सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 16 June 2022
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा पात्रतेची अधिसूचना जारी
मुंबई, दि. १५ : मंत्रालयीन विभागातील सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षेची पात्रता आणि अभ्यासक्रमाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
परीक्षेला बसण्यासाठी पात्रता :-
(अ) परीक्षेला बसण्यासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने
(i) लिपिक-टंकलेखक पदावरील नियमित सेवेची पाच वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे.
(ii) लिपिक-टंकलेखक पदाकरीता विहित केलेली सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा त्यातून सूट मिळणे आवश्यक आहे.
(iii) स्थायित्व प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
तसेच परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकाला विभागीय चौकशी प्रलंबित असलेले लिपिक - टंकलेखक सदर परीक्षेस बसण्यास अपात्र असतील.
(ब) लिपिक - टंकलेखक पदावरील नियमित सेवेचा कालावधी लिपिक - टंकलेखक पदाच्या ज्येष्ठतासूचीमध्ये नमूद केलेल्या दिनांकापासून गणण्यात येईल;
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरुन निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास लिपिक - टंकलेखक पदावर नियमित सेवेची ५ वर्षे सेवा पूर्ण असणारे लिपिक - टंकलेखक परीक्षेला बसण्यास पात्र असतील.
सेवाज्येष्ठता : सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे सहायक कक्ष अधिकारी पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची सेवाज्येष्ठता ही, जे उमेदवार विहित कालावधीत ३० दिवसाच्या आत रुजू होतील, त्यांच्या बाबतीत नियतवाटपाच्या आदेशाच्या दिनांकापासून आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारसक्रमानुसार निश्चित केली जाईल.
प्रश्नपत्रिका पेपर 1 मध्ये तीन भाग असून भाग १ इंग्रजी, भाग 2 मराठी, भाग 3 सामान्य ज्ञान, शासकीय योजना व शासनाशी संबंधित बाबी. यासर्व विषयांसाठी एकूण गुण 100 असतील. कालावधी एक तास असेल. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. पेपर 2, विषय कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान व पद्धती यासाठी एकूण गुण १०० असणार आहेत. प्रश्नपत्रिका कालावधी एक तास आहे. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल.
000
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराचे वितरण जुलैमध्ये
- मंत्री विजय वडेट्टीवार
पुढील वर्षापासून या पुरस्कारांसाठी प्रत्येक महसूली विभागातून दोन व्यक्ती व एक संस्थांची निवड
मुंबई, दि. १५ : वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व संघटनात्मक विकासासाठी कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्य उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक, समाज सेवक व्यक्ती तसेच संस्थांना 'महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येतो. गत सहा वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुढील वर्षांपासून सात महसूली विभागातून दोन व्यक्ती व एका संस्थेची निवड केली जाणार असल्याची माहिती, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
दि. ८ जून २०१६ रोजी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला होता. त्यानुसार २०१६ - १७, २०१७ - १८, २०१८ - १९, २०१९ - २०, २०२० -२१, २०२१- २२ या सहाही वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते.
२०१६-१७ प्रा. मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था म्हणून शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, औरंगाबाद, २०१७-१८ श्री. अभय मनोहर कल्लावार, नागपूर तर संस्था म्हणून वीरमठ संस्थान ता. अहमदपूर, जिल्हा लातूर, २०१८-१९ श्री. विठ्ठल ताकबिडे, नांदेड, २०१९ - २० श्री. उमाकांत गुरूनाथ शेटे पुणे, संस्था म्हणून महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था, फुलकळस ता. पुर्णा, जिल्हा परभणी, २०२० -२१ श्री. रामलिंग बापूराव तत्तापूरे लातूर, संस्था म्हणून तीर्थक्षेत्र आदी मठ संस्थान धारेश्वर, पोस्ट दिवशी खुर्द, ता. पाटण, जिल्हा सातारा, २०२१-२२ डॉ. यशवंतराव बाबाराव सोनटक्के, नवी मुंबई, संस्था म्हणून सारथी प्रतिष्ठान, शिवकृपा बिल्डींग, बसवेश्वर नगर, नांदेड या पुरस्कार विजेत्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
संस्था व व्यक्तीची निवड प्रत्येक विभागातून केली जाणार असून संस्थेला ५१/- हजार रोख व व्यक्तीला २५/- हजार रूपये रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ पुरस्कार म्हणून दिले जातील.
पुरस्कार वितरणास या क्षेत्रात कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक व समाजसेवक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.
******
संध्या गरवारे/विसंअ/
राष्ट्रपती निवडणूक
राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने आज राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाच्या १५ जून २०२२ रोजीच्या राजपत्रात पुनर्प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राष्ट्रपती निवडणूक-२०२२ च्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची बुधवार, दि. २९ जून २०२२ अंतिम तारीख असणार आहे. नामनिर्देशन पत्राची गुरुवार दि. ३० जून २०२२ रोजी छाननी करण्यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख शनिवार दि. २ जुलै २०२२ राहणार आहे. तसेच आवश्यकता असल्यास सोमवार दि. १८ जुलै २०२२ रोजी निवडणूक होईल, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर यांनी कळविले आहे.
०
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...





