Sunday, 9 January 2022


 

 ब्युटी सलूनव्यायाम शाळा 50 टक्के क्षमतेने पूर्ण 'लसीकृतकर्मचाऱ्यांमार्फत

चालवण्यास मुभा

मुंबईदि.9 :- शनिवार दि. 8 जानेवारी 2022 रोजी राज्य शासनातर्फे सोमवारपासून लागू होणाऱ्या निर्बंधांसंबंधी काढण्यात आलेल्या आदेशात अंशत: सुधारणा करण्यात आल्या आहेत. आदेशानुसार ब्युटी सलून आणि व्यायाम शाळांना 50 टक्के क्षमतेनेमास्कचा उपयोग करून व पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांमार्फत सेवा देता येईल कोणतेही नवीन आदेश येईपर्यंत हेच आदेश अमलात राहतील.

या सुधारणा खालील प्रमाणे असतील :

1- तक्त्यामध्ये उल्लेखित प्रस्तावित निर्बंध’ याचा अर्थ लागू निर्बंध असा गृहीत धरण्यात येईल.

2- ब्युटी सलूनचा समावेश केश कर्तनालय (किंवा हेअर कटिंग सलून) या गटात करण्यात येईल. त्यांनाही क्षमतेच्या टक्के उपस्थितीत सलून उघडे ठेवण्याची परवानगी असेल व सोबतच केश कर्तनालय/ हेअर कटिंग सलून करिता उल्लेखित निर्बंध लागू असतील. या आस्थापनांमध्ये फक्त अशीच सेवा देण्यास मुभा असेल कीज्यामध्ये मास्क काढण्याची गरज नसते. या सेवेचा लाभ केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच घेता येईल. त्याचप्रमाणे ब्युटी सलून मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकृत असणे अनिवार्य असेल.

 

3- जिम अर्थात व्यायामशाळा हे क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत चालू ठेवता येतील, तथापि तिथे मास्क लावणे बंधनकारक असेल. या सेवेचा लाभ देखील केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच घेता येईल. त्याचप्रमाणे व्यायामशाळेशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकृत असणे अनिवार्य असेल.

सदर आदेश राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी दिले आहेत.

 

ब्यूटी सलूनव्यायामशाला 50 प्रतिशत क्षमता के साथ

दोनों टीके लगाने वाले कर्मी चला सकेंगे

 

         मुंबईदि. 9:-  विगत 8 जनवरी को राज्य सरकार की ओर से राज्य में अनेक प्रतिबंध लगाने की घोषणा की गईजो 10 जनवरी की रात 12:00 बजे से लागू होने जा रहे है. इसमे अंशत: सुधार किया गया है. ईसके अनुसार ब्यूटी सलून तथा व्यायामशाला 50 प्रतिशत क्षमता के साथ खुले रखने की अनुमति होगी.  इन दोनों अस्थापनाओं का लाभ सिर्फ वही लोग ले सकेंगे जो दोनों टीके ले चुके हैसाथ ही कर्मचारियों को भी वह काम करने की अनुमति दोनों टीको की शर्त पर दी गई है.

            इस को लेकर कुछ सूचनाएं राज्य सरकार की ओर से रविवार को जारी की गईजो नए आदेश आने तक लागू रहेगी

             विगत 8 जनवरी को घोषित आदेश की तालिका पंक्ति में उल्लेखित प्रस्तावित किए गए प्रतिबंधों’ को लागू प्रतिबंधों के रूप में माना जाएगा.

             ब्यूटी सलून को हेयर कटिंग सलून (बाल कटाने के सलून) के गुट में रखा जाएगा तथा उक्त तालिका में उल्लेखित हेयर कटिंग सलून की भांति क्षमता के 50 प्रतिशत उपस्थिति में इसको खुले रखने की अनुमति होगी. इन दोनों आस्थापनाओं में केवल उन्हीं गतिविधियों को अनुमति होगी जिसके लिए मास्क निकालने की किसी को भी आवश्यकता ना हो. साथ ही केवल पूरी तरह से टीकाकरण किए हुए लोग ही इस सेवा का लाभ उठा सकते हैं. ब्यूटी सलून की गतिविधियों में शामिल सभी कर्मियों का पूरी तरह से टीकाकरण होना चाहिए.

             व्यायाम शाला अर्थात जिम को भी 50 फीसदी क्षमता के साथ खुले रखने की अनुमति इस शर्त पर होगी कि वहां पर कोई भी गतिविधि करते समय मास्क का उपयोग किया जाए. इस सेवा का लाभ भी सिर्फ उन्हीं लोगों को मिल पाएगा जो पूरी तरह से टीकाकरण करा चुके हैं. साथ ही सेवा देने वाले व्यायाम शाला के सभी कर्मचारी और निदेशको के लिए भी पूरी तरह से वैक्सीनेटेड’ होना अनिवार्य होगा.

            यह जानकारी रविवार को राज्य सरकार की ओर से जारी एक विज्ञप्ति के माध्यम से राज्य के मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती ने दी है.

