Saturday, 18 June 2022

लेक माझी तुझी

 I I *आपली लेक* I I👩🏻‍🦰

स्वभावाने great असते

  प्रेमाचे net असते

    सुखाचे gate असते

      लेक ही लेकच असते..

भावाशी close असते

  बापाची rose असते

    आईची pose असते

      अभिमानाचे nose असते

लेक ही लेकच असते..

 जगण्यातील shift असते

   ईश्वराची gift असते

     सुखाची lift असते

लेक ही लेकच असते..

  घराण्याची fame असते

    भविष्यातील dame असते

      तुमची आमची same असते

लेक ही लेकच असते.!!

 - Familyमधील सर्व लेकींसाठी. 🙏🏻😌

*🌱तुळशीचं रोप म्हणजे मुलगी आणि मुलगी म्हणजेच महालक्ष्मी...*

* 🍂👩🏻‍🎤🍂 *


*दारा समोर अंगणा मधे*

*सुबक रांगोळी दिसावी..*

*प्रत्येक घरात कमीतकमी* 

*एक तरी मुलगी असावी......🍁 *


*मुलगी म्हणजे घरासाठी*

*जीव की प्राण..* 

*तिला पाहून हरपून जातं* 

*सारं देहभान..*🌹 * 


*मुलगी घरात असली म्हणजे घर कसं फुलून जातं..* 

*तिचं असणं घरासाठी*

*चंदनाचा लेप होतं..🌹 * 


*का बरं तिचेच नाव तोंडी असतं.*

*चोवीस तास येते ओठी.......🍁 ×

त्याग,प्रेम,माया,काळजी*

*शब्द फक्त तिच्यासाठी..*🌹 


*आज सुकल्या सारखे दिसता* 

*बाबा काही दुखतंय का ?*🍁

*असा प्रश्न मुलगीच विचारते* 

*काळजात काही टोचतय का?...🌹 *


*आई वडिलांचं मन वाचण्याची भाषा कुठून शिकते ती ?🍁🍁 *

*सारं दुःख कुशीत घेऊन* 

*इतरांसाठीच जगते ती ?🌹*


*मुलगी करते चिवचिवाट*

*म्हणून घर फुलून येतं..🍁* 

*असो अथवा नसो काही* 

*मन कसं भरून जातं..🌹*


*आई-बाबांच्या म्हातारपणी* 

*मुलगीच होते त्यांची आई......🌹 *

*घर कितीही मोठं असो*

*"मुली" शिवाय श्रीमंती नाही....🌹 *


*मुलीसाठी देवा समोर*

*हात जोडून बसलं पाहिजे..🌹 * 

*प्रत्येकाच्या अंगणा मधे* 

*"तुळशीचं रोप "असलं पाहिजे.........🌹🌱🌹 *


*✍🏻🍁 मातापित्याच्या लाडक्या लेकींसाठी..............🙏🏻🙏🏻

Jr किशोर कुमारी

 


हेल्थ wealth

 *संपूर्णपणे आरोग्यदायी अर्थातच आनंददायी जीवनाचा आनंद घेणे 100% शक्य आहे..*

💪💪💪💪💪💪💪💪💪💪


डायबेटीस, हृदयविकार, कोणत्याही प्रकारचा कॅन्सर, किडनीशी संबंधित विविध आजार... 

यांसारख्या असाध्य भासणाऱ्या व इतर अनेक किचकट शारीरिक, तसेच मानसिक समस्या/आजारांवर यशस्वीपणे आणि प्रभावीपणे मात करून संपूर्णपणे 100 % आरोग्यदायी व आनंददायी जीवनाचा आनंद घेणे खालील गोष्टींच्या साहाय्याने एकदम शक्य आहे :

👇👇👇👇👇👇👇👇

*1. "संबंधित समस्या/आजार याविषयीचे आवश्यक ज्ञान.."*

*2. "संबंधित समस्या/आजार उद्भवण्याचे यथायोग्य कारण जाणणे.."*

*3. "परिस्थितीनुसार यथायोग्य व अचूक मार्गदर्शन/कोचिंग.."*


कोणत्याही प्रकारच्या *आरोग्य समस्या निवारणविषयक मदतीसाठी किंवा वैयक्तिक कोचिंग/मार्गदर्शनासाठी* आम्हाला जरूर संपर्क करा.


