Monday, 27 June 2022

 जनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप.

            मुंबई, दि. 27 : जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

            महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणेशक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

            संबंधित मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विभागांचे काम त्यांच्या नांवासमोर दर्शविण्यात आलेल्या मंत्री व राज्यमंत्री यांचेकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे.

मंत्र्याकडील खातेवाटपात बदल :

            एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल :

             शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.),

            राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)

            अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)

            ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात) आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)

0000

देव आहे अंतरी

 *परमेश्वराची योजना.....बोधकथा.*


एकदा स्वर्गातून घोषणा करण्यात आली की देव सफरचंद वाटायला येत आहेत.सर्व माणसे देवाच्या प्रसादासाठी रांगेत उभी होती.एक लहान मुलगी खूप उत्सुक होती, कारण ती पहिल्यादा देवाला बघणार होती.ती देवाची कल्पना करत मनातल्या मनात खूप खूश होती.देव रांगेतल्या लोकांना सफरचंद वाटू लागले,तीचा क्रमांक आला,देवाने तिला मोठं आणि लाल सफरचंद दिलं ती रांगेतून बाहेर पडताच तीच सफरचंद हातातून निसटून ते चिखलात पडलं.मुलगी उदास झाली.

    आता तिला दुसऱ्यांदा रांगेत राहावं लागणार दुसरी रांग पहिल्यापेक्षा लांब होती, परंतु दुसरा कोणताच मार्ग नव्हता.सर्व लोक प्रामाणिकपणे रांग लावून प्रसाद घेऊन जात होते.शेवटी ती मुलगी पुन्हा रांगेत लागली आणि तिचा क्रमांक येण्याची वाट पाहू लागली.अर्ध्या रांगेतच सफरचंद संपत आले.मुलगी उदास झाली.तिला वाटलं आपण येईपर्यंत सफरचंद संपतील परंतु तिला माहीत नव्हते की देवाचं भांडार कधी रिकामे होत नाही.

     तिचा क्रमांक आला तोपर्यंत आणखी नवे सफरचंद आले.देवाने तिच्या मनातलं ओळखलं ते तिला सफरचंद देत म्हणाले की पहिल्यादा जे सफरचंद दिलं होतं ते एका बाजूने सडलेले होत तुझ्यासाठी ते योग्य नव्हते म्हणून मीच ते तुझ्या हातातून पाडलं होत.दुसऱ्यांदा तुला लांब रांगेत यासाठी उभं राहू दिलं कारण सफरचंद तेव्हा झाडाला होते ते यायला वेळ होता.म्हणून तुला जास्त वेळ वाट पाहावी लागली हे सफरचंद जास्त लाल सुंदर आणि तुझ्यासाठी उपयुक्त आहे.देवाच बोलणं ऐकून मुलगी आनंदी झाली.

    याचप्रकारे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी वाट पाहावी लागत असेलतर देवाची इच्छा समजून त्याचा स्वीकार करा. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना चांगलंच देण्याचा प्रयत्न करतो,त्याचप्रमाणे देवसुद्धा त्याच्या मुलांना तेच देतो जे त्याच्यासाठी चांगलं आहे .


मनुष्याच्या जीवनात केव्हातरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो अनेक व्रते,उपवास करतो पण देव त्याला लवकर मदत करत नाही.परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी रहाते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो.आपण नंतर म्हणतो सुध्दा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्र्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदत सुध्दा ईश्र्वर करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुध्दीयोग देण्याचे कार्य सुध्दा ईश्र्वराचे आहे

पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी *त्या व्यक्ती ला विसरू नये कारण देव स्वतः भेटू शकत नाही मदत करू शकत नाही म्हणून अश्या व्यक्ती ला पाठवतो* आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करावा की आपणही अशीच कोणाची मदत करू जेणेकरून ईश्र्वराची ही व्यवस्था अव्याहतपणे चालू राहिल.


🙏🙏🙏🙏🙏

पाऊले चालती

 पालखी सोहळा लाईव्ह चोरी

पालखी सोहळ्यातील पांढरी टोपी पांढरा शर्ट घातलेला मुलगा निळ्या शर्ट वाल्याची  चैन कशी चोरतो बघा


आरोग्संपन्न

 


यशस्वी

 *✍ज्या पायरीचा सहारा घेऊन*

*आपण पुढची पायरी गाठली आहे*,

*त्या पायरीला कधीच विसरू नये*.

*कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर*

*आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो*…

🙏 *शुभ सकाळ*🙏 lakshvedhimm: लांब उडी , उंच उडी, यशस्वी माणूस मारु शकतो, आपण आपले पाऊले चालती पंढरीची वाट.👏👌

 




 " आई- बाबा, माझा रिझल्ट आला.... मी फर्स्ट क्लासने पास झालो.. " वेद पेढ्यांचा बॉक्स घेऊनच आला होता.

