Wednesday, 11 May 2022

भवताल

 महाराष्ट्रातल्या पाण्याच्या चवीची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ०९)

आपण रोजच पाणी पितो, त्याची चव चाखतो. पाण्याची चव हा किती महत्वाचा मुद्दाय ना? पण तुम्ही त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आपण केलाय का? माझंही असंच होतं. पण २००९ साली नाशिकला एके ठिकाणी पाणी प्यायलो. आणि पाण्याचा खरा गोडवा अनुभवला. ती चव आजही जिभेवर आहे. मग पाण्याच्या चवीचा पिच्छा पुरवायला सुरुवात केली. अनेकांशी बोललो. बरीच चर्चा केल्यावर पाण्याच्या, विशेषत: महाराष्ट्रातल्या पाण्याच्या चवीबाबत काही उत्तरं गवसली... त्याचीच ही गोष्ट.

भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील नववी गोष्ट.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक:

https://bhavatal.com/Maharashtra-Water-Taste

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय - bhavatal.com 

(इतरांसोबतही शेअर करा)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


रोजगार

 ग्रामीण डाक सेवक पदासाठी 5 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. 11 :- भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अधीक्षक, डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील 67 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 5 जून 2022 पर्यंत व त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, नवी मुंबई विभाग यांनी केले आहे.

            https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येतील. अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश: आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच अर्जदाराला अर्जाचे शुल्क प्रधान डाकघर, पनवेल-410206 येथे जमा करता येईल.

            टपाल विभाग उमेदवारांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी पत्रव्यवहार केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इतरांसमोर उघड करु नयेत आणि अनधिकृत दूरध्वनी संदेशापासून सावध रहावे. अधिक माहितीसाठी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे

0000

Candidates may apply for the GDS post before 5th June

            Mumbai, Date 11 :- The Department of Posts Has issued Notification to Fill up the posts of Gramin Dak Sevaks. Sr. Superintendent of Post Offices, Navi Mumbai Division, Vashi is under process to fill up 67 posts of Gramin Dak Sevak as per notification at various offices under Navi Mumbai Division. The interested, willing, eligible candidates may apply for the GDS posts through Online only on website https://indiapostadsonline.gov.in on or before 05.06.2022.

          The candidate should be alert that, "Department of Posts does not make any phone calls to the candidates. The correspondence, if any, is made with candidates through respective Engaging Authority only. Candidates are advised not to disclose their personal information/registration number/mobile numbers/email ids to others and be guarded against any unscrupulous phone calls."

          The fees can be paid at Panvel Head Post Office, Panvel - 410 206. For further any details, visit on website https://indiapostgdsonline.gov.in. check

0000


 ओबीसी युवक-युवतींच्या कौशल्य विकासाकरिता नवीन वेबपोर्टल.

युवक-युवतींना मिळणार परिपूर्ण माहिती

- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई, दि. 11 : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील युवक -युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरिता कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने नवीन वेबपोर्टल www.msobcfdc.org तयार करण्यात आले आहे.ओबीसी युवक-युवतींनी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माहितीसाठी या वेबपोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

          मंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या www.msobcfdc.org या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. मंत्रालयासमोरील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर, कौशल्य विकास अधिकारी विजय काटोलकर यावेळी उपस्थित होते.

          श्री. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरिता ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केले आहे.इतर मागासवर्ग प्रवर्गातील परंपरागत व्यवसायात असलेल्या व्यक्तींनाही या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेवून व्यावसायिक स्पर्धेत उतरता येईल. कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लाभार्थींना महामंडळाच्या थेट कर्ज योजना व व्याज परतावा योजनेचा लाभ घेवून व्यवसायदेखील उभा करता येईल. या योजनेचा लाभ 18 ते 50 वर्ष वयोगटातील इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना घेता येवू शकतो.अधिक माहितीकरिता www.msobcfdc.org या वेबपोर्टलवरील कौशल्य प्रशिक्षण योजना या लिंकला भेट द्यावी.

