सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 12 February 2022
Manav dharm
🙏🏾 *मानव धर्म काय सांगतो* ✍🏾
*१) दुसऱ्याला त्रास होईल,*
*असे वागू नका.*
*२) दुसऱ्याचे पैसे बुडवू नका.*
*३) दुसऱ्याचे वाईट चिंतू नका*
*व जळू नका.*
*४) दुसऱ्याच्या व्यवहारात*
*अडथळा आणू नका.*
*५) दुसऱ्याच्या अन्नात माती*
*कालवू नका.*
*६) दुसऱ्याला गोड बोलून*
*फसवू करु नका.*
*७) दुसऱ्याची वस्तू फुकट लाज*
*सोडून मागू नका.*
*८) दुसऱ्याची तोंड स्तुती करुन*
*फसवू नका.*
*९) दुसऱ्याच्या खोट्या कामात*
*मदत करु नका.*
*१०) दुसऱ्याला दिलेल्या शब्दास*
*बदलू नका.*
*११) दुसऱ्याने केलेल्या उपकाराची फेड*
*अपकाराने करु नका.*
*१२) दुसऱ्याचे नेहमी फुकट खाण्याची*
*सवय मोडून टाका.*
*१३) दुसऱ्याचा, आपल्या फायद्यासाठी*
*तोटा करु नका.*
*१४) दुसऱ्याची चमचेगिरी करु नका,*
*व इकडचे तिकडे करु नका.*
*१५) दुसऱ्याने केलेल्या कामाचे*
*श्रेय स्वत: घेवू नका.*
*१६) दुसऱ्याने उधार माल दिला,*
*त्याचे पैसे बुडविण्याचे*
*निच कृत्य करु नका,*
* *व त्याचा धंदा बसवू नका.*
*१७) दुसऱ्याने उधार माल दिला नाही*
*तर राग मानू नका.*
*१८) दुसऱ्याला कमी लेखून स्वत:ला*
*शहाणे समजू नका.*
*१९) दुसऱ्याच्या घरात लावालावी*
*करुन घर फोडू नका.*
*२०) दुसऱ्याची कमजोरी पाहून*
*आपला स्वार्थ साधू नका.*
*२१) दुसऱ्याचा उपयोग कामापुरता*
*करुन घेऊ नका.*
*२२) दुसऱ्याचे न ऐकता आपलेच*
*म्हणणे खरे करु नका.*
*२३) दुसऱ्याकडून खोटा वायदा*
* *करून पैसे घेऊ नका*
*२४) दुसऱ्याला काहीच कळत*
*नाही असे समजू नका.*
*२५) दुसऱ्याची निंदा करून आपले*
*पाप झाकू नका.*
*२६) दुसऱ्याचे चांगले नाही करता आले*
*तर, वाईट तर करु नका*
*पण चिंतू देखील नका*
*२७) दुसऱ्या वाईट माणसाचा सल्ला*
*घेऊन आपले वाटोळे करून*
*घेवू नका.*
*मानव हा ऐकीचा धर्म..*
🙏🙏🙏🙏🙏
सर्व बांधवांना नम्र व आग्रहाची विनंती की यंदाच्या शिवजयंतीपासून एक प्रथा पाडून घेऊ... ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपुजनाला घराबाहेर सकाळी व संध्याकाळी दिवे लावतोत्याचप्रमाणे या वर्षापासून शिवजयंतीला आपन आपल्या घरी दिवे लावावे... 🎐🏮व घरावर 🚩भगवा झेंडा लावावा.घराबाहेर रांगोळी काढावी,जेणेकरुन शिवजयंतीच्या सणाचे महत्व आपणास व भावी पीढीस कळेल तसेच १९ फेब्रुवारी फक्त जयंती न राहता महाराष्ट्रातील एक सण व्हावा ... हा संदेश आपल्या सर्व समाजबांधवांना पाठवा तसेच गावात व परिवारात ही प्रथा पाडा... ही आपणास आग्रहाची विनंती... जय जिजाऊ जय शिवराय ..🚩🚩🚩🚩
एक शिवभक्त....🙏🚩
Friday, 11 February 2022
जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमाल -
मान, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगार
मधुकर भावे - माहितीपूर्ण लेख
आॕगस्ट-सप्टेंबर २०२० च्या २ महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ. पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई-पिंपरी-चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा १ विपरीत परिणाम माझ्या कंबरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही. कंबर दुखू लागली, पायापर्यंत चमक मारु लागली. मंगलाच्या आजारपणामुळे माझं दुखण महत्वाच नव्हतं, त्यामुळे ते अंगावर काढल. त्यानंतर चालणं असह्य झालं. म्हणून प्रथम डॉ.सुबोध मेहता, मग डॉक्टर कपिल अशा नामवंत वैद्यक शास्त्र्यांकडून तपासणी झाली, MRI झाला, इंजेक्शन झाली, गोळ्या सुरु झाल्या. चालता येईना, दुखणं थांबेना. वेदना असह्य झाल्यावर दुखणं बर होत नाही असं जाणवल्यावर निराशा येत गेली.
