Tuesday, 21 June 2022

मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात अक्षय वाखारे यांच्या

मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे 22 जून रोजी प्रसारण

            मुंबई, दि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळविलेल्या अक्षय वाखारे यांच्या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग 21 जूनऐवजी 22 जून 2022 रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

             महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आता प्रशासकीय सेवेत घवघवीत यश प्राप्त करीत आहेत. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते अपार कष्टही घेत आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू करणाऱ्या नाशिकच्या अक्षय वाखारे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेची तयारी, त्याबाबत त्याला मिळालेले मार्गदर्शन आणि त्याची भविष्यातील वाटचालीविषयी त्यांनी दिलखुलास कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली.

योग पळवेतो रोग

 २१ जून २०२२ रोजीच्या जागतिक योग दिनानिमित्त लेख.

बदलती जीवनशैली आणि योग.

            आज आपली जीवनशैली खऱ्याप्रकारे आरोग्याच्या आधारावर योग्य आहे का ? आजचा आपला आहार, विहाराबाबत खरेतर नव्याने विचार करायची तसेच यामध्ये बदल करायची आवश्यकता निर्माण झाली आहे. आजच्या संगणकीय युगात तरुणांची जीवनशैली पाश्चात्य देशांप्रमाणे होवू लागली आहे. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजार उद्भवतात. बिघडल्यामुळे जीवनशैली पूर्वी पन्नाशीनंतर होणारे रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, पचनाच्या तक्रारी, ताणतणाव असे आजार तरुण वयात होतांना दिसून येत आहेत. 'जीवनशैली'मुळे उद्भवणारे आजार हे डॉक्टरांसहित सगळ्यासाठीच एक आव्हान आहे.

            व्यायामाचा अभाव, अनियमित आहार, मानसिक ताणतणाव, व्यसनाधीनता ,जंक फूड खाण्याचे प्रमाण, भ्रमणध्वनीचा अतिरिक्त वापर, रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशीरा उठणे, बदलते नाते संबंध, कामाच्या ठिकाणी असलेले ताणतणाव , अभ्यासाचा वाढणारा अतिरिक्त ताण आणि ह्या सगळ्यामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक आजार शरीराबरोबर मनावरही तेवढेच खोल परिणाम करतात. ह्या सगळ्यावर आपल्या भारतीय संस्कृतीत योग हे एक उत्तम शास्त्र आहे . योगामुळे शरीर, मनाची क्रिया उत्तम प्रकारे कार्य करते. त्यामुळे योग आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग करुन घेणे ही काळाची गरज आहे.

            योग म्हणजे 'युज' ह्या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ आहे जोडणे. इथे आत्मा आणि मन हे जोडणे असा अर्थ अभिप्रेत आहे. भारतीय योग जीवनशैली, शारीरिक आणि मानसिक त्रास दूर करुन शरीराला नवीन उर्जेचा संप्रेषण करते.

शारीरिक विकासासाठी योग

            वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन, उत्तम आरोग्य, यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योगा समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतू, प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो. योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावरसुद्धा होत असतात.

आसनातून आरोग्याचे संवर्धन

            आसनांचा नियमित अभ्यास केल्याने शरीर निरोगी राहते. रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते. अग्नी प्रदीप्त राहतो. भूक लागते, मलाचे अनुलोमन नीट होते. मनाची एकाग्रता वाढते. मास स्नायू व मज्जारज्जू या सर्वांचे कार्य सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथींचे कार्य सुधारते. आसनांमुळे आरोग्याचे संवर्धन होते. शरीरातील सर्व अवयव व मन हे एकत्रितपणे समन्वयाने काम करतात. त्यामुळे मनावरील व शरीरातील ताणतणाव कमी होते. आसनांमुळे शरीरातील विकृतीचे निराकरण होवून त्यांचे कार्यात सुधारणा होते परिणामी शरीर उत्तम स्थितीत राहते. मानसिक विकृती जसे काम क्रोध, मत्सर, द्वेष, लोभ, अहंकार यांवर नियंत्रण प्राप्त होते. आसनांमध्ये संधी आणि स्नायू यांना ताण बसतो त्यामुळे तेथील रक्तपुरवठा सुधारतो. त्या स्नायूंचे कार्य सुधारते.

