Sunday, 13 February 2022

 *मी असेपर्यत येत रहा*

अगदी काळजात धस्स करणार वाक्य, मरणासन्न बाबा. ऊभ्या आयुष्यात कधीही न झुकलेला, न थकलेला, हारजीत, उन पाऊस सगळ धिरानं पचवलेला माझा बाप. आज बेडवरुन ऊठु शकत नाही. सुन मुलगा करतात सगळं पण त्याला नाईलाजाची किनार आहे की कर्तव्य की प्रेम माहीत नाही. आणि सासरी गेलेल्या लेकी, त्यांच्या जगात व्यस्त आहेत. नाही म्हणायला पाच सहा दिवसांतुन व्हिडीओकॉल करतात. आणि बाबा म्हणतात, *"मी असेपर्यत येत रहा".* डोळ्यातुन गंगा यमुना वहातात. 

अगदी जन्म झाल्यापासुन, दवाखान्यातुन घरी आणणारा, रात्री बेरात्री जागुन खांद्यावर जोजवणारा बाप. शाळेच्या पहिल्या दिवशी अलगद हात सोडणारा बाप. सायकल शिकवताना "हो जमतय. जमतय , बँलेन्स कर हँन्डल, समोर बघ" म्हणुन अचानक हात सोडुन आत्मविश्वास दुणावणारा बाबा. कॉलेजात पहिल्या दिवशी काळजीत दिसणारा, परिक्षेच्या रात्री डोक्यावरुन हात फिरवणारा बाप. स्वतःसाठी फाटके बुट, बटनाचा फोन वापरुन कॉलेजची भरमसाठ फी भरणारा बाबा. बाहेरची घोंघावणारी वादळे थोपवुन धरतोय दरवाजातच बाजीप्रभु सारखा. आपल्याला नेहमी हसताना दिसतो. जखमा, वार, अपमान, कढ, हुंदके , कुठल्यातरी फाटक्या शेल्यात गुंडाळतो. नोकरी , छोकरी आपल्याला मिळते पण आभाळाएवढं कौतुक त्याला असत. आपल्या पहिल्या पगारातुन आपण घेतलेला शर्ट, घड्याळ सा-या जगाला भाबडेपणाने दाखवत बोलतच राहतो. आई रागावली की बाबा बुलेटप्रुफ जँकेट सारखा बचाव करायला उभा असतो. "करु दे ग तिला तिच्या मनासारखं" अस म्हणतो खर पण आतुन साफ घाबरलेला, काळजीत असतो. पण त्यात लेकीची काळजीच असते . 

मुलीच / मुलाचं लग्न ठरल की, तो मनाची बांधाबांध करायला सुरुवात करतो. जणु तिस-या अंकाची नांदी . " काही चुकल तर पोरीला संभाळुन घ्या " अस हात जोडुन सांगणारा बाप सगळ्यांनाच माहीती आहे. पण त्याच वेळी मुलाच्या लग्नात सुनेच्या आई वडिलांना , "काळजी करु नका, आता ती माझी मुलगी आहे".अस भरभरुन आश्वासन देणारा आणि तंतोतंत पाळणारा बाप असतो. तो सुनेत आपल्या चिमण्यापरीला शोधत असतो. म्हणुनच, "बाबांच काही नाही गं, उलट खुप आधार वाटतो त्यांचा" अस गॉसिपींग करणा-या सुना घरोघरी दिसतात. पण सुन आणि सास-यात ठिणगी स्पर्धा, अस्तित्व आणि स्थान ह्यासाठीचा संघर्ष कधीच नसतो. असो.

 आणि समजा पत्नी अगोदर गेली तर आतुन तुटलेला पण बाहेरुन अजुन अँडजेस्टेबल झालेला बाप बघायला मिळतो. मग नातवांना पाढे, कविता, श्लोक , गीता शिकवण्यात रमतो. आणि त्यांच्याकडुन स्मार्ट फोनची फीचर्स शिकत असतो. कधी तर सुनेला प्रेमाने स्वतःला राखी बांधायला सांगतो. मागे सुटलेले, विस्कटलेले नाते सोडुन नव्याने नाती बांधतो. कधी कधी सकाळी आठ साडेआठलाच पिक अवर ला फोन करतो, "काही नाही बर आहे ना सगळं , सहजच फोन केला गं" म्हणुन खुप काही सांगायच राहु देतो. मुलगी असो की मुलगा, सुन असो की जावई , मनात आणि मानात कुठेही वर खाली, पार्शलिटी न करणारा बाबा. 

