सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 19 March 2022
Friday, 18 March 2022
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
मुंबई, दि. १७ : जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिनांक २२ मार्च २०२२ रोजी विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे.
जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, कुलाबा, मुंबई येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव रामनाथ सोनवणे यांनी दिली आहे.
भूजल व भूपृष्ठावरील उपलब्ध पिण्यायोग्य पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याची बचत करणे आणि भूजल पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी पर्जन्य जलसंचयासारखे उपक्रम राबवणे यासाठी मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन व जनजागृती करणे आवश्यक आहे. या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन पाणी बचतीसाठी वैयक्तीक व सामूहिकरित्या योगदान द्यावे, असे आवाहन जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य श्री. संजय कुलकर्णी (जसं), श्रीमती श्वेताली ठाकरे (अर्थ) आणि श्रीमती साधना महाशब्दे (विधी) यांनी केले आहे.
0000
पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.
मुंबई दि 17 :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने 21 मार्च ते 28 मार्च या कालावधीदरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ऑनलाईन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत. या पोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात येत आहे.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा ॲड्रॉईड मोबाईल धारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayamॲप मोफत डाऊनलोड करून नोंदणी करावी. तसेच, लॉग-इन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी आवेदन करावे, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
बृहन्मुंबई हद्दीत 8 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी.
मुंबई, दि. 17 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 8 एप्रिल 2022 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाहप्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यास तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलीसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) यांच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे
वृत्त क्र. 903
बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत
ड्रोन, खाजगी हेलीकॉप्टर उडविण्यास प्रतिबंध.
मुंबई, दि. 17 : बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॅंग ग्लायडर्स, हॉट एअर बलून, खाजगी हेलीकॉप्टर आदींना दि. 8 एप्रिल, 2022 पर्यंत प्रतिबंध करण्याचे आदेश बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) संजय लाटकर यांनी जारी केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद असून बृहन्मुंबईचे पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी, यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.
0000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...