Monday, 28 March 2022

संगीत

 ********************************

*@ २६ मार्च @*

*जागतिक संगीतोपचार दिन*

********************************

आज जागतिक संगीतोपचार दिन !

 संगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय. आजार, व्याधी शरीराला विळखा घालत आहेत, त्यावर बऱ्याचदा औषधांच्या मात्राही काम करीत नाहीत. संगीतात असणाऱ्या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहे.

संगीत हे नेहमीच आनंद देणारं, मनःशांती मिळवून देणारं असतं. कोणतही काम करीत असताना एकीकडे गाणं चालू असलं कि काम चुटकीसरशी संपतं. कामाचा शीण तेव्हढासा जाणवत नाही. 

सकाळच्या वेळी फिरायला जाताना कानात इयर-प्लग्ज घालून गाण ऐकत गाण्याच्या ह्रिदम बरोबर भराभर चालणारे लोक आजकाल खूप दिसतात. जिम मध्ये तालबद्ध गाण्यांच्या साथीने सगळे वर्कआऊट्स होत असतात. वशपींळीं च्या खुर्चीत मोठ्ठा ‘आ’ करून, तोंड बधीर करून बसलेले असताना आणि तिथून कधी एकदा सुटका होतेय त्या क्षणासाठी अधीर झालेले असताना जर का लरलज्ञर्सीपव मध्ये मंद, सुखद वाद्यसंगीत वाजत असलं तर आपलं लक्ष दुखण्यापासून थोडं दूर हटतं. अंगाई गीताच्या सुरांनी चुळबुळ करणारी छोटी बाळ चट्कन झोपेच्या आधीन होतात.

संगीत हे मनाला, चित्तवृत्तींना शांत करतं हे तर सर्वश्रुत आहे. पण संगीताचा उपयोग रोगनिवारणा साठी देखील करता येतो याबद्दल मात्र अजून फारशी कुणाला माहिती नाही. आपल्या वेदांपैकी सामवेदात संगीताबद्दल विस्तृत माहिती आहे. संगीत हे आयुर्वेदाचा देखील खूप जुना भाग आहे.

भारतीय शास्त्रीय संगीतात राग-समय चक्राची संकल्पना फार महत्वाची मानली जाते. त्या नुसार दिवसाच्या प्रहराप्रमाणे राग गायले जातात. जसे सकाळी गायचे राग म्हणजे भैरवचे प्रकार, तोडीचे प्रकार इ. दुपारी सारंगचे प्रकार, पटदीप, भीमपलास इ. संध्याकाळच्या रागामध्ये भूप, कामोद, यमनकल्याण वगैरे आणि रात्रीच्या रागामध्ये बागेश्री, मालकौंस, भिन्न षड्ज इ. रागाचा समावेश होतो.

आयुर्वेदात त्रिदोष म्हणजे कफ, पित्त आणि वात ही संकल्पना आहे. हे त्रिदोष आपल्या शरीरात असतात. त्यांचं प्रमाण हे व्यक्तीपरत्वे भिन्न असत. या दोषांचं प्रमाण हे नेहमी संतुलित असावं लागत. कोणताही एक दोष वाढला की आजार येतो. या दोषांच्या वेळा ठरलेल्या असतात. दिवसभरात दोन चक्रात त्या वेळा विभागलेल्या असतात. म्हणजे सकाळी ६ ते १० कफाचं प्रमाण जास्त असत. १० ते १२ पित्त आणि २ ते ६ वात. दुसऱ्या सायकलमध्ये ६ ते १९ कफ, १० ते २ पित्त आणि २ ते ६ वात.

ज्या वेळेला त्रिदोषांपैकी जो दोष वाढलेला असतो त्यानुसार रागाची निवड केली जाते (अर्थात तो राग त्या वेळी गायचा राग असतो). मात्र त्यात थोडा बदल करावा लागतो. म्हणजे एखाद्या स्वराची षीशाऊशपलू किंवा शपशीसू वाढवून तो राग गायला किंवा वाजविला गेला तर रोग निवारण होण्यास मदत होते. 

राग विशिष्ट पद्धतीने वाजविला किंवा गायला तरच त्याचा परिणाम होतो एरवी त्याने नुसते मनोरंजन होते. शारंगदेवाच्या ‘संगीत-रत्नाकर’ या ग्रंथात याविषयीचे श्लोक आहेत. त्रिदोषांपैकी प्रत्येक दोषाचे पाच प्रकार आहेत आणि ते शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. त्या नुसार राग बांधलेले आहेत.

