सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 30 January 2022
डॉ. सावंत यांच्या पुस्तकांनी दिला जंगलभ्रमंतीचा सुंदर अनुभव
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
डॉ. दीपक सावंत लिखित "वाईल्ड लाईफ फोटोबायोग्राफी"आणि
उद्धव ठाकरे- द टायगर या दोन पुस्तकांचे सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई, दि.२९ : छायाचित्रणाला एक चिकाटी आणि जिद्द लागते ती डॉ. दीपक सावंत यांच्यात असून त्यांच्या आजच्या या पुस्तकामुळे त्यांच्यासमवेत केलेला जंगल भ्रमंतीचा अनुभव, ती दृष्ये जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहिली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या “वाईल्ड लाईफ फोटोबायोग्राफी’’ आणि “उद्धव ठाकरे- द टायगर” या दोन पुस्तकाचे प्रकाशन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या कार्यक्रमास दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती. कार्यक्रमास ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने, प्रकाशक आनंद लिमये यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
आजवर अनेक प्रकाशने झाली, पण आजचा प्रकाशन कार्यक्रम वेगळा आहे, डॉ.दीपक सावंत यांना छायाचित्रकार, लेखक म्हणून एक वेगळी ओळख देणारा हा कार्यक्रम आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी डॉ. दीपक सावंत यांच्यासमवेत केलेल्या अनेक जंगल भ्रमंतीचा आपला अनुभव यावेळी सांगितला. ज्या कान्हा जंगलापासून वाईल्ड फोटोग्राफीला आपण सुरुवात केली तिथे फिरत असतांना वनरक्षकांच्या असलेल्या अडीअडचणी जाणवल्या, त्यातून आरोग्य शिबीराचे आयोजन, रुग्णवाहिकेची उपलब्धता, औषधांची उपलब्धता अशा अनेक बाबींच्या पुर्ततेत डॉ. सावंत यांनी केलेले कामही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वनरक्षकांच्या अनेक अडचणी असतात, त्यांच्या आरोग्याचे, कुटुंबाचे आणि मुलांचे शिक्षणाचे प्रश्न खूप वेगळे असतात हे या जंगल भ्रमंती दरम्यानच कळाल्याचे ते म्हणाले. वन्यजीवांना आपण त्रास दिला नाही तर ते आपल्याला त्रास देत नाहीत, इथे वावरण्याची एक शिस्त असते असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. सावंत यांनी कॅमेऱ्यानेच नाही तर लेखणीने जंगल टिपले असल्याचे या दोन पुस्तकांवरून दिसून येते.
पुस्तक प्रकाशनासाठी डॉ. सावंत यांचे अभिनंदन करून श्री. देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी जंगल भ्रमंतीबरोबर गडकिल्ल्यांचे, वारीचे छायाचित्रण करतांना जीव ओतून काम केल्याचे दिसते. यातून जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख निर्माण झाली. येथे मिळालेला संयम, अनुभव आणि शांत राहून "क्लिक" करण्याची निर्णय क्षमता त्यांना मुख्यमंत्री पदाच्या वाटचालीत उपयोगी पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना योग्य दिशा दिली, सगळ्या यंत्रणांना समवेत घेऊन काम केले. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक संघटनांनी घेतली. त्यामुळे अशा व्यक्तीसमवेत छायाचित्रण करायला मिळणे, जंगलभ्रमंती करायला मिळणे भाग्याची गोष्ट आहे. ते भाग्य डॉ. सावंतांना लाभले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केलेल्या जंगलभ्रमंतीचा आपला अनुभव या पुस्तकांच्या आणि छायाचित्रांच्या माध्यमातून सांगितला आहे.
