Tuesday, 22 March 2022

वास्तू विशेष.

 *🙏🌸श्री ब्रम्हांडनायक परिवार 🌸🙏*

*‼️श्री स्वामी समर्थ महाराज माऊली ‼️*

*कॉपी पेस्ट फक्त👈👈👈👈*

👇👇👇

*आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ असेल तर घरात लक्ष्मी कायम स्वरूपी वास्तव्य करेल..* 

दाराच्या चौकटीच्या खालील लाकडाच्या किंवा दगडाच्या भागाला सामान्य भाषेत उंबरा किंवा उंबरठा, डेहरी म्हणतात. वास्तू शास्त्रात याचे खूप महत्त्व आहे. याबद्दल खास 5 गोष्टी आणि याचे 5 फायदे. 

 

 *वास्तू उपचार -* 

1 वास्तुनुसार उंबरा किंवा उंबरठा भंगलेला किंवा तुटलेला नसावा.

2 विखुरलेला किंवा या दृच्छिक उंबरठा नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतं.

3 दाराची चौकट उंबरा बळकट आणि सुंदर असावा

4 बऱ्याच ठिकाणी उंबरा नसतो हा एक वास्तू दोष असतो. कोणीही आपल्या घरात शिरकाव करताना आधी उंबऱ्याला पार करूनच घरात यावे.

 

 *धन प्राप्ती -* 

1 घराची स्वच्छता करून दररोज उंबऱ्याची पूजा करावी. जे दररोज नियमानं पूजा करतं त्यांचा घरात लक्ष्मी कायम स्वरुपी वास्तव्य करते.

2 दिवाळीच्या व्यतिरिक्त काही विशेष प्रसंगी उंबऱ्यावर तुपाचा दिवा लावावा. असे केल्यानं घरात लक्ष्मीचं येणं सोपं होणार.

3 एखाद्या खास प्रसंगी घराच्या बाहेर उंबऱ्याच्या जवळ स्वस्तिक बनवावं आणि हळद-कुंकू वाहून निरांजन ओवाळावी.

4 देवाची पूजा केल्यावर उंबऱ्याच्या दोन्ही बाजूस सतिया किंवा स्वस्तिक बनवून त्याची पूजा करावी. सतियावर तांदुळाचा ढिगारा रचून त्यावर एक-एक सुपारी वर कलावा बांधून ठेवा. या उपायाने धनप्राप्ती होते. 

 

 *असं करू नये -* 

1 उंबऱ्यावर कधीही पाय ठेवून उभे राहू नये.

2 उंबऱ्यावर कधीही पाय मारू नये.

3 आपल्या पादत्राणांची घाण किंवा पायाची घाण उंबऱ्यावर स्वच्छ करू नये. 

4 उंबऱ्यावर उभारून कोणाचेही पाया पडू नये.

5 उंबऱ्यावर उभारून कोणाही पाहुण्यांचे स्वागत करू नये किंवा त्यांना निरोप देऊ नये. नेहमीच पाहुण्यांचे आतिथ्य घराच्या आतून आणि त्यांना निघण्याचा निरोप उंबऱ्याचा बाहेरून द्यावा.

*🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻*

 पुण्यातील एका स्ञी ने फेसबुकवर दुधात चपाती चा चुरा कालवलेला फोटो शेअर केला.ते फोटो पाहुन तिला comment मध्ये रेसिपी विचारतील तीने हा स्वप्नात सुद्धा विचार केली नसेल😅😅😅

काही बायकांचे Comments😅😅

पहीली : दुध गायीचे घ्यायचे का म्हशीचे🤣🤣

दुसरी : चपाती चा चुरा हाताने करायचा कि Grinder ने😅😅

तिसरी : एका चपातीला किती दुध घ्यायचे😀😀😀

चौथी : दुधात साखरेऐवजी गूळ घातला तर चालेल का 😅😅

पाचवी : एका चपाती च्या चुऱ्यासाठी किती चमचे साखर🤣🤣🤣 वापरायची

सहावी : दुध थंड घ्यायचे का गरम😜🤣

सातवी : चपाती च्या ऐवजी भाकरी घेतली तर चालतील का😅😅😅

आठवी : चपाती ताजी हवी का शिळी😜😜😜

बेस्ट comment हद्दच केली🙄🙄🙄

बेस्ट : 3) चपाती साठी गहु दळुन आणायचे.. का विकतचं पीठ चालेल🤣🤣🤣

2) चपात्या घडीच्या हव्या का फुलके😜😜😜

Winner: 

