Thursday, 24 February 2022

 महानगरपालिका व नगरपालिकामधील सफाई कामगारां

वारसा हक्काचा प्रश्न मार्गी लागणार

- सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे

लाड-पागे समितीच्या शासननिर्णयात सुधारणा करणार

            मुंबई, दि. २३ : सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत सफाई कामगारांच्या विविध संघटनांच्या मागण्या व महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने शिफारशी केलेल्या आहेत. लाड पागे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत आतापर्यंत शासनाच्या विविध विभागांनी सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत काढलेले सर्व शासननिर्णय एकत्र करून सुधारीत शासननिर्णयाचा प्रस्ताव मंत्रीमंडळात प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत सांगितले.

            मंत्रालयातील दालनात लाड-पागे समितीच्या शासननिर्णयात सुधारणा करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, दूरदृश्यप्रणालीव्दारे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सफाई कामगार नेते गोविंदभाई परमार, सुभाष मालपानी, शकील मुजावर यावेळी उपस्थित होते.

            सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या 2016 रोजीच्या शासननिर्णयानुसार फक्त वाल्मिकी मेहेतर व इतर अनुसूचितजाती मधील सफाई कर्मचारी यांना वारसा हक्क लागू होता. इतर सर्व जातीच्या सफाई कर्मचारी यांनाही न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यामध्ये बदल करून सर्वच जातीच्या सफाई कर्मचारी यांना वारसा हक्क लागू करणे, यासह सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत सफाई कामगारांच्या विविध संघटनांच्या मागण्या व महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोग यांनी केलेल्या शिफारशींचाही विचार करण्यात येईल.

            सर्व बाबींचा सर्वांगीण विचार करून लाड पागे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत आतापर्यंत विविध विभागांनी सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत काढलेले सर्व शासननिर्णय एकत्र करून सुधारीत शासननिर्णयाचा प्रस्ताव मंत्रीमंडळात सादर करण्यात येईल यामुळे राज्यातील सर्व महानगर पालिका व नगरपालिकामधील वारसा हक्काचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे श्री. मुंडे यांनी सांगितले.

धारावी येथे भीम थीम पार्कसह सभागृह बांधकामाच्या प्रस्तावांवर लवकरच कार्यवाही

            धारावी येथे संत रोहिदास सभागृह, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह तसेच धारावी येथे भीम थीम पार्क उभारणे हे तीन प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे सादर करण्यात यावेत, लवकरात लवकर या प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येईल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झालेल्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना सांगितले.                                                                

दिव्यांगांचे राज्य स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

            मागील काही वर्षांपासून राज्य स्तरावर दिव्यांग अधिकारी-कर्मचारी, उद्योजक, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार या वर्षी दिले जावेत यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. मागील पाच वर्षातील प्रलंबित पुरस्कार प्रदान करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

*****



 

 ❤️ *भारतीय स्त्रियांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण : फ्रीजमधील वस्तू लवकर वापरून संपवा*❤️


◆ फ्रीजमधील वस्तूंचा आणि कॅन्सरचा काय संबंध? 

पण आहे. 

◆ दुधापासुन दही  

◆ बटर पर्यंत 

◆ साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ,

◆ पोहे, 

◆ रवा, 

◆ लोणचे, 

◆ पापड, 

◆ मसाले, 

◆ सुकामेवा, 

◆ भाजीपाला 

जे असेल ते कोंबा फ्रीजमध्ये, 

ही महिलांची वृत्ती.

इतकंच नाही तर अर्धवट खाल्लेली फळ, 

◆ कालची शिल्लक राहिलेली 

■ डाळ, 

■ भाजी, 

■ चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली  

■ मसालावाटण, 

■ सर्वप्रकारची कडधान्ये, 

■ वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, 

■ उरलेली शितपेये,  

■ मिठाया, 

एक ना धड भाराभर वस्तू!

या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत, असा तुमचा गैरसमज आहे.  

पण कॅन्सरचे विषाणू येथेच तयार होत आहेत. 

अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही. 

पण १००० व्यक्तींचा अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील ५३८ जणांना कॅन्सरची लागण झाली असून, यात स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे

आणि आश्चर्य म्हणजे या ५३८ ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार चालू होता.

■ फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, लागते तेवढेच आणा. 

■ इडली, डोसा, 

■ वडा सांबरच पीठ आणा ताज ताज करण्यापुरतं.. 

आठ आठ दिवसाच नाही. 

■ चणा डाळीचं पीठ, 

■ जोंधळा पीठ, 

■ कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा.

फळभाज्या, पालेभाज्या दोन दिवसांत संपेल एवढीच आणा. 

दूध ४८ तासांत वापरून शिल्लक

राहिलेलं फेकून द्या ! ठेवू नका.

