Thursday, 24 February 2022

 पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभागी व्हा

·       मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

 

            मुंबईदि. 24 : भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत 15 मार्च 2022 आहे. राज्यातील सर्व वयोगटातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठीच्या या उपक्रमास हातभार लावावाअसे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

            सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहे. या स्पर्धेत ई-प्रमाणपत्रापासून रूपये 2 लाखापर्यंत आकर्षक अशी बक्षिसेही जाहीर केली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाचे बंधन नसल्याने भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी https://ecisveep.nic.in/contest/  या संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांच्या प्रवेशिका voter-contest@eci.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात. ई-मेल करतांना विषयात स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा आवर्जून उल्लेख करावाअसेही श्री.देशपांडे यांनी सांगितले.

            राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रश्नमंजुषाघोषवाक्यगीत गायनव्हिडिओ मेकिंग आणि भित्तिचित्र स्पर्धा अशा एकूण पाच प्रकारच्या स्पर्धा आहेत. 

            गीतव्हिडिओ मेकिंग आणि भित्तिचित्रे स्पर्धेकरिता श्रेणी ठरविण्यात आली असून, संस्थात्मक श्रेणीअंतर्गत शाळामहाविद्यालयेविद्यापीठे अशा राज्य किंवा केंद्र सरकारच्या नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल. व्यावयायिक श्रेणीअंतर्गत ज्या व्यक्तिचे उदरनिर्वाहाचे मुख्य स्त्रोत गायन/ व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र असा आहेअशी व्यक्ती व्यावसायिक श्रेणीत गणली जाईल. हौशी श्रेणीअंतर्गत गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र हा छंद म्हणून जोपासत असलेली व्यक्ती हौशी म्हणून गणण्यात येईल.

            गीत स्पर्धाव्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धेकरिता तीन श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले असून संस्थात्मकव्यावसायिक आणि हौशी या श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिकेही दिली जाणार आहे. संस्थात्मक श्रेणीमध्ये चार विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी तीन विशेष उल्लेखनीय पारितोषिके देण्यात येणार आहे.

            घोषवाक्य स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक रूपये 20 हजारद्वितीय पारितोषिक रूपये 10 हजारतृतीय पारितोषिक रूपये सात हजार पाचशे तसेच सहभागी होणाऱ्यापैकी 50 स्पर्धकांना प्रत्येकी दोन हजार रूपये उल्लेखीनय पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे.

            प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता भाग घेणाऱ्या विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येणार असून, तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्रे देण्यात येतीलअशी माहिती श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.

            यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेले लोकशाही समजून घेताना’ या पुस्तकाच्या किंडल आवृत्तीची माहिती श्री.देशपांडे यांनी दिली.

000

 पुणेनांदेडजालनागडचिरोली

जिल्हा रुग्णालयात होणार कॅथलॅब

 

             मुंबई दि. 24 : राज्यातील चार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब उभा करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुणेजालनानांदेड आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता कामाच्या अंदाजपत्रक आणि आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            पुणेगडचिरोलीजालना आणि नांदेड जिल्हा रुग्णालयामध्ये नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता ३२ कोटी २३ लाख वीस हजार रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या चारही रुग्णालयात स्थापत्यविषयक कामकाज करण्यासाठी सहा कोटी आणि यंत्रसामग्री आणि साहित्य खरेदीसाठी २६ कोटी २३ लाख आणि वीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

 एमटीडीसीच्या निवास व न्याहारी योजनेद्वारे पर्यटक सुविधांबरोबरच उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होईल

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. 24 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) निवासन्याहारी तसेच महाभ्रमण योजनेच्या माध्यमातून पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण भागातील उद्योजक यांना उद्योगसंधी आणि सर्वसामान्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईलअसा विश्वास पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

            कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. आता परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असल्याने एमटीडीसीमार्फत निवास व न्याहारी आणि महाभ्रमण योजनेबाबत माहिती देणारी दोन दिवसांची कार्यशाळा नुकतीच दिवेआगर येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्यमंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेत एमटीडीसीचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी योजनेच्या सादरीकरणाद्वारे पर्यटन संकल्पनांच्या व्यावसायिक संधीशासकीय योजनांचे स्वरूप यांची माहिती देऊन त्याबाबतचे प्रशिक्षण दिले.