आधुनिक वैद्यक शास्त्रात आता संगीतात असलेल्या रोगनिवारक शक्ती (हिलिंग पॉवर) बद्दल नवीन शोध लागत आहेत. संगीताच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी आपल्या शरीरातल्या पेशींना कंपनाच्या साह्याने सचेत केलं जातं. या कंपनामुळे रोग्याच्या जाणीवेवर परिणाम होतो व त्याला आरोग्याचा लाभ होतो. त्या साठी रोगाचं अचूक निदान करून त्याला ऐकवण्यासाठी नेमक्या रागाची निवड करून तो किती वेळ आणि कोणत्या समयी ऐकायचा हे ठरवावं लागतं.

चेन्नईतील राग रिसर्च सेंटर सध्या भारतीय राग आणि त्यांचा रोग निवारणासाठी कसा उपयोग करून घेता येईल याबद्दल अभ्यास आणि संशोधन करीत आहे. या साठी संगीतज्ञ, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ञ यांची एक टीम काम करते आहे.

मुंबईत प्रसिद्ध सतारवादक व संगीतकार पं.शशांक कट्टी (शांक-नील फेम) यांनी गेली अनेक वर्ष या संदर्भात अभ्यास व चिंतन करून डॉक्टर्स आणि आयुर्वेदाचार्य यांच्या बरोबर काम करून स्वतःची ‘सूर-संजीवन’ या नावाची एक उपचार पद्धती विकसित केली आहे. इच्छुकांना ते या विषयीच प्रशिक्षणही देतात. रोगनिवारणासाठी विशिष्ट रागांची निवड करून ते विशिष्ट पद्धतीने वाजवून त्यांनी अनेक सीडीजची निर्मिती केली आहे.

डोकेदुखी, पोट दुखी, संधीवात, असिडीटी, मधुमेह, कोलायटिस, यकृताचे विकार, अस्थमा, रक्तदाब, निद्रानाश, फिट्स अशा अनेक विकारावर संगीतोपचार फार उपयुक्त ठरत आहेत. अर्थात चालू असलेली औषध पूर्णपणे बंद करून चालत नाही. पण त्यांच्या जोडीने पूरक उपाय म्हणून ह्या उपचारांचा खूप फायदा होतो. 

औषधांची मात्रा कमीकमी करीत पूर्णपणे बंद करून रोग बरा होऊ शकतो. नुसत करमणूकीचं साधन न रहाता आरोग्य सुधारण्यासाठी आता संगीताचा उपयोग करण्यात येतो आहे.

आधुनिक जीवनाचा परिपाक म्हणून निरनिराळ्या प्रकारच्या व्याधी वाढीस लागल्या आहेत. अ‍ॅलोपथिच्या मर्यादा लक्षात आल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सुजोक, रेकी, प्राणिक हिलिंग इत्यादी अनेक पूरक वा पर्यायी उपचार पद्धती लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांच्याच जोडीने आता येणाऱ्या काळात संगीतोपचार पद्धती लोकप्रिय झाली तर त्यात नवल वाटायला नको.