आपल्या प्रास्ताविक भाषणात डॉ. दीपक सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केलेल्या जंगल भ्रमंतीचा आणि त्यांच्यासमवेत केलेल्या छायाचित्रण कलेचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, वन, जंगल वाचवण्यासाठीचा उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि काम यानिमित्ताने जवळून पाहता आले. माझ्यासह सुरेश प्रभु, सुभाष देसाई, संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत जंगलभ्रमंती केली आहे. त्यावेळी त्यांच्यातील माणूस आम्हा सर्वांनाच जवळून पहावयास मिळाला. ते आपले या क्षेत्रातील गुरु आहेत. फोटोग्राफी करतांना ते अतिशय बारीक गोष्टींची काळजी घेतात हे जाणवले. पर्यावरणीय बदलाचे परिणाम थोपवण्यासाठी जंगले, वने वाचली पाहिजेत, असेही ते म्हणाले. डॉ. सावंत यांनी उद्योग मंत्र्यांसमवेत कोविड सेंटर, महारक्तदान शिबिरात काम करता आल्याचा आनंदही व्यक्त केला.
0000
राज्यपालांच्या हस्ते ४४ डॉक्टर्स सन्मानित
इतिहास भारतातील कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेईल
-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई,दि. २९ : जगाच्या इतिहासात यापूर्वी ठराविक प्रदेश किंवा देशांपुरत्या महामारी येऊन गेल्या. परंतु कोरोनामुळे एकाच वेळी संपूर्ण जग बाधित झाले. या काळात भारतातील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज यांसह सर्व आरोग्य सेवक कोरोना योद्ध्यांच्या केलेल्या अद्भुत कार्याची दखल इतिहास निश्चितपणे घेईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
‘परिश्रम’ या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे कोरोना काळात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ४४ डॉक्टरांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे शनिवारी (दि. २९) सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, शिक्षण संस्थाचालक लल्लन तिवारी, ‘परिश्रम’ संस्थेचे निमंत्रक ॲड. अखिलेश चौबे, डॉ. राजकुमार त्रिपाठी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
एकीकडे विज्ञान, औषधीशास्त्र व वैद्यकीय तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रगती होत असताना दुसरीकडे नवनवे आजार जगात येत आहेत. कोरोना संसर्ग सर्वांसाठी परीक्षेचा काळ होता. अमेरिकेसारख्या प्रगत देशात रुग्णसंख्या व मृत्युदर जास्त होता. परंतु सेवाभाव भारतीयांच्या डीएनए मध्ये असल्यामुळे या कठीण काळात भारतातील रुग्णसंख्या व मृत्युदर कमी होता. आरोग्य सेवक तसेच समाजसेवकांचे हे कार्य भविष्यातील डॉक्टरांकरिता मार्गदर्शक ठरेल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉ. राजीव जोशी, डॉ. वैभव कुबल, डॉ. कुमार दोशी, डॉ.सुयोग दोशी, डॉ.अश्विनी पत्की दोशी, डॉ.राहुल त्रिपाठी, डॉ.पूर्वी छाबलानी, डॉ.संजीत शशीधरन, डॉ.वैजयंती कदम, डॉ.सुशील जैन, डॉ.राहुल वाकणकर, डॉ.त्रिदिब चॅटर्जी, डॉ.निखिल कुलकर्णी, डॉ.हनी सावला, डॉ.मनीष शेट्टी, डॉ.आदित्य अग्रवाल, डॉ.शिल्पा वर्मा, डॉ.नरेंद्र शर्मा, डॉ.अनिता शर्मा, डॉ.ओमप्रकाश शर्मा, डॉ.श्रीप्रकाश चौबे, डॉ.रुणम चड्ढा, डॉ.मोहसीन अन्सारी, डॉ.अमेय पाटील, डॉ.स्वप्नील शिरसाठ, डॉ.अमर द्विवेदी, डॉ.राजेश दहाफुटे, डॉ.पारितोष बाघेल, डॉ.अब्दुल खलीक, डॉ.मुकेश शुक्ला, डॉ.संजय राठोड, डॉ.विवेक शर्मा, डॉ.आमिर कुरेशी, डॉ.भरत तिवारी, डॉ.जीत संगोई, डॉ.शिखर चौबे, डॉ.शैलेंद्र सिंह, डॉ.महाबली सिंह, डॉ.राजेश ढेरे, डॉ.व्यंकटेश जोशी, डॉ.प्रदिप नारायण शुक्ला, डॉ.निखिल शहा, डॉ.नेहा शहा आणि अनिल त्रिवेदी यांचा सत्कार करण्यात आला.
