Monday, 14 February 2022


 

 👇👇 *वाचा माइंड फ्रेश होईल* 👇👇

📍कधीही शाळेत न गेलेले छत्रपति शिवाजी महाराज 

स्वराज निर्माण करतात

📍जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.

बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात.

📍आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक'

नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो

📍पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे

साम्राज्य उभे करतात...

📍कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून

बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम'

राष्ट्रपती पदापर्यंत जातात 

📍रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील

राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात.

📍सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला'

जगाला प्रेम शिकवतात.

📍कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे

'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात...

*"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग*

*निर्माण करतात..."* 

🍒

माणूस किती किंमतीचे कपडे

वापरतो यावरून त्याची किंमत

होत नसते ,

🍒

परंतु , तो इतरांची किती किंमत

करतो यावरून त्याची किंमत

ठरत असते .

🍒

🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो 🐞किड्या 🐜मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच किडेमुंग्या पक्षाला खातात..

तुम्ही खूप शक्तिशाली असाल 💪पण वेळ ⏰तुमच्या पेक्षा शक्तिशाली आहे... 

वेळ आणि स्तिथी केव्हाही बदलू शकते. त्यामुळे कोणाचा अपमान ही करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका... 

🌻 *कोणी कितीही महान असला तरी निसर्ग कोणालाही त्याच्यापेक्षा महान बनायला देत नाही... जसे...* 

🦅कंठ दिला कोकिळेला पण रूप काढून घेतले .. 

🦚रूप दिले मोराला पण इच्छा काढून घेतल्या... 

👨‍👩‍👦‍👦इच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला. 

👳‍♀️संतोष दिला संतांना पण संसार काढून घेतला. 

म्हणून माणसाने अहंकार करू नये. 💰ना पैशाचा, ना संपत्तीचा, ना सत्तेचा कारण जे आज एकाकडे आहे ते उद्या दुसऱ्याकडे असणार. 

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

कित्येकांना या मातीने घडवले⛰️ आणि मातीतच घातले.लग्नाच्या वरातीत लोकं पुढेपुढे नाचतात💃 पण अंतयात्रेत पाठीमागून चालतात. याचाच अर्थ सुखांमध्ये☺️ सर्वजण पुढेपुढे करतात, पण दुःखात मागे हटतात. 😭

🍀🍀 *ज्या माणसांना पैशाची किंमत जास्त असते, त्यांना माणसांची किंमत नसते. हे देखील कटू सत्य आहे.* 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लोकं त्यांच्या गरजेनुसार पुढेमागे होत असतात. म्हणून ती पुढे असली काय आणि मागे असली काय आपलें आयुष्य आपल्या हिमतीने आणि निश्चयाने जगायचे..... 

🍀🍀🍀गरज पडली की सुकलेल्या ओठातून देखील गोड शब्द बाहेर पडतात. पण एकदा का तहान भागली की पाण्याची चव आणि माणसांची नियत दोन्ही बदलतात.... 

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

पैसा आला म्हणून कधीही उन्मत्त होऊ नये. शंभर मुलांचा बाप असणाऱ्या धृतराष्ट्राला मृत्यूसमयी कोणी वाली नव्हता, परंतु ज्या तुकोबारायांच्या घरात बसायला पोतेसुद्धा नव्हते, त्यांना न्यायला जगाचा बाप आला..... 

🙏☘️🌸🍀🙏

 *परमेश्वर फक्त पूजा करताना आपल्याला बघत नसतो , तर चांगले-वाईट कर्म करताना देखील तो आपल्याला बघत असतो. म्हणून कर्म ही स्वच्छ ठेवा आणि वाणी ही स्वच्छ ठेवा.* 

🙏☘️☘️☘️☘️☘️🙏

Jai hind

 


 



 

 एक स्त्री लग्नानंतर तिचं घरदार, नातेवाईक, ओळख सोडून अनोळखी घरात येते. *ही खरंच फार मोठी बाब आहे....



पण अशा अनोळखी स्त्रीच्या ताब्यात स्वतःचं घरदार, संपत्ती आणि स्वातंत्र्य देणाऱ्या *पुरुषांचा महानपणा कोणालाचं दिसत नाही याचचं आश्चर्य वाटतं !!!* 😂😂😂

Sunday, 13 February 2022

 एलोरा लेण्याजवळील किर्तिस्तंभ हटवला जाणार नाही : केंद्रीय संस्कृती मंत्री जी.किशन रेड्डी* 

-----------------------------------------
*जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांना स्पष्ट आश्वासन.*
-----------------------------------------
औरंगाबाद जिल्ह्यातील एलोरा लेण्या जवळील जैन किर्तिस्तंभ हटवण्यात येणार नाही असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.

एलोरा लेण्याजवळील कीर्ती स्तंभ हटवण्याचे पत्र पुरातत्त्व विभागातर्फे जैन समाजाला पाठवण्यात आल्याचे समजल्यानंतर देशभरातील जैन समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. यासंबंधी 'अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे' राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री ना. जी. किशन रेड्डी यांची हैदराबाद येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर जी.किशन रेड्डी यांनी जैन समाजाच्या भावना दुखावतील असा कोणताही निर्णय पुरातत्व विभागातर्फे केला जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही देऊन यासंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

जैन समाजाचे राष्ट्र निर्माण कार्यातील असलेले योगदान, भगवान महावीर यांचा विश्व शांतीचा संदेश देशातील सर्वांसाठीच सन्माननीय आहेत, त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे कार्य होणार नाही. अशी ग्वाही दिली. या संबंधी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी एक विडिओ संदेश ही यावेळी प्रसारीत केला.

जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी कीर्ती स्तंभाची उभारणी व त्याच्या देखभाली संबंधातील माहिती देऊन याविषयीच्या समाजाच्या भावना व्यक्त केल्या.

याचबरोबर जैन समाजाच्या देशभरातील विविध ठिकाणी असलेल्या प्राचीन तीर्थक्षेत्र संबंधी पुरातत्त्व विभागाकडून येत असलेल्या अडचणी, अनेक प्राचीन मंदिरांचा प्रलंबित असलेला जीर्णोद्धार, विविध ठिकाणी उत्खननात आढळणार्‍या जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा व मंदिरांचे अवशेष याचे हस्तांतरण यासंबंधी येणाऱ्या अडचणी, या बाबीवर संस्कृती मंत्र्यांशी ललित गांधी यांनी सविस्तर चर्चा केली. प्राचीन मंदिरांचे जीर्णोद्धार, प्राचीन तीर्थक्षेत्र यांच्या जीर्णोद्धार संबंधित विषय, सम्मेद शिखरजी, गिरणार, शत्रुंजय आदी तीर्थांचे पावित्र्य जपण्याच्या विविध मागण्या, यासंबंधी पुरातत्त्व विभाग, संस्कृती खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांची जैन समाजाच्या शिष्टमंडळासमवेत केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच संयुक्त बैठक आयोजित केली जाईल असे स्पष्ट आश्वासनही श्री रेड्डी यांनी दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, महासंघाच्या आंध्र प्रदेश विभागाचे अध्यक्ष मुकेश चौहान, तेलंगणा विभागाचे अध्यक्ष विमल नहार, दिगंबर समाजाचे पदाधिकारी अशोक पहाडे, मिथुन पोरवाल आदी मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेतला.
या वेळी केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांचा विशेष सत्कार केला.

Featured post

Lakshvedhi