त्यातच मंगलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निराशेत आणखी भर पडली. काय उपचार करावे सुचत नव्हते. डॉक्टरांनी मणक्याचे ऑपरेशन सुचवले, पण ते करणे धोक्याचे आहे, असे त्यांनीच मत दिले. आता काय करायचे? काही प्रश्नांची उत्तर नियती देत असते. एक दिवस अचानक माझे २ मित्र श्री.किशोर अग्रहाळकर (नवी मुंबईचे माजी नगररचनाकार) आणि श्री.अशोक मुन्शी माझ्याकडे आले. माझं दुखणं पाहून त्यांनी सुचवलं की, "जोधपुरला चला" असं सांगायलाच आलो आहोत.
दोन्ही जिव्हाळ्याचे मित्र. जोधपूरला उपाय काय माहित नाही, त्यांच्यावर विश्वास ठेऊन जोधपूरला जायचं ठरले. त्यांनी सांगितले की, डॉ. गोवर्धनलाल पाराशर हे विख्यात डॉक्टर दोन अंगठयांनी कंबर, मणका, मान, पाय याठिकाणी ज्या मांसपेशीमध्ये शीर दबलेली असते तिला बरोबर मार्गी लावतात आणि अवघी १० मिनीटांची त्यांची जादू करुन तर बघा.
४ डॉक्टर झाले होते, ४ प्रयोग झाले होते. ५ वा प्रयोग करूया असं म्हणून जोधपूरला निघालो. सोबत माझी सुविद्य कन्या डॉ.मृदूला (एम.एस. एफ.आर.सी.एस) ही सुध्दा होती. विमानात बसताना पायऱ्या चढता आल्या नाहीत. व्हिलचेअर वरुन आत जावे लागले. उतरताना व्हिलचेअरची गरज लागली. पुढे काय होणार माहित नव्हते. ४० मिनिटात
डॉ. पराशर यांच्या ‘आॕस्टियोपॅथी’ प्रयोगासाठी त्यांच्यासमोर उभा राहीलो. त्यांनी उपचार सुरु केले.
त्यांच्या रुग्णालयात सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ पर्यंत रोज ३०० लोकांवर, या सर्व व्याधींवर उपचार केले जातात. त्यांचे बंधू डॉक्टर नंदू, ज्येष्ठ चिरंजीव डॉ. गिरीराज, दुसरे चिरंजीव डॉ. महेश आणि अन्य डॉक्टर सहकारी अशा १२ जणांची टीम ३०० रुग्णांवर पाच वाजेपर्यंत उपचार करते. जे रुग्ण लंगडत आलेले असतात. ज्या रुग्णांना कंबरेला विळखा घालून उचलून आणलेले असते. अशा अनेक व्याधी असलेले रुग्ण जवळ पास रडत रडतच येतात आणि १० मिनिटांच्या उपचारानंतर टकाटक चालत, हसत आनंदाने परतताना दिसतात. ते सर्व मी बघत होतो.
