Friday, 3 June 2022

 आयटीआय विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष

अभियांत्रिकी पदविकेच्या कोणत्याही शाखेत प्रवेश मिळणार

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल

            मुंबई, दि. 2 : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत ०३ मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेवून आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. कोणत्याही ट्रेड मधून १० वी नंतरचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे. या बदलामुळे साधारणत: १० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.


            मुंबईतील विद्यालंकार तंत्रनिकेतन विद्यालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्यावत संकेतस्थळाचे पुन:लोकार्पण करण्यात आले. यानंतर श्री. सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालक डॉ. अभय वाघ, सहसंचालक डॉ. प्रमोद नाईक, विद्यालंकार तंत्रनिकेतनचे प्राचार्य आशिष उकिडवे, उपप्राचार्य वर्षा भोसले, तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाअगोदरच या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सामील होता येणार आहे. ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाअगोदरच माहिती भरता येणार आहे. निकाल लागल्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे, असेही श्री.सामंत यांनी स्पष्ट केले.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, दरवर्षी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील पदविका स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते आहे. दि. १ जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदविका प्रवेशाच्या नियामावलीस मान्यता देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील इयत्ता १० वी नंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया आज दि. २ जून २०२२ रोजी सुरु करण्यात आली आहे.


            पदविका प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रकियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना तसेच ऑनलाईन अर्ज https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

पदविका प्रवेशात प्रतीवर्षी १० टक्क्यांनी वाढ

            पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशात वाढ होण्याच्या अनुषंगाने समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम इत्यादी कार्यक्रमांद्वारे पदविका अभ्यासक्रमांच्या अध्यापकांनी व संस्थांनी सकारात्मक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. यामुळे पदविका अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. मागील तीन वर्षात पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशात प्रतीवर्षी सलग १० टक्के याप्रमाणे वाढ होत आहे.

केंद्रीभूत प्रवेशाच्या ३ फेऱ्या होणार

            कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या २ फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या ३ फेऱ्या घेण्यात येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

कोविड १९ मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी २ जागा राखीव

            कोविड- १९ महामारीदरम्यान आई व वडील गमावलेल्या मुलांची काळजी घेण्यासाठी पंतप्रधानांनी पीएम केअर्स योजना सुरू केली आहे. राज्य शासनाने पदविका अभ्यासक्रमाकरिता या योजनेअंतर्गत कोरोनामुळे आई व वडील गमावलेल्या पात्र उमेदवारांसाठी प्रत्येक संस्थेतील प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दोन या प्रमाणात अधिसंख्य जागा उपलब्ध राहणार आहेत. या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या स्वनाथ योजनेअंतर्गत पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्यावत संकेतस्थळाचे लोकार्पण

तंत्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ वर्ष २०१५ पासून dtemaharashtra.gov.in या URL वर कार्यरत होते. इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय, भारत सरकार यांच्या धोरणानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ dte.maharashtra.gov.in वा URL वर उपलब्ध करण्यात आले आहे. या नवीन व अद्ययावत संकेतस्थळाचे पुनः लोकार्पण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

            मराठी भाषांतरण (Marathi Version): संचालनालयाच्या संकेतस्थळावर माहिती इंग्रजी व मराठी भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला /पालकांना व विद्यार्थ्यांना संचालनालयाची व त्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या प्रवेशप्रक्रियेबाबत माहिती सहजतेने मराठीमध्येही उपलब्ध होईल. संचालनालयाची माहिती अधिक विद्याकेंद्रित, उपयोगी आणि सर्वासाठी वापरण्याकरिता सहज करण्यात आली आहे.

            विभाग निहाय संस्थांची यादी विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी व जनतेसाठी संचालनालयाच्या विविध विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या संस्थांची यादी दर्शवण्यात आली आहे. विद्यार्थी ही माहिती सहजरित्या बघू शकतील व याचा फायदा त्यांना प्रवेशाच्यावेळी संस्था निवड करण्यासाठी होईल.

            शिष्यवृत्ती योजनांची, प्रवेशासंबंधीची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे . शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता पदविका प्रवेशाच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत.प्रथम वर्ष पदविका (१०वी नंतर)-http://poly22.dte.maharashtra.gov.in प्रथम वर्ष पदविका (१२वी नंतर)- https://phd22.dte.maharashtra.gov.in उपलब्ध करण्यात आले आहे.




