Tuesday, 17 May 2022

सुन्दर माझे घर

 "... मम्मी, तू आणि बाबांनी खूप अडचणी असताना त्या काळात लग्न केलंत...

 गेली *छत्तीस वर्षं* संसार केलात...

आमच्या पिढीला का गं जमत नाही हे ?

*" तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली*. 

चार वर्षं मज्जेत *बॉयफ्रेन्ड* असलेल्याचा आठ महिन्यापुर्वी *हजबन्ड* झाल्यानंतरचा हा राग होता.

*"प्रश्न विचारलास, का ?

पंचावन्नची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली; 

" *उत्तर हवंय*, का ?

'हो 

"उत्तर हवंय", लेक म्हणाली. 

"असे आहे न बाळा," आई सहजच म्हणाली;

"आम्ही *'कसं जमवता येईल'* ते शोधत होतो; 

तुम्ही *'जमलं तर पाहू'* म्हणताय.

"आमच्या वेळी प्रेम हे *व्हायचं*; तुमच्या काळात ते *केलं* जातं.

"आम्ही *साथीदार* व्हायचो; तुम्ही *पार्टनर* बनवता. 

"आमच्यात प्रेम ही *सहजता* होती; तुमच्यात तो *अट्टहास* झालाय.

"आमचं प्रेम *लहानाचं मोठं* व्हायचं; तुमचं प्रेम *लहानपणीच घाई* करतं. 

"आमच्या वेळी *मैत्री विश्वासात* रुपांतरीत व्हायची; तुम्ही *जवळिकीला रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई* करताय.

"आम्ही कविता *लिहायचो*; तुम्ही त्या *फॉरवर्ड* करताय. 

"आमचे *जीवनसाथी* होते; तुमचे *बॉयफ्रेन्ड* नि *गर्लफ्रेन्ड* आहेत.

"आमचं प्रेम *आमच्यासाठी* होतं; तुमचं प्रेम *'सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे, मग माझाही असलाच पाहीजे',* म्हणून केलं जातंय. 

"आमचे *बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट* जाणवायचं. तुमच्यात *इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहीजे तसा बॉयफ्रेन्डही असलाच पाहीजे*, 

"आम्ही *गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित* करायचो; तुमच्या *गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल* याची *कैलक्युलेशन्स* असतात. 

"आम्ही *धुंद* होतो; तुम्ही *उधळलेले* आहात. 

"आम्ही *चेहऱ्यावरचं तेज* शोधायचो; तुम्ही *शर्टचा ब्रान्ड* पाहताय. 

"आम्हाला नजरेतली *समजदार चमक* भाळायची; तुम्हाला *गॉगलच्या किमती* भुरळ घालतायत. 

"आमच्या शरीरांना *पेशन्स* मंजूर होता; *तुमच्या मनालाच तो नकोय."*

..."बाळा; *जमणं - न जमणं हे क्षमतेवर* अवलंबून असतं. क्षमता *डेव्हलप* करायची

 असते..!

✍🏻✍🏻

*जगता आलं पाहिजे... मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृव उजाळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पापं काय* *कसही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला, पुन्हा चालता आलं पाहिजे.* *शहाण्याचं सोंग घेऊन, वेड होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता, आनंदी जगता आलं पाहिजे.* *जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून. फक्त समाधानी राहता आलं पाहिजे...* 

*आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे*

👏🚩🙏







 

 


कळी लावा


 

 कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबाराचे वितरण.

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले जाती

                                     -उपमुख्यमंत्री अजित पवार

            सातारा दि.16: प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून, संघर्षातून आणि कष्टातून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग व संघर्ष कधीही विसरता येणार नाही, त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

            कोयनानगर येथे कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबारा वितरणाचे वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, 

 प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेतील नूतन संकुलाचे लोकार्पण.

शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न

                                   -उपमुख्यमंत्री अजित पवार

             पुणे दि.16-कृषि क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विशेषत: महिलांना शेतीपूरक व्यवसाय आणि प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यावर विशेष भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले

            हवेली तालुक्यातील वडमुखवाडी (चऱ्होली) येथील प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत उभारण्यात आलेल्या प्रशिक्षण संकुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, खासदार श्रीरंग बारणे, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, वनामतीचे संचालक रविंद्र ठाकरे, रामेतीचे प्राचार्य विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, रामेतीच्या माध्यमातून खूप चांगली व्यवस्था शेतकऱ्यांसाठी उभी करण्यात आली आहे. पुणे येथे कृषि आयुक्तालयाची इमारत उभी करण्यात येणार आहे. शेतमजूर, शेतकरी उत्पादन कंपन्या, शेतकरी गट, महिला शेतकरी यांना प्रशिक्षण देऊन कृषि विस्ताराची संकल्पना पुढे नेण्यात येत आहे. महिला शेतकऱ्यांना कृषि विषयक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाचे नुकसान होऊ नये यासाठी शितगृह उभारणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम शासन करेल.

कृषि क्षेत्रासाठी महत्वाचे निर्णय.

            कृषि विभागाला 2022-23 मध्ये 3 हजार 35 कोटीं रुपयांचा नियतव्यय उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषि आणि संलग्न संस्थांसाठी 23 हजार 888 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांसोबतच कृषि संशोधनाला मोठ्या प्रमाणात चालना देऊन कृषि विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यातून हिंगोली येथे हळद पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी संशोधनासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे कृषि संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

            नियमित कर्जफेड करणाऱ्या साधारण 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी 10 हजार कोटी खर्च करण्यात येणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या 41 हजार कोटीचे पीक कर्ज देण्यात आले आहे. व्याज सवलत योजनेचा लाभ 43 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यातील 1 हजार कोटींचा निधी शासनाला भरावा लागणार आहे.

संशोधन आणि कृषि यांत्रिकीकरणाला चालना.

            सोयाबीन आणि कापसाची मूल्यसाखळी विकसीत करण्यासाठी तीन वर्षात एक हजार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी अनुदानात 50 टक्के वाढ करण्यात आली आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ आणि वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाला संशोधनासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये देण्यात येत आहे. मुख्यमंत्री अन्न प्रक्रीया योजनेच्या माध्यमातून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सेंद्रीय शेती, कृषि यांत्रिकीकरणाला चालना देण्यात येत आहे.

महिलांना शेतीपूरक उद्योगासाठी प्रोत्साहन.

            महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे. महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.कृषि विभागातील योजनेचा लाभ 50 टक्के महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, महिलांनी याचा लाभ घ्यावा यशस्वी महिला उद्योजकांचे अनुकरण इतर महिलांनी करावे. लहान स्वरुपात उद्योग सुरू होण्याची गरज आहे. त्याला सर्व सहकार्याची शासनाची तयारी आहे. यशस्वी महिला शेतकऱ्यांनी इतरही महिलांना प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

            रामेती प्रकल्पामुळे 120 व्यक्तींना एकाच वेळी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे महत्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत याकडे लक्ष देण्यात येईलघालणाऱ्या व्यक्तींना चांगले प्रशिक्षण देण्यात येते.  रामेतीच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांनादेखील प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. शासनाने कृषि पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला आहे. उद्योगाचा दर्जा दिला असल्याने त्याला सवलती मिळतात. कृषि पर्यटनाला वीजेच्या बाबतीत सवलत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही श्री.पवार यांनी सांगितले.



            तथागत गौतम बुद्धांच्या त्याग, सेवा, क्षमा, शांती या तत्वांची समाजाला गरज  आहे. त्यांच्या विचारात सर्व मानवजातीचे कल्याण सामावले आहे. दु:खाचा विनाश करून मानवाचे जीवन प्रकाशमान करणारा बुद्धांचा संदेश असल्याचे त्यांनी सांगितल

राज्यातील प्रशिक्षण संस्थांमध्ये वर्षातील प्रशिक्षणासाठी आराखडा.

