Friday, 1 July 2022

अधिवेशन

 विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी

अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची मुदत 2 जुलै दुपारी 12 पर्यंत.

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 जुलै, 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार, दिनांक 3 जुलै रोजी सभागृहात होईल. विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विशेष अधिवेशनास उपस्थित रहावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे.

००००

कृषी दिन

 कृषि दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा.

महाराष्ट्र सुजलाम- सुफलाम होण्यासाठी प्रयत्न करू !

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कृषी दिनाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

            महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले की, हा दिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊयात.

0000



, पाऊस आला

 


 




 

मुख्यमंत्री

 एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

 

            मुंबईदि. 30 :- महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून श्री.एकनाथ शिंदे यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली तर श्री.देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

            राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रगीतानंतर श्री. शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाचा उल्लेख करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

            या सोहळ्यास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेकेंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटीलकेंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह सर्वश्री प्रवीण दरेकरचंद्रकांत पाटीलआशिष शेलारसुधीर मुनगंटीवारगिरीश महाजनमंगलप्रभात लोढाचंद्रशेखर बावनकुळेप्रसाद लाडराधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर तसेच मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवअपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहनितीन गद्रेप्रधान सचिव दीपक कपूर, मनीषा म्हैसकरविकास खारगेमुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहलएमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासपोलिस महासंचालक रजनीश सेठमुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

            पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

पदभार स्वीकारला

            त्यानंतर मंत्रालयात श्री.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा तर श्री.देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.         

00000






Thursday, 30 June 2022

रोजगार शेळी पालन

Continue.  शेळ्यांचे मांस प्रक्रिया केंद्र स्थापन करणे


            सुमारे १.५ एकर क्षेत्रावर मांस प्रक्रिया केंद्र (१ युनिट) स्थापन करण्यात यावे. याकरिता लागणाऱ्या इतर सर्व सुविधा जसे, बांधकामे, यंत्रसामुग्री इ. उभारणी प्रक्षेत्रावरील जमीन खाजगी व्यक्तीस , संस्थेस भाडेकरारावर विहित प्रक्रियेचा अवलंब करुन देण्यात यावी. ज्या व्यक्ती, संस्थेस भाडेकरारावर जमीन देण्यात येईल, ती व्यक्ती,संस्था सदर केंद्राची उभारणी करेल.

शेळी उत्पादक कंपनी व खाजगी व्यावसायिकांकरिता कार्यालय 

            प्रकल्पांतर्गत सुमारे ०.५ एकर क्षेत्रावर शेळी उत्पादक कंपनी व खाजगी व्यावसायिकांसाठी कार्यालय उभारण्यात येणार. सदर कार्यालय शेळी उत्पादक कंपनी किंवा खाजगी व्यवसायिकांना भाडे करारावर देण्यात येणार.

प्रकल्पाची अपेक्षित उद्दिष्टे :

(१) प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शेतकऱ्यांचे समूह तयार करून, त्या माध्यमातून त्यांना शेळी पालन व्यवसायाकरिता प्रवृत्त करणे, तसेच त्यांचे या व्यवसायाबाबतचे कौशल्य विकसित करून, त्यांच्यामध्ये स्वयंरोजगार निर्मिती होऊन त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचविण्यास याचा फार मोठा हातभार लागणार आहे.

(२) या भागातील शेळी पालकांना सतत निर्माण होणारा शेळ्यांच्या विपणन व्यवस्थेचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे, यामुळे शेतकऱ्यांकडे उपलब्ध होणाऱ्या शेळ्यांना निश्चितच जास्त किंमत मिळून त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

 (३) शेळ्यांपासून मिळणाऱ्या विविध पदार्थ व उपपदार्थ यांचे प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन उद्योजक निर्माण तर होईलच, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती सुद्धा होईल.

(४) प्रक्रिया उद्योगामध्ये निर्माण होणारे नाशवंत पदार्थ जास्त दिवस साठवता यावे याकरिता शितगृह स्थापन करण्यात येत आहे. याचा फायदा उत्पादकांना होऊन, त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापार वाढविण्यास मदत होऊन याचा फायदा निश्चितच शेळी पालकांना होणार आहे.

Featured post

Lakshvedhi