Sunday, 12 June 2022

 *सु-संकेत*

     *रस्ता कितीही दगड खड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बुट घालुन त्यावर आपण सहज चालु शकतो, परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते. मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही, तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो.*

     *सुप्रभात*

 


गंमत जंमत

 *थोडीशी गंमत* 


१) स्वर्गात जायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा.. मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची..😂


२) काही चेहरे मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी भाग पाडतात..😂


3) काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत. फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात.


४) रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂


५) चष्मे लावणाऱ्या लोकांचं अर्ध आयुष्य.. "माझा चष्मा कुठं आहे" हे शोधण्यातच निघून जातं.. 😂


६) तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक घेतली तरी.. ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..😂


७) मटणाच्या आणि दारुच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला.. Corona ची किंचित ही भीती नसते..😂


८) कुंडली खरं तर सासू अन् सुनेची जुळली पाहिजे. मुलगा बिचारा कुणही adjust करून घेतो..😂


९) ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात.. त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते..😂


१०) लग्नात मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही..😂


११) आज कालच्या पोरा पोरींपेक्षा संस्कारी तर मच्छर आहेत.. सातच्या आत घरात येतात..😂


१२) ज्यांचं मन साफ असतं ना.. त्यांना रोज आंघोळ करायची गरज नसते...😂


१३) जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..😂


१४) आयफोन वाल्यांच अर्ध आयुष्य.. मिरर सेल्फी काढण्यात अन् आयफोन चा EMI भरण्यातच निघून जातं...😂


१५) वर्षभर Dp न बदलणारे.. जेव्हा २-२ दिवसात Dp बदलतात.. तेव्हा समजून जायचं.. कोणीतरी नवीन 'जेवलीस का ' add झाली आहे..😂


१६) पोट आणि Ego कमी असेल तर.. माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.. 😂


१७) गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 😂


१८) काही लोक रोज सकाळी लवकरच उठतात.. फक्त त्यांना शुद्धीवर यायला १-२ तास लागतात.. 😂


१९) आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..😂


२०) जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😂


२१) जेव्हा आपण Sad Mood मध्ये असतो.. तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं..की आपला आवाज तर आपल्या Condition पेक्षाही खराब आहे.. 😂 😄


     *आजचे ज्ञान समाप्त.....*

Saturday, 11 June 2022

aao स्कूल चले

 शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव

        मुंबई, दि. 11- मागील दोन वर्षातील कोविड 19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात 15 जून रोजी तर विदर्भात 27 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यानुसार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी यासंबंधीच्या परिपत्रकाद्वारे शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना सूचना दिल्या आहेत.

            इयत्ता पहिली ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक अधिकाऱ्याने किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रबोधन करावे. फूल देऊन किंवा शालेय उपयोगी साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात यावे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण होण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक राहील असे व्यवस्थापन करावे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

            मागील दोन वर्षांच्या काळात विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने शैक्षणिक अध्ययन कमाल पातळीपर्यंत असल्याचे स्पष्ट दिसून येत नाही. तसेच शाळांतील शैक्षणिक सोयीसुविधा अस्त-व्यस्त झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी आणि दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित असल्याने हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मागील काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमबजावणी करण्याबाबत सहकार्य करावे. तसेच शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेण्यात यावे, असेही याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

00000


 


 


 


 



 बालमजुरी प्रथेविरोधात एकत्र या

                                  - कामगार मंत्री हसन मुश्रीफ

· 14 वर्षाखालील शोषित मुलांची माहिती तत्काळ नजीकच्या कामगार आयुक्त कार्यालय तसेच हेल्पलाईन क्र. 1098 वर कळविण्याचे नागरिकांना आवाहन

            मुंबई दि, 11: बालमजुरीसारखी समाजविघातक अनिष्ठ प्रथा संपविण्यासाठी राज्यातील जागृत जनतेने एकत्र येवून महाराष्ट्रातून बालमजुरी नष्ट करावी. असे आवाहन, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिनानिमित्त राज्यातील जनतेला केले आहे.


            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यभरातील 14 वर्षाखालील लहान मुले शाळेत न जाता कुठे काम करताना आढळल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ नजीकच्या कामगार आयुक्त कार्यालय अथवा हेल्पलाईन क्र. 1098 वर कळवावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. 