            

Cycle day

 


गुंतवणूक

 


Thursday, 2 June 2022

गुठोलियो के दाम

 

Very nice decision, आम to aam,गुढलीयोके भी dham

भवताल

 एका शिंपल्याच्या रहस्यमय प्रवासाची गोष्ट!

- दोन कोटी वर्षांच्या काळातल

(भवतालाच्या गोष्टी २३)

दोन कोटी ३० लाख वर्षांपूर्वीचा एक समुद्री जीव, शिंपल्यात राहणारा. त्याचं नाव, डोसिनिस्का. गुजरातमधल्या कच्छ परिसरातील समुद्रात त्याचा वावर होता. पण काळाच्या ओघात पृथ्वीची भूरचना आणि समुद्रामध्येही मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. त्यात या इवल्याशा जीवाच्या प्रजातीने हजारो किलोमीटरचे स्थलांतर केले. ही प्रजाती श्रीलंका, ईस्ट इंडीज्, टिमोर बेट या मार्गाने निघाली. तिचा प्रवास अर्थातच अत्यंत मंदगतीने झाला, पिढ्यानुपिढ्या सुरू राहिला. आता ही प्रजाती न्यूझिलँड आणि ऑस्ट्रेलिया इथे स्थिरावली आहे... हे सारेच थक्क करणारे. या जीवाची, त्याच्या प्रवासाची आणि त्याने उलगडलेल्या निसर्गाच्या रहस्याची ही अफलातून कहाणी!

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/Sea-Shell-Migration

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही तेवीसावी गोष्ट)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी - bhavatal.com     

(इतरांसोबतही शेअर करा)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


ओबीसी योजना

 *ओबीसीच्या योजनाबाबत माहिती....*                                      #महाज्योती म्हणजे नेमक काय, ओबीसी विद्यार्थिसाठी कोणते कोर्स आहेत. याबाबत माहिती या “माहिती पत्रक ‘ मध्ये सविस्तर दिलेली असून ओबीसी व विविध संघटनेत काम करणाऱ्या सर्वानीच हि माहिती वाचून, समजून घेणे गरजेच आहे. #ओबीसीना  मिळणाऱ्या *महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर* 

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था) यांनी माहिती पत्रक जाहीर केले असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक कोर्स उपलब्ध आहेत. याची माहिती ओबीसी वर्गाला व्हावी म्हणून जनजागृती करण्यात येत आहे. ओबीसी तसेच कुणबी समाजातील सर्व मंडळे, शाखा व युवा शाखा यांनी याबाबत माहिती घ्यावी व विविध योजनांचा लाभ घ्यावा.

__________________________

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई (सलग्न)

कुणबी युवा मुंबई









 Dear Madam/Sir,

 

Arun Jaitley National Institute of Financial Management is an institute of national importance promoted by the Ministry of Finance, Government of India with Hon’ble Union Minister of Finance as the President of the AJNIFM Society. It is a Centre of Excellence for capacity building in the complex domain of finance. Apart from capacity building, AJNIFM is also engaged in Policy Research in the field of financial markets, under the aegis of DEA-AJNIFM Research Programme.

To promote the spirit of Knowledge creation besides enhancing financial awareness among the citizen of the country, Ministry of Finance, Government of India is conducting a National Quiz on Financial Sector to celebrate Azadi ka Amrit Mahotsav and the journey of Indian Financial Sector in last 75 years since independence.


Arun Jaitley National Institute of Financial Management (AJNIFM) in collaboration with National Stock Exchange is organising this national quiz.

The Quiz is active for a period of one month, from 01st June, 2022 to 30th June, 2022.

You can take the 5 minutes (300 seconds) quiz from anywhere, on any mobile/ computer, anytime.

The best performers will be awarded medals and cash prizes while all the participants will be issued a Certificate of Participation.

The details are available in the brochure attached herewith.


The Quiz will be available at: quiz.mygov.in

Wish you happy quizzing!

Thanks and regards,

 

Dr. S.N. Ghosh

Convenor, National Quiz on Financial Sector

Arun Jaitley National Institute of Financial Management

(Ministry of Finance, Government of India)

 

Featured post

Lakshvedhi