Friday, 25 February 2022

रामदास स्वामी

 समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च . १६०८, जांब, महाराष्ट्र - १३ जानेवारी. १६८१ , सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते.[१] रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले.[२] ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.[३] पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे.

रामदास स्वामी

Samarth ramdas swami original.jpg

मूळ नाव

नारायण सूर्याजीपंत ठोसर

जन्म

चैत्र शु. ९, शके १५३० [२४ मार्च १६०८]

जांब, जालना जिल्हा, महाराष्ट्र

निर्वाण

माघ कृ. ९ ,शके १६०३ [१३ जानेवारी १६८१]

सज्जनगड, सातारा जिल्हा, महाराष्ट्र

संप्रदाय

समर्थ संप्रदाय

गुरू

प्रभू श्रीरामचंद्र

भाषा

मराठी

साहित्यरचना

दासबोध, मनाचे श्लोक

कार्य

भक्ति-शक्तीचा प्रसार, जनजागृती, समर्थ-संप्रदाय व मठांची स्थापना

प्रसिद्ध वचन

जय जय रघुवीर समर्थ

संबंधित तीर्थक्षेत्रे

सज्जनगड, शिवथर घळ, चाफळ

वडील

सूर्याजीपंत ठोसर

आई

राणूबाई सूर्याजीपंत ठोसर.

पूर्वाश्रमीचा परिवार संपादन करा

समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. ते ऋग्वेदी असून जमदग्नी हे त्यांचे गोत्र होते. ते सूर्योपासक होते. त्यांच्या पत्‍नीचे, म्हणजे गंगाधर-नारायणांच्या आईचे नाव 'राणूबाई ' होते.[४]

सूर्याजीपंत आणि सरकारी अधिकारी

बालपण संपादन करा

समर्थ रामदासस्वामी(नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होता. . लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. एकदा नारायण लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर त्याने दिले होते.या मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली.[४]

तपश्चर्या आणि साधना संपादन करा

पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली.वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते.

नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत.रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले असे मानले जाते. समर्थ दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेऊन उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच 'करुणाष्टके' होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात.[४] त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.

समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता.

तीर्थयात्रा आणि भारतभ्रमण संपादन करा

तुम्हास जगोद्धार करणे आहे /तुमची तनु ते आमुची तनु पाहे /दोनी तपे तुमची रक्षिली काय हे /धर्मस्थापनेकारणे //

समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला.

शिखांचे सहावे धर्मगुरू हरगोविंद आणि समर्थ रामदास

भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. हरगोविंदसिंगांबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले - " आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता ?" तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले - " एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी". समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले - "आणि हा सारा फौजफाटा ?" त्यावर हरगोविंद म्हणाले - " धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे , केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे.'समान-शीले-व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने दोघांत सख्य झाले. समर्थ गुरु हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते दोन महिने राहिले.तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले.... त्याला ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी. जप करतांना या कुबडीवर बगल ठेऊन चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे.समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पहायला मिळते. भारत प्रवास करीत असतांना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत."समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. त्यापाठोपाठ गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली.

समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुती संपादन करा

समर्थांनी ११ मारुतींची स्थापना केली. गावोगाव मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे:

(१) दास मारुती, चाफळ (राम मंदिरासमोर)

(२) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे)

(३) खडीचा मारुती, शिंगणवाडी, चाफळ (डोंगरावर)

(४) प्रताप मारुती, माजगांव, चाफळ

(५) उंब्रज मारुती (ता. कराड)

(६) शहापूर मारुती (उंब्रज जवळ)

(७) मसूर मारुती (ता. कराड)

(८)बहे-बोरगांव (कृष्णामाई) मारुती (जि. सांगली)

(९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली)

(१०) मनपाडळे मारुती (जि. कोल्हापूर)

(११) पारगांव मारुती (जि.कोल्हापूर).[४] ही ती गावे होत.

समर्थ स्थापित मठ संपादन करा

१. जांब

२. चाफळ

३. सज्जनगड

४. डोमगाव

५. शिरगाव

६. कन्हेरी

७. दादेगाव [४]

8 मादळमोही

जीवन संपादन करा

भारत प्रवास करतांना शेवटी वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी पैठणला परत आले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्‍नी या दोघांनी देह ठेवलेला होता. नाथांची पत्‍नी समर्थांची मावशी होती. पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले.

मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमंडपातून पलायन केल्यावर २४ वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले. त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे, असे येऊन गेले. समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्याया गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. २४ वर्षात दाढी, जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाईदेखील दीराला ओळखू शकल्या नाहीत. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. २४ वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले, असे मानले जाते.

