Thursday, 19 May 2022

 राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित.

            पुणे, दि. 19 : राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करणे व सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांचे https://scea.maharashtra.gov.in/ संकेतस्थळ कार्यान्वित झाले आहे. संकेतस्थळाला नागरिकांसह सहकारी संस्थांचा चांगला प्रतिसाद असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य चे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.

            राज्यातील निवडणूकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (२५० सभासद व त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून), तसेच, निवडणूकीस पात्र असलेल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या निवडणूक कामकाजाचे सनियंत्रण या प्राधिकरणामार्फत करण्यात येते.

कामकाजात यापुढील काळात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सहकारी संस्था आणि कृषि उत्पन्न बाजार समित्या यांच्या सभासद, निवडणूक कामकाजाच्या विविध टप्प्यांची माहिती दर्शकांना सुलभरितीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

            सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाशी निगडित असलेले सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, साखर आयुक्त, पणन संचालक, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त, वस्त्रोद्योग आयुक्त, उद्यम विकास आयुक्त, मत्स्यव्यवसाय आयुक्त, गृहनिर्माण विभाग या संकेतस्थळाची माहिती (लिंक) देण्यात आली आहे.

            राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची संरचना, सहकारी संस्था व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांची कार्यपद्धती, त्या संबंधित अद्ययावत कायदे व नियम, सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांची हस्त-पुस्तिका, राज्यातील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तसेच तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांची संपर्क यादी, प्रत्येक जिल्ह्याच्या नामिकेतील क तसेच ड वर्गातील सहकारी संस्थांकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांची यादी, नागरिकांची सनद, माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत स्वयं-प्रकटन, वारंवार विचारले जाऊ शकणारे प्रश्न, महत्वाचे नमूने , सांख्यिकी माहिती इत्यादी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे सहकार, कृषी, पणन क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.

            राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव (सहकार) अनुप कुमार, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका जयश्री भोज यांच्या मार्गदर्शनाखाली संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. येत्या काळात संकेतस्थळावरील सुविधा अधिक विस्तारित करण्याचा मानस असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी दिली आहे.


००००




 राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने

नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

            मुंबईदि. 19 : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करत यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. तसेच शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण मोफत देणारे, शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

            ‘राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक 2022’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातकृषीमंत्री दादाजी भुसेसहकार मंत्री बाळासाहेब पाटीलपशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदारफलोत्पादन मंत्री संदिपान भुमरेकृषी राज्यमंत्री डॉविश्वजीत कदमफलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरेमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवकृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेकृषी आयुक्त धीरजकुमार उपस्थित होतेतर दूरदृष्यप्रणालीद्वारे पालकमंत्रीविभागीय आयुक्तकृषी विद्यापाठांचे कुलगुरूजिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीआदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या पोषणावर विशेष लक्ष देणार

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीज्या राज्यात शेतकरी सुखी, ते राज्य सुखीशेतकरी बांधव कष्ट करत असताना स्वत:च्या, कुटुंबाच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होतेत्यामुळे शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण राज्य शासन आता शेतकरी बांधवांना मोफत देणार आहे. शेतकरी बांधव आपल्या कुटुंबातले घटक आहेतत्यामुळे यंत्रणेने आपुलकीने कुटुंबासारखे काम करावे‘विकेल ते पिकेल’ अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले पाहिजेरोगकीडींचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगली पाहिजेशेतमालाला हमी भाव आहे, पण हमखास भाव मिळाला पाहिजेअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

            शेतकरी बांधवांसमोर पीक विम्याचा प्रश्न आहेपीक विमा समाधानकारक नाहीकेंद्राकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहेयाबाबत केंद्र सरकार विचार करत आहेयंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहेकृषी विभागाचे खरीप हंगामाचे नियोजन समाधानकारक आहेत्यामुळे आपणा सर्वांच्या प्रयत्नानेसहकार्याने यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

