Wednesday, 23 March 2022

 नामांकित इंग्रजी निवासी शाळेसाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करावे.

            मुंबई, दि. 22 : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी 31 मार्च 2022 पर्यंत अर्ज करावेत, असे मुंबई येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

            यामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश देण्यात येतो. इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री मध्ये प्रवेश घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावे व पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 31 मार्चपर्यंत 2022 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.




 

 






सुप्रभात

 



जय हो बाबा की

 *बाबा नेहमीच मागे का असतात*.??? हे माहित नाही. 🤔

◆ आई नऊ महिने ओझं वाहते, वडील २५ वर्षे ओझं वाहतात. दोघेही बरोबरीचे आहेत, तरीही... *बाबा मागे का आहेत* ??? हे माहित नाही. 

◆ आई कुटुंबासाठी मोबदला न घेता काम करते, बाबा कुटुंबासाठी सर्व पगारच खर्च करतात. दोघांचे प्रयत्न समान आहेत. तरीही... *बाबा मागे का पडतात* ??? हे माहित नाही.

◆ आई आपल्याला पाहिजे ते शिजवते. बाबा आपल्याला पाहिजे ते खरेदी करतात. दोघांचे प्रेम समान आहे, परंतु आईचे प्रेम वरिष्ठ म्हणून दर्शवले जाते. *बाबा मागे का पडतात* ??? हे माहित नाही.

◆ जेव्हा आपण फोन करतो तेव्हा आपल्याला आधी आईशीच बोलावेसे वाटते. दुखापत झाल्यास आपण ‘आई गं’ असेच ओरडतो. जेव्हा आपल्याला वडिलांची गरज असते तेव्हाच आपल्याला त्यांची आठवण होते. परंतु वडिलांना कधीच वाईट वाटले नाही, की इतर वेळी मुलांना आपण आठवत नाही. पिढ्यानपिढ्या मुलांचे प्रेम मिळवतांना आपण पाहतो, की *बाबा नेहमीच मागे पडतात* का...??? हे माहित नाही.

◆ कपाटांमध्ये रंगीबेरंगी साड्या आणि मुलांसाठी पुष्कळ कपडे भरलेले असतात, परंतु वडिलांकडे फारच कमी कपडे असतात. कुटुंबियांच्या गरजेपुढे त्यांना स्वतःच्या गरजेची काळजी नसते. तरी... *बाबा अजूनही मागे का आहेत* ??? हे माहित नाही.

◆ आईकडे सोन्याचे अनेक दागिने असतात, पण वडिलांकडे एकच रिंग असते, कदाचित ती ही नसते. तरीही आई कमी दागिन्यांची तक्रार करते, आणि बाबा कधीच करत नाहीत. तरी अजूनही *बाबा मागे का आहेत* ??? हे माहित नाही.

◆ आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी बाबा आयुष्यभर खूप कष्ट करतात. पण घरातच जेव्हा जेव्हा ओळख मिळते, तेव्हा *बाबा नेहमीच का मागे पडतात*??? हे माहित नाही. 

◆ आई म्हणते, ह्या महिन्यात मुलांची शिकवणी फी देण्याची गरज आहे. सणानिमित्त मला साडी घेऊ नका, परंतु वडिल स्वतःसाठी नव्या कपड्यांचा साधा विचारही करत नाही. तरीही... *बाबा का मागे पडतात* ??? हे माहित नाही.

◆ आई-वडील म्हातारे झाल्यावर मुले म्हणतात, आई कमीत कमी घरातील कामात मदत करते, पण ते म्हणतात, बाबा निरुपयोगी आहेत. *बाबा मागे का पडतात*..??? हे माहित नाही.

●●● वडील *मागे, ‘मागच्या बाजूला’* आहेत. कारण *ते कुटुंबाचा कणा आहेत.* त्यांच्यामुळेच आपण सगळे उभे आहोत.

म्हणून तर ते... *मागे* आहेत.

●●● *आई श्रेष्ठ आहे.* पण, म्हणून... *बाबा कनिष्ठ नाहीत,* एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की, ...

*❤️...कुठलाही मोठेपणा न मिरवणारा बाबा आमचा भक्कम आधार आहे.*❤ *लेकरू आईच्या उदरात ९ महिने असते पण बापाच्या डोक्यात कायम असते तरी बाबा मागे का*🙏🏻🙏🏻

🙏 *सर्व बाबांना समर्पित..* 🙏

🕉️जय भोलेनाथ🕉️




 

क वी taa

 जागतिक कविता दिनाच्या शुभेच्छा 

मास्तर :- बंड्या ऊठ, कविता म्हण

पश्या :- कविता

मास्तर :- मुर्खा जरा व्यवस्थित म्हण 

बंड्या : -क-वि-ता

मास्तर :- अरे मर्ढेकरांची कविता तुला आवडते ना?

बंड्या :- नाय, मला कुलकर्णींची कविता आवडते

मास्तर :- कुलकर्णींची कविता आहे का १२ वीला ?

बंड्या :- १0 वीला आहे

मास्तर :- मग तुला परिक्षेत कुलकर्णींची कविता येणार कारे ठोंब्या.

बंड्या : - नाही पण कुलकर्णींची कविता मला कायमचं प्रोत्साहन देते.

मास्तर: बरं, कुलकर्णींची तर कुलकर्णींची, सांग काय आहे ती.

बंड्या : -कविता सखाराम कुलकर्णी, इयत्ता १0वी , तुकडी - ब.

😁😁😁

 

Featured post

Lakshvedhi