Tuesday, 24 May 2022


 कला हे कालातीतईश्वराचे देणं असते

                      - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

          मुंबई, दि. 24 : काव्यकलाशिल्पकलाचित्रकला या सर्व कला कालातीत गोष्टी असतात.  देशात परचक्र आले असताना देखील आपल्या देशातील कला टिकून राहिल्या. ईश्वरी देणे असलेल्या कलेला कधी अंत नसतो. त्यामुळे ज्याला जी कला प्राप्त झाली आहेतिचा त्या व्यक्तीने सर्वोत्तम विकास केला पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            राज्यपाल कोश्यारी यांनी नुकतेच बॉम्बे आर्ट सोसायटी मुंबई येथे 'कला गुलदस्ताया निवडक कलाकारांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचे उदघाटन केलेत्यावेळी ते बोलत होते. 

            कला उद्योजिका व व्हिडीओशॉट्स आर्टस् अँड एंटरटेनमेंटच्या संस्थापिका अंजली कौर अरोरा यांच्या पुढाकाराने या एक आठवड्याच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

            पूर्वी कलेला राजाश्रय होता. आज कलेला लोकाश्रय आहे. आपल्या घरी भिंतीवर एखादी सुंदर कलाकृती असावी असे सामान्य माणसाला देखील वाटत असतेअसे राज्यपालांनी सांगितले. कलाकारांनी स्वतः आशावादी असावे व लोकांना देखील जगण्याची नवी उमेद द्यावी असे राज्यपालांनी सांगितले.

            ..तर कलाकार पुनश्च अजंता - वेरूळ साकारतील : भगवान रामपुरे

            यावेळी बोलताना ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांनी पूर्वीप्रमाणे कलेला राजाश्रय मिळत नाही याबद्दल खंत व्यक्त केली. आजही कलाकारांना त्यांच्या उमेदीच्या काळात राजाश्रय मिळाला तर ते एखाद्या पहाडातून अजंता-वेरूळ सारखी अजरामर शिल्पे साकारतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  देशात उत्तमोत्तम कलाकार आजही आहेत. परंतु त्यांचेकडून काम करून घेणारे नाहीतअसे त्यांनी सांगितले   

            यावेळी राज्यपालांनी प्रदर्शनाची पाहणी केली व कलाकारांशी संवाद साधला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रदर्शनात सहभागी होत असलेले कलाकार वैशाली राजापूरकरअभय विजय मसरामराखी शहा व सकीना मंदसौरवाला यांचा सत्कार करण्यात आला. 

            ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णीसहआयोजक नरेंद्र सिंग अरोराकलाकार व कलारसिक यावेळी उपस्थित होते. 

००००



Governor Koshyari inaugurates Anjali Arora's 'Bouquet of Arts' Exhibition


            Mumbai 24 Governor Bhagat Singh Koshyari inaugurated 'Bouquet of Arts' an Exhibition of the work of four promising artists at Bombay Art Society Mumbai. The Exhibition was organised by Videoshots Arts and Entertainment founded by Art Entrepreneur Anjali Kaur Arora.

            Speaking on the occasion, Koshyari said works of art such as poetry, painting, music and sculpture are timeless. He said art is the gift of God to mankind. He appealed to artists to identify and nurture the artistic talent given to them by nature. Senior artists Sadashiv Kulkarni, sculptor Bhagwan Rampure and Co Founder of Videoshots Arts and Entertainment Narendra Singh Arora were present.

            The Governor felicitated the participating artists Vaishali Rajapurkar, Abhya Vijay Masram Rakhi Shah and Sakina Mandsaurwala.