कृषी विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार – अजित पवार

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेराज्यातील शेतकरी बांधवांना खतेबियाणे वेळेत मिळाली पाहिजेतखते कमी दरात वेळेत मिळण्यासाठी कृषी विभागाने केंद्र सरकारच्या संपर्कात रहावेयंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करावेकृषी विभाग योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो, ही बाब समाधानाची आहेया विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करू देण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कीराज्याच्या विकासात कृषी विभागाची महत्त्वाची भूमिका आहेफलोत्पादनात आपल्या राज्याने मोठं काम केले आहेराज्याच्या दृष्टीने येणारे चार महिने महत्वाचे आहेतखरीप हंगामात येणाऱ्या समस्यांवर मात करत हा खरीप हंगाम यशस्वी करायचा आहे.

           कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले कीराज्यातील शेतकरी बांधवांना दर्जेदारप्रमाणित बियांणांचा पुरवठा करण्याबरोबर कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याची दक्षता घेतली आहेसोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने पेरा वाढण्याची शक्यता असून त्यासाठी बियाणांची उपलब्धता वाढविण्याचे नियोजन केले आहेराज्यामध्ये खरीप हंगामात ज्वारीबाजरीभातमकातूरमूगउडीदभुईमूगसोयाबीनतीळकापूस ही प्रमुख पिक घेतली जातातबियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठीचा महत्वाचा घटक आहे.

पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये – दादाजी भुसे

            खरीप हंगाम 2022 मध्ये प्रमुख अन्नधान्य पिकांचे 151.33 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित आहेखरीप हंगामात खोडमाशीच्या प्रादुर्भावाची शक्यता 

            मुंबई, दि. 19 : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करत यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. तसेच शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण मोफत देणारे, शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

            ‘राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक 2022’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, कृषी विद्यापाठांचे कुलगुरू, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या पोषणावर विशेष लक्ष देणार

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, ज्या राज्यात शेतकरी सुखी, ते राज्य सुखी. शेतकरी बांधव कष्ट करत असताना स्वत:च्या, कुटुंबाच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण राज्य शासन आता शेतकरी बांधवांना मोफत देणार आहे. शेतकरी बांधव आपल्या कुटुंबातले घटक आहेत. त्यामुळे यंत्रणेने आपुलकीने कुटुंबासारखे काम करावे. ‘विकेल ते पिकेल’ अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले पाहिजे. रोग, कीडींचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे. शेतमालाला हमी भाव आहे, पण हमखास भाव मिळाला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

            शेतकरी बांधवांसमोर पीक विम्याचा प्रश्न आहे. पीक विमा समाधानकारक नाही. केंद्राकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाचे खरीप हंगामाचे नियोजन समाधानकारक आहे. त्यामुळे आपणा सर्वांच्या प्रयत्नाने, सहकार्याने यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

कृषी विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार – अजित पवार

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील शेतकरी बांधवांना खते, बियाणे वेळेत मिळाली पाहिजेत. खते कमी दरात वेळेत मिळण्यासाठी कृषी विभागाने केंद्र सरकारच्या संपर्कात रहावे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करावे. कृषी विभाग योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो, ही बाब समाधानाची आहे. या विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करू देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्याच्या विकासात कृषी विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. फलोत्पादनात आपल्या राज्याने मोठं काम केले आहे. राज्याच्या दृष्टीने येणारे चार महिने महत्वाचे आहेत. खरीप हंगामात येणाऱ्या समस्यांवर मात करत हा खरीप हंगाम यशस्वी करायचा आहे.

           कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, राज्यातील शेतकरी बांधवांना दर्जेदार, प्रमाणित बियांणांचा पुरवठा करण्याबरोबर कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याची दक्षता घेतली आहे. सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने पेरा वाढण्याची शक्यता असून त्यासाठी बियाणांची उपलब्धता वाढविण्याचे नियोजन केले आहे. राज्यामध्ये खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. बियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठीचा महत्वाचा घटक आहे.

पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये – दादाजी भुसे

            खरीप हंगाम 2022 मध्ये प्रमुख अन्नधान्य पिकांचे 151.33 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित आहे. खरीप हंगामात खोडमाशीच्या प्रादुर्भावाची शक्यता गृहीत धरून तिचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पुरेसा पाऊस होणार आहे. परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये, असे आवाहनही कृषीमंत्र्यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.