साभार : डॉ. मकरंद करमरकर

*टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई*

*एक विनंती हा मेसेज प्रत्येक घरात व घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोंचवा.*

*आपले ज्यावेळी कैंसरने अवेळी आपणाला सोडून जातात त्याचे दु:ख उमजा*🙏🙏🙏🙏

 24 फेब्रुवारीपासून मुंबईत कला प्रदर्शनाचे आयोजन

            मुंबई, दि. 23 :- कला संचालनालयामार्फत 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) २०२१-२२ आयोजित करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन मुंबईतील सर ज.जी.कला महाविद्यालय, येथे दि. २४ फेब्रुवारी ते ०२ मार्च, २०२२ या कालावधीत होणार आहे, असे प्र. कला संचालक राजीव मिश्रा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दि. २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता सर ज.जी. कला महाविद्यालय, मुंबई येथे होणार आहे. यावेळी कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे उपस्थित राहणार आहेत.

            ज्येष्ठ कलाकार वसंत सोनवणी यांचा व 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील पारितोषिक प्राप्त कलाकारांचा शासनाच्यावतीने सत्कार समारंभ होणार असल्याची माहिती श्री. मिश्रा यांनी दिली. 

            पारितोषिक प्राप्त कलाकार :गौरी अमर भिसे (उपयोजित कला-महिला आरोग्य समस्या), प्रसाद चंद्रकांत गवळी (उपयोजित कला- वन्यजीव संवर्धन), प्रितीश विजय ताजणे (उपयोजित कला-स्वच्छ भारत), राहुल मच्छिंद्र गोडसे (उपयोजित कला- वस्तुस्थिती), अंजली सुधीर पवार (उपयोजिक कला-दि टॅबू), आनंद शत्रुघ्न प्रताप (रेखा व रंगकला-अनागमी), संघपाल उत्तम म्हस्के, (रेखा व रंगकला-फॉर्मसी लॅब), मदन किसनराव पवार (रेखा व रंगकला-लॉकडाऊन सिटी-1), सुभाष बाभूळकर (रेखा व रंगकला-अनटायटल्ड-2), स्वाती विश्वनाथ साबळे (रेखा व रंगकला- अनटायटल्ड), हर्षवर्धन प्रकाश देवतळे (रेखा व रंगकला- प्रकाशाच्या विभिन्न दिशा), श्रीनिवास गोविंदराव म्हेत्रे (मुद्राचित्रण-स्टे अफ्लोड टूगेदर), वैभव मारुती मोरे (शिल्पकला- इटर्नल इमेज), नंदकुमार यशवंत कुलये, (शिल्पकला- इंटॅंजिबल इन टँजिबल), दिव्यांग विभागात सचिन भाऊसाहेब निंबाळकर (मुद्राचित्रण- कलयुग) या कलांवतांचा पारितोषिक देवून सत्कार करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

0000


 इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही केवळ मोहीम न राहता सवय बनणे आवश्यक

- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

  • मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षाचा शुभारंभ

 

            मुंबईदि. २३ : मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेला 'मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षहे क्रांतिकारक पाऊल असून या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी मदत होईलअसे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही केवळ मोहीम न राहता ती सवय बनणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

            'मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षा'चा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडेमुंबईचे उपमहापौर ॲड सुहास वाडकरस्थानिक आमदार मंगलप्रभात लोढाबेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकरबेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रामहानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.संजीवकुमारउपायुक्त (पर्यावरण) सुनील गोडसेडब्ल्यूआरआय इंडियाच्या सिटीज प्रोग्रामचे कार्यकारी संचालक माधव पैनागरी विकास उपक्रम प्रमुख  लुबायना रंगवालाइलेक्ट्रिक मोबिलिटीच्या वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक चैतन्या कानुरीसल्लागार कौस्तुभ गोसावीपर्यावरण सल्लागार तन्मय टकले आदी उपस्थित होते. वर्ल्‍ड रिसोर्सेस इंडिया (डब्ल्यूआरआय) संस्थेच्या सहकार्याने या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

            पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे म्हणालेवातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपाययोजना करून शाश्वत विकासाकडे राज्यशासनाची वाटचाल सुरू आहे. याच अनुषंगाने राज्याने आपले सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी सुरूवातीला सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले. आता शासकीय पातळीवर इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे वैयक्तिक पातळीवर या वाहनांचा वापर वाढावा यासाठी चार्जिंग स्थानके वाढविण्यासारख्या पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतुकीअंतर्गत मुंबईत बेस्टच्या ताफ्यात सध्या असलेल्या 386 बसेसमध्ये लवकरच वाढ होऊन 2027 पूर्वी 100 टक्के बसेस इलेक्ट्रिक असतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे. वातावरणीय बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा उल्लेख करून श्री.ठाकरे यांनी कार्बन न्यूट्रलच्या दिशेने जाताना संबंधित सर्वच विभागांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

            राज्यमंत्री श्री.बनसोडे म्हणालेवातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्याकरिता शक्य त्या सर्व उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून हवा आणि ध्वनीचे प्रदूषण थांबविणे तसेच इंधनाचा वापर कमी करणे यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे ही त्यापैकीच एक उपाययोजना आहे. मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्ट्रिक वाहन कक्षामार्फत प्रयत्न करण्यात येणार असून या उपक्रमाला शुभेच्छा. मुंबईसह राज्यात लवकरच मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहने धावू लागतील आणि वाहनांद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यात आपण आघाडीचे राज्य बनू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            उपमहापौर ॲड.वाडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई महानगरपालिकेमार्फत देशातील पहिला ईव्ही सेल स्थापन करण्यात आल्याचे सांगून केवळ बेस्टची वाहनेच नव्हे तर रस्त्यावर धावणारी सर्वच वाहने ईव्ही व्हावीत यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती दिली. तरआमदार मंगलप्रभात लोढा यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्णयांचे आणि वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

            बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक वाहनांची माहिती देऊन 2027 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात खरेदी करण्यात येणाऱ्या संपूर्ण बसेस इलेक्ट्रिक असतील असे नियोजन असल्याचे सांगितले.

            महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीवकुमार यांनी महानगरपालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. मुंबई इलेक्ट्रिक व्‍हेईकल कक्षाच्‍या माध्‍यमातून शासकीय अधिकारीई-मोबिलिटी तज्‍ज्ञइलेक्ट्रिक व्‍हेईकल उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी यांना एकत्र आणण्‍याचे कार्य केले जाणार आहे. विद्युत वाहनांच्‍या प्रचारासाठी निर्णय घेण्‍यासाठी धोरणकर्त्‍यांना सहाय्य करणेमुंबई महानगरात विद्युत वाहन चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणेविद्युत वाहनांच्‍या खरेदीसाठी सुलभरित्‍या कर्ज सुविधा उपलब्‍ध करुन देणेवाहनांमधील बॅटरींसाठी अद्ययावत तंत्रज्ञान अंमलात आणणेबेस्‍टच्‍या सहयोगाने इलेक्ट्रिक बसेसचा ताफा तयार करणेसार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांचे विद्युतीकरण करणेमुंबईत प्रायोगिक तत्‍त्‍वावर कामकाज करण्‍यासाठी इलेक्ट्रिक व्‍हेईकल क्षेत्रातील नवउद्योजकांना सहाय्य करणे अशी विविध कार्ये या कक्षाच्‍या माध्‍यमातून करण्‍यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००


 


Wednesday, 23 February 2022

 राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचे

संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ असे नामकरण

 

        मुंबई, दि. 23 : उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि नाट्य कलेचा प्रचार व प्रसार सर्व स्तरातून व्हावा या उद्देशाने आयोजीत होणाऱ्या राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचे संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ असे नामकरण करण्यात आले असल्यासंदर्भातील शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.

            नव कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावात्या कलागुणांमधुन व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा यासाठी शासनामार्फत गेली ६० वर्षे या राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मराठीहिंदीसंगीतसंस्कृतबालनाट्य व दिव्यांग बालनाट्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यातीलच राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धा ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे. या स्पर्धेस संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे नाव देण्यात आले आहे.

            त्यांनी संगीत शारदासंगीत सौभद्रसंगीत मृच्छकटीकसंगीत मानापमान अशी अनेक अजरामर नाटके सादर केली. संगीत नाटक या प्रकारातील एक अतुलनीय अभिनेते व गायक म्हणून त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धेचे संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा असे नामकरण करण्यात आले आहे. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

०००

 चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत तात्काळ कार्यवाही करावी

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबईदि. २३ : चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील १९ गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत नियमानुसार तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व चाकण इंडस्ट्रीज असोसिएशन (CIA) यांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या आढावा बैठकीत करारनाम्याचे प्रारूप अंतिम करण्यात आले.

            चाकण औद्योगिक वसाहत व पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील १९ गावांच्या पाणीपुरवठा योजनाबाबत आढावा बैठक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

            पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणालेया योजनेच्या औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येतो. तर पाणीपट्टी वसुलीचाकण इंडस्ट्रीज असोसिएशन (CIA) मार्फत करणेत येते. योजनेचे संकल्पित वर्ष हे २०२१ असून लाभार्थी गावे औद्योगिक क्षेत्रात येत असल्याने  गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच औद्योगिकरणामुळे पाण्याचा वापरही वाढत आहे. या योजनेचा संकल्पन कालावधी पूर्ण झाला असल्याने सुधारीत योजनेनुसार समाविष्ट गावांना सध्याचा लोकसंख्येचा दाखला व योजनेत समाविष्ट होण्यास इच्छुक असल्याबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ही माहिती संबंधित ग्रामपंचायतीकडून प्राप्त झाल्यानंतर सुधारीत योजनेबाबत पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

            या बैठकीस आमदार दिलीप मोहीते पाटीलअधिक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सुभाष भुजबळअधिक्षक अभियंता प्रशांत भामरेकार्यकारी अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते.

 श्री संत गजाजन महाराज सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शेगाव येथील अतिशय दुर्मिळ फोटो 

हा फोटो अकोला येथे महाराज येत असत तेंव्हा त्यांचे परमभक्त रामदासपेठ येथील पसारकर स्टुडिओ यांचे घरी काढला आहे ... अजूनही त्याची Negative त्यांनी जपून ठेवली आहे

 गजानन माऊलींचा ओरिजनल फोटो जमेल तेवढा शेयर करा..

 

 *"गण गण गणात बोते "*

Featured post

Lakshvedhi