जीवनकार्य संपादन करा

समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होत.समर्थांचे एक वैशिष्ट्य होते - समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती.

आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा रामदासस्वामींना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती, काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले.

सर्वस्वी नि:सत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे, समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.

केल्याने होत आहे रे ।

आज आपल्या जीवनात अपयश आणि दु:ख दिसत असेल, तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आंनद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नांनाच ‘तप’ असे म्हटले जाते. आपला प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खऱ्या धैर्याची कल्पना येऊ शकेल. जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करून ते यशस्वी झाले. अंत:करणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत, अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंत:करणात धैर्य उत्पन्न होईल. साडेतीनशे वर्षापूर्वी, राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले -

धिर्धरा धिर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका ।

केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥

मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राममंदिराची स्थापना केली. काही वेगवेगळ्या गांवी त्यांनी सुरूवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी. समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेले एकूण अकराशे मठ आहेत. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला.

समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दऱ्याखोऱ्यातून, डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगायमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठमहंत निर्माण करून, निःस्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभु श्रीरामचंद्र, आदिशक्ति तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वतः डोंगरदऱ्यांत, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. समर्थावर संत एकनाथाच्या वाङ्‌मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.

‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणाऱ्या समर्थांचे हे मुख्य उद्दिष्ट होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदास स्वामी भारावून गेले.

शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना दिलेली सनद संपादन करा

शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या भेटीचे एम.व्ही. धुरंधर यांनी काढलेले चित्र

छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास यांचे शिष्य होते. स्वराज्य रक्षणासाठी रामदासांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले आहे.[४] छत्रपती शिवाजी महाराजांनी ३१ नोव्हेंबर १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली होती. याबाबतचे एक पत्र इ. स. १९०६ मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी ‘समर्थांची दोन जुनी चरित्रे’ या ग्रंथात प्रकाशित केले होते; पण या वेळेस देवांना या पत्राची मूळ प्रत न मिळता एक नक्कल सापडली होती.

यानंतर इतिहासाचार्य राजवाड्यांनाही या पत्राच्या काही नकला सापडल्या. शिवाय, अनेक नकला पुणे पुराभिलेखागारात इनाम कमिशनच्या दफ्तरातही सापडतात; पण या सगळ्या नकला अथवा मूळ पत्राच्या कॉपी असून मूळ पत्र हे अनेक वर्षे कोणाच्याही पाहण्यास आले नव्हते. अखेरीस मे २०१७ मध्ये लंडनच्या ‘ब्रिटिश लायब्ररी’त या मूळ पत्राची फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली असून, महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे आहेत, त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. सदर सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे आहेत. पत्राच्या मुख्य बाजूवरचे अक्षर आवजी चिटणिसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते आहे.

‘श्रीसद्‌गुरुवर्य, श्रीसकळतीर्थरूप, श्रीकैवल्यधाम, श्रीमहाराज श्रीस्वामी, स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेऊन विज्ञापनाजे’’, अशा मायन्याने हे पत्र सुरू होते. त्यापुढे शिवाजी महाराजांनी स्वत:च्या शब्दात पूर्वी समर्थांनी त्यांना काय उपदेश केला, त्याबद्दल थोडक्‍यात लिहिले आहे.[५]

तत्त्वज्ञान संपादन करा

रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. त्यांच्या तत्त्वज्ञानास संत एकनाथांच्या वाङ्‌मयाची बैठक होती. दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये ब्रह्म%, माया, जीव, जगत्‌, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. पंचीकरण हा विषय समर्थांनी अतिशय सखोलपणे सांगितला आहे. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपण घेतो असे ते सांगतात. समर्थ रामदास स्वामी स्वतः सदैव विदेही अवस्थेमध्ये असल्याने त्यांचे हे अनुभवज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने मांडले.