 चपात्या बायकोने केलेल्या चालतील का रोजच्याप्रमाणे नवऱ्यानेच करायच्या 🤣🤣🤣🤣🤣🤣

 स्थानिक निधीतून रोहित्रे खरेदीसाठी परवानगी देणार - उपमुख्यमंत्री

            अतिदाबाने रोहित्रे नादुरुस्त होत असून डीपीदेखील खराब होत आहेत, विशेष बाब म्हणून रोहित्रे विकत घेण्यासाठी आमदारांच्या स्थानिक निधीतून परवानगी देता येईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार हरिभाऊ बागडे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

स्कूल फीस

 विद्यार्थ्यांचे शुल्क परत न करणाऱ्या

महाविद्यालयांवर फौजदारी कारवाई करणार

 - विजय वडेट्टीवार

            मुंबई, दि. 21 : इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कापोटी डीबीटीद्वारे रक्कम मिळणार असतानासुद्धा काही विना अनुदानित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित महाविद्यालयांनी घेतलेले पैसे विद्यार्थ्यांना परत न केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत सांगितले. 

            विधानसभा सदस्य लक्ष्मण जगताप, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना इतर मागास बहुजन कल्याणमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, २०२१-२२ या आर्थिक वर्षात इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपसाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेला १४६४ कोटी रुपयांचा १०० टक्के निधी महाडीबीटी पोर्टलवर वितरित करण्यात आला आहे.

            सद्यस्थितीत २०२०-२१ या आर्थिक वर्षातील शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपचे रुपये ५३० कोटी रुपये प्रलंबित आहेत. तसेच २०२१-२२ च्या हिवाळी अधिवेशनात १२६० कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजूर झाली असून निधी वितरणाची कार्यवाही सुरु आहे. याच प्रवर्गातील ९ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांना २०१८-१९ मध्ये एक हजार ९२५ कोटी रुपये, २०१९-२० मध्ये ९ लाख २३ हजार विद्यार्थ्यांना १ हजार ९४६ कोटी रुपये आणि २०२०-२१ या वर्षात साडेनऊ लाख विद्यार्थ्यांसाठी १ हजार ६७९.६४ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आल्याचे सांगून यावेळच्या पुरवणी मागण्यांमध्ये ४३२ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून तो विद्यार्थ्यांना देण्यासाठी महाडिबीटी प्रणालीवर वर्ग करण्यात आला आहे, असेही मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

0000


 

पुरस्कार

 महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदा न.

            नवी दिल्ली, दि. 21 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

          राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. आज प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील सहा मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये डॉ. सायरस पुनावाला आणि एन.चंद्रशेखरन यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर डॉ. भिमसेन सिंघल, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. हिंमतराव बावस्कर तसेच डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

             डॉ. सायरस पुनावाला यांना उद्योग व व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘पद्मभूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. श्री पुनावाला हे सुप्रसिद्ध औषधी निर्माता आहेत. जगातील सर्वात मोठी औषधी निर्माण करणारी सिरम संस्थेचे ते संस्थापक आहेत. कोरोना माहामारीच्या साथीत या संस्थेने तयार केलेली लस सर्व भारतीयांना तसेच अन्य देशातील लोकांनाही सर्वोउपयोगी ठरली. त्यांच्या या कार्याची दखल घेत आज त्यांना सन्मानित करण्यात आले.

            श्री एन. चंद्रशेखरन यांनाही उद्योग व व्यापार क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. श्री चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. ते भारतील एक नामांकित उद्योजक आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत आज त्यांना गौरविण्यात आले.  

