याचं तोंड आयुष्यभर बघणार नाही, असली फालतू कट्टरता इथं नाही...
आपलीच पोरं म्हणून आईवडील पोसतात...
बारीकसारीक भांडणावरून कोर्टात जातील पण, खून पडणार नाहीत...
कायद्यावर, प्रशासनावर खूप विश्वास आहे इथल्या लोकांचा... नियमात वागतील अन नियमात काम करून घेतील...
जीव लावणे, घासातला घास देणे कोकणात शिकावे..
इथं मी कामानिमित्त रात्री 3 वाजता सुध्दा एकटी फिरले आहे, अजिबात भीती वाटत नाही..
इथं स्त्रीचा खूप सन्मान राखला जातो..
मी स्वतः पाहिलंय, एका माणसाचे दुकानातून घेतलेले गहू, रस्त्यावर सांडले.. तर लोकांनी त्यावर गाड्या न घालता, 3-4 जण गाडी थांबवून उतरून गहू जमा करून भरून दिले!
आम्ही सरकारी कर्मचारी सुध्दा, आपण या जनते साठी आहोत याची जाण ठेवून लोकाभिमुख काम करतो!
सरकारी कर्मचाऱ्यांना किलोभर तांदूळ, 4 आंबे, 2 नारळ, कुळीथ.. ही प्रेमाने दिलेली भेट इथं मिळते... त्यात गरिबांचे प्रेम असते..
भाऊंनो, बाईंनो अशी प्रेमाने हाक असते..
मी 18 वर्षे कोकणात एकटी, माझं लहान मूल घेऊन राहिले, मूलगा आता 21 वर्षाचा आहे... पण, मला कधी इथं असुरक्षित वाटलं नाही...
माझे शेजारी अन माझे कार्यालयातले सहकारी यांनी माझी कधीही अडचण निर्माण होऊ दिली नाही...
मी आजारी असताना औषधे आणून देणे, मी बाहेर असेल तर माझ्या घरात दूध भाजी पोचवणे, गाडी बंद पडली तरी ती त्या स्पॉट वरून नेऊन परत घरापर्यंत आणून देणे... सगळं घरपोच सेवा देणे हे सगळं आपुलकीने करतात...
इथल्या माणसांच्यात निसर्गतःच प्रेम आहे..
खळाळत्या झऱ्यासारखं जगणं..
धो धो पावसासारखे प्रेम बरसणार..
हिरव्यागार डोंगर दऱ्या प्रमाणे काळीज हिरवंगार...
अथांग समुद्राप्रमाणे विशाल काळजाची माणसं...
फणसाचे गोड गरे, तशी गोड माणसं..
रातांबे जसे लाल, तशी रंगीत माणसं..
करवंद, जांभळे, तुरट गोड...
गणेशोत्सव, शिमग्याची गोष्टच न्यारी... माणसाला वर्षातून बेधुंद होऊन नाचणं हवं, त्यासाठी हे उत्सव..
एकमेकांना मदत करून जीवन जगतात इथली माणसं...
अन मग... मी पण इथलीच झाले आहे... गावाहून येताना, साखरप्याच्या हद्दीत गाडी आली की माझा श्वास मोकळा होतो..
हातखंबाच्या तिठ्यावरून रत्नागिरीत शिरलं की माझ्या कानात आपुलकीचं वारं भरतं
या मातीत मिसळून जायची तयारी आहे...
मी रिटायर्ड झाले तरी, जग फिरत राहीन पण जग फिरून पुन्हा कोकणातच येईन...
माझं घर आहे इथं...
प्रोमोशन झाले तरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्ये घेईन... पण कोकण नाही सोडणार.
(तळटीप: चांगलं वाईट सगळीकडे असतं, अपवादात्मक बाबी सगळीकडे असतात, पण कोकणात मी खूप सुखी आहे)
*©️प्रतिभा देशमुख, रत्नागिरी*
🌹🌹🌹 *जरुर वाचा आणि शेअर करा*.
I my
*""या वर्षी एवढा टॅक्स कसा काय लागला ? मागच्या वर्षी तर नव्हता लागला""*
किंवा
*"या वर्षी एवढे कागदपत्रे का मागत आहे ? मागच्या वर्षी तर नव्हते मागितले"*
👆🏽
वरील वाक्ये या वर्षी प्रत्येक कर सल्लागाराच्या/वकिलाच्या/सिएच्या ऑफिस मध्ये करदात्या कडून ऐकायला मिळत आहेत
तर मित्रानो लक्षपूर्वक खालील माहिती वाचा
👇🏼
इनकम टॅक्स डिपार्टमेंट ने अशी साईट विकसित केली आहे की प्रत्येक PAN/AADHAR नंबर वर होणारा आर्थिक व्यवहार आता सहजपणे आयकर खात्याला विनासायास प्राप्त होत आहेत
सदर व्यवहाराचे संपुर्ण माहिती A.I.S. म्हणजेच Annual Information Statement व T.I.S. म्हणजेच Taxpayers Information Summery व सोबतच 26 AS या माहिती पत्रकात Income Tax च्या साईट वर उपलब्ध आहेत .