            14 वर्षाखालील सर्व मुलांना घटनेने शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिला आहे. याकरिता राज्यात 14 वर्षाखालील गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. सर्व लहान मुलांनी शाळेत शिकून स्वत:चे व देशाचे भविष्य उज्ज्वल करावे, ही त्यामागील भूमिका आहे. असे असतानाही काही समाजकंटक या कोवळ्या जीवांना बेकायदेशीरपणे स्वत:च्या स्वार्थाकरिता कामावर ठेवून त्यांचे शोषण करतात. या कुप्रथेविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवे. नागरिकांनी सजगता दाखवून अशा समाजकंटकाची माहिती शासन यंत्रणेस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अशा समाजकंटकांविरुद्ध खात्रीशीर कारवाई करण्यात येईल, तसेच पिळवणूकग्रस्त बालकास पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले

0000000



 



 लॉन टेनिसमध्ये सुवर्णाची 'आकांक्षा'पूर्ती'


खेलो इंडिया युथ गेम्स'

            पंचकुला, दि. ११: खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस आहे. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण बनला आहे. एकेका सुवर्णपदकासाठी काट्याची लढाई सुरू आहे. लॉन टेनिसमध्ये सकाळीच महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्य पदक पटकावले. कडाक्याच्या उन्हात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने कर्नाटकच्या सुहिथा मयुरीचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. हा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. आकांक्षाने तीन सेटमध्ये (६-७, ७-६ व ६-४) हा सामना जिंकला.


            पंचकुलातील जिमखाना मैदानावर ही चुरशीची लढत झाली. पहिल्या सेटमध्ये कर्नाटकच्या मुयरीने आघाडी घेतली होती. पहिले चार गुण मिळवल्यानंतर तिने सामन्यावर पकड बनवली. परंतु आकांक्षाने ४-४ आणि ५-५, ६-६ अशी बरोबरी साधली. परंतु ऐनवेळी मुयरीने गुण घेत पहिला सेट जिंकला.


दुसऱ्या सेटमध्येही पहिले पाच गुण घेऊन मयुरी पुढे होती. परंतु आकांक्षाने नंतर खेळ प्रकारात बदल करुन फोरहँड, बॅकहॅडचे फटके मारून तिने गुण घेण्यास सुरूवात केली. सहा-सहा गुण बरोबरी झाली. नंतर आकांक्षाने एक गुण घेत दुसरा सेट (७-६) जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली.


            नेहमीप्रमाणे तिसऱ्या सेटमध्ये मयुरी आघाडीवर राहिली. पहिले चार गुण घेत तिने आकांक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आकांक्षा दोन गुणांवर होती. तेव्हापासून खेळाचा नूर पालटला. दोघीही एकेका गुणांसाठी झगडत होत्या. त्यांना प्रत्येकी तीन अॅडव्हान्टेज मिळाले. परंतु तिसरा महत्त्वाच पॉईंट ही आकांक्षानेच घेतला. चौथाही गुण सहज घेतला. चार-चार अशी बरोबरी झाल्याने मयुरी बॅकफूट गेल्याचे दिसून आले. पाचवा गुणही आकांक्षानेच घेतला. दबावात आलेल्या मयुरीवर तिने पुन्हा एक महत्त्वपूर्ण गुण घेत तिसऱ्या सेटमध्ये (६-४) अशा फरकाने सामना जिंकला.


एकेरीत सहज कांस्य


            मुलींच्या एकेरीत महाराष्ट्राला कांस्यपदक सहजपणे पदक मिळाले. पुण्याच्या वैष्णवी आडकर आणि हरियाणाच्या श्रृती अहलावत यांच्यात कांस्य पदकासाठी सामना होता. परंतु या सामन्यात श्रृती गैरहजर राहिली. त्यामुळे वैष्णवी कांस्यपदकाची मानकरी ठरली.


क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आकांक्षाचा उत्साह वाढविला


            एकेरीत सुवर्णपदक पटकावणारी आकांक्षा ही नवी मुंबईतील एएसए अकादमीत सराव करते. प्रशिक्षक अरूण भोसले यांच्यासोबत महाराष्ट्राचे क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे, ओएसडी व्यंकेश्वर, खो-खोचे प्रशिक्षक उदय पवार यांनी सामन्यास उपस्थित राहून आकांक्षाला प्रोत्साहन दिले. ती पिछाडीवर असतानाही मानसिक बळ देण्याचे काम त्यांनी केले. क्रीडा मंत्री सुनील केदार व आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनीही शुभेच्छा देत खेळाडूंचा उत्साह वाढविला.


सायकलिंगमध्ये रौप्य, टेटेमध्ये मुली फायनलमध्ये


            रोड सायकलिंगमध्ये मास स्टार्ट प्रकारात सिद्धेश पाटीलने रौप्यपदक पटकावले. तो पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू आहे. टेबल टेनिसमध्येही मुलींनी महाराष्ट्राचा हरियानात डंका वाजवला आहे. त्यांचा अंतिम सामना सायंकाळी सहा वाजता हरियाणासोबत होणार आहे. दिया चितळे व स्वस्तिका घोष (दोघीही मंबई) या हरियाणाच्या सुहाना सैनी व चक्रवर्ती यांच्यासोबत लढतील.


 


000000


 


 


 


 



Featured post

Lakshvedhi