                                         -कृषिमंत्री दादाजी भुसे.

            श्री.भुसे म्हणाले, रामेती प्रकल्प 2011 पासून मध्ये 90 टक्के पूर्ण झाला होता. तेव्हापासून त्याच अवस्थेत हा प्रकल्प असताना सव्वा तीन कोटी खर्च करून एक वर्षात पूर्ण करण्यात आला. यामुळे अधिकारी, कर्मचारी, शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. महिला शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. रामेतीच्या माध्यमातून पुण्याच्या कृषि प्रगतीला गती देणारा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. राज्यभरातील प्रशिक्षण संस्थांना वर्षभराचा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. प्रशिक्षणार्थींपैकी 50 टक्के शेतकऱ्यांना आणि त्यातही 50 टक्के प्रशिक्षणार्थी महिला आहेत. प्रशिक्षणाच्या माध्यमातून या महिला यशस्वी व्हाव्यात आणि त्यांनीही प्रगती साधावी अशी यामागची भावना आहे.

            पर्यावरण बदलामुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित असताना कृषि विद्यापीठे विशेष संशोधन करीत आहेत. कृषि विभागाने चांगल्या योजना राबविल्या आहेत. कृषि पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची तयारी शासनाची आहे. याचे दूरगामी परिणाम लवकरच दिसून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर  31 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला. त्यांना 21 हजार कोटींची मदत करण्यात आली. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय शासनाने घेतला. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा अंदाजपत्रकात करण्यात आली असून लवकरच ही भेट शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.डवले यांनी केले. राज्यात 7 प्रादेशिक कृषि प्रशिक्षण संस्था आहेत. पूर्वी दौंड येथे असलेल्या संस्थेचे स्थलांतर पुणे येथे करण्यात आले. त्याचा लाभ शेतकरी आणि कृषि विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

            राज्यातील आलेल्या महिला शेतकऱ्यांपैकी जालना येथील  सीताबाई मोहिते  आणि यशस्वी महिला शेतकऱ्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात अनुभव मांडले. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेअंतर्गत यशस्वी महिला कृषि उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

रामेती संस्थेत प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा.

            रामेती पुणे प्रशिक्षण केंद्रावर 2424.30 चौ. मी. क्षेत्रावर वसतिगृह इमारत असून प्रशिक्षणार्थीसाठी 36खोल्या आहेत. प्रत्येक खोलीमध्ये 3 प्रशिक्षणार्थीकरीता निवास व्यवस्था करण्यात आली आहे. (108 प्रशिक्षणार्थी) तसेच 2 हॉल असून सध्याचे प्रशिक्षणाचे लक्षांक विचारात घेता त्याचे रूपांतर प्रशिक्षण कक्षामध्ये करण्यात येत आहे. 1 समिती सभागृह, भोजन कक्ष, योगा हॉल याप्रमाणे सुविधा उपलब्ध आहेत. प्रक्षेत्रावर 80 चौ.मी. क्षेत्रावर अधिकारी निवासस्थान बांधण्यात आले आहे.

            प्रक्षेत्रावरील 3 हेक्टर क्षेत्रावर आंबा, पेरू, सिताफळ, आवळा, नारळ, चिक्कू इत्यादी फळझाडांच्या लागवडीसाठी प्लॉटस तयार करण्यात आले आहेत. तसेच फळबागेसाठी ठिबक सिंचन सुविधा निर्माण करण्यात आली आहे.  जून  2022 मध्ये फळबाग लागवड करण्यात येणार आहे. या फळझाडांची लागवड आधुनिक तंत्रज्ञानानुसार करण्यात येणार असून त्याचा उपयोग प्रात्यक्षिक म्हणून प्रशिक्षणार्थीसाठी होणार आहे.

00000






 

  

 0

 .

 .

 धा

 .

 .

 .

 .

 से

 .