*****



 किमान आधारभूत किमतीनुसार हरभरा खरेदीसाठी

शेतकऱ्यांनी 17 मे पर्यंत नोंदणी करावी

- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील.

            मुंबई, दि. 11 : किमान आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी आतापर्यंत ४ लाख 9४ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. मार्चपासून आजतागायत 50.84 लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून, उद्दीष्टपूर्तीसाठी दि. १७ मे 2022 पर्यंत नोंदणीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

            आज मंत्रालयात हंगाम २०२१-२२ मधील हरभरा (चणा) खरेदी, साठवणूक नियोजन व शेतकरी चुकारे संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आतापर्यंत चणा खरेदी संदर्भातील आढावा घेतला व शेतकऱ्यांसाठी नोंदणीची तारीख वाढवावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे दिपक तावरे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे सुधाकर तेलंग, द विदर्भ सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हरी बाबू, यांच्यासह पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी, विदर्भ ॲग्रीकल्चर अलाईड प्रोड्युसर कंपनी नागपूर, नाफेड, भारतीय अन्न महामंडळ, वखार महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मंत्री श्री. देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना चणा खरेदीसाठीच्या नोंदणीची तारीख वाढविण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्या. चणा खरेदीचे उद्दीष्ट ६.८९ लाख मेट्रिक टन असून, ते पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न करण्यात यावेत. धान्याची साठवणूक योग्यरितीने करण्यासाठी प्रयत्न करावेत पावसामुळे कुणाचेही नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. शेतकऱ्यांना त्यांच्या धान खरेदीची किंमत वेळेत अदा करण्यात यावी. याचप्रमाणे हमालीचेही पैसे वेळेत अदा करण्यात येतील यासाठी प्रयत्न करावेत. राज्यातील धान खरेदी वाढवावी त्याचबरोबर गोडाऊनच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी संबंधित मंडळांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

            हरभरा ५२३० प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात येत असून, १ मार्च पासून 730 केंद्रांवर खरेदी करण्यात येत आहे. आजतागायत ४ लाख ९४ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ५०.८४ लाख क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. २ लाख ८० हजार २८४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. खरेदीची एकूण किंमत २६५८.९३ कोटी असून, १९५८.४० कोटी निधी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


००००



 



 उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा

कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुंबईत झाला यात्रेचा प्रारंभ

40 हजारहून अधिक युवक-युवतींना मिळणार सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रशिक्षण.

            मुंबई, दि. 11 : राज्यात उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय, कौशल्य विकास आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.

            युथ एड फाऊंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि राज्यातील विविध भागातील स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात्रेच्या प्रारंभी कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, उपसचिव नामदेव भोसले, युथ एड फाउंडेशनचे अध्यक्ष मॅथ्यू मॅथन, फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया कोठारी यांच्यासह स्वयंसेवक, प्रशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 40 दिवस सुमारे 4 हजार किलोमीटरचा प्रवास या यात्रेद्वारे करण्यात येणार आहे. यात्रेमध्ये 40 उद्योजकता प्रशिक्षक सहभागी होणार असून हे प्रशिक्षक सुमारे 40 हजारहून अधिक युवकांना भेटतील, त्यांना सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देतील. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांमध्ये उद्योजकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे उद्योगाच्या नवनव्या संकल्पना आहेत अशा युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे. युवकांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम यात्रेदरम्यान राबविण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात 3 दिवसांच्या उद्योजकता प्रशिक्षणाचा कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व 36 जिल्ह्यामध्ये डिसेंबरअखेर 4 हजार सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी विपणन सहाय्य प्रदान करण्याबरोबरच संबंधीत युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना शक्य असेल त्या सरकारी योजनांशी जोडण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.