*संपर्क :*

*विजय जंगम*

*हेल्थ, वेलनेस अँड लाईफ कोच/मार्गदर्शक*

*Call/Whatsapp :*

*7038987501*

*9763168157*


 

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांतर्गत

संत कबीर जयंतीनिमित्त ‘दास्तान ए कबीर’ संगीत मैफल संपन्न

            मुंबई दि, १७ : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई द्वारा हिंदी भाषा व साहित्याच्या विकासासाठी सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई द्वारा ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत १५ व्या शतकातील महान संत कबीरदास यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १४ जून, २०२२ रोजी सायंकाळी ‘दास्तान ए कबीर' या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम म्हैसूर असोसिएशन ऑडिटोरियम, माटुंगा येथे संपन्न झाला. त्यात संत कबीरदास यांचे दोहे गीत संगीतच्या माध्यमातून सादर करण्यात आले. तसेच संत कबीरदास यांच्या जीवनकार्यास देखील उजाळा देण्यात आला. किरदार आर्ट अकादमी द्वारा निर्मित या संगीत मैफलीचे संकल्पक व निर्देशक इकबाल नियाजी हे होते. दास्तानचे लेखन डॉ. नाज खान यांनी केले. या दास्तानचे सादरीकरण डॉ. नाज आणि शिव शर्मा यांनी केले. याचे संगीत संयोजन हे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त वरिष्ठ संगीतकार कुलदीप सिंघजी यांचे होते. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी चे सदस्य सचिव व सहनिर्देशक सचिन निंबाळकर यांनी आभार व्यक्त केले.

00000



 

 दहावीचा निकाल 96.94 टक्के,

मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 1.90 टक्के जास्त

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

आवड आणि कल यानुसार पुढील मार्ग निश्चित करा

- शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड

            मुंबई, दि. 17- “कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीतही आपल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीने, धैर्याने, संयमाने व परिश्रमाने अभ्यास पूर्ण करत दहावीची परीक्षा दिली. शिक्षणाप्रती त्यांच्या या समर्पणभावाला सलाम,” अशा भावना शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केल्या.


            या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे, असे आवाहन प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळाले नाहीत त्यांना श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत लगतच्या दोन परीक्षांमध्ये पुन:श्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. मार्च 2022 च्या परीक्षेस प्रथमच नियमित विद्यार्थी म्हणून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या) जुलै-ऑगस्ट 2022 व मार्च 2023 च्या परीक्षेस श्रेणीसुधार साठी प्रविष्ट होण्याच्या दोन संधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


            या परीक्षेत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,68,977 नियमित विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 15,21,003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 6,50,779 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, 5,70,027 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 2,58,027 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. “हा निकाल आनंददायक व आशादायक आहे,” असे मंत्री प्रा. गायकवाड यांनी म्हटले आहे.


            राज्यातील 12,210 शाळांचा आणि 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांची कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी 99.27 अशी सर्वाधिक असून सर्वांत कमी उत्तीर्णतेची टक्केवारी नाशिक विभागाची 95.90 टक्के अशी आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 97.96 असून मुलांची 96.06 एवढी आहे.

            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे इ.10 वीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. तर मार्च 2020 मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी 95.30 अशी होती. याचाच अर्थ मार्च-एप्रिल 2022 चा निकाल मार्च 2020 तुलनेत 1.64 टक्के वाढला आहे.

००००


 



 दिलखुलास’ कार्यक्रमात अक्षय वाखारे यांची मुलाखत

            मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळविलेल्या अक्षय वाखारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 20 जून व मंगळवार 21 जून 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आता प्रशासकीय सेवेची स्वप्ने पाहत आहेत. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते अपार कष्टही घेत आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू करणाऱ्या नाशिकच्या श्री. वाखारे यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी, त्याबाबत त्याला मिळालेले मार्गदर्शन आणि त्याची भविष्यातील स्वप्नांविषयी दिलखुलास कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली आहे.


००००

Featured post

Lakshvedhi