            शेतमाल निर्यातीसाठी असलेल्या मालाच्या दर्जा तपासणी (ट्रेसिबिलीटी) नोंदणीच्या प्रणालीमध्ये देशातील 72,280 शेतकऱ्यांपैकी महाराष्ट्रातील 62,344 शेतकरी आहेत. भारतातील 129 भौगोलिक मानांकनापैकी महाराष्ट्रातील 26 आहेत. देशात भौगोलिक मानांकन नोंदणीकृत शेतकरी 5,260 आहेत. त्यापैकी 4390 शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील द्राक्ष, डाळींब, आंबा, केळी, कांदा, मिरची या पिकांच्या निर्यातीत आघाडीवर आहे. देशाच्या एकूण निर्यातीच्या 65 टक्के फळे, 55 टक्के भाजीपाला महाराष्ट्रातून निर्यात होतो. देशात सर्वाधिक 4500 शेतकरी उत्पादक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेत (पीएमएफएमई) महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. ही आपल्या महाराष्ट्राची बलस्थाने आहेत.

-----०००-----



 हिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून


आरक्षण व सवलती देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार


- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे


· बार्टीने समाजाच्या अभ्यासाच्या अहवालातील त्रुटी पूर्ण करून 15 दिवसात परिपूर्ण अहवाल सादर करण्याचे मुंडेंचे निर्देश..



· हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

            मुंबई, दि. 18 :- राज्यात हिंदू खाटीक समाजाची हिंदू खाटीक, कलाल खाटीक, धनगर खाटीक अशी नावे विभाग निहाय वेगळी आहेत तसेच काही भागात अनुसूचित जातीशिवाय ओबीसी व अन्य पोट प्रवर्गातून आरक्षण दिलेले आहे. हिंदू खाटीक प्रवर्गातील सर्व नावे एकाच प्रवर्गातील असल्याचे ग्राह्य धरून त्यांना अनुसूचित जाती प्रमाणे सर्व सवलती लागू कराव्यात, यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र सरकारला परिपूर्ण प्रस्ताव शिफारशीसह पाठविण्यात येणार असल्याची माहिती, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत दिली.

            महाराष्ट्र राज्य हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संघटनेच्या विनंतीवरून मंत्रालयात यासंदर्भात मंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, तसेच संघटनेचे अध्यक्ष ॲड. व्यंकट बेदरे, विनोद गायकवाड, कॅ. निलेश पेंढारी, सुधीर निकम, दिलीप भोपळे, ॲड. अमित कोटींगरे, सम्राट खराटे आदी उपस्थित होते.

            हिंदू खाटीक समाजात लाड खाटीक, धनगर खाटीक, कलाल खाटीक, मराठा खाटीक अशी विविध नावे विभागानुसार पडलेली आहेत. हा समाज अनुसूचित जातीच्या सवलतीपासून वंचित आहे. या सर्व नावांचा एकच प्रवर्ग म्हणून विचार व्हावा व त्यांना अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्यात या प्रमुख मागण्यांसह अन्य काही मागण्यांचे निवेदन मंत्री श्री. मुंडे यांना देण्यात आले होते. त्यानंतर श्री. मुंडे यांनी बार्टी मार्फत समाजाच्या सद्यस्थितीचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते.

            बार्टीने सादर केलेल्या अभ्यास अहवालात काही त्रुटी असल्याचे श्री. मुंडे यांनी नमूद करत सदर त्रुटींची 15 दिवसांच्या आत पूर्तता करून सुधारित अहवाल दाखल करण्याचे निर्देश त्यांनी बार्टीला दिले आहेत.

            बार्टीकडून हा सुधारित अहवाल प्राप्त होताच परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे श्री. मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या मार्गी लागल्याने संघटनेच्या वतीने अध्यक्ष ॲड. व्यंकट बेदरे यांनी मंत्री श्री. मुंडे यांचे आभार मानले.