000


 ****पहिली इंडो - नेपल इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2022****


 *स्थळ :* नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स काठमांडू नेपाळ 

 *दिनांक* 22 May 2022 

 *प्रमुख प्रशिक्षक :* शिहान राहुल तावडे

 *प्रमुख संघटक :* शिहान राजेंद्र ओझा 

 *प्रमुख आयोजक :* डॉ. दीपक कटारिया

 *कटा विभागात सुवर्ण पदक विजेते* 

1 लव्या घाडगे 2 मोक्षदा पाटील 3 राजनंदिनी खपाले 

4 मुमुक्षा घरत 5 साईशा मुंबईकर 6 राजलक्ष्मी सगर 

7. विधी ठाकूर8. अनय पाटील 9. आदित्य चोरगे 

10. सिद्धेश यादव 11. वरद यादव 12. ईशान वैशंपायन 

13. तनिष्क तावडे 14. आयुष्य अंबाडे 15. अद्वैत म्हात्रे 

16. कार्तिक गावंड 17. देवांक ढवळे 

 *रौप्य पदक विजेते

1. मानसी कंटक 2. ओमकार बाबर 3. मित पवार

 *कुमिते विभाग* सुवर्ण पदक विजेते* 

1. लव्या घाडगे 2. मोक्षदा पाटील 3. मानसी कंटक 

4. सायशा मुंबईकर 5. अनय पाटील 6. देवांक ढवळे 

7. अद्वैत म्हात्रे 8. मीत पवार आयुष 9. अंबाडे 

10. तनिष्क तावडे 

 *रौप्य पदक विजेते* 

1. राजलक्ष्मी सगर 2. विधी ठाकूर  3. मुमुक्षा घरत 

4. आदित्य चोरगे 5. वरद यादव 6. सिद्धेश यादव 

7. कार्तिक गावंड 8. ओमकार बाबर 9. ईशान वैशंपायन

 *स्थळ :* नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स काठमांडू नेपाळ 

 *दिनांक* 22 May 2022 

 *प्रमुख प्रशिक्षक :* शिहान राहुल तावडे

 *प्रमुख संघटक :* शिहान राजेंद्र ओझा 

 *प्रमुख आयोजक :* डॉ. दीपक कटारिया


 *कटा विभागात सुवर्ण पदक विजेते* 

1 लव्या घाडगे 2 मोक्षदा पाटील 3 राजनंदिनी खपाले 

4 मुमुक्षा घरत 5 साईशा मुंबईकर 6 राजलक्ष्मी सगर 

7. विधी ठाकूर8. अनय पाटील9. आदित्य चोरगे 

10. सिद्धेश यादव 11. वरद यादव 12. ईशान वैशंपायन 

13. तनिष्क तावडे 14. आयुष्य अंबाडे 15. अद्वैत म्हात्रे 

16. कार्तिक गावंड 17. देवांक ढवळे 

 *रौप्य पदक विजेते* 

1. मानसी कंटक 2. ओमकार बाबर 3. मित पवार


 *कुमिते विभाग* 

 *सुवर्ण पदक विजेते

1. लव्या घाडगे 2. मोक्षदा पाटील 3. मानसी कंटक 

4. सायशा मुंबईकर 5. अनय पाटील 6. देवांक ढवळे 

7. अद्वैत म्हात्रे 8. मीत पवार आयुष 9. अंबाडे 

10. तनिष्क तावडे 

 *रौप्य पदक विजेते* 

1. राजलक्ष्मी सगर 2. विधी ठाकूर  3. मुमुक्षा घरत 

4. आदित्य चोरगे 5. वरद यादव 6. सिद्धेश यादव 

7. कार्तिक गावंड 8. ओमकार बाबर 9


. ईशान वैशंपायन

Monday, 23 May 2022

 Maharashtra Inaugurates it Pavillion at WEF, Davos, makes a pledge towards sustainable development for a trillion dollar economy

            Davos, Switzerland: The state delegation of Maharashtra inaugurated its pavilion at Davos. The Maharashtra state is participating as a part of Team India at WEF, Davos, representing the state’s role in building the $5 trillion economy for India.


            The state delegation is led by Honorable Minister of Environment & Climate Change, Shri Aaditya Thackeray, Honorable Minister of Industries Shri Subhash Desai and Honorable Minister of Energy, Dr. Nitin Raut and have been accompanied by ACS to Hon Chief Minister Shri Ashish Kumar Singh, ACS Industries Shri Baldev Singh, MD of MSEDCL, Shri Vijay Singhal, CEO of MIDC Dr P. Anbalagan amongst others.

            The Annual Meeting 2022 will embody the World Economic Forum’s philosophy of collaborative, multistakeholder impact, providing a unique collaborative environment in which to reconnect, share insights, gain fresh perspectives, and build problem-solving communities and initiatives. The World Economic Forum is an yearly event, which serves as a melting pot of ideas and many important global partnerships are forged during the week-long event.

            Maharashtra had launched the Magnetic Maharashtra 2.0 program for attracting investments in the state. So far, in the 9 editions of the MM 2.0 initiative, Maharashtra, under the leadership of Hon. Chief Minister, Shri Uddhav Thackeray has been able to attract INR 1.89 lac crore in new investments in addition to an FDI of more that INR 2 lac crore, highest in India. The MIDC plans to execute the 10th edition of Magnetic Maharashtra 2.0 at the World Economic Forum.

            The state delegation has a series of high-powered meetings lined up with global CEO’s of Fortune 500 companies and hopes to mobilize huge investments in Maharashtra. Some of the key investors that the state met today are – Suntory – a global beverage company that is leading efforts in sustainable packaging; UPL, a multinational major in chemicals who are investing in 250 acres of land in Raigad district of the state, among others.

            The state also signed an MoU with the Global Plastic Action Partnership (“GPAP”)and initiated the Maharashtra Plastic Action Partnership (Maharashtra PAP), which will serve as a roadmap for sustainable development in the state. Maharashtra was the first state to ban single use plastic in 2018 and has been at the forefront in sustainable development with aggressive policies and action plans to balance development and climate change.


