Saturday, 21 May 2022

 राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन


            नवी दिल्ली दि. 20 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी' दिन पाळण्यात आला .

               कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) डॉ. निरूपमा डांगे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली.

           याचबरोबर महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ पाळण्यात आला. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योतकौर अरोरा यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

 मधाचे गाव

महाबळेश्वरचे मांघर

महाबळेश्वरला फिरायला गेलात की तुमची ही भेट आता 'गोड' आठवण देणारी ठरणार आहे. इथे येणारे लाखो पर्यटक मांघर या गावाला भेट देऊन येथील मधपाळांनी संकलीत केलेला शुद्ध मध चाखू शकणार आहेत.

जंगल व डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरुपी रोजगार मिळावा, कृषी पर्यटनाच्या धर्तीवर ‘मधुपर्यटन’ही संकल्पना रुजावी या मुख्य उद्देशाने खादी ग्रामोद्योग विभागाने 'मधाचे गाव' ही संकल्पना साकारण्यासाठी मांघर हे मधाचे गाव तयार केले आहे. हे देशातील पहिले मधाचे गाव ठरले आहे.

मधमाशांची घटती संख्या संपूर्ण सजिव सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांसाठी घातक आहे. अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून मधमाशांचे कार्य अनन्यसाधारण असेच आहे. आज जागतिक स्तरावर देखील मधमाशांच्या संवर्धनासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत.

मधमाशांची संख्या वाढावी तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा, यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मागील साठ वर्षांपासून मधमाशा पालनासंदर्भात कार्यरत आहे. मधमाशांचा विकास व विस्तार व्हावा या उद्देशाने 1957 साली मध संचालनालयाची स्थापना देखील महाबळेश्वरला करण्यात आली आहे.

मांघर ठरले पहिले मधाचे गाव

'मांघर' या महाबळेश्वर तालुक्यातील गावाची निवड 'देशातील पहिले मधाचे गाव' म्हणून करण्यात आली आहे. मांघर गावातील एकूण लोकसंख्येच्या ऐंशी टक्के लोक मधमाशीपालन करीत आहेत. या गावाच्या आजूबाजुला घनदाट जंगल असून वर्षभर राहणारा फूलोरा आहे. या गावाने आज अखेर शासनाचे जवळपास दहा पुरस्कार मिळवले आहेत. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत या गावात निवडणूक झाली नाही. सुंदर व स्वच्छ असणाऱ्या या गावात मधमाशांमुळे समृद्धी आली आहे. या सगळ्याचा विचार करुन मांघर गावची निवड करण्यात आली आहे.

या गावात सामुहीक मधमाशांचे संगोपन केले जात आहे. प्रत्येक ग्रामस्थांच्याकडे कमीत कमी दहा मधमाशांच्या पेट्या आहेत. मधमाशांपासून मध मेण व इतर उत्पादने तयार करण्यासाठी या गावात मधमाशांचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. संकलीत केलेला मध गावच्या ब्रँन्डने विकला जाणार आहे.

गा

 दिलखुलास’ कार्यक्रमात अंशू सिन्हा यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि. 21 मे व सोमवार 23 मे 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            गावे स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर व्हायची असतील तर ग्रामोद्योगाला विशेष बळ देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ हेच कार्य नेटाने करत आहे. या मंडळाचे कार्य, त्याचे रोजगार निर्मितीसाठीचे प्रयत्न, मधाचे गाव ही संकल्पना, भविष्यातील योजना याविषयी सविस्तर माहिती अंशू सिन्हा यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

000

भवतल

 पेवातल्या हळदीची चोरी का होत नाही? त्याची ही गोष्ट

(भवतालाच्या गोष्टी १५)

हळद साठवणाऱ्या पेवांबद्दल मला सर्वाधिक आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे- पेवातल्या हळदीची चोरी होत नाही, होऊच शकत नाही. हे ऐकल्यापासून डोक्यात प्रश्न होता, असं का? तो तुमच्याही मनात आला असेल. इतकंच नव्हे, तर उत्सुकता लावणारी दुसरी गोष्ट म्हणजे- पेवात साठवलेल्या १०० किलो हळदीचे वजन १०६ किलोपर्यंत वाढते... ऐकावे ते आश्चर्यच! पण प्रत्यक्ष पेवं पाहिल्यावर आणि तिथं लोकांशी बोलताना एकेक रहस्य उलगडत गेले. त्याचीच ही गोष्ट.

भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील ही पंधरावी गोष्ट.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक -

https://bhavatal.com/Sangli-Peva-Part3

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय- bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

भवताल 


(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

  प्रतिसाद


प्रतिपालकत्वासाठी नोंदणी करावी

     - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

            मुंबई, दि. 20 : अनाथ बालकांना दत्तक घेणाऱ्या पालकांची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहे. महिला व बाल विकास विभागाने प्रतिपालकत्व पोर्टल तयार केले आहे. आजपर्यंत या पोर्टलवर दहापेक्षा अधिक पालकांनी नोंदणी केली असून याबाबत विभागामार्फत पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रतिपालकत्वासाठी इच्छुक असणारे अनेक पालक जिल्हास्तरावर माहिती घेत आहेत. या पोर्टलला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, ही आनंददायी बाब आहे. प्रतिपालकत्व नोंदणीसाठी या पोर्टलवर जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

            अनाथ लेकरांना कुटुंबाची, आपल्या माणसांच्या प्रेमाची गरज असते. त्यामुळे अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देऊ शकणारी प्रतिपालकत्व योजना क्रांतिकारी ठरणार आहे. अनाथ बालकांना कुटुंब मिळवून देण्याच्या कामाइतके मोठे पुण्य नाही, असे मत मंत्री ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

    महिला व बाल विकास विभागाने अतिशय सुरक्षित आणि पारदर्शी असे Foster Care Registration Portal विकसित केले आहे. हे निश्चितच एक महत्त्वाचे पाऊल असून त्यामुळे काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना त्यांचे हक्काचे क्षण, प्रेम, काळजी, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी मदत होईल. इच्छुक पालक या पोर्टलवर प्रतिपालक म्हणून नोंदणी करू शकतात. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना आपुलकीने कुटुंबात समाविष्ट करून त्यांना प्रेमळ वातावरणात वाढण्याची संधी द्या आणि https://fc.wcdcommpune.com या संकेतस्थळाला भेट देऊन प्रतिपालक म्हणून नोंदणी करावी,असे आवाहन मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले आहे.

            प्रतिपालकत्व नोंदणी पोर्टल हे अर्ज भरण्यासाठी सुरक्षित व सुलभ आहे. “अर्जदार आणि विभाग यांच्या मधील दुहेरी प्रणालीच्या माध्यमातून सुलभ व जलद अर्जाची प्रक्रिया, शासकीय कार्यालयांना कमीत कमी भेटी, ऑनलाईन अर्जाची स्थिती, ऑनलाईन शंकानिरसन यंत्रणा, कालबद्ध निपटारा स्वयंचलित संदेश आणि ई-मेल यामार्फत अर्जाची स्थिती कळविण्यात येत आहे.

000


 


 


 

 Principle of 

*JUST LEAVE IT* 

( Worth Practicing)


Try convincing a person once or twice. If he or she refuses to get convinced

*Just Leave it*


When the children grow up and take their own decisions, do not impose

*Just Leave it*


Your frequency doesn't match with everyone in life. If you can't connect with someone

*Just Leave it*


After a certain age if someone criticises you don't get upset

*Just Leave it*


When you realise that nothing is in your hands, stop worrying about others and the future

*Just Leave it*


When the gap between your wish list and your capabilities increases, stop self expectations 

*Just Leave it*


Everyone's path of life, size of life, quality of life is different, so stop comparing

*Just Leave it*


When life has given you such a wonderful treasure of experience, stop counting your daily earnings, but

*Just Leave it*


If this does NOT Appeal or Apply to You….


*Just Leave it*🙏

Friday, 20 May 2022

 Trust & Truth are two inter related pillars of a strong relationship...


If u don't Trust a person, you won't speak Truth 

And

If u don't say Truth,

the person won't Trust you..


Good morning 🌹🌹

Featured post

Lakshvedhi