००००





 पत्रकारांनी सकारात्मक कार्याची देखील दखल घ्यावी.

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपालांच्या हस्ते 21 वे राजर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान

 

            मुंबई, दि. 19 :- ध्येयनिष्ठ व निर्भीड पत्रकार समाजाला प्रतिबिंब दाखवत असतात. समाजातील त्रुटींवर बोट ठेवत असताना चांगल्या कामाची दखल घेणे हे देखील तितकेच आवश्यक आहे, असे सांगून पत्रकारांनी सकारात्मक कार्य करणाऱ्यांना देखील कौतुकाची थाप द्यावीअसे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.    

            विश्व संवाद केंद्रमुंबई यांच्या वतीने देण्यात येणारे 21 वे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी दि. 18 रोजी राजभवनमुंबई येथे प्रदान करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. 

            ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी यांना यावेळी पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.  प्रिंटइलेक्ट्रॉनिकडिजिटल व समाज माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना देखील राज्यपालांच्या हस्ते देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

            शाश्वत जीवन मूल्यांवर आधारित चांगली पत्रकारिता करणाऱ्या गुणी पत्रकारांना शोधून सन्मानित करीत असल्याबद्दल राज्यपालांनी विश्व संवाद केंद्राचे कौतुक केले.

            राज्यपालांच्या हस्ते ज्ञानदा कदम (एबीपी माझा)आलोक निरंतर (व्यंगचित्रकार)दीपक जोशी (छायाचित्रकार)दिनेश कानजी (वृत्तसंकेतस्थळ न्यूज डंका) अश्विन अघोर (घनघोर युट्यूब चॅनल)प्राजक्ता हरदास (गुणवंत पत्रकार विद्यार्थिनी)रोहित  दलाल (समाजमाध्यम)अभिराज राजाध्यक्ष आणि नियती माविनकुर्वेआकाश सुभाष नलावडे व अभिजित चावडा (समाजमाध्यमे) यांना 21 वे नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            यावेळी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकरनिवड समितीच्या सदस्य वैजयंती आपटे तसेच कोकण प्रांताचे संघचालक डॉ सतीश मोध यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

00000


 

Maharashtra Governor presents 21st Devarshi

Narad Awards to journalists

 

          Mumbai Date 19 :Governor Bhagat Singh Koshyari presented the 21st Devarshi Narad Patrakarita Puraskars to journalists from Print, Electronic, Digital  and Social media at Raj Bhavan, Mumbai. The awards instituted by Vishwa Samvad Kendra were presented on Wed (18th May) .

The Governor presented the lifetime achievement award in journalism to Senior Journalist Prakash Joshi.

          Speaking on the occasion, the Governor said fearless journalists hold a mirror to society. He appealed to journalists to applaud good work while bringing to the fore shortcomings in the society. The Governor applauded Vishwa Samvad Kendra for honouring journalists who upheld ethical values.

The Narad Patrakarita Puraskars were also presented to Dnyanda Kadam, ABP Majha, Alok Nirantar, Cartoonist, Deepak Joshi, photographer, Dinesh Kanji (News Portal), Ashwin Aghor (Youtube Channel), Prajakta Hardas (Student journalist), Rohit Dalal, Abhiraj Rajadhyaksh, Niyati Mavinkurve, Aakash Nalawade and Abhijit Chawada (Social Media).

President of Vishwa Samvad Kendra, Mumbai Sudhir Joglekar, member of the selection committee Vaijayanti Apte and Prant Sanghchalak of Konkan Prant Dr Satish Modh were present.

00000

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपालांच्या हस्ते 21 वे राजर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान.

            मुंबई, दि. 19 :- ध्येयनिष्ठ व निर्भीड पत्रकार समाजाला प्रतिबिंब दाखवत असतात. समाजातील त्रुटींवर बोट ठेवत असताना चांगल्या कामाची दखल घेणे हे देखील तितकेच आवश्यक आहे, असे सांगून पत्रकारांनी सकारात्मक कार्य करणाऱ्यांना देखील कौतुकाची थाप द्यावी, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.    

            विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारे 21 वे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी दि. 18 रोजी राजभवन, मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

            ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी यांना यावेळी पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाज माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना देखील राज्यपालांच्या हस्ते देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

            शाश्वत जीवन मूल्यांवर आधारित चांगली पत्रकारिता करणाऱ्या गुणी पत्रकारांना शोधून सन्मानित करीत असल्याबद्दल राज्यपालांनी विश्व संवाद केंद्राचे कौतुक केले.

            राज्यपालांच्या हस्ते ज्ञानदा कदम (एबीपी माझा), आलोक निरंतर (व्यंगचित्रकार), दीपक जोशी (छायाचित्रकार), दिनेश कानजी (वृत्तसंकेतस्थळ न्यूज डंका) अश्विन अघोर (घनघोर युट्यूब चॅनल), प्राजक्ता हरदास (गुणवंत पत्रकार विद्यार्थिनी), रोहित दलाल (समाजमाध्यम), अभिराज राजाध्यक्ष आणि नियती माविनकुर्वे, आकाश सुभाष नलावडे व अभिजित चावडा (समाजमाध्यमे) यांना 21 वे नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            यावेळी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर, निवड समितीच्या सदस्य वैजयंती आपटे तसेच कोकण प्रांताचे संघचालक डॉ सतीश मोध यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


00000

Maharashtra Governor presents 21st Devarshi

Narad Awards to journalists.

          Mumbai Date 19 :Governor Bhagat Singh Koshyari presented the 21st Devarshi Narad Patrakarita Puraskars to journalists from Print, Electronic, Digital and Social media at Raj Bhavan, Mumbai. The awards instituted by Vishwa Samvad Kendra were presented on Wed (18th May) .

The Governor presented the lifetime achievement award in journalism to Senior Journalist Prakash Joshi.

          Speaking on the occasion, the Governor said fearless journalists hold a mirror to society. He appealed to journalists to applaud good work while bringing to the fore shortcomings in the society. The Governor applauded Vishwa Samvad Kendra for honouring journalists who upheld ethical values.

The Narad Patrakarita Puraskars were also presented to Dnyanda Kadam, ABP Majha, Alok Nirantar, Cartoonist, Deepak Joshi, photographer, Dinesh Kanji (News Portal), Ashwin Aghor (Youtube Channel), Prajakta Hardas (Student journalist), Rohit Dalal, Abhiraj Rajadhyaksh, Niyati Mavinkurve, Aakash Nalawade and Abhijit Chawada (Social Media).

President of Vishwa Samvad Kendra, Mumbai Sudhir Joglekar, member of the selection committee Vaijayanti Apte and Prant Sanghchalak of Konkan Prant Dr Satish Modh were present.

00000


 शासकीय रेखाकला परीक्षा-2021.

इंटरमिजिएट निकाल दिनांक 20 मे रोजी तर एलिमेंटरी परीक्षेचा निकाल 23 मे रोजी प्रसिद्ध होणार.

            मुंबई, दि. 19 : कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला (एलिमॅटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2021 शालेय स्तरावर दिनांक 9 एप्रिल ते 12 एप्रिल 2022 या कालावधीत इयत्ता 9 वी व इयत्ता 10 वी करिता अनुक्रमे एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते.

            इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल दिनांक 20 मे 2022 व एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल दिनांक 23 मे 2022 रोजी www.doa.maharashtra.gov.in त्याचप्रमाणे https://dge.doamh.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहेत.

            या दोन्ही परीक्षा मिळून वर्ष 2021 मध्ये एलिमेंटरीसाठी 1 लाख 2 हजार 818 व इंटरमिजिएटसाठी 1 लाख 11 हजार 170 असे एकूण 2 लाख 13 हजार 988 परीक्षार्थ्यांनी नावे नोंदविलेली होती. एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेचा निकाल अनुक्रमे 96.15 % व 94.65% इतका लागला आहे, अशी माहिती कला संचालनालयाचे प्र.कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली आहे.

000


 



मोरया



 


 

Featured post

Lakshvedhi