0000

 इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे

परदेश शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई, दि. २३ : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात परदेश शिष्यवृत्ती साठी २३ जून २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी विहीत वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी.डी.डोके यांनी केले आहे.

          परदेश शिष्यवृत्तीसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे अथवा कुटूंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.८ लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत THE (Time Higher Education ) / आणि QS World University Ranking २०० च्या आतील असावी. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागेवर मुलींची निवड करण्यात येईल. अन्य अटी व शर्ती हया सविस्तर विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील. अर्जाचा नमूना, शासन निर्णय व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील रोजगार या लिंकवर भेट द्यावी. ही योजना शासन निर्णय इमाव, सावशैमाप्र, विजाभज आणि विमाप्रा कल्याण विभाग क्र. शिवृत्ती २०१८/प्र.क्र.११८/शिक्षण, दि. ११ ऑक्टोबर २०१८ नुसार हा अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे-१ यांच्याकडे दि.२३ जून २०२२ रोजी सायं ६.१५ पर्यंत जमा करावा.

           या योजनेसाठी लाभाचे स्वरूप पढीलप्रमाणे आहे. विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम. विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DCPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर करेल ती रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अनुज्ञेय असेल.विद्यार्थ्यांना परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च अनुज्ञेय असेल.

0000


 



 स्वित्झर्लंडमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन

दावोस आर्थिक परिषदेमुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीला चालना मिळेल

- सुभाष देसाई.

            दावोस, दि. 23 :- दावोस, स्वित्झर्लंड येथे 22 मे पासून सुरु झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत उपस्थित आहेत. परिषदेच्या पहिल्या दिवशी या मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच विविध कंपन्यांसोबत गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले. या परिषदेद्वारे राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

            याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर आदी उपस्थित होते. देशाच्या ५ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र अग्रणी असून राज्याने एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातून राजकीय नेते, धोरणकर्ते, उद्योगपती व तज्ज्ञ मंडळी दावोस, स्वित्झर्लंड येथे एकत्र आली आहे.

            शिष्टमंडळाने इंडिया पॅव्हेलियनला भेट दिली. राज्य पॅव्हेलियनमध्ये भेट घेतलेल्या प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये पॅकेजिंग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जपानच्या पर्यावरणस्नेही सनटोरी कंपनीच्या प्रतिनिधींसोबत महाराष्ट्राच्या शिष्ठमंडळाने चर्चा केली. तर रसायन क्षेत्रातील बहुराष्ट्रीय यू पी एल या कंपनीने रायगड जिल्ह्यात २५० एकर भूखंडावर गुंतवणूक करण्यास पसंती दिली असून त्यासंबधी चर्चा केली.

            पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्लोबल प्लास्टिक ऍक्शन पार्टनरशिप यांचे समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. २०१८ मध्ये एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.


०००

 शिवसंपर्क अभियान भाग २


संस्नेह जय महाराष्ट्र!

             अलिबाग मुरुड व पेण विधानसभा मतदार संघातील सर्व उप जिल्हा प्रमुख ,तालुका प्रमुख , उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शहर प्रमुख,नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य, युवा सेना तालुका अधिकारी, अल्पसख्याकांसेना, कामगारसेना, ग्रा.सं.कक्ष, उप शहर प्रमुख, उप तालुका अधिकारी, महिला आघाडी प्रमुख,आजी माजी पदाधिकारी तसेच शिवसैनिक, युवा सैनिक आणि महिला आघाडी आपणांस कळविण्यात येते की, शिवसेना पक्ष प्रमुख ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार आपल्या येथे शिवसेना नेते माननीय खासदार श्री.राजन विचारे साहेब, आमदार. मा.श्री भरतशेठ गोगावले,आमदार मा.श्री.महेंद्रशेठ थोरवे , रायगड जिल्हा संपर्क प्रमुख मा श्री.सदानंद थरवळ साहेब मा.श्री.विलास चावरी साहेब रायगड जिल्हा प्रमुख मा.श्री.अनीलजी नवगणे महिला आघाडी संपर्क मा.सौ. सुवर्णा ताई कारंजे, यांच्या प्रमुख उपस्थितित मंगळवार दिनांक २४ मे २०२२ रोजी सकाळी 10.00 वाजता रोहा ,दुपारी 12 वाजता मुरुड शहर , दुपारी 2.00 वाजता अलिबाग राजमला (श्रीराज - आमदार निवास),सायंकाळी 5.00 वाजता बेणसे ता. पेण येथे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.


            

     आपला महेंद्र हरी दळवी वि.स.स. 

 शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड


 

Featured post

Lakshvedhi