Saturday, 29 January 2022
इस्रायली जनतेमध्ये महात्मा, मोदी आणि मेहता लोकप्रिय :
कोबी शोशानी
इस्रायल येथील रस्त्याला शिवाजी महाराजांचे नाव देणार
मुंबई, दि. 29 : इस्रायलच्या लोकांमध्ये महात्मा गांधी, इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व संगीत संयोजक झुबीन मेहता अतिशय लोकप्रिय असून त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम असल्याचे इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी सांगितले.
कोबी शोशानी यांनी शुक्रवारी (दि.28) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. या महिन्यात इस्रायल-भारत यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात इस्रायल-भारत संबंध अतिशय दृढ झाल्याचा अभिमान वाटतो, असे शोशानी यांनी सांगितले. आपण स्वतः दुर्गप्रेमी असून महाराष्ट्रातील काही शिवकालीन किल्ल्यांना भेट दिली असल्याचे सांगून इस्रायल येथील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याबाबत विचार विनिमय सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
इस्रायल भारताला जल व्यवस्थापन, निःक्षारीकरण, जलसिंचन, या क्षेत्रात सहकार्य करीत असून इस्रायलने भारतात कृषी उत्पादन वाढविण्यासाठी 29 सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापित केले असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायल मध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची पुस्तके हिब्रू भाषेत असली तरीही स्नातकपूर्व अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत उपलब्ध असून परकीय विद्यार्थ्यांपैकी भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने इस्रायल येथे शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
इस्रायलच्या स्थापनेवर लिहिलेली 'एक्झोडस' ही जगप्रसिद्ध कादंबरी आपण वाचली असून ती वाचताना अनेकदा भावुक झाल्याचे राज्यपालांनी सांगितले. भारताने ज्यू धर्मीय किंवा कुठल्याही परधर्मीय लोकांबाबत भेदभाव ठेवला नाही, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले. इस्रायल-भारत संबंध अतिशय सुदृढ झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
बैठकीला इस्रायल वाणिज्य दुतावासातील राजकीय व विशेष प्रकल्प सल्लागार अनय जोगळेकर हे देखील उपस्थित होते.
००००
Mahatma, Modi, Mehta very popular in Israel : Kobbi Shoshani
The Consul General of Israel in Mumbai Kobbi Shoshani said Mahatma Gandhi, Prime Minister Narendra Modi and music composer Zubin Mehta are adored by the people of Israel. Stating that he has already visited some of the well-known forts in Maharashtra the Consul General informed that Israel is considering a proposal to name a road in the country after Chhatrapati Shivaji Maharaj.
The Consul General was speaking to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Friday (29th Jan).
The Consul General told the Governor that India and Israel are celebrating the completion of 30 years to the establishment of diplomatic relations. Mentioning that Narendra Modi is the first Indian Prime Minister to have visited Israel he said he was very proud of the present state of strong relations between the two great countries.
The Consul General said Israel is assisting India in water management, desalination and irrigation. He said his country has already established 29 Centres of Excellence to enhance agriculture productivity.
Expressing happiness over the strong relations between India and Israel, Governor Koshyari said India has never discriminated against Jewish people on the grounds of religion. He said he was moved by the famous novel Exodus that described the story of the creation of Israel State.
Political and Special Projects Advisor to the Consulate Anay Joglekar was also present.
0000
Strggle
.
*कलेक्टर मेकअप का करत नाहीत...❓*
*मलप्पुरमच्या जिल्हाधिकारी श्रीमती. राणी सोयमोई यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला*.
....................................
तिने घड्याळाशिवाय कोणतेही दागिने घातले नव्हते.सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने फेस पावडर देखील वापरली नाही.
भाषण इंग्रजीत आहे. ती फक्त एक-दोन मिनिटेच बोलली, पण तिचे शब्द दृढनिश्चयाने भरलेले होते.
त्यानंतर मुलांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले.
*प्रश्न: तुझे नाव काय आहे?*
माझे नाव राणी आहे. सोयामोई हे माझे कौटुंबिक नाव आहे. मी झारखंडची रहिवासी आहे.