डॉक्टर गोवर्धनजी मला म्हणाले, "आपका तो कुछ भी नही है। दो दिन मे ठीक होके मुंबई जाओगे।" मी ऐकत होतो. पाचवा प्रयोग आहे असंच म्हणत होतो. डॉक्टरांच्या सोबत उपचाराच्या खोलीत गेलो. एका रुंद टेबलावर त्यांनी झोपवलं. दोन अंगठयांनी मणक्याची शीर दाबायला सुरुवात करून कमरेपर्यंत दोन अंगठ्यात दुखरी शीर पकडत ते खालपर्यंत येत होते, पुन्हा वर जात होते. मला फरक जाणवू लागला. पायापर्यंत जाणारी चमक पहिल्या ५ मिनिटात कमी झाल्याच जाणवलं. पुढच्या ५ मिनिटानंतर डॉक्टर म्हणाले, "चलो उठो. आप खुद चल के जा सकते हो।" मी टेबलवरुन खाली उतरलो. माझी पावलं ताड-ताड पडू लागली. काय झालंय मलाच समजेना. आवाजात एकदम फरक पडला, उत्साहात फरक पडला. नियती काय घडवतं असते त्याचा अनुभव करत होतो. डॉक्टर साहेबांजवळ येऊन बसलो. "कैसा महसूस कर रहे हो?", त्यांच्या प्रश्नावर इतकच म्हणालो की, "विश्वास बसत नाही असं काहीतरी घडलं आहे."
पुराणामध्ये एक कथा आहे की, भगवान श्रीकृष्णांनी एका करंगळीवर अख्खा गोवर्धन पर्वत उचलला होता... मोठी रोचक कथा आहे. त्याचे मित्र असलेले पेंदे काठ्या टेकून उभे होते, पर्वत उचलला होता श्रीकृष्णाच्या करंगळीवर, ते बघायला कुणीच गेल नाही. पण माझ्यासमोरच्या डॉक्टरांनी हाताच्या २ अंगठयावर हजारो रुग्णांची व्यथा, पिडा गोवर्धन पर्वतासारखीच उचलली आणि त्यांची पिडा दूर केली. विलक्षण योगायोग म्हणजे त्या वैद्यकशास्त्राच नाव डॉक्टर गोवर्धनच आहे. अंगठ्याची कमाल आहे. सेवेची आणि ऑस्टियोपॅथीच्या अभ्यासाची ही साधना आहे.
डॉक्टरांनी एक पुस्तक हातात दिलं. उलटून बघितलं, विश्वास बसला नसता. फोटोसकट सगळी सचित्र माहिती होती. मान, पाठ, मणका, पोटऱ्या एवढेच नव्हेतर हाताची एकमेकांवर चढलेली बोटं अशा अनंत व्याधी घेऊन डॉक्टर साहेबांकडे कोण कोण आले आणि हे जागतिक किर्तीचे लोक अंगठयाच्या जादूने बरे होऊन गेले. त्यांनी कोणत्या कोणत्या शब्दात डॉक्टरांचं वर्णन कसं केलं... सगळं वाचून थक्क झाले.
या उपचारामध्ये आहेत, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अमेरिकेचे माजी राष्टपती डॉ. जॉर्ज बुश, बराक ओबामा, भारताचे माजी राष्टपती डॉ. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, आजचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सिनेतारकांमध्ये देवानंद, राजेश खन्ना, धर्मेद्र, मिथुन चक्रवर्ती, सलमान खान, सनी देओल आणि शेवटची दोन नाव... लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या सर्वांचे या ना त्या रुपात डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत आणि त्या सर्वांच्या व्याधी दूर केलेल्या आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंग चक्क ६ दिवस दाखलच झाले होते.या महारथींच्यापेक्षा सुध्दा सकाळी ८-५ संध्याकाळी जी सामान्य माणसं येतात त्यांच्या चेह-यावरचा आनंद विलक्षण आहे आणि प्रत्येकाची फी फक्त रुपये १००/-.
आणखी एका किस्सा सांगतो. ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मातोश्री श्रीमती कोकिलाबेन अंबानी यांच्या उपचारासाठी त्यांना जोधपुरात आणलं होतं. तो योग साधून त्यांचा वाढदिवस मुकेशजींनी जोधपूरमध्ये साजरा केला. ४०० मित्रांना वाढदिवसाला बोलावलं, १० चॅटर्ड विमान आणली,सगळी फाईव्हस्टार हॉटेल्स बुक केली,५ कोटी रुपये खर्च केला म्हणतात मग नंतर डॉक्टर गोवर्धनलालजींना ते म्हणाले, "मी मुंबईमध्ये ५-२५ कोटी रुपये लावून तुमच्या उपचारांसाठी फाईव्हस्टार रुग्णालय उभं करतो, तुम्ही तिथे या."