00000

 

 

 

 वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

नाशिक, दि. 8- ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा ह्या दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ३१ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या.   

            राज्यात ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

            महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

            या बैठकीस विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त श्री. विरेंद्र सिंग, संचालक, डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक, डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

000

 राज्यात 2021 मध्ये कौशल्य विकास विभागामार्फत 2.19 लाख जणांना रोजगार


 कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. 8 : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये २०२१ मध्ये २ लाख १९ हजार १५६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

            डिसेंबर २०२१ या एकाच महिन्यात ४५ हजार १८२ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. डिसेंबर २०२१ मध्ये विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास उत्तम प्रतिसाद आणि यश मिळाले. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले. 

            श्री. मलिक यांनी सांगितले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

*नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी*

विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९३ हजार ८७१ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे श्री. मलिक यांनी सांगितले.

*मुंबईत डिसेंबरमध्ये ७ हजार ३१४ बेरोजगारांना रोजगार*

श्री. मलिक यांनी सांगितले की, डिसेंबर २०२१ मध्ये विभागाकडे ६९ हजार ०५२ उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ११ हजार ३४८, नाशिक विभागात १० हजार ८८९, पुणे विभागात १३ हजार ५३९, औरंगाबाद विभागात सर्वाधिक १८ हजार ३५७, अमरावती विभागात ११ हजार ६५८ तर नागपूर विभागात ३ हजार २६१ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. 

डिसेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ४५ हजार १८२ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात ७ हजार ३१४, नाशिक विभागात ७ हजार ५७०, पुणे विभागात ५ हजार ९३१, औरंगाबाद विभागात सर्वाधिक १४ हजार ०७३, अमरावती विभागात ९ हजार ४०० तर नागपूर विभागात ८९४ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

त्याचबरोबर वर्ष २०२१ मध्ये विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांमधून २ लाख १९ हजार १५६ जणांना रोजगार मिळाला. यामध्ये मुंबई विभागात ८० हजार ६७०, नाशिक विभागात ३१ हजार ६०७, पुणे विभागात ६२ हजार ४०३, औरंगाबाद विभागात २८ हजार ००२, अमरावती विभागात १२ हजार ०२० तर नागपूर विभागात ४ हजार ४५४ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

००००






 रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या तीन घाट रस्त्यांच्या सर्वेक्षणासह

अंदाजपत्रक तयार करा-सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देsh

            मुंबई,दि. 7 :- रत्नागिरी जिल्ह्यात दळणवळणाच्या दृष्टीने उपयुक्त आणि पर्यायी मार्ग असलेल्या भांबेड ते गावडी, देवडे ते विशालगड आणि काजिर्डा ते पडसाळी या तीन घाट रस्त्यांच्या कामांचे प्राथमिक सर्वेक्षण करावे आणि त्याचे अंदाजपत्रक, प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

            रत्नागिरी जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या बैठकीस आमदार डॉ. राजन साळवी, प्रा. विनय खामकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड-कोळेवाडी-मांजरे-गावडी जि. कोल्हापूर, संगमेश्वर तालुक्यातील देवडे-भोवडे ते विशालगड (जि. कोल्हापूर), राजापूर तालुक्यातील मौजे काजिर्डा ते पडसाळी घाट या तीन घाट रस्त्यांबाबत चर्चा करण्यात आली. दळणवळणाच्या दृष्टीने उपयुक्त आणि पर्यायी मार्गासाठी भांबेड ते गावडी या घाट रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचनाही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या. 

            भांबेड ते गावडी, देवडे ते विशालगड आणि काजिर्डा ते पडसाळी हे रत्नागिरी आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे जोडणारे पर्यायी रस्ते आहेत, या घाट रस्त्यांच्या सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी तसेच सविस्तर प्रकल्प अहवालासाठी येत्या अर्थंसंकल्पात निधीची तरतूद करण्याचे निर्देश देतानाच या तीनही घाट रस्त्यांच्या कामाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे निर्देशही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी दिले. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबाघाट अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला असून तो खुला करण्याची मागणी यावेळी रत्नागिरी जयगड पोर्ट ट्रान्सपोर्टस युनियनच्या वतीने अध्यक्ष रमेश कीर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडे यावेळी केली.

            राजापूर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जागेचे सर्वेक्षण करुन आवश्यक जागेची मागणी जिल्हा परिषदेकडून प्राप्त करुन घ्यावी. आणि त्यानुसार नवीन जागा पंचायत समिती इमारतीसाठी हस्तांतरित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही श्री. चव्हाण यांनी दिल्या.

0000



 


 





 राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा;

दापोली नगर पंचायतीचा देशात दुसरा क्रमांक

            नवी दिल्ली , 7 : केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार-2020’ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला असून महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार जाहीर झाले आहेत.

          जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने विविध राज्ये, संस्था आणि व्यक्तींना 11 श्रेणींमध्ये एकूण 57 पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले . यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.2018 पासून राष्ट्रीय जल पुरस्काराची सुरुवात झाली आहे.

