Friday, 11 March 2022

 बोधीवृक्ष शिक्षण संस्थेंबाबत तक्रार प्राप्त झाल्यास मान्यता रद्द

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई, दि. 10 : सामजिक न्याय विभागाच्या दि. 29 ऑक्टोबर 2021 च्या शासन निर्णयान्वये कायम विनाअनुदानित म्हणून 8 शाळांना मान्यता देण्यात आली होती. या 8 शाळांमध्ये बोधीवृक्ष शिक्षण व बहुउद्देशीय शाळाचाही समावेश होता. बोधीवृक्ष शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळानी ठराव करून ही शाळा कै.बाजीराव पाटील वाचनालय या संस्थेला हस्तांतर व स्थलांतरणाची प्रक्रिया केली. या बाबतीत काही लेखी तक्रार प्राप्त झाल्यास किंवा काही चुकीचे झाले असेल तर त्यावर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री डॉ.परिणय फुके यांनी उपस्थित केला होता.

000

 


 कोकणातील आपत्तीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना

- मंत्री विजय वडेट्टीवार.

            मुंबई, दि. 10 : कोकणात सातत्याने येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला असून येत्या 4 वर्षात साधारणत: एकूण 3200 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. याकरिता दि. 23 सप्टेंबर 2021 च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्य शासनाकडून 1200 कोटी रूपये तर 15 व्या वित्त आयोगाकडून 2000 कोटी रूपये सहभाग असणार आहे. याद्वारे समुद्र धूप प्रतिबंधक बंधारे, भूमिगत विद्युत वाहिन्या, चक्रीवादळ केंद्रे, निवारा केंद्रे बांधणी आदींचे नियोजन असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यात समुद्र धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडून 1400 कोटी रूपयांचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असून येत्या 15 दिवसात त्यास परवानगी देण्यात येईल. प्रस्ताव मंजुरीनंतर त्यासंदर्भातील निविदा काढून पुढील 2-3 महिन्यात कामाची सुरूवात करण्यात येईल, असे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

            यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री विजय उर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, अनिकेत तटकरे, प्रसाद लाड, विनायक मेटे, रमेशदादा पाटील यांनी उपस्थित केला होता.

000

 धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ लागू.

- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई, दि. 10 : धनगर समाजाला आरक्षण मिळावे तसेच ते कायद्याच्या कसोटीवर टिकावे याबाबतचे काम ‘टीस’ या सामाजिक संस्थेला देण्यात आले होते. या संस्थेने आपला अहवाल सादर केला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या निकषावर महाधिवक्ता यांचे अभिमत घेऊन आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या एस.टी.च्या योजनांचा लाभ लागू असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            धनगर समाजाच्या विकासासाठी 22 योजना राबविण्यासाठी 100 कोटी रूपये एवढा निधी घोषित करण्यात आला असून 85 कोटी 3 हजार रुपयांची इतर तरतूद करण्यात आली आहे. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्यासंबंधी 5500 इतक्या विद्यार्थी संख्येस या शैक्षणिक वर्षात मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर धनगर समाजाच्या बांधवांना 10 हजार घरे बांधून देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती श्री.वडेट्टीवार यांनी दिली.

            यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री सदाशिव खोत, प्रविण दरेकर, महादेव जानकर, गोपिचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता.

0

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखतीच्याच दिवशी

निकाल केला जाहीर

            मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा एकुण 34 पदांच्या मुलाखती आयोगाने घेतल्या असुन सदर पदांच्या मुलाखती ज्या दिवशी पार पाडल्या त्याच दिवशी आयोगाने संबंधीत पदाचे निकाल देखील प्रसिद्ध केले आहेत. सदर अतिविशेषीकृत पदे जी अनेक वर्षापासुन रिक्त होती ती आयोगाने विशेष मोहिम राबवून भरली आहेत.

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मज्जातंतूशास्त्र (Neurology), नवजात शिशुरोगशास्त्र (Neonatology), अंतस्त्रावी विकारशास्त्र (Endrocrinology), जठारांत्रजन्यशास्त्र, (Eastroenterology), वृक्क विकारशास्त्र (Nephrology), हृदयवाहीका आणि उरोविकृती शल्यचिकित्साशास्त्र (C.V.T.S.), बालरोग शल्यचिकित्साशास्त्र (Paediatric Surgery), मुत्रविकारशास्त्र (Urology), सुघटन शल्यचिकित्साशास्त्र (Plastic Surgery), हृदयरोग चिकित्साशास्त्र (Cardiology), अधिष्ठाता (Dean), शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, उपसंचालक (Dy. Director) आरोग्य सेवा, औषध वैद्यकशास्त्र (General Medicine), मंजातंतू शल्यचिकित्साशास्त्र (Neuro Surgery), अतिविशेषीकृत (super speciality) विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा एकुण 34 पदांच्या मुलाखती आयोगाने घेतल्या असुन या पदांच्या मुलाखती ज्या दिवशी पार पाडल्या त्याच दिवशी आयोगाने संबंधीत पदाचे निकाल देखील प्रसिद्ध केले आहेत.

0000000


 

 *किडणी म्हणजे शरीराची नगरपालिका* 

 *जागतिक किडणी दिवस* 

               किडणी (मूत्रपिंड) चे रोग आणि चिकित्सा आपण मूत्रपिंड (किडणी- Kidney) किंवा वृक्क याविषयी खूपच थोडे जाणतो. ज्याप्रमाणे नगरपालिका शहर स्वच्छ ठेवते, त्याचप्रमाणे किडण्या शरीरास स्वच्छ ठेवतात. शरीरातील रक्तात असलेली विजातीय व अनावश्यक द्रव्ये आणि कचरा मूत्रमार्गाद्वारे शरीराबाहेर काढण्याचे महत्त्वाचे कार्य किडण्यांद्वारे होते. खरे पाहता किडणी ही रक्ताचे शुद्धिकरण करणारी एक प्रकारची ११ से.मी. लांबीची काजूच्या आकाराची गाळणी आहे, जी पोटाच्या पृष्ठभागात मेरुदंडाच्या दोन्हीकडे स्थित असते. नैसर्गिकदृष्ट्या सुदृढ व सक्षम किडणीत रोज ६० लीटर पाणी गाळण्याची क्षमता असते. साधारणपणे २४ तासात १ ते २ लीटर मूत्र बनवून ती शरीर निरोगी ठेवते. ज्याप्रमाणे नगरपालिकेच्या निष्काळजीपणा किंवा आळसामुळे शहरात हळूहळू संक्रामक रोग पसरू लागतात, त्याचप्रमाणे किडण्या खराब झाल्यास शरीर अस्वस्थ होते. एका कुशल यंत्रकारागिराप्रमाणे किडणी आपल्या शरीरात कार्य करते. किडणी शरीराचा आवश्यक व क्रियाशील भाग आहे, जो आपल्या शरीर व मनाच्या स्वास्थ्यावर नियंत्रण ठेवतो. किडणी बिघडल्यास रक्त, हृदय, त्वचा व यकृतावर परिणाम होतो. किडणी रक्तातील शर्करा (Sugar), रक्तकण व उपयोगी आहार-द्रव्य सोडून फक्त अनावश्यक पाणी व द्रव्ये मूत्राच्या रूपात बाहेर फेकते. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यास ती फक्त अतिरिक्त शर्करेस गाळून मूत्राद्वारे शरीराबाहेर टाकते. किडणीचा हृदय, फुप्फुसे, यकृत व प्लीहेशी विशेष संबंध असतो. बहुतांश हृदय व किडणी परस्पर सहयोगाने कार्य करतात, म्हणून ज्यावेळी एखाद्याला हृदयरोग होतो त्यावेळी त्याची किडणीदेखील खराब होते आणि जेव्हा किडणी बिघडते तेव्हा त्या माणसाचा रक्तदाब उच्च होतो व हळूहळू हृदयदेखील दुर्बल होते. आयुर्वेदाचे निष्णात वैद्य म्हणतात की किडणीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे याचे मुख्य कारण आजकाल समाजात हृदयरोग, दमा, क्षयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या रोगांच्या उपचारासाठी केले जाणारे इंग्रजी औषधांचे दीर्घकाळपर्यंत किंवा आजीवन सेवन आहे. या इंग्रजी औषधांच्या विषारी प्रभावामुळेच किडणी व लघवीसंबंधी रोग जडतात. कधी कधी एखादे आधुनिक औषध अल्पकाळ घेतल्याने....

किडनी रोगात आहार-विहार आयुर्वेदिक उपचार संदर्भात सविस्तर माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा👇🏽

https://ayurvedafitnesstips.com/%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%80/

 *Nutritionist & Dietitian* 

 *Naturopathist* 

 *Dr. Amit Bhorkar* 

 *whats app: 7218332218*

 


Featured post

Lakshvedhi