*अजून काही विचारायचे आहे?.*
प्रेक्षकांमधून एक सडपातळ मुलगी उभी राहिली.
विचार, मुली.
"मॅडम, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मेकअप का वापरत नाही?"
कलेक्टरचा चेहरा अचानक फिका पडला. तिच्या पातळ कपाळावर घाम फुटला. तिच्या चेहऱ्यावरचे हसू ओसरले. श्रोते अचानक शांत झाले.
तिने टेबलावरची पाण्याची बाटली उघडली आणि थोडे प्यायले. मग तिने मुलाला बसायला इशारा केला. मग ती हळूच बोलू लागली.
मुलाने गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. एका शब्दात उत्तर देता येणार नाही, अशी गोष्ट आहे. उत्तरात मला माझी जीवनकथा सांगायची आहे. माझ्या कथेसाठी तुम्ही तुमचे मौल्यवान दहा मिनिटे बाजूला ठेवण्यास तयार असाल तर मला कळवा.
तयार ...
माझा जन्म झारखंडच्या आदिवासी भागात झाला.
कलेक्टरने थांबून प्रेक्षकांकडे पाहिले.
*माझा जन्म कोडरमा जिल्ह्यातील आदिवासी भागातील "अभ्रक" खाणींनी भरलेल्या एका लहानशा झोपडीत झाला*.
माझे वडील आणि आई खाण कामगार होते. मला वर दोन भाऊ आणि खाली एक बहीण होती. आम्ही एका छोट्या झोपडीत राहायचो जिला पाऊस पडला की गळती व्हायची.
माझ्या पालकांनी तुटपुंज्या पगारावर खाणीत काम केले, कारण त्यांना दुसरी नोकरी मिळत नव्हती. हे एक अतिशय गोंधळाचे काम होते.
मी चार वर्षांची असताना माझे वडील, आई आणि दोन भाऊ विविध आजारांनी अंथरुणाला खिळून होते.
खाणीतील प्राणघातक अभ्रक धूळ चा श्वास घेतल्याने हा आजार होतो, हे त्यांना त्यावेळी फारसे माहीत नव्हते.
मी पाच वर्षांची असताना माझ्या भावांचा आजाराने मृत्यू झाला.
एक छोटा उसासा टाकून कलेक्टरने बोलणे थांबवले आणि तिने अश्रूंनी भरलेले डोळे बंद केले.
बहुतेक दिवस आपल्या आहारात पाणी आणि एक-दोन भाकरी असायच्या. माझ्या दोन्ही भावांनी तीव्र आजार आणि उपासमारीने हे जग सोडले. माझ्या गावात डॉक्टरांकडे किंवा शाळेत जाणारे लोक नव्हते. वीज नसतानाही, शाळा, दवाखाना किंवा शौचालय नसलेल्या गावाची तुम्ही कल्पना करू शकता का?
एके दिवशी जेव्हा मला भूक लागली, तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सर्व कातडे आणि हाडासह पकडून, मला एका मोठ्या खाणीत ओढले, ज्यात नालीदार लोखंडी पत्रे होते.ही एक अभ्रक खाण होती, जी कालांतराने प्रसिद्ध झाली. ही एक प्राचीन खाण आहे, जी अंडरवर्ल्डमध्ये खणली गेली होती. माझे काम तळाशी असलेल्या छोट्या गुहांमधून रेंगाळणे आणि अभ्रक धातू गोळा करणे, हे होते. हे फक्त दहा वर्षांखालील मुलांसाठी शक्य होते.
आयुष्यात पहिल्यांदाच मी भाकरी खाल्ली आणि पोट भरले. पण त्या दिवशी मला उलट्या झाल्या.
*मी इयत्ता पहिलीत असताना, मी विषारी धूळ श्वास घेत, अशा अंधाऱ्या खोल्यांमधून अभ्रक हुंगत होते*.
अधूनमधून भूस्खलनात आणि अधूनमधून काही जीवघेण्या आजारांनी दुर्दैवी मुलांचा मृत्यू होणे, असामान्य नव्हते.