4 मान्यवरांना ‘पद्मश्री पुरस्कार’ आज प्रदान

            वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. भिमसेन सिंघल यांना ‘पद्मश्री पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. डॉ. सिंघल हे नामांकित न्यूरोलॉजिस्ट आहेत. डॉ. सिंघल यांनी मज्जतंतूचा शास्त्रीयरीत्या अभ्यास केलेला आहे. धमन्या आक्रसणे (स्क्लेरोसिस) आणि पार्किन्सन रोगावर त्यांचे संशोधन जगमान्य आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करीत त्यांना आजा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            डॉ. विजयकुमार डोंगरे यांना कुष्ठरोगांवर केलल्या निस्वार्थ उपचारांसाठी वैद्यकिय क्षेत्रामधून ‘पद्मश्री पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. डॉ. डोंगरे हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते गेली अनेक वर्ष कुष्ठरोंग्यांवर उपचार करीत आहेत. त्यांच्या या निरपेक्ष सेवेची दखल घेऊन त्यांना आज गौरविण्यात आले.


            विंचुदंश आणि सर्पदंशावर केलेल्या अभ्यासासाठी डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन आज सन्मानित करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील विंचुदंश आणि सर्पदंश झालेल्यांचे प्राण त्यांनी वाचविले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत आज त्यांना नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. तळागळातील शास्त्रज्ञ अशी डॉ. राजवंशी यांची ओळख आहे. निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) चे ते संचालक आहेत. डॉ. राजवंशी यांनी अक्षय ऊर्जा संशोधन, ग्रामीण आणि सतत विकास याविषयांवर त्यांचा तीस वर्षापेक्षा अधिक अभ्यास आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत आज त्यांना सन्मानित करण्यात आले.

            केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात येते. यावर्षी एकूण १२८ पद्मपुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ४ ‘पद्मविभूषण’, १७ ‘पद्मभूषण’ आणि १०७ ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे.

            पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये ३४ महिलांचा समावेश आहे. १० अप्रवासी भारतीयांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले असून १३ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यापैकी आज काही पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले आहेत. उर्वरीत पुरस्कार दुस-या टप्प्यात 28 मार्च रोजी प्रदान करण्यात येतील.

अर्थसंकल्प

 अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम लवकरात लवकर

पूर्ण व्हावे हीच राज्य शासनाची भूमिका

- अशोक चव्हाण.

            मुंबई, दि. 21 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, ही शासनाची भूमिका असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.

            कृषी, पदुम, शालेय शिक्षण व क्रीडा, वित्त, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना श्री.चव्हाण बोलत होते.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने अरबी समुद्रात स्मारक उभारण्याच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्मारकाबाबत काही न्यायालयीन प्रकरणे आहेत. तसेच पर्यावरण विभागाकडूनही काही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे हे काम पूर्णत्वास नेण्यात अडथळे येत असून छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक लवकरात लवकर व्हावे, ही शासनाची भूमिका आहे, असे श्री.चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

            मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, दरवर्षी प्रमाणे रस्ते विकासाच्या कामांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. मात्र, मागच्या काळात कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता जुनी विकासकामे हाती घेवून ती पूर्णत्वास नेण्याची गरज आहे. तसेच आशिया विकास बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून राज्यातील विविध रस्त्यांची कामे सुरु आहेत. पहिल्या टप्प्यातील 31 कामे प्रगतीपथावर असून 18 कामे निविदा प्रक्रियेत आहेत. यात ज्या भागात जास्त वाहतूक आहे त्या भागात रस्त्याची कामे केली जात आहेत. तसेच राज्यातील ज्या भागात खनिकर्माच्या कामांमुळे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते, त्या भागात डांबरी रस्त्यांऐवजी सिमेंट रस्ते निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे कामे सुरु आहेत.

            कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, कृषी विभागाच्या अनेक योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून कोणताही भेदभाव न करता लाभार्थींची निवड केली जात असून यामुळे कुणावरही अन्याय होत नाही. ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत विविध योजना एका छताखाली आणून आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनांचे जलदगतीने बळकटीकरण करण्यासाठी अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. शेतमाल थेट विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. यासाठी टास्क फोर्स निर्माण केला असून त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. सेंद्रिय शेतीबाबतही स्वतंत्र शेती प्रमाणीकरण यंत्रणा उभी करण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीलाही चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य देण्याचा निर्णय विभागाने घेतला असून आता महिला शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्याचे धोरण राज्याने अवलंबिले आहे. त्याचबरोबर जालना सीड हब या प्रकल्पाला चालना देण्यात येत असून यामुळे राज्यातच जास्तीत जास्त बियाणे उत्पादन करता येणार आहे.

            सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच मुंबईमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मोठे जाळे आहे. या गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकांबाबत 250 सदस्य संख्या अटीबाबत शासनस्तरावर विचार सुरु आहे. या निवडणुकांना खर्च मोठ्या प्रमाणावर लागतो. याबाबत लवकरात लवकर बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

             पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईतील किल्ल्यांच्या विकासाबाबत सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभाग संयुक्तपणे कृती आराखडा तयार करुन त्याप्रमाणे कामे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चंद्रपूर येथे चांगले टुरिजम सर्किट तयार करण्याबाबतही कार्यवाही सुरु आहे. तसेच रायगडावर जीवा महाले यांचे स्मारक उभारण्याबाबत शासन सकारात्मक असून जागेची निश्चिती करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

            शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यातील शाळांचा दर्जा सुधारणे, भौतिक व पायाभूत सुविधा पुरविण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. जिल्हा परिषद शाळा, आदर्श शाळा आणि निजामकालीन शाळांसाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. येत्या काळात या शाळांना भरघोस निधी देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली, दुसरीतील अभ्यासक्रमातही बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राचे ज्ञान व्हावे यासाठी कृषी सहलीही आयोजित करण्यात येतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे कल वाढविण्यासाठी सायन्स सिटी निर्माण करण्याचा देखील शासनाचा प्रयत्न आहे. शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना, मुंबईतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत वित्त विभागाचे मत घेतले जात आहे. मंत्रिमंडळातही याबाबत चर्चा केली जात असून याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी सदस्य सर्वश्री प्रशांत बंब, आशिष शेलार, रवींद्र वायकर, रवी राणा, संजय केळकर, अभिमन्यू पवार, प्रकाश सोळंके, दीपक केसरकर, आशिष जैस्वाल, अशोक पवार, भारती लव्हेकर आदींनी चर्चेत सहभाग घेवून मागण्या मांडल्या होत्या.

००००


           

 धान उत्पादक शेतकऱ्यांचे शिल्लक ६०० कोटी तत्काळ वितरित करणार.

- उपमुख्यमंत्री अजित पवार.

             मुंबई, दि. 21 : धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी रुपये तत्काळ देण्यात येतील, अशी माहिती उपमख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

            विधानसभेत सदस्य वैभव नाईक, सुधीर मुनगंटीवार यांनी औचित्याच्या मुद्याच्या माध्यमातून धान खरेदीचा मुद्दा उपस्थित करीत शेतकऱ्यांच्या बोनसची मागणी केली. सरकारने धान खरेदी सुरु केली आहे, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत आहे. मात्र या वर्षीचा बोनस मिळालेला नाही. तो बोनस द्यावा, अशी मागणी सदस्य वैभव नाईक यांनी केली. तर राज्यात सन २०१३ पासून शेतकऱ्यांना धान खरेदीवर बोनस देण्याची पद्धत सुरू आहे. ती कायम ठेवावी अशी मागणी विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावर मागील धान खरेदीपोटीचे शेतकऱ्यांचे शिल्लक ६०० कोटी रुपये लगेच देण्यात येतील असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले. मात्र बोनसची मागणी मान्य करता येणार नाही यातून केवळ शेतकऱ्यांची फसवणूक होते. शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसड राज्यातील व्यापारी राज्यात येऊन शेतकऱ्यांच्या नावाने धान विकून बोनस घेऊन जातात. राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नाही. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांना त्यांनी धानाची लागवड केल्याच्या प्रमाणात काही प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत विचार सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

****



Featured post

Lakshvedhi