Sunday, 12 June 2022

Cast verification

 जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन.

            मुंबई, दि. 10 : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याने त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

            जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे, त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

००००

 युरोप - भारत शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावे

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत युरोप दिन संपन्न

            मुंबई, दि. 12 : युरोप भारताचा महत्वाचा भागीदार असून भारत आणि युरोपीय देशांमध्ये पर्यावरण, संरक्षण व स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रात मोठे सहकार्य सुरू आहे. युरोप जगातील सर्वात मोठी व्यापारी पेठ असून भारताला देखील युरोपशी व्यापाराचा मोठा इतिहास आहे. भारत व युरोपीय देशांमधील संबंध केवळ व्यापार व गुंतवणूक या विषयांपुरते मर्यादित न राहता उभयपक्षी शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध देखील वृद्धिंगत व्हावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे आज व्यक्त केली. 

            भारत आणि युरोपीय समुदायांमधील संबंध स्थापन होण्याला ६० वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून कौन्सिल ऑफ युरोपियन युनिअन चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडिया या संस्थेतर्फे शुक्रवारी मुंबईत 'युरोप दिन 2022' साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

            कार्यक्रमाला युरोपिअन युनिअनच्या भारतातील व्यापार व आर्थिक शिष्टमंडळाच्या प्रमुख रेनिता भास्कर, युरोपिअन युनिअन चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मनीष भटनागर, फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शर्ले, चेंबरच्या संचालक श्रीमती डॉ. रेणू शोम तसेच विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व उद्योग-व्यापार प्रतिनिधी उपस्थित होते. 

            महाराष्ट्रातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने युरोपमधील विद्यापीठे तसेच महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये सहकार्य अधिक वाढावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात राज्यपालांनी युरोपिअन युनिअन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या कार्याचे कौतुक केले.     

युरोपीय समुदाय भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार असल्याचे सांगून फ्रांस व भारत राजनैतीक सहकार्याची 75 वर्षे साजरी करीत असतानाच युरोपिअन युनिअन व भारत आपल्या सहकार्याची 60 वर्षे साजरी करीत आहे हा चांगला योगायोग आहे, असे फ्रान्सचे वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शर्ले म्हणाले. 

            भारत व युरोपीय देशांचा व्यापार 100 अब्ज डॉलर इतका असून हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी योग्य संधी आताच असल्याचे युरोपियन युनियनच्या व्यापार व आर्थिक शिष्टमंडळाच्या प्रमुख रेनिता भास्कर यांनी यावेळी सांगितले. डॉ रेणू शोम यांनी आभार प्रदर्शन केले.


 


***


 


Maharashtra Governor attends Europe Day celebrations on 60th anniversary of Indo - EU diplomatic relations




Mumbai, 12 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the Europe Day 2022 celebrations organised to mark the 60 years of diplomatic relations between European Union and India. The Europe Day celebrations was organised by the Council of EU Chambers of Commerce in India in Mumbai on Friday (10th).

Founder President of the EU Chambers Manish Bhatnagar, Minister Counsellor - Head of Trade and Economic Affairs, Delegation of European Union to India Renita Bhaskar, Consul General of France in Mumbai Jean Mark Sere Charlet, Director of EU Chambers Dr Renu Shom and Consul Generals of various countries were present on the occasion.

Speaking on the occasion, Governor Koshyari called upon European Union countries to also enhance their cooperation in the areas of culture and education while promoting trade and investment with India.


***



बातोसे घाबरणा क्या.

 Hilarious!! hence forwarding.!!!!🤣😃🤪😂


Patient: Doctor, the medicine you had written on the left side top of my prescription is not available in any pharmacy in Mumbai.


 Doctor: That is not medicine, I was trying to see if my pen was writing or not, just doodling.


 Patient : What!!!?? With this terrible handwriting, I had to go to 52 shops to check it out.😠😠


Saala, one medical man said that he will get it for me tomorrow. 😕


Another said, this company is now closed, shall I give you similar medicine from another company? 🙁


Third one said, there is a huge demand for this medicine, you will get only in Black.☹️


And the fourth one made me jump out of my skin; he said, this medicine is for cancer, who has cancer at your place?


🤭🤭🤣🤣😅😅😂😂🤭

Jai ho Chemists

मतदार यादी

 221 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्यांची 21 जूनला प्रसिद्धी


            मुंबई, दि. 10 (रानिआ): विविध जिल्ह्यांमधील 221 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 जून 2022 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 27 जून 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले.

            मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्या 221 नगरपरिषदा/ पंचायतींमध्ये 208 नगरपरिषदा आणि 13 नगरपंचायतींचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 21 जून 2022 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 21 ते 27 जून 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 1 जुलै 2022 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 5 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

            प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

Start up

 स्टार्टअप आणि उद्योजकता विकासासाठी युनिकॉर्नसह यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन घेणार

                                      -प्रधान सचिव मनीषा वर्मा

            मुंबई, दि. 11: देशात सर्वाधिक युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत. त्याचबरोबर स्टार्टअप इकोसिस्टीममध्येही  महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात तरुणांमधील नवकल्पनांना चालना देणे त्याचबरोबर उद्योजकता वाढीसाठी स्टार्टअप यात्रा, स्टार्टअप सप्ताह, इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात यापुढील काळातही स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी युनिकॉर्न लीडर तसेच यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन घेण्यात येईल, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी यांनी के

            येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या tiecon india unicorn summit 2022 मध्ये काल उद्घाटनपर भाषणात त्या बोलत होत्या. यावेळी श्रीमती वर्मा यांनी सविस्तर सादरीकरण करून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. टायकॉन परिषदेसाठी यंदा विभागामार्फत प्रथमच भागीदारी करण्यात आली. युनिकॉर्नच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे तसेच उद्योजकांना प्रेरित करणे ही यंदाच्या टायकॉन समीटची थीम हो

            श्रीमती वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीने tie मुंबईसोबत स्टार्टअप्स आणि इनक्यूबेटर्सना मार्गदर्शन करण्यासाठी आणि tie च्या विशाल नेटवर्कचा फायदा घेऊन गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यासाठी भागीदारी केली आहे. राज्यात स्टार्टअपचा शासकीय कामात उपयोग करून घेण्यासाठी स्टार्टअप सप्ताहसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवउद्योजकांना कार्यादेश देऊन शासकीय काम देण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 15 कोटी रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय स्टार्टअपना पेटंट मिळविण्याच्या प्रक्रियेसाठी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. राज्यात घेण्यात आलेले असे विविध निर्णय आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची फलनिष्पत्ती म्हणून स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्मितीमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे, असे त्यांनी सांगितले

            युनिकॉर्न आणि स्टार्टअप्समार्फत राबविण्यात आलेल्या बेस्ट प्रॅक्टिसेस, त्याचबरोबर बेस्ट बिझनेस माॅडेल यांना स्वीकारून त्यांचा अवलंब करण्यात आला पाहिजे. राज्यात स्टार्टअप आणि यूनिकॉर्नची निर्मिती ही सध्या महानगरांभोवतीच केंद्रित झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातही स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्मिती, त्याचबरोबर उद्योजकतेला मोठा वाव आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही श्रीमती वर्मा यांनी यावेळी सांगित

            अनेक युनिकॉर्न संस्थापक, उद्योजक विविध उद्योगांचे सीईओ या कॉन्फरन्समध्ये उपस्थित होते. अनुपम मित्तल (shaadi.com), हर्ष जैन (ड्रीम11) नवीन तिवारी (इनमोबी), अमिताव साहा (एक्सप्रेस बीज), आशिष हेमराजानी (बुक माय शो), निशिथ देसाई, सिद्धार्थ शाह (pharmeasy) आदी विविध उद्योजकांनी यावेळी सादरीकरण केले

कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या शुभेच्छा

            दरम्यान, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी या कॉन्फरन्ससाठी शुभेच्छा कळविल्या . tiecon india unicorn summit 2022 च्या माध्यमातून स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. या कार्यात महाराष्ट्र शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी 

            विभागाने आयोजित केलेल्या स्टार्टअप सप्ताहाचे विजेते ठरलेल्या स्टार्टअप्सच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचे कॉन्फरन्समध्ये प्रदर्शन करण्यात आले

            याप्रसंगी विविध स्टार्टअप, युनिकॉर्नचे प्रतिनिधी, उद्योजक, tiecon चे पदाधिकारी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी मिथुन जॉन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

००००











 

  

  

 ०

 .

 . दिली..ले..ती.ले.

०००००


 


 


 


 


 


 



जय हिंद


 राज्यपालांच्या हस्ते रतन टाटा यांना मानद डॉक्टरेट प्रदान

रतन टाटा विनम्रता, मानवता व नितिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती

 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई दि :नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षांत समारोहात ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे श्री. टाटा यांना ही पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली.