कौशल्य विकासातून शाश्वत विकासाला चालना

            मंत्री श्री. टोपे याप्रसंगी म्हणाले की, राज्यातील युवकांकडे नवनवीन संकल्पना आहेत, स्टार्टअप्सचा विकास, सूक्ष्म व्यवसाय, लघुउद्योग यांना चालना देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आज सुरू झालेल्या उद्यमिता यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या अशा विविध योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील युवक-युवतींपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. युवकांचा कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी, नवनवीन संकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या स्टार्टअपचा विकास या माध्यमातूनच राज्याच्या शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे, असे मंत्री श्री. टोपे म्हणाले.

            उद्यमिता यात्रेचा आज प्रारंभ झाला असून पालघर, वसई, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या मार्गे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून जनजागृती करत ही यात्रा प्रवास करणार आहे. 20 जून रोजी पुणे येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

0000 



 इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण होईल.

- धनंजय मुंडे

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड,

राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली स्मारक कामाची पाहणी.

            मुंबई, दि. 11 : दादर येथील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करीत आहेत. या शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देण्यात असून, मार्च २०२४ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

           भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील इंदू मिल परिसरातील स्मारकाच्या सद्यस्थितीबद्दल आयोजित बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड,सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवासन, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, प्रसिध्द वास्तुविशारद शशी प्रभू, सहसचिव दिनेश डिंगळे यांसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

           मंत्री श्री. मुंडे म्हणाले, स्मारक उभारणीसाठी प्रगती तक्ता तयार करून दर पंधरा दिवसांनी या कामाच्या प्रगतीचा अहवाल घेण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती धोरण निश्च‍ितीसंदर्भातील सर्व कार्यवाही पार पाडण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पाठपुरावा करावा. हे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. स्मारक उभारणीचे काम जरी एम. एम. आर. डी. ए. कडे असले तरी राज्य शासनाने इंदूमिल स्मारक उभारणीच्या संनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात या कामासाठी लागणारा निधी विहित वेळेत उपलब्ध करून देणे तसेच वेळोवेळी कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल तपासणे हे काम सातत्याने सुरू आहे. या स्मारकासाठी लागणारा निधी तत्काळ एम. एम. आर. डी. ए. ला वितरित करण्याचे निर्देशही मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी दिले.

             यावेळी आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवासन यांनी या परिसरात करण्यात येणाऱ्या कामांच्या माहितीचे सादरीकरण तसेच प्रत्यक्ष भेट देवून माहिती सांगितली. प्रवेशद्वार, स्मारक इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, बेसमेंट वाहनतळ याबद्दल सविस्तर माहिती दिली. एमआरडीए हे सर्व काम गतीने करत असून उर्वरित काम गतीने करणार असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली.

             सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, सचिव सुमंत भांगे, एस.व्ही.आर.श्रीनिवासन, डॉ.प्रशांत नारनवरे, प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू, दिनेश डिंगळे यांनी इंदूमिल येथील स्मारक उभारणीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली तसेच चालू कामाचा समग्र आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

          मंत्रिमंडळाने मंत्री श्री.धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाचे सनियंत्रण व जलदगतीने पूर्ण करणे यासाठी एक उपसमिती नेमली असून, या उपसमितीमध्ये श्री. मुंडे यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे.या स्मारकाचे काम जलदतीने पूर्ण व्हावे यासाठी दर पंधरा दिवसांनी या कामाचा आढावा घेणार असल्याचेही मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.


******




निसर्ग

 *है



```या नैसर्गिक घटनेला मुरमुरेशन असे म्हणतात. येथे तुम्हाला झारोव्हर पक्षी वेगवेगळ्या स्वरूपात उडताना दिसतात. शास्त्रज्ञांनी एकमेकांशी टक्कर न घेता असे कसे उडतात हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि निष्कर्ष काढला की जेव्हा प्रत्येक पक्षी एकमेकांना आदळू नये म्हणून एक सेकंदात सुमारे शंभर दशलक्ष गणिती आकडेमोड करू शकतो तेव्हाच ते शक्य आहे. निसर्ग आपल्याला आश्चर्यचकित करणे कधीही थांबवत नाही !```

Featured post

Lakshvedhi