आजार बळावला, अंथरुण धरले तरी बाबांच विठुरायाचे भजन, रामरक्षा, अथर्वशीर्ष जप सुरुच असत. घर कस सुरक्षित आधाराखाली आहे वाटत रहात. त्यांच केवळ असण खुप बळ देणारं असत. आणि माहेरचा हक्काचा शेवटचा दुवा असतो बाप. बाप गेला की माहेर संपल्याची काळीज चिरणारी यातना होते. भाऊ, वहिनी, भाच्या, भाचे, सगळ मनापासुन करतात नणंदेच माहेरपण. ती ही दुःख विसरुन सगळ्यांवर बाबाचं पांघरुण घालते. पण ती सल, ती उणीव, ते खालीपण कुठेतरी आत जाणवत रहाते. 

मित्र मैत्रिणिंनो, तुम्हालाही तुमचा बाबा म्हणाला की *" मी असेपर्यत येत रहा "* तर अगदी सर्व काम, लायबिलीटीज, कमिटमेंट, मिटींग्ज, सेमिनार, सेशन्स, टुर आणि अजुन काय जे असेल ते बाजुला टाकुन बाबाला भेटा. 

सुरकुतलेल्या हातांवरुन, परतीच्या चाहुलीने सैरभैर झालेल्या, एकटेपणाने कोलमडलेल्या बाबाला धीर द्या, सांगा, *"हो बाबा, मी तुम्ही असेपर्यत आणि नसल्यावरही सगळं संभाळेल",* तुम्हाला त्यांच्या डोळ्यात भरुन पावल्याचं समाधान दिसेल. 

*मी असेपर्यत येत रहा,*

*काळजात धस्स करणार वाक्य.*

*.*


😊😊💐💐


 

Suprabhat


 

Ghoda

 


Saturday, 12 February 2022

 *60+ ज्येष्ठ नागरिक सहसा पुढील गोष्टींचा अनुभव घेतात:*

 1. घशात अन्न अडकणे

 2. मान दुखणे

 3. पायात गोळे येणे

 4. पायला मुंग्या येणे.

 विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी खाली दिलेले सोपे उपाय डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी मदतीचे ठरू शकतात.

समस्या व‌ उपाय

 *१. घशात अन्न‌ अडकणे*

 आपल्याला फक्त "हात वर करणे" आवश्यक आहे.

 हात डोक्यापेक्षा वर सरळ ताणल्यास , आपल्या घश्यात अडकलेले अन्न आपसुक खाली जाण्यास मदत होईल.

 *२. मान दुखी*

 कधीकधी आपण मानेच्या दुखण्यासह सकाळी उठतो. याला चुकीची उशी वापरणे हे एक कारण असू शकते. अशा परिस्थितीत आपण फक्त आपले पाय उचलून जर बोट ओढून आपले पाय एका घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरूद्ध‌ दिशेने हलवले तर आराम मिळू शकेल

 *३. पायात गोळे येणे*

 जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळे अथवा‌ पेटके आले असतील तर आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात पेटके आले असतील तर आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरे वाटेल.

 *४. पायाला मुंग्या येणे*

  जेव्हा डावा पायास मुंग्या येत असतील तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला उजवा हात गोलाकार फिरवा, जेव्हा उजवा पाय मुंग्या येत असेल, तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला डावा हात गोलाकार फिरवा. याने‌ लगेच फायदा होईल.

 ➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

 😂😂🤔😂😂😂😂

सांगा पोरांनो

पार्वतीने शंकराला आपला पती म्हणून का  निवडले?

बंड्याने लगेच हात वर ☝ केला :-

मास्तरनी बंड्याला उत्तर देण्यास सांगितले...

बंड्याने पाच कारणे सांगितली...

१) शंकर वाघाचे कपडे बनवुन वापरत असल्यामुळे पार्वतीला कपडे धुण्याचा त्रास नव्हता...

🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾

२) शंकर कंदमुळे खात असल्यामुळे पार्वतीला स्वयंपाक करण्याची चिंता नव्हती...

🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈

३) शंकराच्या डोक्यावरूनच गंगा यमुना वाहात असल्याने पार्वतीला लांबून पाणी आणायची गरज नव्हती...

🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊

४) शंकराच्या डोक्यावरच चंद्र असल्यामुळे लोड शेडींग मधे मेणबत्त्या शोधायची कटकट नव्हती....

🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛🌛

५) शंकराला माता पिता नसल्यामुळे सासू सासऱ्यांचा त्रास नव्हता...

🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬

अन मास्तर यामुळेच आताच्या पोरी असाच शंकरा सारखा नवरा मिळावा म्हणून सोळा सोमवारचे व्रत उपाशी राहुन करतात...!

😄😂😄😂😄😄😄😭😄😭😄बोला हर हर महादेव

       ना चिंता ना भय हो,     भोलेेनाथ की जय हो!! 

 

 

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने कुसुमाग्रजांच्या साहित्य वाचनाचा उपक्रम

· ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त विशेष आयोजन

            नवी दिल्ली, 11 :‘मराठी भाषा गौरव दिन’ या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्य वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात दिल्लीतील मराठी अधिकारी आणि पत्रकार सहभागी होणार आहेत.                       

            वि.वा.शिरवाडकर यांनी मराठी साहित्यात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राने १४ ते २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान त्यांच्या साहित्य वाचन उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात केंद्र व राज्य शासनातील दिल्लीत कार्यरत मराठी अधिकारी आाणि मराठी पत्रकार सहभागी होणार आहेत. वि.वा.शिरवाडकरांच्या कथा, कादंबरी,कविता आदि साहित्याचे मान्यवरांनी केलेले वाचन महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिन्ही ट्वीटर हँडल, तिन्ही फेसबुक पेज, युटयूब चॅनेल, इन्स्टाग्राम आणि कु या समाजमाध्यमांवरुन प्रसारित करण्यात येतील. 

‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘कुसुमाग्रज’

             विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्‍कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान आहे. श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. प्रसिध्द साहित्यिक वि.स.खांडेकरांनंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ते दुसरे मराठी साहित्यिक. कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

             वि.वा शिरवाडकरांचे एकूण २४ कविता संग्रह , ३ कादंबऱ्या, १६ कथा संग्रह, १९ नाटके, ५ नाटिका व एकांकीका आणि ४ लेखसंग्रह आदि साहित्य संपदा प्रसिध्द आहे. १९६४ मध्ये गोव्यात आयोजित ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये त्यांच्या ‘नटसम्राट’ ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले तर याच कलाकृतीला १९८७ मध्ये ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारही मिळाला.

कुसुमाग्रजांच्या कविता संग्रहाविषयी

            कुसुमाग्रजांचे एकूण २४ कविता संग्रह प्रकाशित आहेत. यामध्ये जीवनलहरी, विशाखा , समिधा , किनारा, मेघदूत अनुवाद, मराठी माती, स्वगत ,जाईचा कुंज बालांसाठी कविता, हिमरेषा , वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी, मुक्तायन, श्रावण, प्रवासी पक्षी, पाथेय, बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज, माधवी, महावृक्ष, करार एका ताऱ्‍याशी, चाफा, मारवा, अक्षरबाग, थांब सहेली या काव्यसंग्रहांचा समावेश आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ‘मराठी भाषा गौरव दिन उपक्रम-२०२१’ विषयी

              महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने २०२१ मध्ये ‘मराठी भाषा गौरवदिना’निमित्ताने कार्यालयाच्या सर्व समाज माध्यमांद्वारे कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला होता .यात महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्य व परदेशातील साहित्य प्रेमींनी सहभाग घेतला होता.

राज्य शासनाच्या ‘‍द्वि वर्षपूर्ती’ निमित्त सध्या महाराष्ट्र परिचय केंद्राची विशेष मोहीम

           महाराष्ट्र शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राच्या सर्व समाजमाध्यमांद्वारे सध्या विशेष मोहीम राबविली जात आहे. यात महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित ‘दोनवर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’ या पुस्तिकेतील माहितीवर आधारीत ध्वनिचित्रफीत दररोज प्रसारित करण्यात येते. या मोहिमेद्वारे राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेली जनकल्याणाची कामे व राबविलेल्या जनहितकारी योजनांची माहिती देण्यात येत आहे.                                      

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic



Featured post

Lakshvedhi