            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले,रतन टाटा हे केवळ उद्योगपती किंवा कॉर्पोरेट जगताचे प्रमुखच नाहीत तर ते त्याहीपेक्षा विनम्रता, मानवता व नितिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती असून नव्या उद्योजकांसाठी दीपस्तंभ आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी केले.रतन टाटा यांनी मानद पदवी स्वीकारुन विद्यापीठाचा तसेच उपस्थितांचा गौरव वाढवला. टाटा यांचा सन्मान हा संपूर्ण टाटा समूहाचा तसेच टाटा घराण्याचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.


विद्यापीठांनी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी : रतन टाटा


            एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी अशी अपेक्षा रतन टाटा यांनी यावेळी व्यक्त केली.


            दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीश, माजी अध्यक्ष किशु मानसुखानी व कुलगुरु डॉ हेमलता बागला आदी उपस्थित होते.



Governor Koshyari confers Honorary Doctorate on Ratan Tata


Mumbai Date 11 :Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Honorary Doctor of Literature to industrialist and philanthropist Ratan Tata at Raj Bhavan Mumbai on Saturday (10th Jun).


            The Honorary doctorate was presented to Tata at the First Special Convocation of the HSNC University. Provost of the HSNC University Dr Niranjan Hiranandani, president of HSNC Board Anil Harish, former President Kishu Mansukhani, Vice Chancellor of the University Dr Hemlata Bagla and trustees were present.


            Speaking on the occasion, the Governor said the honour for Ratan Tata is in effect the honour of the entire Tata family and Tata Group. He said, by accepting the Honorary doctorate from HSNC University, Ratan Tata has honoured the HSNC University and the audiences.


            The Governor said, Ratan Tata is much more than an industrialist or Corporate leader; he is a role model and an icon for young entrepreneurs and startups. He said values, ethics, humility and humanity make Ratan Tata an inspiration for the younger generation.


 


00000


 


 


 राज्यपालांच्या हस्ते रतन टाटा यांना मानद डॉक्टरेट प्रदान

रतन टाटा विनम्रतामानवता व नितिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती

 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी


            मुंबई दि 
:नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षांत समारोहात ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे श्री. टाटा यांना ही पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली.

            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले,रतन टाटा हे केवळ उद्योगपती किंवा कॉर्पोरेट जगताचे प्रमुखच नाहीत तर ते त्याहीपेक्षा विनम्रतामानवता व नितिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती असून नव्या उद्योजकांसाठी दीपस्तंभ आहेतअसे प्रतिपादन राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी केले.रतन टाटा यांनी मानद पदवी स्वीकारुन विद्यापीठाचा तसेच उपस्थितांचा गौरव वाढवला. टाटा यांचा सन्मान हा संपूर्ण टाटा समूहाचा तसेच टाटा घराण्याचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विद्यापीठांनी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी : रतन टाटा

            एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी  नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी अशी अपेक्षा रतन टाटा यांनी यावेळी व्यक्त केली.

            दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानीउच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगीएचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीशमाजी अध्यक्ष किशु मानसुखानी व कुलगुरु डॉ हेमलता बागला आदी उपस्थित होते.


Governor Koshyari confers Honorary Doctorate on Ratan Tata

Mumbai Date 11 :Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Honorary Doctor of Literature to industrialist and philanthropist Ratan Tata at Raj Bhavan Mumbai on Saturday (10th Jun).

            The Honorary doctorate was presented to Tata at the First Special Convocation of the HSNC University. Provost of the HSNC University Dr Niranjan Hiranandani, president of HSNC Board Anil Harish, former President Kishu Mansukhani, Vice Chancellor of the University Dr Hemlata Bagla and trustees were present.

            Speaking on the occasion, the Governor said the honour for Ratan Tata is in effect the honour of the entire Tata family and Tata Group. He said, by accepting the Honorary doctorate from HSNC University, Ratan Tata has honoured the HSNC University and the audiences.

            The Governor said, Ratan Tata is much more than an industrialist or Corporate leader; he is a role model and an icon for young entrepreneurs and startups. He said values, ethics, humility and humanity make Ratan Tata an inspiration for the younger generation.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

वृत्त 


 


 


 


 


 


 


 


वृत्त 




 

Featured post

Lakshvedhi