आनंदी मनासाठी योग

            सूर्य नमस्कार, कपाल भाती आणि प्राणायाम या योगिक्रियांनी वजन कमी होते. अनुलोम विलोम, भ्रामरी या सारख्या प्राणायामामुळे ताणतणावापासून मुक्ती मिळते. रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताणतणावांचा निचरा योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेमुळे होतो. योगाच्या सरावाने शरीरातली विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर टाकली जातात. योगा आणि ध्यानधारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होवून नाते संबंधात सुधारणा होते . 

शरीरशुद्धीसाठी प्राणायाम

            प्राणायाम हा शब्द प्राण आणि आयाम यापासून बनला आहे. प्राणही उर्जा शरीरातील सर्व अवयवांना पुरवला जाते व त्याबरोबरच शरीरातील महत्त्वाची श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्था याचे नियमन केले जाते. नियमन यामध्ये प्रयत्नपूर्वक श्वासावर नियंत्रण केले जाते कारण प्राणाद्वारे विश्वासाचे महत्त्वपूर्ण नियमन होते. प्राणायाम ही एक अशी क्रिया आहे ज्यामध्ये प्राणाचे नियमन हे श्वासाद्वारे प्रयत्नपूर्वक केले जाते प्राणायामामुळे विविध प्रकारच्या नाडीची शुद्धी होते. प्राणायाम सर्व प्रकारच्या शरीरातील विषजन्य घटकांची शुद्धी होते. अलीकडे मनोकायीक आजार (सायको सिमॅटिक) नियंत्रित करण्यासाठी प्राणायामाचा फायदा होतो. प्राणायामाचे महत्त्वाचे उद्दिष्ट मनावर नियंत्रण करणे असे आहे. जेव्हा मन नि:श्चल होते त्यावेळी कोणत्याही विचारांची प्रक्रिया किंवा भावनिक अडथळे निर्माण करू शकत नाही म्हणूनम्हणून मनावर नियंत्रण ठेवल्यामुळे आपण विविध प्रकारच्या भावनांवर विजय मिळवू शकतो.


आसने करतांना घ्यावयाची काळ


            सकाळी लवकर उठून प्रात:विधी उरकून रिकाम्या पोटी आसने करावीत. आसने नेहमी प्रसन्न मोकळे आणि नैसर्गिक वातावरणात करावे.चटई किंवा आसन घेवूनच आसने करावीत. सुती आणि सैलसर कपडे वापरावे शक्यता मौन पाळावे. गर्भवती आणि रोगी अवस्थेत योग्य योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय आसने करु नयेत. आसनांच्या वेळी श्वासोश्वास सामान्य असावा. थकवा येईपर्यंत आसने करू नयेत. आसने केल्यानंतर किमान अर्धा ते एक तासाने आंघोळ करावी. शक्यतो रिकाम्यापोटी आसने करावी. संध्याकाळी आसने करण्यापूर्वी जेवणानंतर तीन-चार तासानंतर करावेत. शरीरात कंप आल्यास आसन सोडून द्यावे. बळजबरीने आसने करू नयेत आसना नंतर शवासन जरूर करावे


            आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदरुस्त ठेवू शकतो. मनावर चांगले संस्कार करुन त्यावर ताबा ठेवता येतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम योगाच्या माध्यमातून होतो. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवरील विविध देशांनी स्वीकारुन त्याचा प्रचार आणि प्रसारही केला आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असतांना योगामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत झाली. त्यामुळे योगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सौ. ममता दवे, रियल बॉडी योगा केंद्र, पुने





०००


 णेहे..जी

बौध्द धम्म

 भारत आणि बांगलादेशातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक सुदृढ करण्यासाठीबौद्ध धर्म सेतूचे कार्य करेल

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई, दि. 21 : भगवान गौतम बुद्ध यांनी देशाला व जगाला शांती व प्रेमाचा संदेश दिला. भारत व बांगलादेश या देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी बौद्ध धर्म सेतूचे कार्य करेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला.  

            राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते बांगलादेशातील सर्वोच्च संघ परिषदेचे १३ वे संघराजा व बांगला भाषेतून थेरवाद बुद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी अविरत प्रयत्न करणारे डॉ. ज्ञाननश्री महाथेरा यांना शनिवारी (दि.२०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते. 

            केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत राजभवन येथे हा पुरस्कार देण्यात आला. अखिल भारतीय भिक्खू संघ व बौद्ध धम्म अनुयायी महासंघातर्फे महाथेरा यांना सदर पुरस्कार देण्यात आला.

