सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 21 June 2022
सण
नमस्कार मंडळी🙏🙏
पुढील महिन्यापासून सर्वांना हवेहवेसे वाटणारे *सण* आले आहेत. सहज आठवणीत राहावेत म्हणून सारांश पाठवीत आहोत.
10 जुलै , रविवार *आषाढी एकादशी*
28 जुलै , गुरुवार *आषाढ अमावस्या* अर्थात दिव्यांची अवस! *दीप अमावास्या (दिवे पूजन)*. घरातले सर्व दिवे धुवून वा स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. नंतर *श्रावण मास* आरंभ
1 ऑगस्ट *श्रावणी सोमवार* पहिला (8 ,15 , 22, 29 ऑगस्ट *श्रावणी सोमवार*)
2 ऑगस्ट तसेच 9, 16 ,23 , मंगळवार *मंगलागौरी पूजन*.
2 ऑगस्ट, मंगळवार *नाग पंचमी*
11 ऑगस्ट, गुरुवार *नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन*.
18 ऑगस्ट, गुरुवार *श्रीकृष्ण जयंती*.
19 ऑगस्ट, शुक्रवार *गोपालकाला*.
26 ऑगस्ट, शुक्रवार *पिठोरी अमावस्या*
27 ऑगस्ट, शनिवार *शनि अमावास्या*
30 ऑगस्ट, मंगळवार *हरितालिका पूजन*.
31 ऑगस्ट, बुधवार *श्री गणेश चतुर्थी*.
1 सप्टेंबर, गुरुवार *ऋषी पंचमी* .
3, 4 व 5 सप्टेंबर शनिवार *ज्येष्ठागौरी* आवाहन , रविवार पूजन , सोमवार विसर्जन.
9 सप्टेंबर, रविवार *अनंत चतुर्दशी*.
25 सप्टेंबर, रविवार *सर्वपित्री दर्श अमावस्या*.
26 सप्टेंबर, सोमवार *अश्विन मासारंभ व घटस्थापना*.
30 सप्टेंबर, शुक्रवार *ललिता पंचमी*
2 ऑक्टोबर, रविवार *सप्तमी, सरस्वती आवाहन, महालक्ष्मी पूजन*
3 ऑक्टोबर, सोमवार *महाष्टमी, सरस्वती पूजन*
4 ऑक्टोबर, मंगळवार *नवरात्रोत्थापन, आयुध -महानवमी*
5 ऑक्टोबर, बुधवार *विजयादशमी दसरा*
9 ऑक्टोबर, रविवार *कोजागिरी पौर्णिमा*.
21 ऑक्टोबर, शुक्रवार, *रमा एकादशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस*
22 ऑक्टोबर, शनिवार *गुरु द्वादशी, धन त्रयोदशी*
24 ऑक्टोबर, सोमवार *नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन.*
25 , ऑक्टोबर, मंगळवार *खंडग्रास सूर्यग्रहण*
26 ऑक्टोबर, बुधवार
*बलिप्रतिपदा, पाडवा, यमद्वितीया -भाऊबीज.*
4 नोव्हेंबर, शुक्रवार *कार्तिकी एकादशी.*
5 नोव्हेंबर, शनिवार *तुलसी विवाह आरंभ*
7 नोव्हेंबर, सोमवार *वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा*
8 नोव्हेंबर, मंगळवार *तुलसी विवाह समाप्ती,चंद्रग्रहण*
16 नोव्हेंबर, बुधवार *कालभैरव जयंती, महालय समाप्ती*
*धन्यवाद*
🙏🙏
आनंदी माणूस
मुकेश अंबानी सकाळी अन्टिलीया बंगल्यात संगमरवरी डायनिंग टेबल वर बसले होते. समोर चांदीच्या थाळीत बिनमिठाची, बिन तिखटाची, बिना मसाल्याची
भेंडीची भाजी आणि बिन तेलाची चपाती होती, गरम केलेले मिनरल पाणी होते.
सात हजार कोटींचे घर, दहा नोकर नाष्टा वाढत होते, एसी फिरत होते, गारेगार हवा देत होती.
इमारती खालून प्रदूषणाचे धुराडे धूर ओकत होते.
अशा वातावरणात अंबानी नाष्टा करत होते.......
😊
इकडे शेतात दूर बांधावर शेत मजूर बसला होता. त्यानेही शिदोरी सोडली, त्यात तेल लावलेली चपाती, हळद-मसाला-तेल टाकलेली भेंडीचीच भाजी होती, सोबत होता कांदा व ठेचा. बरोबर तोंडी लावायला लुसलुशीत मेथीची भाजी, प्यायला मटक्यांतले थंडगार पाणी होते.
समोर हिरवे गार शेत, पिके वाऱ्यावर डोलत होते, थंडगार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट.
आणि
तो आरामात न्याहरी करत होता.