रिटर्न भरण्यापूर्वी करदात्याला त्याच्या सगळ्या प्रकारच्या आर्थिक व्यवहाराची माहिती पडताळून पाहण्यासाठी व त्या अनुषंगाने आपापले इनकम टॅक्स रिटर्न भरणे सोपे जावे यासाठी ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे
मागील वर्षीपासून Income Tax Return भरण्यापूर्वी वरील सदर माहिती आपल्या रिटर्न मध्ये दाखविणे अनिवार्य झाले आहे
सहसा नोकरपेशा करदाते फक्त सॅलरी बेस वर आपापले रिटर्न आज पर्यंत भरत आले असावेत
एकदा Form No 16 दिला किंवा पगाराची माहिती दिली की सुटलो असा समज असे
थोड्याबहुत प्रमाणात व्यापारी/व्यवसायी वर्गात पण हेच चित्र असायचे
परंतु आता मात्र यापुढे ताकच काय पाणी सुध्दा फुंकून प्यावे लागेल
कोणत्याही करदात्यांनी AIS व TIS मधील माहिती न पडताळता रिटर्न भरले तर त्याला इनकम टॅक्स ऑफिस कडून नोटीस येऊ शकते
इनकम टॅक्स हा सर्व मार्गातून मिळालेल्या इनकम वर लागत असतो , मग ते शेती सोडून कोणतेही उत्पन्न असो
उपरोक्त AIS व TIS मध्ये खालील काही मोजक्या व महत्वाच्या आर्थिक व्यवहाराची माहिती उदाहरणा दाखल दिलेली आहेत
बँकेतील बचत खात्या वरील व्याज
बँकेतील Fixed Deposit / Term Deposit वरील व्याज
पगारापासून मिळणारे उत्पन
Shares ची खरेदी व विक्री
Mutual Fund ची खरेदी व
विक्री
SIP म्हणजेच Systematic Investment Plan
बॉण्ड चा व्यवहार
पोस्ट ऑफिस मधील व्यवहार
चल ,अचल स्थावर मालमत्तेची खरेदी किंवा विक्री
वेगवेगळ्या कंपन्यांचे Divident
कमिशन
10 लाखवरील सर्वच प्रकारचे व्यवहार
SFT म्हणजेच Specified Financial Transactions
करकपात झालेले म्हणजेच TDS केलेले सर्वच प्रकारचे व्यवहार
इत्यादी..... इत्यादी .....
इत्यादी.... 50 पेक्षा जास्त प्रकारच्या आर्थिक व्यवहाराची माहिती उपरोक्त AIS व TIS मध्ये असल्याने
रिटर्न भरताना सदर माहिती लपविल्या जाऊच शकत नाही आणि त्या आधारावर येत असलेला टॅक्स भरावाच लागेल हे पक्के ध्यान्यात ठेवावे लागेल
मागील वर्षापर्यंत अनेक प्रकारची माहिती लपविल्या जाऊ शकत होती सहसा Shares किंवा Mutual Fund चे व्यवहार लपविल्या गेल्याचे प्रकर्षांने निदर्शनास आले आहेत
पण तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली आहे त्यामुळे सगळ्याच व्यवहारावर CC TV लागले आहेत असे समजले तरी गैर होणार नाही
येणाऱ्या काही दिवसात याची आणखी व्याप्ती वाढलेली दिसेल
त्यामुळे येईल तो टॅक्स भरून शांत झोप घेणे कधीही चांगलेच राहील करचोरी करणे आता सोपे राहिले नाही
याचा अर्थ हा नाही की आपण व्यवहार किंवा व्यापार करू नये किंवा करताना भीती बाळगुन व्यवहार करावे. असे अजिबात नाही . सर्वच व्यवहार सुरळीतपणे चालू राहू द्यावे
फक्त आता आर्थिक शिस्त लावणे गरजेचे झाले आहे एवढेच
कायदेशीर मार्गे कर वाचविण्याचे सर्वच पर्याय नियमा प्रमाणे उपलब्ध राहणारच आहे
आता *राष्ट्र प्रथम* ही भावना लक्षात घेऊन समर्पित भावनेने कर भरून राष्ट्रिय कर्तव्य मात्र पार पाडावे लागेल
Saturday, 9 July 2022
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