            यावेळी साधनानंद थेरो, राहुल रत्न, उपासक रवी गरुड, घनश्याम चिरणकर, बौद्ध धम्म विचार प्रसाराचे आशिया खंडाचे निमंत्रक राजेंद्र जाधव व जनसंपर्क अधिकारी हेमंत रणपिसे प्रामुख्याने उपस्थित होते.    

००००

Buddhist Seer from Bangladesh given

Dr Babasaheb Ambedkar Lifetime Achievement Award

            Mumbai, 21th June : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Dr Babasaheb Ambedkar Lifetime Achievement Award for 2022 to the Buddhist Seer and the 13th Sangha Raja of Supreme Sangha Council of Bangladesh Dr Jnananshree Mahathera at Raj Bhavan Mumbai.

            The award was presented to Dr Mahathera for his work of revival of Theravada Buddhism in Bengal dialect.

            Union Minister of State for Social Justice and Empowerment Ramdas Athawale, Sadhanananda Thero, Ravi Garud, Ghanashyam Chirankar, PRO Hemant Ranpise and Asia Continent Coordinator Rajendra Jadhav were present.

0000



 

 . बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या

सहा ग्रंथाचे होणार प्रकाशन

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

            मुंबई, दि. 21 : राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र – साधने प्रकाशन समितीच्या सहा ग्रंथाचे प्रकाशन दिनांक 21 जून 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

            यावेळी परिवहन व संसदीय कार्य मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब, ऊर्जामंत्री आणि समितीचे सदस्य डॉ. नितीन राऊत, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री व समितीचे उपाध्यक्ष प्राजक्त तनपुरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे उपस्थित राहणार आहेत.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जनता’ पाक्षिक ‘1930 ते 1956 पर्यंत प्रकाशित झालेल्या ‘जनता’चा दुसरा खंड आणि इंग्रजी खंड 13 चा मराठी अनुवाद ‘डॉ. आंबेडकर : भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार’ - भाग -1 आणि भाग-2 या नवीन ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. इंग्रजी 13 व्या खंडाचा अनुवाद राज्यशास्त्राचे तज्ज्ञ आणि लेखक डॉ. आर. के. क्षीरसागर (औरंगाबाद ) यांनी केला आहे. तसेच सोर्स मटेरियलचा खंड -1 , डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे–खंड-8 (Pakistan or Partision of India), खंड-10 (Dr. Ambedkar as a Member of the Governor General’s Executive), खंड -13 (Dr. Ambedkar as the Principal Architect of the Constitution) या 4 इंग्रजी खंडाच्या पुनर्मुद्रित ग्रंथाचे प्रकाशन सुद्धा यावेळी होणार आहे.

            मागील काही वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र – साधने प्रकाशन समितीचे काम प्रलंबित होते. परंतु या वर्षापासून पुन्हा समितीने ग्रंथ प्रकाशनाच्या कामास गती देण्यात आली आहे, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

सत्कार



 मुंबईच्या राजस्थानी समाजातील कोरोना योद्ध्यांचा राजभवन येथे सन्मान.

"राजस्थानी समाज युद्धभूमीवरही आघाडीवर आणि दान - पुण्य कार्यातही अग्रेसर.

- राज्यपालांचे प्रशंसोद्गार

            मुंबई, दि. 21 : राजस्थानी समाजात एकीकडे महाराणा प्रतापांसारखे महाप्रतापी योद्धे झाले तर दुसरीकडे भामाशांसारखे महादानी आणि मीराबाईंसारखे संत निर्माण झाले. युद्धभूमीवर आघाडीवर असंणारा राजस्थानी समाज दान व पुण्य कार्यातही अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

            जीवनज्योती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राजभवन येथे मुंबईच्या राजस्थानी समाजातील डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, व्यापारी व समाजसेवकांना करोना काळातील सेवाकार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते कोरोना वीर सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जीवनज्योती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र गुप्ता व उद्योजक धनराज अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते.

            आपण समाजाकडून काही ना काही घेत असतो त्यामुळे आपण समाजाला देखील देणे लागतो ही भावना राजस्थानी समाजात विशेषत्वाने पाहायला मिळते. राजस्थानी समाज उत्तराखंड, नेपाळ पासून तर अनेक देशात पसरला आहे. या सर्व ठिकाणी समाजाने तळे, विहिरी, शाळा व धर्मशाळा बांधून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. मुंबईसारख्या महानगरात देखील राजस्थानी समाजाने उद्यमशीलतेमुळे स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे असे राज्यपालांनी सांगितले. 