 . अशा इमारतींच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवात भर

 जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त उत्कृष्ट पर्यटन केंद्र चालकांचा सत्कार

ग्रामीण भागाचा आर्थिक विकास व्हावा यासाठी

कृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य.

                                  -पर्यटन राज्यमंत्री कु.अदिती तटकरे

            मुंबई 16 - ग्रामीण भागाचा शाश्वत आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी कृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांना येथील संस्कृतीची माहिती व्हावी, तसेच उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून नोंदणी करून कृषी आणि पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी हातभार लावावा, असे आवाहन पर्यटन राज्यमंत्री कु.अदिती तटकरे यांनी केले.

            जागतिक कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालय आणि कृषी पर्यटन विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण केंद्र येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि उत्कृष्ट कार्य केलेल्या केंद्र चालकांचा आज सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राज्यमंत्री कु.तटकरे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. पुरस्कार प्राप्त कृषी पर्यटन केंद्र चालकांचे त्यांनी अभिनंदन केले.

शालेय विद्यार्थ्यांना कृषी पर्यटन

            यावेळी बोलातना पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर म्हणाले, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे कृषी पर्यटन धोरण हे देशाला दिशा दर्शविणारे धोरण बनावे असा प्रयत्न केला आहे. पर्यावरणामध्ये असमतोल निर्माण झाल्याने निसर्गावर आधारित शेती करणारे शेतकरी आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या अडचणीत आलेले आहेत. यामुळे दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी, कुक्कुटपालन आदी विविध कृषी पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येते. तथापि, नैसर्गिक आपत्तींमुळे यामध्ये सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात याला मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरांमध्ये वाढणाऱ्या आजच्या पिढीची नाळ ग्रामीण भागाशी पुन्हा जोडता यावी आणि ग्रामीण भागातील आणि शेतीमधील विविधतेची त्यांना माहिती व्हावी यादृष्टीने कृषी पर्यटन धोरणाचा मोठा लाभ होणार असून शालेय विद्यार्थ्यांना कृषी पर्यटन घडवून आणावे, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाकडे करण्यात येणार आहे. कृषी पर्यटन केंद्र सुरू करू इच्छिणाऱ्यांना शासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

354 पर्यटन केंद्रांना नोंदणी

            पर्यटन सहसंचालक डॉ.सावळकर म्हणाले, कृषी पर्यटन धोरण राबविण्याचे अनेक वर्षांपासून विचाराधीन होते. शेतकरी विविध समस्यांनी ग्रासत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त असलेले हे धोरण तातडीने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी विविध देशांमध्ये राबविण्यात आलेल्या देशांच्या कृषी पर्यटन धोरणांचा अभ्यास केला. या धोरणांतर्गत नोंदणीसाठी 736 अर्ज प्राप्त झाले असून आतापर्यंत 354 पर्यटन केंद्रांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या धोरणाला मिळत असलेला प्रतिसाद आणि मिळत असलेल्या प्रतिक्रिया यांच्या आधारे कालानुरूप आवश्यक बदल करण्यासाठी एका राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून आता केंद्रचालकांसाठी सातबारा नावावर असणे बंधनकारक असणार नाही. आठ खोल्यांपेक्षा अधिक मोठे केंद्र स्थापन करण्यासाठी देखील आवश्यक परवानग्या घेऊन मान्यता देण्यात येणार आहे. स्थानिक खाद्य आणि हस्तकला विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असल्याचे डॉ.सावळकर यांनी सांगितले. पर्यटन संचालनालय राज्यातील आणि राज्याबाहेरीलही पर्यटकांना आकर्षित करण्सासाठी प्रयत्न करीत असून यापुढे राज्यात आदर्श कृषी पर्यटन केंद्र घोषित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            कृषी पर्यटन विकास समितीचे सदस्य पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटन सुरू केल्यानंतर तेथेच न थांबता दरवर्षी त्यात आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, असे आवाहन कृषी पर्यटन केंद्र चालकांना केले. 2008 पासून सुरू असलेले कृषी पर्यटनाला शासनाच्या कृषी पर्यटन धोरणामुळे नवीन अंकूर फुटला असून योग्य दिशा मिळाली असल्याचे ते म्हणाले.