*सात अरब करोडचा मालक जे खात होता तेच 200 रुपये रोजंदारीचा शेत मजूर खात होता.*
पण
*चविष्ट खात होता*
आता सांगा, दोघांत काय फरक होता. 🤔
अंबानी पन्नास वर्षाचा होता आणि मजूरही पन्नास वर्षाचाच होता.
नाष्ट्यानंतर अंबानी बीपी, मधुमेहाची गोळी खात होते आणि शेतमजूर चुना लावून पान खात होता.
*कमी कुणीच नाही, मोठा कुणीच नाही.*
म्हणून
*आनंद* शोधू नका
*आनंद* निर्माण करा कारण
*आनंद* निर्मीती वर GST *0%* आहे
*स्वतःचा शोध स्वतःमध्ये घ्या*
बाकी सगळ *Google* वर आहे.?
🙏
Monday, 20 June 2022
खरिपासाठी राज्यात खते, बियाणांचा तुटवडा नाही.
खरीप हंगाम 2022 मध्ये कापूस पिकासाठी सर्वसाधारणपणे बियाणांच्या 1.71 कोटी पाकिटांची आवश्यकता असते. राज्यात कापूस पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी बीटी कापसाचे 98 टक्के क्षेत्र असून, बीटी कापसाच्या बियाणांची २.०१ कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. सोयाबीन पिकासाठी एकूण 34.5 लाख क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. सध्या सोयाबीनचे ४८.८२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. याचाच अर्थ चालू वर्षी कापूस, सोयाबीन बियाणांचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा भासणार नाही.
राज्यात बियाणांचा तुटवडा भासणार नाही
सोयाबीन पिकाखालील नियोजित क्षेत्र 46.०० लाख हेक्टर असून त्यासाठी एकूण 34.5 लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातून 14.65 लाख क्विंटल एवढे बियाणे उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. या व्यतिरिक्त खरीप 2020 पासून घरचे बियाणे राखून ठेवायची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत खरीप 2021 हंगामात 44.46 लाख क्विंटल बियाणे उत्पादित झाले आहे. रब्बी/उन्हाळी हंगामात सोयाबीन बिजोत्पादनातून ४.३७ लाख क्विंटल असे एकूण ४८.८२ लाख क्विंटल बियाणे खरीप हंगाम २०२२ करिता घरगुती सोयाबीन बियाणे मोहिमेतून उपलब्ध होत आहे. घरगुती सोयाबीन बियाणे उच्च गुणवत्तेचे आहे. मागील तीन वर्षांतील सरासरीपेक्षा जास्त बियाणे यंदाच्या वर्षी उपलब्ध होत आहे. त्यामुळे बाजारातील सोयाबीन बियाणांचा तुटवडा होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. खरीप हंगामात कापूस सोयाबीन बरोबरच ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग व तीळ ही इतर पिके घेतली जातात. या बियाणांचा देखील तुटवडा भासणार नाही.
खतांचा पुरेसा साठा
राज्यातील मागील ३ वर्षांतील सरासरी खत वापर ४१.७३ लाख मेट्रिक टन आहे. खरीप हंगाम २०२२ साठी केंद्र शासनाने एकूण ४५.२० लाख मेट्रिक टन वाटप मंजूर केले आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या सुरुवातीला एकूण १२.१५ लाख मे टन खत उपलब्ध होते. सध्या एकूण १७.१७ लाख मे टन खत उपलब्ध आहे. राज्यभरात खते, बियाणे व कीटकनाशके यांचे बाबत बनावट निविष्ठा विक्री होऊ नये यासाठी राज्य जिल्हा व विभाग स्तरावर भरारी पथके स्थापन केली आहेत.
शेतकऱ्यांना तक्रारी थेट करता याव्यात यासाठी राज्यस्तरावर हेल्पलाइन नंबर ८४४६११७५००, ८४४६३३१७५०, ८४४६२२१७५० राज्यभर प्रसारित केले असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येत आहे. त्याव्यतिरिक्त प्रत्येक जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला असून त्यामध्ये देखील हेल्पलाइन नंबर देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन दक्ष आहे. कृषी निविष्ठा या दर्जेदार गुणवत्तेच्या असाव्यात यासाठी राज्यात ११३१ गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक कार्यरत असून त्यांचे माध्यमातून कृषी निविष्ठांची नमूने काढणे व प्रयोगशाळेमध्ये तपासणी करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यानुसार अप्रमाणित आढळलेल्या नमुन्यावर कोर्ट केस दाखल करणे, अप्रमाणित साठ्यास विक्री बंद आदेश देणे, अशी कार्यवाही करण्यात येते.
