Thursday, 17 February 2022

Aurved

: ###गोक्षुरादि ##गुग्गुळ.....

.. किडनी.हा फार महत्वाचाशरिरातील अवयव आहे.. विघातक पदार्थ, विषारी घटक काढण्याचं काम किडनी अव्याहतपणे करत असते. पण तरीही कधी तरी तिच्या वर लोड येतं. आणि मग त्रास सुरू होतो

...क्रियेटिन लेव्हल वाढते आणि बरेच वेळा रूग्णांना .. डायलिसिस वर ठेवले जाते..

... अशा वेळी. . आपल्या.. आयुर्वेदात.. फार अनमोल असे औषध आहे जे या त्रासातून मुक्त करते.

 आणि किडनी मजबूत करते. ते आहे..*गोक्षुरादि गुग्गुळ*. गोखरू व गुग्गुळ यांच्या संयोगाने तयार केलं जातं.. आपण बघणार आहोत याचे बहुमोल फायदे...👇

..मुत्रखडा...हा क्रिस्टल स्वरूपात असतो. जेव्हा हे मोठ्या प्रमाणात वाढतात. तेव्हा असह्य वेदनां होतात. व शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. अशा वेळी. गोक्षुरादि गुग्गुळ. वरुणादि काढा एकत्र दिल्यास काही दिवसांतच मूतखडे तुटून बाहेर पडतात.

युरिनमध्ये जळजळ, अडथळा येणे, यासाठी. गोक्षुरादि गुग्गुळ द्यावे. याने युरिन साफ होते. व वेदना दूर होतात. युरिक एसिड वाढल्याने सांधेदुखी सुरू होते, एडि, गुडघे, दुखतात. हि वटि जेवणानंतर दोन घ्यावे. आराम पडतो.पुरूषांना नेहमीच.. प्रोस्टेट ग्रंथी चा त्रास होतो.सूज व वेदना होतात. अशा वेळी

...गोक्षुरादी गुग्गुळ वटि दोन वेळा जेवणानंतर घ्या. याने आराम मिळतो.

....हि वटी फक्त. मूत्रविकारा वर काम करत नाही तर, शरिरात वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करते,.

फिस्टुला वर हे उत्तम कार्य करते.स्रियांना मासिक पाळीत होणारे त्रास देखील कमी होतात

......श्वेतप्रदर, आणि संसर्ग याचा त्रास झाल्यास . गोक्षुरादि गुग्गुळ वटि जेवणानंतर दोन गोळ्या द्या.

.. हळूहळू फरक पडतो. ज्यांना संतति होण्यासाठी अडचणी येतात अशावेळी,ओवुलेशन वाढण्यासाठी

 व पुरुषांमधील शुक्राणू वाढण्यासाठी.. रोज.गोक्षुरादि गुग्गुळ वटि जेवणानंतर घ्या.

... फायदा होतो..

              ###निरामय ###आयुर्वेद......

 आता आपण बघू या याचे घटक...👇

   शुद्ध गुग्गुळ..२८० ग्राम..गोक्षुर..११२० ग्राम.. हिरडे..१००ग्राम..बेहडा..१०० ग्राम.,

    आवळा..१०० ग्राम., .. सुंठ..१०० ग्राम..,. पिंपळि..१०० ग्राम., काळे मिरे..१०० ग्राम.   नागरमोथा..१०० ग्राम..

  *  यातिल. महत्वाचे...गोक्षुर.. हे शरिराची सूज व वेदना कमी करते, स्त्रियांच्या. गर्भाशयावर उत्तम कार्य करते. पुरुषांचे शुक्राणू वाढवते,

* आवळा हा.पचन चांगले करवतो भूक लागते, बद्धकोष्ठता मंदाग्नी अरुचि होत नाही

* हिरडे हे जखम झाली तर सूज उतरते, पाचक आहे, पोट साफ होते,

*पिंपळी हि जठरावर चांगले कार्य करते, स्राव तयार करते, व त्यामुळे पचन नीट होते.

*बेहडा. हा इम्यून सिस्टीम मजबूत करतो,. सूज कमी करतो, शरिरातील संक्रमण दूर करतो.

*सुंठ. हि भूक वाढवते व नवीन रक्त तयार करते, जंतूनाशक आहे, पाचक रस उत्तेजित करते

 *काळे मिरे.. हे जंतू नाशक आहे,. सूज उतरते, पूरक कार्य करते..

*गुग्गुळ. हे अनेक रोगांवर उपयोगी आहे, हे पूरक म्हणून कार्य करते..