ग्रामीण संस्कृतीशी ओळख

            कृषी पर्यटन क्षेत्रातील धोरणामुळे शहरी पर्यटकांना शेतीची प्रत्यक्ष भेटीतून माहिती, शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन, ग्रामीण संस्कृतीशी ओळख असा अनुभवांचा ठेवा मिळतो. शेतीची कामे कशी चालतातत्याचा  स्वतः  अनुभव  घेऊन  निसर्गाशी मैत्री करण्याची संधी तसेच निरामय आयुष्य  जगण्याची  प्रेरणा मिळते. कृषी पर्यटन विकास हे करिअरचे अनोखे क्षेत्र ठरू शकते म्हणूनच या क्षेत्रातील विविध पैलूंची माहिती इच्छुकांपर्यंत पोहचवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य आहे. या कार्यक्रमात पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कृषी पर्यटनाची भूमिका अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या नव्याने आणि वेगाने विकसित होत असलेल्या व्यवसायात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कृषी पर्यटन केंद्र चालकांचा सत्का

            कृषी पर्यटन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कृषी पर्यटन केंद्र चालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे बंदेवाडी येथील देवगिरी कृषी पर्यटन केंद्राचे सुखदेव शामराव गिरी, सातारा जिल्ह्यातील मौजे बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्राचे आनंदराव गणपत शिंदे, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याच्या मौजे रामपूर येथील सावे कृषी पर्यटन केंद्राचे आदित्य प्रभाकर सावे, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या मौजे वळती येथील मामाचं वावर कृषी पर्यटन केंद्राचे मोहन जगताप, जळगाव जिल्ह्यातील अंजाळे येथील नंदग्राम गोधाम कृषी पर्यटन केंद्राचे अभिलाश संतोषकुमार नागला, वर्धा जिल्ह्यातील मौजे वालधूर येथील रानवारा कृषी, निसर्ग व ग्रामीण पर्यटन केंद्राचे राजेंद्र सोभागमलजी डागा, रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील सगुणा बाग कृषी पर्यटन केंद्राचे चंदन चंद्रशेखर भडसावळे, औरंगाबाद जिल्ह्यातील मौजे वडगाव येथील वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्राचे रवींद्र भीमराव पाटील तसेच औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील मिर्जापूर येथील सृष्टी कृषी पर्यटन केंद्राच्या प्रतिभा किरण सानप यांचा समावेश होता. महाराष्ट्रात कृषी पर्यटन संकल्पना रूजवणे, वाढवणे, प्रचार-प्रसार, क्षमता व कौशल्य, धोरणात्मक विकास करणे या विशेष योगदानासाठी बारामती येथील कृषी पर्यटन विकास संस्थेचे संचालक पांडुरंग भगवानराव तावरे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.

            यावेळी कृषी पर्यटन विकासाशी संबंधित कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये पुरस्कार प्राप्त केंद्र संचालकांनी आपले अनुभव कथन केले. विभागीय उपसंचालकांनी त्यांच्या विभागातील कृषी पर्यटन संधींची माहिती दिली. तर, या क्षेत्रातील संजय पवार, डॉ.रवी जायभाये, डॉ.साईनाथ हाडुळे, आनंद पेंडारकर, अविनाश जोगदंड, चंदन कस्तुरवार, डॉ.सौरभ कृष्णा, पालघर येथील पशुसंवर्धन विभागाचे कोकण विभागाचे सहआयुक्त डॉ.प्रशांत कांबळे, रूतुजा अचलारे सप्रे आदी तज्ज्ञांनी कृषी पर्यटन केंद्र चालकांना मार्गदर्शन केले.

000

Featured post

Lakshvedhi