    " देवाजवळ ठेव आधी पेढे.... आशिर्वाद घे.... शेवटी तू तुझं स्वप्न पूर्ण केले. आम्हाला आधी नव्हता आवडला तुझा हा हॉटेल मॅनेजमेंटला अ‍ॅडमिशन घेण्याचा निर्णय! पण तू तुझ्या निर्णयावर अढळ राहिलास आणि ते चांगल्या मार्कांनी पूर्ण केलेस."

       " बाबा नमस्कार करतो... "

    " यशस्वी हो! आता पुढे काय ठरवलंय? "

  " बाबा, आपली थोडी जमीन आहे ना हायवे ला लागून..... मी आणि माझे दोन मित्र मिळून तिथे हॉटेल सुरू करणार आहोत.... आधी थोडेसेच, कामापुरते बांधकाम करून घेऊ..... नंतर जसा जम बसेल तसं हळू-हळू वाढवू हॉटेल..... "

     " वेद, अरे जमीन तर बँकेकडे गहाण आहे.... तिथे काही करू शकत नाही आपण...... तू एखाद्या मोठय़ा हॉटेलमध्ये नोकरी बघ ना आधी...... "

       " बाबा, जमीन गहाण आहे? मला का सांगितलं नाही तुम्ही? आणि गहाण कशाला टाकली जमीन? ....... तुम्हाला माहीत होतं ना मला हॉटेल टाकायचं होतं तिथे.....नोकरी तर मी कधीच करणार नाही.... मला बिजनेस करायचा आहे..... बरं, आपल्याकडे किती पैसे आहेत? भाड्याने घेऊ जागा...."

       " अरे बाळा, पैसे असते तर जमीन गहाणच का टाकली असती? तुझ्या कॉलेजची फी, हॉस्टेलचा खर्च, घरखर्च.... माझ्या पेंशनमध्ये थोडाच भागणार होता? तू दुसरा काहीतरी मार्ग शोध. "

        वेदला बाबांचा फार राग आला. त्याच्या माहितीप्रमाणे त्यांची परिस्थिती इतकी काही बिकट नव्हती की त्यांना जमीन गहाण टाकावी लागेल... आणि आता पैशांची मदतही करणार नाही असं म्हणताहेत...." कसे आई-वडील आहेत? मुलासाठी काहीच करू शकत नाही!"

      वेद त्या दिवशी जेवलाच नाही.... दुसर्‍या दिवसापासुन सकाळीच घराबाहेर पडायचा तो रात्रीच घरी यायचा.... कुठे जातो... काय करतो... आई बाबांना माहीतही नसायचे...

आईने विचारल्यावर नीट उत्तरही देत नसे. 

त्याची आई, बाबांना म्हणाली एकदा," अहो, करा ना त्याला काही मदत.... वणवण भटकतोय पोर! एकुलत्या एक मुलासाठी करायचे नाही मग कोणासाठी करायचे?"

      " यशोदा, अगं, असते पैसे तर दिले असते ना! मी काही वैरी आहे का त्याचा?"

     "पण तो तर वैरी समजायला लागलाय ना तुम्हाला... मला बघवत नाही असा अबोला घरात..... "

वसंतराव यावर काहीच बोलले नाही.


    काही दिवसांनी वेद आईला म्हणाला," आम्ही तीन मित्र मिळून गाळा घेतोय भाड्याने.... छोटेसे स्नॅक्स आणि कॉफी हाऊस सुरू करतोय..... बघू कसे चालतंय ते..... आणि तुम्ही पैसे द्यायची गरज नाही..... गाळ्याचा मालक चांगला आहे डिपाॅझिट नाही घेणार... दोन महिन्यांचे भाडे फक्त आगावू घेणार आहे.. आणि बाकी सामानासाठी माझे काही जमवलेले पैसे आणि काही उधारी यावर भागेल आमचे सध्या..... सांग बाबांना.... मी करेल माझं काय ते! "

       यशोदाबाईंच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.... वसंतराव शांतच होते.

     वेद आता कामात पार बुडून गेला.... सकाळी लवकर बाहेर पडायचा.... रात्री तर बारा वाजायचे जेवायला... आईने दिलेला डबाही परत यायचा.... त्याचे खाण्या-पिण्यावर लक्षच नव्हते...

           पहिले दोन तीन महिने धंदा काही व्यवस्थित होत नव्हता.... सगळा खर्च जाऊन हातात काही शिल्लकच रहात नव्हते.... त्यामुळे त्याची चिडचिड होऊ लागली... त्यात एक मित्र भांडून निघून गेला.. आता दोघांवरच सगळा भार आला. वेदने मग होम डिलीवरी सुरू केली, काही नव्या ऑफर चालू केलेल्या.... फ्री सँपलिंग , कॉलेजच्या समोर स्टॉल.... असे एक ना अनेक प्रयोग करू लागला .... मार्केट स्टडी करून कस्टमरला काय हवं असतं त्याचा अभ्यास केला...... पार्टी ऑर्डर सुरू केल्या....