त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरूवातीलाच सांगितले आहे. त्यांनी स्वतः १२ वर्षे नामस्मरण भक्ती केली व त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय केलेला प्रपंच 'भिकारी' आहे. ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावे असे समर्थ निक्षून सांगतात. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्दज्ञानाची त्यांनी तिखट शब्दात हजेरी घेतली आहे. भोंदू गुरू व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात असे त्यांनी सांगितले आहे

परमात्मा हा चराचरांत भरलेला असून, त्याची प्राप्ती करून घेण्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे हे समर्थांनी अनेक स्थळी सांगितले आहे. अनेक उपनिषदांचा संदर्भ देऊन समर्थांनी या जगाचे अनित्यत्व, मिथ्यत्व प्रतिपादन केले आहे. कर्म,भक्ती, ज्ञान या मार्गांचे अनुसरण करून मुक्त होण्याचे सर्वोच्च लक्ष्य त्यांनी त्यांच्या शिष्यांपुढे ठेवले. सतत ईश्वरचिंतन करावे, सद्गुरूंची सेवा करावी, उपासनेला प्राणपणाने चालवावे, सतत परमार्थ ग्रंथांचे परिशीलन करावे असे अनेक दंडक समर्थांनी घालून दिले आहेत.

पहा : चौदा ब्रह्म

व्यक्तिमत्त्व संपादन करा

मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे. “शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरी ज्ञान योगेश्र्वराचे। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।” हा श्लोक वामन पंडितांनी समर्थ रामदासांना उद्देशून लिहिला आहे.

साहित्य व काव्यनिर्मिती संपादन करा

समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गरम्य जागा होत्या.[४] आजही चाफळ, शिवथरघळ, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. समर्थांना अंगापूरच्या डोहात दोन मूर्ती सापडल्या; एक श्रीरामचंद्रांची आणि दुसरी तुळजाभवानीची. त्यांतील श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली. श्री तुळजा भवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले. सज्जनगडावरील प्रसिद्ध अंग्लाई देवीचे मंदिर आजही याची साक्ष देत आहे. सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांना एक बाग तयार करायची होती. या बागेत कोणकोणती झाडे लावावयाची आणि ती कशी लावावीत या संबंधीचे समर्थांचे स्वतंत्र प्रकरण आहे. यावरून त्यांचा वनस्पतीशास्त्राचा किती अभ्यास होता याची कल्पना येते. बाग प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवितेत समर्थांनी सुमारे ३५० वनस्पतींची नवे दिली आहेत. आश्चर्य म्हणजे यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, फळ, फूल, औषधी वनस्पती यांची व्यवस्थित वर्गवारी आहे. सज्जनगडावर दोन वर्षे राहून समर्थ शिवथरघळीत आले. तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. दासबोधातील मूर्खलक्षणे वाचत असताना तर अनेकांना वाटते की, समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला? जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.


समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध[६], मनाचे श्लोक[७], करुणाष्टके[८], भीमरूपी स्तोत्र[९],अनेक आरत्या उदाहरणार्थ 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती, 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांनी घरांघरांत स्थान मिळवले आहे 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' ही संत नामदेवांनी लिहिलेली आरती प्रसिद्ध आहे. याचा अर्थ नामदेवांच्या काळात देवांच्या आरत्या मंदिरात म्हटल्या जात होत्या. पुढे मोगलांच्या आक्रमणामुळे देवांचे उत्सव बंद पडले, अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे आरती वाङ्‌मय जनमानसाच्या स्मृतीतून नाहीसे झाले.... समर्थांनी या वाङ्‌मयाचे पुनरुज्जीवन केले. आपण ज्या विविध आरत्या म्हणतो, त्यांपैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिल्या आहेत. मोरगावला गणपतीच्या दर्शनाला गेले असताना तेथील पुजाऱ्याला आरती येत नाही हे पाहून त्यांनी 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती केली. तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी. तिचे दर्शन घेतांना समर्थांना 'दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी' ही आरती स्फुरली. 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी' ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो.

समर्थांनी शंकराची आरती लिहिली, त्याची कथा मोठी गमतीशीर आहे. तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला आले. तिथे खंडेरायाचे दर्शन घेऊन ते लवथेश्वराला आले.जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीच मरण पावतो, अशी या मंदिराची ख्याती होती.हे कळल्यावर समर्थांनी मुद्दाम मंदिरातच झोपायचे ठरवले. ग्रामस्थांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण समर्थ तसे जिद्दी होते. सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीत भीतच प्रवेश केला. पाहतात तर काय ! समर्थ भगवान लवथेश्वराची पूजा करीत होते. त्याच वेळी 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' या प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली. समर्थांनी खंडेराया, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण, दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या आहेत.

रामदासस्वामींनी श्रीमत्‌ ग्रंथराज दासबोध’ या पारमार्थिक ग्रंथाची रचना (महाडजवळील) शिवथरघळ येथे केली.[१०]

दासबोधाशिवाय रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षड्‌रिपु-विवेक इत्यादी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे.

समर्थांची शिकवण कशी व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्मविश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाचीही होती.

एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ काही शव्दांत सांगता येते - कर्म ,उपासना, ज्ञान, विवेक. भक्ती, प्रयत्‍न व सावधानता.

समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला; कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनांत ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले -

जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।

प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की -

प्रपंची जे सावधान। तोचि परमार्थ करील जाण।

प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।

याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात,

बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी।

चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।।

मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,

‘येक म्हणजी मऱ्हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये।

ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।।

लोहाची मांदूस केली। नाना रत्‍ने साठविली।

ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी।

तैसी भाषा प्राकृत।।’

लेखन संपादन करा

रामदासस्वामींची वाङ्‌मय संपदा अफाट आहे. मानवी जीवन सर्वांगाने समृद्ध व्हावे म्हणून समर्थांनी विविध विषयांवर चिंतनपर रचना केल्या. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके, शेकडो अभंग, स्तोत्रे, स्फुट रचना, रुबाया, सवाया, भारुडे, कविता, अनेक ओवीबद्ध पत्रे तसेच आरत्या त्यांनी रचलेल्या आहेत. समर्थांच्या वाङमयाचे मूल्यमापन भिन्न प्रकारे, अनेक दृष्टिकोनातून, अनेक विचारवंतांनी केले आहे. त्यांच्या एक एक वाङ्‌मय प्रकाराचा ऊहापोह करून त्या प्रकारच्या वाङ्‌मयातून समर्थ काय सांगतात, हे पहातानाही त्यांच्या भक्तीचे, शैलीचे, बुद्धिमत्तेचे कुणालाही कौतुक वाटावे. त्यांचा भाषावैभव स्वयंभू होता. त्यांना शब्दांची कधी वाणच पडली नाही.

समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात. असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन्‌ त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये. विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.

परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहिले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी, किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.

रामदासांच्या काही साहित्यरचना :-


अस्मानी सुलतानी

आत्माराम

आनंदवनभुवनी

एकवीरा समाधी अर्थात्‌ जुना दासबोध

करुणाष्टके

छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र

दासबोध

समर्थकृत देवी स्तोत्रे

नृसिंहपंचक : हे काव्य लाटानुप्रासाचे उत्तम उदाहरण आहे.

’भीमरूपी महारुद्रा’ सारखे स्तोत्र

मनाचे श्लोक- मनाचे श्लोक एकूण २०५ आहेत.

मारुति स्तोत्र

मुसलमानी अष्टक

रामदास स्वामींचे अभंग

राममंत्राचे श्लोक

समर्थांच्या उर्दू पदावल्यांचे पुस्तक

सवाई

’सुखकर्ता दुखहर्ता’, ’लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा’, ’सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं’, यांसारख्या सुमारे ६१ आरत्या

सोलीव सुख , आणि

अप्रसिद्ध असलेला हजारो पानी मजकूर

Mahabharat

 *Fact today*


*युक्रेन कडे अणुबॉम्ब चा मोठा साठा होता. सोवियत महासंघाचा भाग असताना हा साठा तेथे ठेवण्यात आला होता.*

*सोव्हियत महासंघातून बाहेर पडल्यावर हा साठा युक्रेन च्या मालकीचा झाला. अमेरिका, युरोप वगैरे देशांनी सांगितले की हा साठा नष्ट करा. यावर युक्रेन ने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हा साठा आवश्यक आहे असे सांगितले. तेव्हा जगाने त्यांना सुरक्षिततेची हमी दिली.*

*मग १९९४ मध्ये युक्रेन ने अण्वस्त्रांचा साठा नष्ट केला. आणि रशिया ने २०१४ मध्ये आक्रमण करून त्यांचे एक शहर ताब्यात घेतले, २०२२ मध्ये युक्रेन चे ३ तुकडे करण्यासाठी आक्रमण केले आहे. पण जग ढिम्मच आहे. कोणी युक्रेन चे संरक्षण करण्यासाठी जात नाही.*

*शस्त्रत्याग हा महामुर्खपणा आहे. श्रीराम यांनी राज्य त्याग केला पण शस्त्रत्याग नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना शस्त्रत्याग करु नकोस हेच सांगितले होते.*

*आपले शस्त्र सतत जवळ ठेवणे, वेळोवेळी ते सज्ज आहे हे तपासणे आणि सुसज्ज ठेवणे फार आवश्यक आहे.*

 राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात १२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत.