            राज्यपालांच्या हस्ते मीरा भाईंदरचे वरिष्ठ स्त्री रोग विशेषज्ञ डॉ. शिवभगवान अग्रवाल, वरिष्ठ समाज समाजसेवी - किशनलाल मोर, शरद गोयनका, शल्य चिकित्सक डॉ. निरंजन अग्रवाल, शंकर मित्तल, नगरसेवक तसेच नेत्र रोग विशेषज्ञ डॉ. सुशील अग्रवाल, श्रीमती शानू जोरावर सिंह गोहिल, उद्योगपती नंदकिशोर अग्रवाल, बाल रोग विशेषज्ञ डॉ. राजीव अग्रवाल, समाजसेवी रामवतार भूतड़ा, विजय डोकानियां, सीए नारायण तोष्णीवाल, सीए विष्णु अग्रवाल, उद्योगपती राजकुमार केडिया, उद्योगपती मनोज अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, मंगला सुरेश पुरोहित, नटवर डागा, प्रवीण मुकीम, दिनेश अग्रवाल, पवनकुमार शर्मा, जितेन्द्र गुप्ता, सीए मनोज खेमका, सुशील पोद्दार व जितेन्द्र कुमार कोठारी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

००००

Governor Koshyari hails Rajasthani community for philanthropy

Governor felicitates Corona Warriors from Mumbai's Rajasthani community

               Mumbai, 21th June : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari felicitated Covid Warriors from Mumbai's Rajasthani community at a felicitation held at Raj Bhavan Mumbai on Mon (20 June). The felicitation of Corona Warriors was organised by Jeevan Jyoti Charitable Trust. Twenty five social workers comprising doctors, CAs, industrialists and social workers were felicitated by the Governor on the occasion. 


               President of Jeevan Jyoti Charitable Trust Narendra Gupta and philanthropist Dhanraj Agrawal were present on the dais.


               Speaking on the occasion, Governor Koshyari complimented the Rajasthani community for giving the nation warriors like Maharana Pratap, philanthropists like Bhamasha and saints like Meerabai. He praised the community for remaining in the forefront of social work in all parts of the country.


               The Governor felicitated Shivbhagwan Agarwal, Kishanlal Mor, Sharad Goyanka, Dr. Niranjan Agarwal, Shankar Mittal, Dr. Shshil Agarwal, Nandkishore Agarwal, Dr. Rajiv Agrawal, Ramavatar Bhutada, Shri. Vijay Dokaniya, Narayan Toshniwal, CA Vishnu Agarwal, Rajkumar Kediya, Manoj Agarwal, RajkumarAgrawal, Smt. Shanu Joravar Singh, Smt. Mangala Suresh Purohit, Natwar Daga, Pravin Mukim, Dinesh Agarwal, Pavankumar Sharma, Jitendra Gupta, CA Manoj Khemka, Sushil Poddar and Jitendra Kumar on this occasion.


0000



 


 


 



विधान parishad

 विधान परिषद निवडणूक निकाल

            मुंबई, दि. 21 :- राज्य विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सोमवार दि. 20 जून 2022 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून उमेदवारांना जिंकण्यासाठीचा 2600 हा मतमूल्यांचा कोटा पूर्ण करण्यासाठी फेरीनिहाय मिळालेली मतमूल्य पुढीलप्रमाणे :


            पहिल्या फेरीअखेर राम शिंदे (भाजपा) यांना 3000, श्रीकांत भारतीय (भाजपा) यांना 3000, एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2900, प्रवीण दरेकर (भाजपा) यांना 2900, रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2700, श्रीमती उमा खापरे (भाजपा) यांना 2700, सचिन अहिर (शिवसेना) यांना 2600 आणि आमश्या पाडवी (शिवसेना) यांना 2600 तर पाचव्या फेरीअखेर प्रसाद लाड (भाजपा) यांना 2857 इतके मतमूल्य मिळून त्यांनी विजयासाठीचा कोटा पूर्ण केला.


            दहाव्या व शेवटच्या फेरीअखेर भाई जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2474 इतकी मतमूल्य तर चंद्रकांत हंडोरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2200 इतकी मतमूल्य मिळाली. या फेरीअखेर अधिक मतमूल्यांच्या आधारे श्री.जगताप हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.राजेंद्र भागवत यांनी जाहीर केले.


०००००


 



 🌺🌺शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा,

आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.🌺🌺

🌺🙏शुभ सकाळ!🙏🌺

Featured post

Lakshvedhi