मला डॉक्टर गोवर्धनलाल यांची विशेषता यातच वाटते की, त्यांनी काय सांगितलं? "मुकेशभाई,आपका वह सेंटर तो फाईव्हस्टार हॉटेल से भी उपर के लेवल का होगा। जाहीर है की ऐसे संस्थान मे मैं गरीब तो क्या, मध्यमवर्ग का आदमी भी पहुंच नही सकता, मैं विनम्रतापूर्वक इसे स्वीकार नही कर सकता, क्योंकी जहा गरीब रुग्ण की मेरे हाथसे सेवा नही हो सकती ऐसे हेल्थकेअर सेंटर मे मेरी विद्या किस काम की?"
डॉक्टर गोवर्धनलाल पराशर यांची प्रखर मानसिकता, त्यांची उच्च विचारसरणी, व्यावसायाची निष्ठा, सामाजिक धाडस या सर्व गोष्टीचा परिचय त्या एकाच घटनेत होऊ शकतो. ६ दिवस उपचार घेतले, आज मी टकाटक पूर्वीप्रमाणे झपाटून कामाला लागलो आहे. जगात १६०० कोेटी लोक राहतात, त्यांचे ३२०० कोेटी अंगठे आहेत पण जोधपूरमधले डॉक्टर गोवर्धनलाल पाराशर यांचे दोन अंगठे जगातल्या ३२०० कोटी अंगठयांपेक्षा वेगळे अंगठे आहेत. ‘अंगठा दाखवला’ असा मराठीतला वाकप्रचार फार वाईट अर्थाने वापरला जातो. जोधपूरले हे २ अंगठे कमाल करणारे अंगठे आहेत. मी मुंबईला परत निघताना डॉक्टरसाहेबांना सांगितलं की, "डॉक्टरसाहब, आपका तहे दिलसे ऋणी हूँ। आज मुंबई जा रहा हूँ। जोधपूर के २ अंगुठे का डंका मुंबई आणि पुरे महाराष्ट्र मे बजाने की मेरी जिम्मेदारी, आप से मेरा इतनाही वादा."
मुंबईला आल्यावर अनेक महिने थांबलेला व्यायाम पूर्ववत सुरु केला आहे. मंगलाच्या निधनाने दु:ख पचवून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. डॉक्टर गोवर्धन यांची ही यशस्वी गाथा महाराष्ट्र भर सामान्य माणसाला उपयोगी पडेल यासाठी मुंबई, पुणे,नागपूर या २-३ ठिकाणी डॉ. पाराशर यांची आरोग्य शिबीरे आयोजित करण्याचे काम सुरु केले आहे.नियती या कामात यश देते की नाही ते पाहूया.
Jodhpur Dr. Gowardhanlal Parashar
Osteopathy Center, Shree Sonwarlal Osteopathy Chartable
कार्यालय : +91 84260 72222
Phone : +91 291 297 2777
घर : +91 291 262 2888
Personal drparashar@rediffmail.com
घर
18 E, Chopasni Housing Board, Jodhpur, Rajasthan, 342008. From my brilliant friend Shri Lakman Dhoot.. Fabulous, affordable treatment, so circulate among all known and Earn blessings 👍👌🙏
‘दरबार हॉल’ लोककल्याणकारी उपक्रमांचे केंद्र बनावे
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मुंबई, दि. 11 : आपल्या संविधानानुसार, 'आम्ही भारताचे लोक' हा देशाच्या सार्वभौमत्वाचा आधार आहे. दरबार हॉलचा उद्घाटन सोहळा हा भारताच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव आहे. राजभवनासह दरबार हॉल देखील लोककल्याणकारी उपक्रमांसाठी एक प्रभावी केंद्र बनेल, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.
राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, व इतर मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद म्हणाले, राजभवनात कोणतीही वैयक्तिक किंवा कोणतीही गोपनीय बाब नाही. जे काही घडते ते सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांसोबत, सार्वजनिकपणे पारदर्शकपणे, लोकसेवकांकडून जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्याची पद्धत रूढ होत आहे. अशा प्रकारे हे नवे दरबार हॉल नव्या संदर्भातील आपल्या नव्या भारताचे, नव्या महाराष्ट्राचे आणि आपल्या चैतन्यशील लोकशाहीचे नवे प्रतीक आहे.