भरारी पथक, नियंत्रण कक्ष, संपर्क यंत्रणा
खतांचा काळाबाजार, साठेबाजी, चढ्या दराने खताची विक्री, खत उपलब्ध असतानाही खत उपलब्ध करून न देणे इत्यादी गोष्टी टाळण्याकरिता विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नियंत्रण कक्ष विभाग, जिल्हा व तालुका, आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8446117500, 8446331750 व 8446221750 उपलब्ध आहेत. तक्रार नोंदविण्याकरिता controlroom.qc.maharashtra@gmail.com हा इमेल आहे.
कृषी सेवा केंद्रनिहाय नियोजन
कृषी सेवा केंद्रनिहाय उपलब्ध खताचे आसपासच्या गावाच्या मागणीप्रमाणे नियोजन करण्यात येत आहे. ऐन हंगामात खत वितरणात सुसूत्रता राहण्यासाठी कृषी सेवा केंद्रनिहाय अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून तुटवड्याच्या काळात संपर्क अधिकारी यांच्या उपस्थितीत खतांचे वितरण करण्यात येणार आहे. विशिष्ट खताचा आग्रह धरू नये. बाजारात पर्यायी सरळ व संयुक्त खते उपलब्ध आहे. पर्यायी खत उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. डीएपीला पर्याय म्हणून एसएसपी + युरिया कॉम्बिनेशन, प्रोम यांचा वापराला चालना देण्यात येत आहे. पोटॅशला पर्याय म्हणून पीडीएम वितरणासाठी खत कंपन्यांना उद्युक्त करण्यात येत आहे. वॉटर सोलुबल फर्टिलायझर्सची उपलब्धता व वापर वाढविणेबाबत प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात खते, बियाणांच्या उपलब्धतेबाबत तुटवडा भासणार नाही. राज्यात खते, बियाणांचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी करू नये
बालमजुरी प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठीसर्वांचा सहभाग आवश्यक
-. सुशीबेन शाह
मुंबई, दि. 20 : बालमजूरीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण हरवते. शिक्षण घेण्याच्या वयात एकाही मुलावर मजुरीची वेळ येऊ नये. बालमजुरी प्रथेचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करून “बाल मजूर मुक्त महाराष्ट्र” साठी स्वयंसेवी संस्थांबरोबरच प्रत्येक शासकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांचे योगदान या प्रक्रियेत आवश्यक असून नागरिकांचा सहभागही आवश्यक आहे, असे मत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी मुंबई शहर, महिला व बालविकास अधिकारी मुंबई शहर आणि कामगार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिन सप्ताह सांगता समारोहाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केले होते.
या कार्यक्रमास कोकण विभागाच्या अप्पर आयुक्त शिरीन लोखंडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ज्ञानेश्वर पाताळे, शिक्षण उपनिरिक्षक, रंजना राव, प्रथम संस्थेच्या संचालक फरिदा लांबे, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य निलिमा चव्हाण, कामगार उपायुक्त निलांबरी भोसले, महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार आदी उपस्थित होते.
सुशीबेन शाह म्हणाल्या, आपण एखाद्या शहरात बाल मजुरी विरोधी कारवाया करतो परंतू तीच मुले अन्य राज्यात किंवा जिल्हयात काम करताना आढळतात. त्यामुळे याबाबत कडक कायदेशीर कारवाई केली पाहिजे. बाल मजुरी प्रश्नाबाबत प्रभावी जनजागृतीसह, बालकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. येत्या वर्षभरात आपण बालमजुर मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न लवकरच साकार करू, असा विश्वास सुशीबेन शाह यांनी यावेळी व्यक्त केला.
दहावी व बारावी परीक्षेत राज्यातील बालगृहातील विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविले आहे. परंतु यानंतर या मुलांचे पुढे काय होते. त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बालमजूरी मुले का करतात त्यांच्या पालकांशी त्या मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे. यासाठी बालकांच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे, असेही सुशीबेन शाह यावेळी म्हणाल्या.
सचिव ज्ञानेश्वर पाताळे म्हणाले, बाल कामगार मुलांना शिक्षणाकडे वळविले पाहिजे. अशासकीय संस्थांची यासाठी मदत घ्या. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदेशीर सहाय्य व सल्ला देण्यात येईल.
अपर आयुक्त शिरीन लोखंडे म्हणाल्या, बाल कामगार विरोधी दिन सप्ताह आपण साजरा केला, याचे फलित आपण लोकांपर्यंत पोहोचलो. आपण या मुलांशी बोलले पाहिजे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत.
यावेळी बालकांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी , अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.
दि. 12 जून ते 20 जून या कालावधीत बाल कामगार विरोधी दिन सप्ताह राबविण्यात आला, या सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात आले याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालविकास विभागाच्या विधी सल्लागार सविता ठोसर यांनी केले तर आभारआय.जे.एम. संस्थेच्या क्लेफा परमार यांनी मानले.
00
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