जर तुम्ही दिवसाचे आठ तास काम केले, तर तुम्हाला किमान एक भाकरी मिळेल. भूक आणि उपासमार यामुळे मी दररोज हडकुळी आणि निर्जलित ( शरीरात पाणी नसलेली) होत होते.
एका वर्षानंतर माझी बहीणही खाणीत कामाला जाऊ लागली. मी थोड बर होताच, माझे वडील, आई, बहीण आणि मी एकत्र काम केले आणि आम्ही अशा ठिकाणी आलो, जिथे आम्ही उपाशी राहू शकलो नाही.
पण नशिबाने दुसर्याच रूपाने आम्हाला पछाडायला सुरुवात केली होती. एके दिवशी खूप ताप आल्याने, मी कामावर जात नसताना अचानक पाऊस आला. खाणीच्या पायथ्याशी कामगारांसमोरच खाण कोसळून शेकडो लोकांचा मृत्यू झाला. त्यात माझे वडील, आई आणि बहीण होते.
*जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. प्रेक्षकांमधील प्रत्येकजण श्वास घेण्यासही विसरला. अनेकांचे डोळे भरून आले*.
माझ्या हे लक्षात आहे की, मी त्यावेळी फक्त सहा वर्षांची होते.
अखेर, मी शासकीय आगती मंदिरात पोहोचले. तिथंच माझं शिक्षण झालं. मुळाक्षरे शिकणारी, मी माझ्या गावातून पहिली होते. शेवटी, मी कलेक्टर तुमच्या समोर आहे.
मी मेकअप वापरत नाही, हे आणि याच्यात काय संबंध आहे ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
ती प्रेक्षकांकडे नजर टाकत पुढे सांगू लागली,
तेव्हाच मला समजले की, त्या दिवसांत अंधारातून रेंगाळताना मी गोळा केलेला संपूर्ण अभ्रक मेकअप उत्पादनांवर वापरला जात होता.
अभ्रक हा फ्लोरोसेंट सिलिकेट खनिजाचा पहिला प्रकार आहे.
*बर्याच मोठ्या कॉस्मेटिक कंपन्यांनी ऑफर केलेल्या मिनरल मेकअपमध्ये, सर्वात रंगीबेरंगी बहु-रंगीत अभ्रक आहेत, जे 20,000 लहान मुलांचा जीव धोक्यात घालून तुमची त्वचा चमकवतात*.
*गुलाबाची कोमलता त्यांच्या जळलेल्या स्वप्नांसह, त्यांचे उध्वस्त आयुष्य आणि खडकांमध्ये चिरडलेले त्यांचे मांस आणि रक्त आपल्या गालावर पसरते*.
आपले सौंदर्य वाढवण्यासाठी,
लाखो डॉलर किमतीचे अभ्रक अजूनही खाणीतून लहान मुलांच्या हातांनी उचलले जाते.
*आता तुम्हीच सांगा*,
मी माझ्या चेहऱ्यावर मेकअप कसा लावू?. उपासमारीने मरण पावलेल्या माझ्या भावांच्या स्मरणार्थ मी पोटभर कसे जेवू शकते? नेहमी फाटलेले कपडे घालणाऱ्या माझ्या आईच्या आठवणीत मी महागडे रेशमी कपडे कसे घालू?.
*तोंड न उघडता डोके वर करून, एक छोटेसे स्मितहास्य करून ती बाहेर पडताना नकळत सारे प्रेक्षक उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा मेकअप डोळ्यांतून टपकणाऱ्या गरमाश्रूंनी भिजू लागला होता*.
....................................
स्त्रिया फेस पावडर, क्रीम, लिपस्टिकने भरलेले पाहून त्यांच्यापैकी काहींना किळस आली, तर त्यांना दोष देऊ नका.
(झारखंडमध्ये अजूनही उच्च दर्जाचे अभ्रक उत्खनन केले जाते. 20,000 हून अधिक तरुण मुले शाळेत न जाता तेथे काम करतात. काही भूस्खलनाने गाडले गेले आहेत, तर काही रोगामुळे मृत्यू पावले आहेत. )
*मल्याळममधून अनुवादित*
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ ; मुंबईच्या वाहतुकी स मोठा दिलासा मिळणार ...