मुंबई, दि. २४ : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, १९८७ मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, यांनी संपूर्ण राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लोकअदालत १२ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

मुंबई येथील सर्व न्यायालयात १२ मार्च रोजी लोक अदालतीचे आयोजन

न्यायालयीन प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्याबाबत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण हे वेळोवेळी लोक अदालतीचे आयोजन करीत असते.त्या अनुषंगाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार शनिवार दि. १२ मार्च २०२२ रोजी मुंबई येथील सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. व त्याद्वारे दूरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा देण्यात आली आहे.

लोकअदालतीत ठेवण्यात येणारी प्रकरणे

धनादेश अनादराची प्रकरणे, बॅंकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकाबाबतची प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, आयकर कायद्यातील फौजदारी स्वरूपातील तडजोड प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रकरणे, वैवाहिक वाद, संपादन प्रकरणे व दिवाणी दावे तसेच उपरोक्त नमूद स्वरूपातील दाखल पूर्व प्रकरणे सुनावणी करिता ठेवण्यात येणार आहेत.

तरी ज्या पक्षकारांना वर नमूद प्रकारची प्रकरणे दि. १२ मार्च २०२२ रोजी लोकअदालतीत ठेवावयाची आहेत. त्या पक्षकारांनी संबंधित न्यायालयात आपल्या प्रकरणात विनंती अर्ज लवकर सादर करावा व प्रकरण सामंजस्याने तात्काळ मिळवावे असे आवाहन मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे तथा नगर दिवाणी व सत्र न्यायालय, बृहन्मुंबईचे प्रधान न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके व सचिव हितेंद्र वाणी यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीचे फायदे

· प्रकरणात जमा केलेली संपूर्ण कोर्ट फी परत मिळते

· लोकअदालतीतील निवाड्यास कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही.

· सामंजस्याने वाद मिटल्यामुळे वेळ व पैसे दोन्हींची बचत होते.

· लोक अदालतीमध्ये पक्षकारांना आपली बाजू स्वत: मांडण्याची संधी मिळते.

अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविले आहे.


००००



 

 महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) 


            महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हा महाराष्ट्रा शासनचा अंगिकृत उपक्रम असून महामंडळाची स्थापना महिला सक्षमीकरणाच्या मुख्य उद्देशाने जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने दि. 24 फेब्रुवारी,1975 रोजी झाली. माविमचे एकूण 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यालय असून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना संघटित करुन महिलांचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न महामंडळ करीत आहे. महाराष्ट्र शासनाने दि.20 जानेवारी 2003 नुसार महामंडळाला महिला विकासाची राज्यस्तरीय “शिखर संस्था” म्हणून घोषित केले आहे.

            महामंडळाने आतापर्यंत विविध योजनेअंतर्गत 1.50 लाख हजार बचतगटाची निर्मिती करुन 17.51 लाख महिलांचे संघटन उभे केले असून त्यापैकी जवळजवळ 8.50 लाख महिला विविध प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. माविमने बचत गटांचे महाराष्ट्रामध्ये 361 फेडरेशन नोंदणीकृत केले आहे. यापैकी 80% फेडरेशन हे स्वबळावर सुरु आहेत.

------

 माविम’ म्हणजे महिलांसाठी ‘विकासाचा महामार्ग’

- महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

            मुंबई, दि. 24 : बचत गट हे महिला सक्षमीकरणाचे सशक्त माध्यम असून, महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिजनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे. ई- मार्केटिंगमध्ये महिला कमी पडू नयेत, यासाठी बचतगटाच्या उत्पादनांना ‘माविम’मार्फत ऑनलाइन मार्केटिंगचे सर्व व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘माविम’ म्हणजे महिलांच्या विकासाचा मार्ग आहे, असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी केले.

             महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या 47 व्या वर्धापन दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते,त्यावेळी त्या बोलत होत्या.

            या कार्यक्रमास महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर या दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या, तर उद्योग मंत्री सुभाष देसाई, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.


महिला बचत गटांना ई-कॅामर्स सोबत जोडून नवी व्यावसायिक दालने खुली

– उद्योग मंत्री सुभाष देसाई

            महिलांमध्ये आत्मविश्‍वास वाढवून त्यांचा उद्योजकीय विकास घडवून आणणे, त्यांना सातत्याने रोजगाराच्या संधी आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची बाजारपेठेशी सांगड घालून देण्यात येत आहे. माविमच्या महिला बचतगटांना आयकीया, अमेझॉन, फ्लिपकर्ट या कंपन्यासोबत जोडून महिलांसाठी नवी व्यावसायिक दालने खुली करून दिली आहेत, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

            महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, शासनाने नवतेजस्विनी अंतर्गत IFAD च्या सहकार्याने ५२५ कोटींच कर्ज मिळवून देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे अठरा लाख महिला माविमच्या माध्यमातून संघटित झाल्या आहेत. 2 कोटी पर्यंतचे लक्ष्य समोर ठेवले आहे. महिलांच्या विकासासाठी महाराष्ट्र कायमच अग्रेसर राहिला आहे. लवकरच राज्याचे चौथ महिला धोरण जाहीर होणार आहे. महिलांना उद्योगामध्ये प्रोत्साहन मिळावं, त्यादृष्टीने यंत्रणा उभी रहावी यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.

            महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला बचतगट मोहिमेचे बळकटीकरण करणे व महिला बचत गट भवन निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला आणि बालकांच्या सशक्तीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टक्के निधी कायमस्वरूपी महिला व बालविकास विभागाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याद्वारे महिला आणि बालकांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील महिलांना बचतगटांच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्याचा माविमच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहे, याच माध्यमातून आपल्या अनेक महिलांनी ई- रिक्षा घेतल्या आहेत, शेळी पालनात पुढाकार घेतला आहे, असे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

            राज्यातील सर्व एमआयडीसीमध्ये महिलांसाठी प्राधान्याने भूखंड देण्याच्या निर्णय घेतला आहे. यापुढेही महिलांना उद्योगांसाठी जागा राखीव ठेवली जाईल. मध्यान्ह भोजन ही योजना सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. याचे काम बचतगटांना काम दिले जाते. त्यांच्यासाठी कॉमन किचन उभारण्यासाठी उद्योग विभाग मदत करेल. एका ठिकाणी स्वयंपाक तयार करून शाळाशाळांत तो वितरित केला जाईल. स्वीडन मधील आयकिया ही कंपनी गृहसजावटीच्या वस्तूंची विक्री करते. त्या ठिकाणी ‘माविम’च्या बचतगटांच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या उत्पादनाची मागणी आहे त्या वस्तू तयार करणे यावर भर द्यावा. ग्रामीण भागातील महिलांना संधी मिळाल्यास त्यांच्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ लाभेल, असे उद्योग मंत्री, सुभाष देसाई यांनी सांगितले

            श्रीमती ज्योती ठाकरे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी, त्यांना सक्षम करणारी महत्वाची यंत्रणा आहे. सध्या राज्यात सुमारे दीड लाख बचतगटांची स्थापना ‘माविम’च्या वतीने करण्यात आली आहे. तर सुमारे साडेसतरा लाख महिलांचे अतिशय उत्तम आणि प्रभावी संघटन महाराष्ट्रात उभे करण्यात यश आले आहे. या महिलांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी ‘माविम’च्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय्य केले जाते.

            यावेळी अपर्णा पाठक आणि अॅड. आशा शेरखाने कटके यांचे महिलांसाठी सुरक्षा कायदे विषयक मार्गदर्शन, प्रा. हरि नरके यांचे मराठी भाषेला अभिजात दर्जा या विषयावर माहितीपर सत्र, विविध मान्यवरांचा सहभाग असलेली पॅनल चर्चा आणि तेजस्विनी कन्यांचा सत्कार, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गौरव गीताचा पुरस्कार कार्यक्रम, ‘मराठी भाषा दिनानिमित्त’ माझ्या मते मैत्री या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार असे विविध कार्यक्रम दोन सत्रात पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी केले, तर, व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी उपस्थितांचे आभार मानल.

Thursday, 24 February 2022

 इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

--

·       5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता 5 आणि 7 एप्रिल 2022 रोजी होणार

 

            मुंबईदि. 24 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल 2022 च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील दि. 05 मार्च आणि दि. 07 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे दि. 05 एप्रिल आणि दि. 07 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

            महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा दि. 04 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये बदल करण्यात येत आहे.

            यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार शनिवार दि. 05 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी हिंदी विषयाची तसेच द्वितीय सत्रात होणारी जर्मनजपानीचिनीपर्शियन विषयांची परीक्षा आता मंगळवार दिनांक 05 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल. तरसोमवार दि. 07 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी मराठीगुजरातीकन्नडसिंधी, (अरेबिक/देवनागरी) मल्याळमतमिळतेलुगुपंजाबीबंगाली विषयांची तसेच द्वितीय सत्रात होणारी उर्दूफ्रेंचस्पॅनिश आणि पाली विषयांची परीक्षा आता 07 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल.

            उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) च्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल नाही. त्याचप्रमाणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/ प्राचार्यविद्यार्थीपालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावीअसे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi