सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 8 June 2022
त्याची तीची कविता
*मंगेश पाडगांवकर*
मी कुठे म्हणालो *"परी"* मिळावी.
एवढंच की जरा *"बरी"* मिळावी.
प्रयत्न मनापासून आहेत मग...
किमान एक *"तरी"* मिळावी...!
स्वप्नात तशा खूप भेटतात...
कधीतरी *"खरी"* मिळावी.
हवीहवीशी एक जखम...
एकदा तरी *"उरी"* मिळावी...!
गालावर खळी नको तिच्या...
फक्त जरा *"हसरी"* मिळावी...!
चंद्राइतकी सुंदर नकोच...
फक्त जरा *"लाजरी"* मिळावी..!!
मी कुठे म्हणालो *"परी"* मिळावी..
एवढच की जरा *"बरी"* मिळावी..!!
( - *मंगेश पाडगावकर*)
-------------------------'----
👌👌👌👍👍👍
*तिची कविता:-*
मी कुठे म्हणतेय *"देखणा"* मिळावा...
एवढंच की जरा *"शहाणा"* असावा.
प्रयत्न शंभर आणे आहेतच,
मग किमान एक *"आणा"* मिळावा..!
सिनेमात तसे खूप भेटतात ,
कधी तरी *"अंगणात"* भेटावा.
हवाहवासा असा छोटासा,
एक तरी *"नजराणा"* मिळावा
नुसती छप्पन इंचाची छाती नको,
मनाचा *"सच्चा बाणा"* असावा
सूर्याइतका तेजस्वी नको,
पण प्रेमात कधी *"उणा"* नसावा
मी कुठे म्हणतेय *"देखणा"* मिळावा
एवढंच की जरा *"शहाणा"* असावा
*----------------*
अष्टांग हृदयम!!
आपल्या भारतात ३००० वर्षांपूर्वी एक फार मोठी ऋषी होऊन गेले.
त्यांचं नाव होतं महाऋषि वागभट!!
त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं.
त्या पुस्तकाचं नाव होतं, अष्टांग हृदयम!!
(Ashtang hrudayam)
आणि याच पुस्तकात त्यांनी
आजारपण दूर करण्यासाठी ७००० सूत्रे लिहिलेली होती !
हे त्यातीलच एक सूत्र आहे !!
महर्षी वागभट लिहीतात की कधीकधी हृदयाचा घात होत असतो!
म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये blockage व्हायला सुरुवात झालेली असते!
म्हणजे याचा अर्थ असा की रक्तामध्ये (blood) , acidity (आम्लता ) वाढलेली आहे!
आम्लता म्हणजे काय ते आपण जाणताच!
यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात acidity !!
आम्लता दोन प्रकारची असते !
एक असते पोटाची आम्लता !
आणि दुसरी म्हणजे रक्ताची (blood) आम्लता !!
आपल्या पोटात जेव्हा आम्लता वाढते!
तेव्हा आपण म्हणतो पोटात आग पडल्यासारखं वाटतंय!!
आंबट ढेकरा येतायत!
तोंडात सारखं पाणी येतय!
आणि ही आम्लता (acidity) जेव्हा आणखीन वाढते तेव्हा!
तिला इंग्रजीत hyperacidity म्हणतात !
आणि हीच पोटातली आम्लता वाढत वाढत जेव्हा रक्तात उतरते तीलाच रक्त आम्लता (blood acidity) म्हणतात!!
आणि जेव्हा blood मध्ये acidity वाढते तेव्हा हे आम्लयुक्त रक्त (blood) हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून वाहू शकत नाही!
आणि रक्तवाहिन्यांमध्ये blockage होते !
आणि असं होतं तेव्हाच heart attack येतो !! त्याशिवाय heart attack नाही येत !!
आणि हे आयुर्वेदाचं सर्वात मोठं सत्य आहे जे कुठलाही डॉक्टर आपल्याला सांगत नाही!
कारण यावरील उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे!!
काय उपाय आहे हा??
महर्षी वागभट यांनी लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा रक्तात (blood) आम्लता (acidity) वाढलेली असेल!
तेव्हा आपल्या आहारात क्षारयुक्त पदार्थांचा समावेश करावा!
आपल्याला हे तर माहीतच आहे की पदार्थ दोन प्रकारचे असतात, आम्लयुक्त आणि क्षारयुक्त!!
acidic and alkaline
आता आम्ल आणि क्षार यांना एकत्र केलं तर काय होईल! ?????
acid and alkaline यांना एकत्र केलं तर काय होईल ?????
neutral
होईल हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे !!
तर वागभट पुढे लिहितात !
की जर रक्ताची आम्लता वाढली असेल तर क्षारीय (alkaline) पदार्थांचं सेवन करावं !
*म्हणजे रक्ताची आम्लता (acidity) neutral होईल!!!*
आणि रक्ताची आम्लता neutral झाली की मग!
heart attack ची शक्यता आयुष्यात कधीही उद्भवणारच नाहीं !!
अशी आहे एकंदरीत कथा !!
आता आपण साहजिकच विचाराल की असे कोणकोणते पदार्थ आहेत जे क्षारीय असतात आणि आम्ही आहारात घ्यायला हवेत?????
आपल्या स्वयंपाक घरात असे पुष्कळसे पदार्थ आहेत की जे क्षारीय आहेत!
आणि ज्यांचं आपण सेवन केलं तर आपल्याला कधीच heart attack येणार नाही !
आणि जर येऊन गेला असेल !
तर पुन्हा येणार नाही !!
आपल्या घरात सर्वांत अधिक क्षारीय पदार्थ जर कोणता असेल तर तो म्हणजे दुधी भोपळा !!
हिंदीत त्याला लौकी म्हणून ओळखल्या जातं!!
English भाषेत त्याला म्हणतात bottle gourd !!!
याची आपण भाजी करून खात असतो!
ह्यापेक्षा क्षारीय दुसरा कुठलाच पदार्थ नाही!
तर आपण रोज दुधी भोपळ्याचा रस काढून पित राहावे !!
किंवा कच्चा दुधी भोपळा खाल्ला तरी चालेल!!
वागभट पुढं लिहितात की रक्ताची आम्लता कमी करण्याची सर्वाधिक शक्ती दुधी भोपळ्यातच !
तेव्हा आपण दुधीच्या रसाचा सेवन जरूर करावं!!
किती रस सेवन करायचा ?????????
रोज 200 ते 300 मिलीग्राम रस प्यावा !!
केव्हा प्यायचा ??
सकाळी अंशापोटी (प्रातर्विधी आटोपल्यावर) पीऊ शकता !!
किंवा नाश्ता केल्यावर अर्ध्या तासानंतर पीऊ शकता !!
या दुधी भोपळ्याच्या रसाला आपण आणखीन अधिक क्षारीय बनवू शकताढ
याच्या रसात ७ ते १० तुळशीची पानं टाका
तुळस फार क्षारीय आहे !!
तसंच यात आपण पुदीन्याची ७ ते १० पानंही टाकू शकता!
पुदीना फार क्षारीय आहे !
याच्यासोबत आपण काळं मीठ किंवा सेंदवमिठ जरूर टाका !
हे मीठ देखील खूप क्षारीय आहे !!
पण लक्षात असू द्या
मीठ काळं वा सेंधव मीठच असलं पाहिजे !
ते दुसरं आयोडीन युक्त मीठ अजिबात टाकू नका !!
हे आयोडीन युक्त मीठ आम्लीय असतं !!!!
तर मित्रांनो आपण या दुधी भोपळ्याच्या ज्युसचं सेवन जरूर करा !!
२ ते ३ महीन्यांच्या अवधीत आपल्या heart चे सारे blockages ठीक होतील!!
२१ व्या दिवशीच आपणास या उपायांचा खूप अधिक परिणाम दिसून येणं सुरू होईल !!!
कुठल्याही शस्त्रक्रियेची जरूरत आपल्याला पडणार नाही !!
घरातूनच आपल्या भारताच्या आयुर्वेदानं या आजाराचा इलाज होऊन जाईल !!
आणि आपलं हे अनमोल शरीर आणि ऑपरेशनचे लाखो रुपये वाचतील !!
आपण पूर्ण पोस्ट वाचलीत, आपणास खूप खूप धन्यवाद !!
आपल्याला योग्य वाटल्यास आपण ही माहिती इतर सर्वत्र पोहोचवावी ही विनंती.
🙏🏻जय श्रीमन नारायण नारायण नारायण🙏
त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदान देण्यास उपमुख्यमंत्र्यांची मान्यता.
मुंबई, दि. 7 :- १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ तुकड्या/ अतिरिक्त शाखावरील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान व ज्या शाळा २० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि काही शाळांच्या त्रुटींमुळे अनुदान सुरू करता आले नव्हते. या शाळांनी त्रुटी पूर्तता केल्यामुळे अनुदान देण्यास आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
या बैठकीस आमदार सर्वश्री सुधीर तांबे, जयंत आजगावकर, अभिजित वंजारी, कपिल पाटील, विक्रम काळे, सतीश चव्हाण, किरण सरनाईक, बाळाराम पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल आदी उपस्थित होते.
आज झालेल्या बैठकीमध्ये त्रुटी पूर्तता केलेल्या २० टक्के अनुदानासाठी ७९ प्राथमिक शाळा, २८४ तुकड्यांमधील ८३५ शिक्षकांच्या पदांना, ५३ माध्यमिक शाळांमधील २५३ शिक्षकांच्या आणि १५९ शिक्षकेतर पदांना, १२९ माध्यमिक तुकड्यांमधील १९४ शिक्षकांच्या पदांना तसेच २५१ उच्च माध्यमिक शाळांमधील १२८४ शिक्षक आणि ३६ शिक्षकेतर पदांना मान्यता देण्यात आली. याचबरोबर वाढीव २० टक्के अनुदानासाठी ८२ प्राथमिक शाळा, २४० तुकड्यांमधील ७७३ शिक्षकांच्या पदांना, २०२ माध्यमिक शाळांमधील ९८९ शिक्षकांच्या तर ७१० शिक्षकेतर पदांना, ४८४ माध्यमिक तुकड्यांमधील ६७५ शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्यात आली. यासाठी एकूण १७७.०६ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.
तसेच कायम शब्द वगळलेल्या अनुदानास पात्र असलेल्या परंतु अनुदानास पात्र घोषित न केलेल्या मूल्यांकन पात्र खाजगी शाळांना देखील अनुदानास पात्र घोषित करण्यास आजच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. कायम शब्द वगळलेल्या अघोषित खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
मूल्यांकन पात्र ठरलेल्या २९८ प्राथमिक शाळा, ६१९ तुकड्या, ३३८ माध्यमिक शाळा, १३८६ तुकड्या तर १३२० उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय अशा एकूण ३९६१ शाळा/तुकड्या अनुदानासाठी पात्र घोषित करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा
- दिनेश वाघमारे
मुंबई, दि. 7 :"सध्याच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करूनच आपला स्पर्धेमध्ये टिकाव लागू शकतो", असे मत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात श्री. वाघमारे बोलत होते. यावेळी मंचावर महापारेषणचे संचालक (संचलन) अनिल कोलप, संचालक (प्रकल्प) नसीर कादरी, संचालक (वित्त), अशोक फळणीकर, संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे उपस्थित होते.
"आपली कंपनी जोपर्यंत कात टाकत नाही, तोपर्यंत या खासगी कंपन्यांसमोर आपला टिकाव लागणार नाही. महापारेषणने ड्रोनच्या साहाय्याने काम करण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नव्या संकल्पनेचा अवलंब केला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे,” असेही श्री.वाघमारे म्हणाले,
प्रास्ताविकात श्री.गमरे म्हणाले, "कंपनीची संस्कृती व कर्मचाऱ्यांमध्ये एकसंघ वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येणे, सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणे, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून कंपनीचा विकास साधावा, या हेतूने महापारेषणतर्फे कंपनीचा १७ वा वर्धापनदिन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा त्यामागचा हेतू आहे"
यावेळी ऊन-पावसाची तमा न बाळगता विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्री.वाघमारे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापारेषणचे मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) सुधीर वानखेडे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन, मनुष्यबळ नियोजन) राजू गायकवाड, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, राजशिष्टाचार अधिकारी सतिश जाधव, अधीक्षक अभियंता (प्र.) योगेश पाचपांडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद अवताडे, संचालक (मानव संसाधन) यांचे विशेष कार्य अधिकारी महेश आंबेकर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला राज्यातील विविध परिमंडळातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन
‘युजीसी’च्या निकषानुसार वाढविण्याचा निर्णय
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतील निर्णय
मुंबई, दि. 7 : राज्यातील महाविद्यालयातून तासिका (सीएचबी) तत्त्वावर शिकविणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निकषानुसार वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. त्याचबरोबर विद्यापीठांचे आकृतिबंध तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत ‘नॅक’ (राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद) मानांकन असणाऱ्या महाविद्यालयांना ५० टक्के पदभरतीला परवानगी दिली जावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणात कोणतीही तडजोड करु नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रीया व तासिका तत्वावर (सीएचबी) कार्यरत प्राध्यापकांच्या दरमहा मानधनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुधीर तांबे, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार किरण सरनाईक, माजी आमदार अमरसिंह पंडीत, संजय खोडके, सामान्य प्रशासन विभागाचे (सेवा) अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने, महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टिचर्स असोसिएशनचे (मुप्टा) सुनिल मगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच महाविद्यालयातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील तासिका तत्त्वावर (सीएचबी) शिकविणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निकषानुसार वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो ‘सीएचबी’ तत्त्वावर शिकविणाऱ्या प्राध्यापकांना होणार आहे. तसेच राज्यातील विद्यापीठांचे आकृतीबंध तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देताना आकृतिबंध पूर्ण झालेल्या मात्र ‘नॅक’ (राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद) मानांकन मिळविणाऱ्या महाविद्यायालयातचं ५० टक्के पदभरतीला मान्यता देण्यात येणार आहे. राज्यातील महाविद्यालयीन शिक्षणाच्या दर्जात कोणत्याही परिस्थितीत तडजोड करता कामा नये अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.
*****
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...