*तेव्हा अशा प्रकारे हे मौल्यवान आयुर्वेद औषध गरजेनुसार घेतल्यास बरेच आजार बरे होतात...

...हि माहिती मी.. आयुर्वेद अभ्यासक..त्या अनुषंगाने आपणास दिलि आहे...

 आयुर्वेद अभ्यासक.... सुनिता सहस्रबुद्धे.... निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार..

 *भोजना संबंधी 12 महिन्याचे नियम..*.

  1.चैत्र (मार्च-एप्रिल )- 

या काळात गुळाचे सेवन करु नये. सकाळी रिकाम्यापोटी कडुलिंबाची 4-5 पाने, कडुलिंबाच्या झाडाची आंतर साल यांचा एक कप काढ़ा घेतल्याने बरेच आजार ठीक होतात.

2.वैशाख (एप्रिल -मे )- 

या महिन्यात तेलाचा आहारात कमीतकमी उपयोग केला पाहिजे. कारण या काळात शरीरात रोग होण्याची संभावना जास्त असते. या महिन्यात बेलाच्या पानांचे सेवन अतिशय लाभदायक असते.

3.ज्येष्ठ (मे -जून)- 

या महिन्यात गर्मी जास्त प्रमाणात असल्या मुळे दुपारी एखादा तास झोपले पाहिजे. या काळात शिळं अन्न बिलकुल खाऊ नये. शिळया अन्नामुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

4.आषाढ़ (जून-जुलै )-

या महिन्यात सर्वानी आपल्या वयानुसार शक्य होईल तेवढा व्यायाम आणि खेळ खेळाला पाहिजे.

या काळात पाचनशक्ती कमी असते. हलका आहार घ्यावा. बेलाचे सेवन करू नये.

5.श्रावण (जुलै -आँगस्ट )-

या काळात हिरव्या पालेभाज्या आणि दुध आरोग्य वर्धक आहे. या महिन्यात हिरड्या चे सेवन जरुर करावे.

6.भाद्रपद (आँगस्ट -सप्टेंबर )

हा पावसाळ्यामधील शेवटचा काळ, आजुबाजूला डबकी साचलेली असतात. संसर्गजन्य रोग असतात. दवाखान्यात गर्दी असते. रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधे घ्यावीत.

7.आश्विन (सप्टेंबर -ऑक्टोबर )- 

या काळात गुळाचे सेवन आरोग्यवर्धक आहे.

या महिन्यात कारले खावू नये. 

8.कार्तिक (ऑक्टोबर -नोव्हेंबर )- 

या महिन्यात ताक पिणे हानिकारक आहे. मुळा लाभदायक आहे.

9.मार्गशिष :( नोव्हेंबर -डिसेंबर )- 

हा आरोग्य वर्धक महीना आहे. व्यायाम करणे फायदेशिर आहे. या काळात जास्त थंडी असते. या काळात जास्त गरम, जास्त थंड पदार्थाचे सेवन करू नये.

10.पौष (डिसेंबर -जानेवारी )- 

या महिन्यात दुध पिणे आरोग्य वर्धक आहे.पण या काळात धने - धने कूट भाजीत वापरू नये.

11.माघ (जानेवारी -फेब्रुवारी )- 

या काळात शुद्ध तुपाचे सेवन आरोग्य वर्धक आहे.

या महिन्यात खड़ी साखर खाऊ नये 

12.फाल्गुन (फेब्रुवारी -मार्च)- 

या महिन्यात सकाळी गार पाण्याने स्नान करणे आरोग्य वर्धक असते.

या काळात चने खाणे हानिकारक असते.

सर्वांनी चांगल्या आरोग्या साठी सर्वच महिन्यात रोज सकाळी व्यायाम केला पाहिजे. तसेच आराम सुद्धा आवश्यक आहे. रात्री दही सेवन करू नये.

आयुर्वेद ही काळाची गरज आहे.




 

 धर्मादाय योजनेंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी

येणाऱ्या अडचणीबाबत आढावा बैठक

            मुंबई, दि. 16 : खाजगी रुग्णालयांमध्ये धर्मादाय योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय मदत-सुविधा मिळतांना होणारा विलंब तसेच प्रत्यक्ष रुग्णालय आस्थापनांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ याच्या अध्यक्षतेखाली आणि विधि व न्याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती आढावा बैठक झाली.

             यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार देवेंद्र भुयार, सह धर्मादाय आयुक्त आर.यू. मालवणकर, सह धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई नि.सु. पवार, धर्मादाय उपायुक्त पुणे श्री. राहुल मामू, धर्मादाय सह आयुक्त ठाणे श्री इंगोले, संबंधित रुग्णालयांचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय संचालक व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. खाजगी रुग्णालयांशीही प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.

            रुग्णालयांमध्ये योजनेच्या तरतूदीनुसार कागदपत्र सादर करुनही दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधीचा उपचारास विलंब होणे, आपत्कालीन रुग्णास तात्काळ वैद्यकीय मदत न मिळणे, रुग्ण तथा नातेवाईकांची कागदपत्रे व पुराव्यांबाबत उलट तपासणी करणे, या योजनेंतर्गत अर्ज प्राप्ती व उपचाराधीन रुग्णांची माहिती उपलब्ध करणे तसेच रुग्णालयांच्या निर्धन रुग्ण निधी 2 टक्क्यांहून 5 टक्के एवढा वाढविणे अशा विविध विषयांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

            विधी व न्याय राज्यमंत्री कु.तटकरे म्हणाल्या, कोविड परिस्थितीमध्ये अहोरात्र सेवा देणाऱ्या वैद्यकीय यंत्रणांबाबत सर्व स्तरांत आदराची भावना आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्य सेवेसाठी लोकप्रतिनिधींना आलेल्या अनुभवाप्रमाणे प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या रुग्णालयांना येणाऱ्या अडचणींचाही विचार घेणे महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीमध्ये विविध आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रमाणात दिसते आहे. रुग्णांना वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे सर्वांचे सामाजिक कर्तव्य आहे. धर्मादाय अंतर्गत सुविधा देतांना रुग्णालयांना येणाऱ्या समस्यांबाबतही विचार करण्यात यावा, असे राज्यमंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

            धर्मादाय अंतर्गत रुग्णांना योग्य वैद्यकीय सहकार्य करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालय व खाजगी रुग्णालये यांच्या समन्वयाने ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे’ या समितीच्या पुढील बैठकीमध्ये याबाबत सविस्तर चर्चा करुन यावर उपाययोजना करण्यात येतील, असे राज्यमंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

             बैठकीत उपस्थित रुग्णालयाच्या प्रतिनीधींनी या योजनेंतर्गत सुविधा देण्यात प्रत्यक्ष भेडसाविणाऱ्या समस्यांविषयी आपली मते मांडली. ज्यामध्ये रुग्णांचे उत्पन व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास होणारा विलंब, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची विशेष मागण्या रोबोटीक सर्जरी, त्रयस्थांमार्फत होणारी फसवणूक, खोटे पुरावे सादर करणे आदी विषयावरही यावेळी सखोल चर्चा झाली.

Govt Recruitment

 भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांना आवाहन

            मुंबई, दि. 16 : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा विभागाच्या https://landrecordsrecruitment 2021.in व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दि. 9 डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

            त्यानुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२१ अखेर ऑनलाईन स्वरुपात स्विकारण्यात आलेल्या एकूण ७६३७९ अर्जाचा डाटा विभागाकडे प्राप्त झालेला आहे. या अर्जाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे आढळले, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पद्धतीने अपलोड केल्याचे दिसून आले.

            या कारणांस्तव विभागाने ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीकरीता छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणेचे ठरविले आहे. त्याबाबतच्या सविस्तर सूचना विभागाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

            छाननी अर्ज हे केवळ दि. 9 डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांनाच भरता येतील. या उमेदवारांनी आपले विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलोड करावयाचे आहे. तसेच जे उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणार नाहीत अशा उमेदवारांना परिक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येवून छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे अशी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

0000



 

Wednesday, 16 February 2022

 बेलापूर येथे बांधण्यात आलेल्या प्रवासी जेट्टीचे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 17 रोजी उद्घाटन

· मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे ध्वजांकन

            मुंबई, दि. 16 : रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करुन प्रवासी जलवाहतूक सेवा सुरु करण्यासाठी बेलापूर येथे बांधण्यात आलेल्या प्रवासी जेट्टीचे उद्या, दि. १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याच कार्यक्रमात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे केंद्रीयमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते ध्वजांकन होणार आहे, अशी माहिती बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

            बेलापूर जेट्टी येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, बंदरे विकास मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचेसह खासदार राजन विचारे आणि विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, बाळाराम पाटील, रमेश पाटील आणि श्रीमती मंदा म्हात्रे, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुंबईहून बेलापूर, एलिफंटा आणि जेएनपीटीचा प्रवास सुखकर होणार - बंदरे विकास मंत्री अस्लम शेख

            मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतुकीचा पुढील टप्पा म्हणून नवी मुंबईपासून मुंबई, एलिफंटा, जेएनपीटी अशा विविध जलमार्गांवर प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी बेलापूर, नवी मुंबई येथे सुमारे ८.३७ कोटी खर्च करुन प्रवासी जेट्टीचे बांधकाम करण्यात आले आहे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्येकी ५० टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्याचेही बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. वॉटर टॅक्सी सेवेमुळे निर्माणाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुद्धा जोडणी मिळणार आहे तर नवी मुंबईमधून थेट एलिफंटा येथे जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार असल्याने पर्यटनालादेखील चालना मिळणार आहे, असेही श्री. शेख यांनी सांगितले.

            बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे. बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त ३० मिनिटे तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटीचे भाडे प्रतिप्रवासी ८०० ते १२०० रुपये असून कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी २९० रुपये इतके भाडे ठेवण्यात आले आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावर सुद्धा प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहे.

            महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बंदरे व खाड्यांमधून दरवर्षी सुमारे दीड कोटी प्रवासी जलवाहतूकीद्वारे प्रवास करतात. जलवाहतूकीचा पर्याय हा किफायतशीर, इंधन व वेळेची बचत करणारा आणि पर्यावरणस्नेही आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या प्रचंड वाहतूक असलेल्या शहरांसाठी तसेच हळूहळू अलिबागपर्यंत विस्तारत जाणाऱ्या लोकवस्तीसाठी रस्ते व रेल्वे वाहतूकीला पर्याय म्हणून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर जलवाहतूक सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

००००



 कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग

कौशल्य विभागाच्या नावात बदल

            कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे नामकरण आता “कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग” असे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            महाराष्ट्रात स्टार्टअप्सच्या माध्यमातून नवीन संकल्पना राबविण्यात येत असून नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतुने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. नाविन्यता ही संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या दृष्टीकोनातून हे सुधारित नामकरण करण्यात आले आहे.

 पोहरा येथे शेळी समूह योजना राबविणार

            अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

             या योजनेसाठी 7.81 कोटी इतका निधी देण्यात येईल. पोहरा प्रमाणेच राज्यातील उर्वरित 5 महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी समूह प्रकल्प राबविण्यास देखील मान्यता देण्यात आली. राज्यातील शेळी पालनाचा व्यवसाय हा भूमीहीन ग्रामीण तसेच अल्पभूधारकांसाठी उपजीविकेचे महत्त्वपूर्ण साधन आहे. देशातील शेळ्यांच्या संख्येत महाराष्ट्र 6 व्या क्रमांकावर असून राज्यामध्ये उत्पादित होणाऱ्या दुधापैकी 2 टक्के हिस्सा शेळ्यांच्या दुधाचा आहे. त्याचप्रमाणे एकूण मास उत्पादनाच्या 12.12 टक्के एवढे उत्पादन शेळीच्या मासांचे होते.

            राज्यामध्ये अनेक भागात संसर्गजन्य रोगांमुळे शेळ्या रोगग्रस्त होऊन मरण पावतात. गावातील स्थानिक जातीचे बोकड किंवा उपलब्ध असणारा कोणताही बोकड पैदाशीकरिता वापरला जातो. मासांच्या वाढत्या मागणीमुळे कमी वयातील शेळ्यांची कत्तल होते व जातीवंत पशुधन उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेळी मेंढी पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्यामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. राज्यातील 106 लक्ष शेळ्यांपैकी अमरावती विभागात 13.33 लक्ष तर नागपूर विभागात 13.24 लक्ष एवढी शेळ्यांची संख्या आहे. पोहरा येथे अविकसित भाग असल्यामुळे या ठिकाणी विकास कामे करण्यास मोठ्या प्रमाणावर संधी आहे तसेच स्वयंरोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर वाव आहे. या ठिकाणापासून रस्ते, रेल्वे तसेच हवाई सुविधा जवळ आहे.

            या योजनेअंतर्गत शेळी पालकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येऊन उत्पादक कंपन्याही स्थापन करण्यात येतील. शेळी पालकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात येतील. याशिवाय शेळ्यांचे दूध व दुग्धजन्य प्रक्रीया केंद्र स्थापन करणे, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र व निवासस्थान, सामुहिक सुविधा केंद्र स्थापन करण्यात येतील.

Featured post

Lakshvedhi