           पर्यटन राज्यमंत्री कु.तटकरे म्हणाल्यारायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. एमटीडीसीच्या विविध योजनांचा उद्योजकांनी येथे नक्कीच लाभ घ्यावा. महामंडळाने या योजनेत अधिकृतरित्या नोंदणीसाठी काही अटी शर्ती आखल्या असून नोंदणी केल्यानंतर पर्यटकांना काय सुविधा द्याव्यापर्यटकांच्या निवासासाठी काय कार्यपद्धती असावी याचे मार्गदर्शन करण्यात येते. ग्रामीण भागातील पर्यटनाच्या व्यावसायिक संधीबाबत तरुणवर्ग जागरूक होत आहे ही एक सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी निवास व न्याहारी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या व्यावसायिकांना राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

            एमटीडीसीच्या निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण योजनांना आजवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पर्यटन क्षेत्रात या उपक्रमांचे महत्व सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांना तसेच सामान्य जनतेला उत्पन्नाचा स्रोत म्हणून निवास व न्याहारी योजनेअंतर्गत नोंदणी करून आपली जागाकक्ष किंवा निवास व्यवस्था पर्यटकांसाठी विविध सांस्कृतिक अनुभवांसह परवडणाऱ्या दरात प्रदान करता येते. अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवली जावी या उद्देशाने या कार्यशाळेत सहभागी झालेल्या इच्छुकांना या योजनांचे स्वरूप व त्याबाबतची माहिती दिली गेली.

०००००


 राज्यात लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम

•       कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

         मुंबई, दि. 22 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ०८ ऑक्टोबर आणि २६ ऑक्टोबर २०२१ तसेच ८ जानेवारी, दि.०९ जानेवारी दि.३१ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित केलेले आदेश राज्यात अद्याप लागू आहेत. त्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम आहेत. नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
         कोविड विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी १५ जुलै, .१० ऑगस्ट आणि .११ ऑगस्ट २०२१ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्बंधाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. मात्र  तरीही  ०८ ऑक्टोबर, २६ ऑक्टोबर २०२१, दि.८ जानेवारी, दि.०९ जानेवारी दि. ३१ जानेवारी २०२२ या तारखांना निर्गमित केलेले आदेश अद्याप लागू आहेत. तरी नागरिकांनी व विविध सेवा देणाऱ्या संस्थांनी लसीकरण झाले असले तरी व झाले नसले तरी सार्वजनिक प्रवास करताना मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, हात वारंवार धुणे अशा कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसुल करण्याचा

महामंडळाचा कोणताही निर्णय नाही एसटी महामंडळाची स्पष्टोक्ती

        मुंबई, दि. 22 : एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसुल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.शेखर चन्ने यांनी स्पष्टपणे सांगितले.
        एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या संपामुळे महामंडळाला कोट्यावधी रूपयांचे नुकसान सोसावे लागते आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कामगारांच्या वेतनात कपात करून वसूल करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचारधीन आहे, असे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. वास्तविक, अशा प्रकरणी संपामुळे होणारी महसुली नुकसान भरपाई कामावर रुजू झालेल्या कामगारांच्या वेतनातून वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही किंवा तसा प्रस्तावही विचारधीन नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.शेखर चन्ने यांनी दिली आहे. तसेच अशा तथ्यहीन वृत्तांवर कामगारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
        दरम्यान, संपामुळे सर्वसामान्य प्रवासी, ज्येष्ठ नागरिकांचे तसेच शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कामगारांनी आपल्या कर्तव्यावर हजर व्हावे, असे आवाहनही श्री. चन्ने यांनी केले आहे.
00000


 

Featured post

Lakshvedhi