        हळू हळू त्याचा जम बसू लागला.... ऑर्डर वाढल्या, कस्टमरची गर्दी होऊ लागली.... जागा कमी पडू लागली.... शेजारचा गाळाही भाड्याने घ्यावा लागला .... आता कुठे त्याला मनासारखा नफा होऊ लागला ... धंद्यातील बारकावे समजू लागले... आत्मविश्वास वाढला.... शहरात त्यांचे नाव होऊ लागले....

          एक वर्षात त्याने हॉटेल एकदम नावारूपाला आणले. आता फक्त नाश्ता न ठेवता जेवणाचा मेनू ही ठेवावा असं त्याला आणि मित्राला वाटू लागलं.... पण परत जागेचा प्रश्न! आता त्याने आजुबाजूला कुठे मोकळी जागा भाड्याने मिळते का त्याचा अभ्यास सुरू केला.... बँकेच्या कर्जाचीही चौकशी सुरू केली..... या सगळ्यापासून त्याने आईबाबांना हेतूपुरस्सर दुरच ठेवले होते.... त्याला त्यांची मदत आता अजिबात नको होती.... दुखावला गेला होता तो! स्वतःच्या हिमतीवर सगळं करणार होता.

             वेदचा वाढदिवस आला.... आईने त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ केले.. रात्र होऊन गेली तरी तो अजून आला नव्हता... ती बेचैन झाली....

  "काम असेल का फार त्याला? की मुद्दाम आला नाही लवकर .... आपल्याला त्रास द्यायला आवडतं हल्ली त्याला.. नीट बोलत नाही की काही सांगत नाही." 

     रात्री दहाला तो आला. आईने त्याला पटकन आवरून घ्यायला सांगितले..... बाबांनी टेबलवर केक आणून ठेवला... आईने औक्षणाचे ताट तयार करून आणले... 

       वेद आवरून आला... आईने त्याला ओवाळले... बाबांनी केक कापायला सांगितला. 

   " कशाला आणला केक... केक कापला मी मित्रांबरोबर .... तुम्ही कशाला त्रास घेता माझ्यासाठी?" 

  " अरे, असे काय बोलतोस वेद, बाबा आहेत ते तुझे.... " 

  " बाबा आहेत.. मग काय केलं माझ्यासाठी? गेले वर्षभर मी मर-मर मरतोय... इतके कष्ट घेतोय..... एकदा तरी त्यांनी विचारले का? काही मदत तर दूरच पण साधी माझ्या हॉटेलची चौकशीही केली नाही... "

     " वेद, ते सगळं विसर बाळा, आणि ही घे तुझ्या वाढदिवसाची भेट! " 

    " काय आहे ते? मला नको काही तुमच्याकडून... "

  " अरे बाबा एवढे म्हणतात तर बघ ना उघडून पाकीट. "

    वेदने पाकीट उघडले.... जमिनीचे कागद होते आणि त्यात हॉटेलचा प्लॅन होता...

  " हे काय बाबा? हॉटेलचा आर्किटेक्टचा प्लॅन? असे पण जमीन तर गहाण होती ना?" 

" नाही रे बाळा. मी तुझ्याशी खोटं बोललो... मला माफ कर! तू नुकताच कॉलेज सुटून आलेला... काही अनुभव हाताशी नाही..तुला जर लगेच जमीन देऊन हॉटेल सुरू करायला पैसे दिले असते, तर तुला या व्यवसायातील सगळे बारकावे कसे समजले असते.... सुरुवात नेहमी छोटया गोष्टींपासून करावी.... या एका वर्षातील अनुभवावरून तू खूप शिकला आहे. माणसांची पारख, मार्केटचा अभ्यास, पैशांचा हिशोब आणि व्यवहार... हलाखीच्या परिस्थीतीतही तग कसा धरून ठेवायचा हे तू शिकला.... तुझ्या त्या हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजपेक्षा जास्त ज्ञान तुला या अनुभवाच्या शाळेतून मिळाले आहे... आता तू तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम बनला आहे.... तू आता मोठी झेप घेऊ शकतो... "

   " वेद बाळा, तुझ्या प्रत्येक पावलावर तुझे बाबा तुझ्या बरोबर होते बरं! गाळ्याचे डिपॉझिट त्यांनीच भरले होते तुला न समजू देता... तुला उधारी देणार्‍यांना बाबांनीच हमी दिली होती.... तुझ्या प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती होती त्यांना.... तू तुझ्या पायावर उभा रहावा म्हणुन खोटं बोलले रे ते..... मनावर दगड ठेवून केलं आम्ही हे सर्व! "

       " आई बाबा, मी चुकलो. रागाच्या भरात तुम्हाला नाही-नाही ते बोललो. पण तुम्ही माझी साथ सोडली नाही.... माझ्या आधाराच्या कुबड्या काढून घेतल्या म्हणुन मी आज चालायला शिकलो.... तुम्ही माझी साथ कधी सोडली नाही..... 

*आणि आज मला जाणीव करून दिलीत आई बाबा आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतात!* !!! !!!!! ::::::::!!!! ::::::::::!! :::::::::::!!!!!

Featured post

Lakshvedhi