*संकलन : संजीव वेलणकर, पुणे*

*९४२२३०१७३३*

*संदर्भ : इंटरनेट/सुलोचना देवलकर*

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

********************************

हिशोब

 *हिशोब काय ठेवायचा*


*काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहा मध्ये..*

*आपल्या थोड्या वर्षांचा..*

*हिशोब काय ठेवायचा ..!!*


*आयुष्याने भर भरून दिले असताना..*

*जे नाही मिळाले त्याचा..*

*हिशोब काय ठेवायचा..!!*


*मित्रांनी दिले आहे,*

*अलोट प्रेम इथे...*

*तर शत्रूंच्या बोलण्याचा,*

*हिशोब काय ठेवायचा..!!*


*येणारा प्रत्येक दिवस,*

*आहे प्रकाशमान इथे..*

*तर रात्रीच्या अंधाराचा,*

*हिशोब काय ठेवायचा..!!*


*आनंदाचे दोन क्षण ही, पुरेसे आहेत जगण्याला..*

*तर मग उदासिनतेच्या क्षणांचा..*

*हिशोब काय ठेवायचा..!!*


*मधुर आठवणींचे क्षण,*

*इतके आहेत आयुष्यात..*

*तर थोड्या दु:खदायक गोष्टींचा..*

*हिशोब काय ठेवायचा..!!*


*मिळाली आहेत फुले इथे, कित्येक सहृदा कडुन..*

*मग काट्यांच्या टोचणीचा..*

*हिशोब काय ठेवायचा..!!*


*चंद्राचा प्रकाश आहे, जर इतका आल्हाददायक..*

*तर त्यावरील डागाचा..*

*हिशोब काय ठेवायचा..!!*


*जर आठवणीनेच होत असेल, मन प्रफुल्लित..*

*तर भेटण्या न भेटण्याचा..*

*हिशोब काय ठेवायचा..!!*          

*काही तरी नक्कीच..खुप चांगलं आहे सगळ्यांमधे..*

*मग थोड्याशा वाईटपणाचा,*

*हिशोब काय ठेवायचा..!!*


🙏🌹🙏🌹🙏🌹

 


ग्रामीण महिला खेळ

 


Sunday, 27 March 2022

कैसी लगि मिर्ची

 



 




 तबारक उल्ला खान के नाम से मुमेरीयल टूर्नामेंट रखा गया है शिवली नगर मुंब्रा थाने में

➖➖➖➖➖➖➖➖ नेहाल हसन रीपोर्टर मुंबई से ➖➖➖➖ यह टूर्नामेंट 3 दिन का है जिसमें 26 तारीख को लड़कियां खेलेंगे 27से 28 पुरुषों के लिए रखा गया है महाराष्ट्र के कई जिलों से खेलने के लिए खिलाड़ियों और लड़को ने भाग लिया है यह टूर्नामेंट महफूज शेख उर्फ मामा कराते हैं उनको सहयोग करते शब्बीर खान अजीम शेख शमीम खान हिरा सीता राम पाटिल एहतेशाम शेख इक्सपोट का शौक मामा को बचपन से है और राजनीतिक का कभी शौक है 16 सालों से शिवली नगर मुंब्रा में अकेले दम पर इक्सपोट टूर्नामेंट का प्रोग्राम कराते हैं और बड़े पैमाने पर कराते हैं जब उनसे बातचीत की गई उन्होंने बताया कि हम किसी पार्टी लेवल से काम नहीं करते हैं हम अपना खुद का पैसा खर्च कर के यह सब कराते हैं और एक संस्था भी चलाते हैं जिसमें गरीब बच्चियों की शादी कराना गरीबों की मदद करना जो परेशान हाल है उसकी परेशानी को हल करना मगर हैरतअंगेज की बात यह है जब पता लगाया गया तो पता चला महफूज मामा किसी से ₹1 रुपया चंदा नहीं लेते हैं ना किसी से मदद मांगते हैं अपने अकेले दम पर जो उनसे होता है वह काम करते हैं अगर किसी को जरूरत पड़ती है आधी रात को भी तो महफूज मामा तुरंत आ जाते हैं और मुंब्रा के अंदर हर कोई उनको मामा के नाम से जानता है उनका कहना है मुंब्रा वासियों से अपनी बच्चियों को इक्सपोट सिखाएं ताकि देश का नाम रोशन करें और अपने मां बाप का भी हर मां बाप का सपना होता है कि मेरे बच्चे आगे बढ़कर नाम करें इसीलिए हमने इक्सपोट खोला है आए और उसका फायदा उठाएं महफूज मामा का कहना है हम किसी से ₹1 रुपया नहीं लेते हैं बच्चों को और बच्चियों को फ्री में इक्सपोट सिखाते हैं उनके दोस्त एहतेशाम भाई ने तारीफ करते हुए नजर आए वह मुंब्रा के समाजवादी पार्टी के उपाध्यक्ष है इसी तरह कांग्रेस राष्ट्रवादी पार्टी के सभी लोग मामा को मान सम्मान और सहयोग करते हैं वह खुद कांग्रेश राष्ट्रवादी पार्टी में है उनका कहना है खेल में कोई राजनीतिक नहीं है यह दिलों को जोड़ता है इस कार्य को हम राजनीतिक से दूर रखते हैं राजनीतिक अपनी जगह है खेल अपनी जगह और कई बड़ी हस्तियां मामा के प्रोग्राम में शामिल है


Featured post

Lakshvedhi