राजभवनाच्या या दरबार हॉलमध्ये मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी मोरारजी देसाई यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता अशी आठवण यावेळी राष्ट्रपतींनी जागविली. भारताचे माजी पंतप्रधान श्री. मोरारजी देसाई यांच्याकडे मला त्यांचे स्वीय सचिव म्हणुन काम करण्याची संधी मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र हे नावाप्रमाणेच महान राज्य असल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाले, राज्याच्या महानतेला अनेक परिमाण आहेत. महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांचीच नावे मोजली तरी यादी संपणार नाही. शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक व्यक्तिमत्त्वांमध्ये महाराष्ट्राच्या महानतेचा असा अफाट प्रवाह दिसतो.
यापूर्वी अनेकदा महाराष्ट्रात यायची संधी मिळाली, मात्र यावेळच्या प्रवासात मला एक पोकळी जाणवतेय. असे सांगून राष्ट्रपतींनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्याविषयी शोकभावना व्यक्त केल्या. त्याच्यासारखी महान प्रतिभावान गायिका शतकात एकदाच जन्माला येतात. लताजींचे संगीत अमर आहे, जे सर्व संगीत प्रेमींना नेहमीच मंत्रमुग्ध करेल. यासोबतच त्यांच्या साधेपणाची आणि सौम्य स्वभावाची आठवणही लोकांच्या मनावर उमटणार आहे. मला व्यक्तिश: त्यांचा स्नेह मिळाला. त्यांचे जाणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. असे श्री कोविंद म्हणाले.
राजभवन हे जनता भवन व्हावे
- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
तिन्ही बाजूनी समुद्रानी वेढलेल्या या राजभवनवर बाणगंगेचे, मुंबादेवीचे आणि सिद्धीविनायकाचे आशिर्वाद आहेत. राजभवन हे जनता भवन व्हावे. अशी इच्छा व्यक्त करुन राज्यपाल म्हणाले, राजभवन उभे रहावे यासाठी रात्रं दिवस कार्य करणाऱ्या मजूरांचे विशेष योगदान आहे. राज्यपाल म्हणून मला मिळालेल्या अधिकारात राहून मी जनतेच्या भल्याचे कार्य करण्याचा प्रयत्न करित आहे. वनजमिनीसंदर्भातील अपील करण्यासाठीचा अधिकार आधी जिल्हाधिकारी यांनाच होता आता तो अधिकार आयुक्तांकडे देण्यात आला. यामुळे हजारो लोकांना न्याय देता आला.
कोविड काळात उत्तम कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्याचा राजभवनमध्ये सत्कार करण्याचे सौभाग्य मला लाभले. सुमारे पाच हजार लोकांचा या दरम्यान सत्कार करण्यात आला. यात विद्यार्थी, नर्स, अधिकारी, अभिनेते, स्वच्छता कर्मचारी यांना सन्मानित करता आले हा मी माझा सन्मान समजतो.
मुंबईतील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असं देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. देशातील हे सर्वोत्तम राजभवन आहे. असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले<s
मुंबई शहर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे
प्रलंबित प्रकरणांसाठी १४ ते २८ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीm
मुंबई, दि. ११: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर समितीमार्फत जात प्रमाणपत्रांच्या प्रलंबित प्रकरणांसाठी दिनांक १४ ते २८ फेब्रुवारी पर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या अर्जदारांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी शैक्षणिक व सेवा विषयक प्रस्ताव सादर केलेला आहे व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर समितीकडे ज्या अर्जदारांचे जात प्रस्ताव अद्यापही कागदपत्रे, पुराव्या अभावी प्रलंबित आहेत, अशा सर्व अर्जदारांना त्रुटी पूर्तता करण्याबाबत समितीकडून कळविण्यात आलेले आहे.ज्या अर्जदारांनी अद्यापही त्रुटींची पूर्तता न केल्याने प्रकरणे प्रलंबित आहेत.अशा प्रलंबित प्रकरणांसाठी दिनांक १४ ते २८ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत त्रुटीपूर्तता करण्यासाठी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत त्रुटींची पूर्तता केली जाणार नाही अशी सर्व प्रकरणे फेब्रुवारी २०२२ अखेर बंद करण्यात येतील. तसेच संबंधित अर्जदारांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास नव्याने प्रस्ताव सादर करावा लागेल.तरी विहित कालावधीमध्ये संबंधित अर्जदारांनी त्रुटी पूर्तता करावी, असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...