दापोली नगर पंचायत आणि सुर्डी ग्रामपंचायत पुरस्कारांच्या मानकरी

            सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्थेच्या श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट तीन संस्थांची निवड करण्यात आली असून यात रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या श्रेणीमध्ये पश्चिम विभागातून निवड करण्यात आलेल्या तीन ग्रामपंचायतींमध्ये सोलापूर जिल्हयाच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी ग्रामपंचयातीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जलव्यवस्थापनात उत्कृष्ट कार्यासाठी देशातून तीन गैर शासकीय संस्थांची निवड करण्यात आली असून या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्थेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

            जनतेमध्ये जलजागृतीकरिता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील एक वृत्तपत्र आणि एका वृत्तवाहिनीचीही सर्वोत्कृष्ट माध्यम श्रेणीत निवड करण्यात आली असून सकाळ वृत्तपत्र समूहाच्या ‘ॲग्रोवन’ वृत्तपत्रास सर्वोत्कृष्ट वृत्तपत्राचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

            पुरस्कार स्वरूप रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहेत.

Saturday, 8 January 2022

 मुंबई महानगर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातून घेतला आढावा

ओमायक्रॉनचा जास्त धोका असलेले ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या

आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय प्रवाशांच्या निगराणीसाठी प्रत्येक मनपाने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करावी

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केल्यास अधिक कठोर निर्बधांची गरज लागणार नाही


मुंबई, दि.8 - ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका आयुक्त आणि नगरपालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांना दिल्या. कोव्हिड बाधित रुग्ण नॉन-कोव्हिड खासगी रुग्णालयात आल्यास त्याला प्रथम दाखल करून त्याची प्रकृती स्थिर करून मगच इतर रुग्णालयात हलवावे, तसेच शक्य असल्यास त्यांच्यावर त्याच रुग्णालयात उपचार करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. 

ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी स्वतः रुग्णालयात असूनही दूरदृश्य प्रणालीद्वारे विशेष आढावा बैठक घेऊन मुंबई महानगर क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. या क्षेत्रात रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा यावेळी रुग्णालयाची गरज मर्यादित असली तरीही आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये, यासाठी साऱ्या सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश शिंदे यांनी या बैठकीत दिले.

एमएमआर क्षेत्रातील सर्व खासगी आणि सार्वजनिक रुग्णालये, तसेच कोरोना केंद्र सज्ज करून ठेवण्याचे निर्देश त्यांनी मनपा आयुक्तांना दिले. त्यासोबतच या रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिटचा पुन्हा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. गृह विलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांचे नियमितपणे कॉल सेंटर्सच्या माध्यमातून ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग होईल, याबाबत दक्ष राहण्यास त्यांनी सांगितले. डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ यांना देखील मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्याने पर्यायी व्यवस्था उभी करण्याबाबत तयारी ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. 

ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी त्यासाठी लागणारी मोलुनुपीरावीर, व्हिटॅमिन सी सप्लिमेंट, पॅरासिटामॉलच्या गोळ्या यांचा पुरेसा साठा करून ठेवण्याबाबत त्यांनी सर्व मनपा आयुक्तांना सूचना दिल्या. त्यासोबतच ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट, ऑक्सिजन काँसंट्रेटर, याची सज्जता करून ठेवावे असेही त्यांनी निर्देश दिले. आज जरी बेड्सची गरज फार नसली तरीही भविष्यात ते वाढवावे लागले तर त्यासाठी संभाव्य जागा शोधून ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले. 

बाहेरील देशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे काम एअरपोर्ट अथॉरिटी आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येते. सर्व मनपा हद्दीत बाहेरून होणाऱ्या या प्रसाराबाबत अधिक दक्ष राहावे, यासाठी अशा प्रवाशांची माहिती घेऊन त्यांना वेळीच क्वारंटाइन करण्यासाठी प्रत्येक महानगरपालिकेने यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा, अशी सूचना देखील श्री. शिंदे यांनी केली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याचे शक्य ते सारे प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहेत. कोरोनाबाबत राज्य आणि केंद्र शासनाकडून तयार करण्यात आलेल्या नियमावलीचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन केल्यास ही परिस्थिती हाताळणे शक्य होईल. लोकांनी सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रसार रोखण्यास निश्चित मदत होणार असून अधिक कडक निर्बंध लागू करण्याची वेळ येणार नाही, असे श्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या लाटेचा सामना करण्याची आपली सज्जता झाली असली तरीही एक टीम बनून आपल्याला या परिस्थितीचा सामना करायचा आहे, असेही त्यांनी यावेळी सर्व मनपा आयुक्तांशी बोलताना स्पष्ट केले. 

यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, ठाणे मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा, नवी मुंबईचे मनपा आयुक्त अभिजित बांगर, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, भिवंडी मनपा आयुक्त सुधाकर शिंदे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, उल्हासनगर मनपाचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अंबरनाथचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, बदलापूरचे मुख्याधिकारी सुनील गोडसे, ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजीत सिंग, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000


 

Featured post

Lakshvedhi