Wednesday, 5 January 2022

 तुम्ही जिथे सदस्य आहात त्या ग्रुपवर पोस्ट करा.

 जर तुम्हाला, जन्मापासून मूकबधीर असलेले कोणतेही मूल माहित असेल तर आता कॉक्लियर इम्प्लांट सर्जरीच्या शोधामुळे या अपंग मुलाला बरे करणे शक्य झाले आहे.

 शस्त्रक्रियेसाठी सुमारे 10 ते 12 लाख खर्च येतो, परंतु काळजी करू नका, आता रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी, जिल्हा 3141 च्या मदतीने, ही शस्त्रक्रिया SRCC हॉस्पिटल, मुंबई येथे विनामूल्य केली जाते.

 कृपया इतर ग्रुपवर पोस्ट करा जेणेकरून गरजू लोकांपर्यंत संदेश पोहोचेल.

 संपर्क :-

 रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी

 DG Rtn राजेंद्र अग्रवाल

 9820085149

 सादर. 🙏

Tuesday, 4 January 2022

 Continue.मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी व राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.

उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या दोन प्रतीसह पाठवावे. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या दोन प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.

पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्जदाराने राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कार पात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.

ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.

जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई(कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखण अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.

गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय मुंबई-32 येथे पाठवाव्यात.

शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधी विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.

2021 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीयस्तरासाठी आहे. तसेच, कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.

प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

विकास योजना संदर्भातील

समाज माध्यम (सोशल मीडिया) पुरस्कार

ही स्पर्धा वृत्तविषयक/चालू घडामोडीविषयक संकेतस्थळे व ब्लॉग या समाज माध्यमात प्रसारित मराठी भाषेतील वृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठी आहे. या दोन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी सहभाग घेता येईल. समाज माध्यमातील पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. हे लेखन किमान एक वर्षापासून सुरु असावे. या माध्यमाचा वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी संकेतस्थळ व ब्लॉग या समाज माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या प्रसिद्धींची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रीत प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात.विविध पुरस्कारासाठी असलेल्या अटी या गटासाठी लागू राहतील.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

केंद्र शासनाचे “स्वच्छ भारत अभियान” आणि राज्य शासनाचे “स्वच्छ महाराष्ट्र अभियान”प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांना तसेच ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील पत्रकारांना सहभागी होता येईल.

स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव योजना, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅस तसेच वीज निर्मिती इत्यादी बाबत लेखण केलेले असावे.शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता विषयक योजनांची प्रसिद्धी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी लेखनाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन यांचा या स्पर्धेत अंतर्भाव होईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी स्पर्धा

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी “पु.ल.देशापांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार” देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र जोडलेले असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपसंचालक (वृत्त), यांच्या नावाने मुंबई येथील मुख्यालयातील पत्त्यावर पाठवावे.

छायाचित्रकार पुरस्कार

“तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार” स्पर्धा, ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. यात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे, समाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पुरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह प्रवेशिका सादर करता येईल.

महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार

विविधविकास कामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांना, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल.

या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे. 

प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे.

इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील.

0000



 राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 साठी

प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2022 असा आहे.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.inआणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्याची माहिती पुढीलप्रमाणे : -

पुरस्कारांची माहिती अ.क्र - पुरस्काराचेनाव -पारितोषिक

1.बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये.   (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

2. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये.(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र).

3. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये.मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

4.मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)

51 हजार रुपये.मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

5यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये.मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

6.पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजार रुपये,(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

7 .तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये ,(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

8.केकीमूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तr

51 हजाररुपये ,(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

9.समाज माध्यम पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजार rs (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

10.स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजाररुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

11.पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये,(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

विभागीय पुरस्कार.

12.दादासाहेब पोतनीस पुरस्कार,

नाशिक विभाग,51 हजार रुपये.(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,

या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

13.अनंतराव भालेराव पुरस्कार,

औरंगाबाद आणि लातूर विभाग

51 हजाररुपये,(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

14.आचार्य अत्रे पुरस्कार,

मुंबई विभाग

51 हजाररुपये.(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

15.नानासाहेब परूळेकर पुरस्कार,

पुणे विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

16 .शि.म.परांजपे पुरस्कार,

कोकण विभाग

51 हजाररुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

17.ग.गो.जाधवपुरस्कार,

कोल्हापूर विभाग

51 हजाररुपये (मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

18.लोकनायकबापूजीअणेपुरस्कार,

अमरावती विभाग.

51 हजाररुपये.(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

19.ग.त्र्यं.माडखोलकरपुरस्कार,

नागपूर विभाग.

51 हजाररुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठीच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे :-

नियम व अटी

राज्य / विभागीय पुरस्कार

पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील पाच वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी व राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.

उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या दोन प्रतीसह पाठवावे. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या दोन प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.

पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.continue

अर्जदाराने राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील

 कोविड प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे

-शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

            मुंबई, दि. ३ : कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. याअनुषंगाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

            शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. आता १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरणास प्रारंभ झाला असल्याने सर्व शाळांनी नियोजन करून या वयोगटातील विद्यार्थ्यांचे तातडीने लसीकरण करून घ्यावे. जेथे अद्यापही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नसेल तेथे त्यांनीही तातडीने लस घ्यावी. शाळांमध्ये कोविडसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून गर्दीचे उपक्रम टाळावेत. शाळेमध्ये गर्दी टाळण्यासाठी ५० - ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवावी. प्रात्यक्षिके गर्दी टाळून घ्यावीत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शक सूचनांचे पालन, लसीकरण आदींबाबत दक्षता घ्यावी. विद्यार्थी अथवा शिक्षक/ कर्मचारी कोविड संक्रमित झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घ्यावेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन वर्ग अथवा शाळा गरजेनुसार बंद ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.

            शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे पहिल्यांदाच लसीकरण होत असल्याने शाळांनी गर्दी टाळून योग्य नियोजन करावे. विद्यार्थी अथवा शिक्षक कोविड संक्रमित झाल्यास ती वर्गखोली सॅनिटाईज करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. बहुतांश जिल्ह्यांत १५ ते २० तारखेपर्यंत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शालेय शिक्षण विभाग दक्ष आहे. राज्यात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ६५ लाख २३ हजार ९११ इतकी असून सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.

            या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका/नगरपालिकेचे शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आदी ऑनलाईन उपस्थित होते.

००००

                                                                                                                 वि.वृ.क्र.12

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाकरिता

7 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा १६ जानेवारी 2022 रोजी होण

               मुंबई, दि.3 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 9 डिसेंबर 2021 पासून करण्यात आली आहे.इच्छुक उमेदवारांनी 7 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करावे. सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा रविवार, 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत घेण्यात येणार आहे, असे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

            केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2022 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णपणे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण केंद्रे नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद व कोल्हापूर येथील प्रवेश परीक्षेसाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून www.siac.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online) अर्ज मागवण्यात येत आहेत. राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना सन 1976 साली झाली असून महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांचा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत टक्का वाढावा या उदात्त हेतूने करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. सन 1976 पासून आजतागायत संस्थेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे व संस्थेत प्रशिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी देशातील वेगवेगळ्या राज्यात व परदेशात देखील भारतीय प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत,अशी माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक डॉ.खुशपत जैन यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.

00000



 

 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त

राज्यभरात ‘सावित्री उत्सव’ साजरा

            मुंबई दि. 3 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज सावित्री उत्सव म्हणून महिला व बाल विकास विभागाच्या राज्यभरातील सर्व कार्यालय व अंगणवाड्यांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळत उत्साहात साजरी करण्यात आली.

            जयंतीनिमित्त बोलताना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, भारताच्या इतिहासावर ज्यांची अमीट छाप आहे अशा स्त्री रत्न म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. भारतीय स्त्री ने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाचा प्रारंभ करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. सावित्रीबाई फुले यांची जयंती गेल्या वर्षीपासून महिला व बाल विकास विभागातर्फे सावित्री उत्सव म्हणून साजरी केली जात आहे. सावित्रीबाई फुले यांच्या शिकवणीनुसार मी आणि माझा विभाग महिलांच्या उत्थानासाठी कार्यरत असल्याचे ॲड.ठाकूर त्यांनी सांगितले.

            सावित्री उत्सव साजरा करताना राज्यातील सर्व अंगणवाड्यांमधे कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले. अंगणवाडी व प्रकल्प स्तरावर प्रतिमा पूजन, अभिवाचन, जनजागृती कार्यक्रम, प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा असे कार्यक्रम घेण्यात आले. १०० टक्के लसीकरण करणा-या व पोषण माह मध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या बिट मधील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. माझी कन्या भाग्यश्री योजनेनूसार एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन करणा-या जोडप्यांना गौरविण्यात आले. कोरोना काळात एकल झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत आहेत. आज अनाथ बालकांच्या घरी भेटही महिला व बाल विकास विभागाच्या अधिकार्यांनी दिली. विविध खेळात देशपातळीवर प्राविण्य प्राप्त केलेल्या मुलींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

0000



 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आणि वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

· पात्र विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 03 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यास दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही विषयातील प्रवेश प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहेत. एल एल बी, बी एड यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या फेरी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू राहणार असल्याचे सीईटी विभागाने कळवले असून, त्याअनुषंगाने वसतिगृह प्रवेश किंवा स्वाधार योजना यातील लाभांपासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले.

            सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील प्रवेश व स्वाधार योजना या दोन्हींसाठी अर्ज करण्यास 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून, पात्र विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन श्री. मुंडे यांनी केले.

००

वि.वृ.क्र.18

दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य योजनेबाबत

राज्य सरकार सकारात्मक

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

            पुणे, दि. 03 : दिव्यांग व्यक्तींचे जीवन सामान्य व्यक्तिप्रमाणे सुखकर व्हावे, यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांना विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून याबाबत राज्य स्तरावर लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकारातून पुणे येथे आयोजित 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोख्या विवाह सोहळ्यादरम्यान त्यांनी केलेल्या सुचनांची दखल घेवून श्री.मुंडे यांनी दिव्यांग जोडप्यांच्या विवाहासाठी अर्थसहाय्य योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या वतीने व खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून प्रथमच आयोजित केल्या गेलेल्या 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोख्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, विजय कान्हेकर, अभिजित राऊत, दीपिका शेरखाने यांसह मान्यवर उपस्थित होते.

            स्वतः कोविड बाधित असूनही दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात लग्न सोहळा अनुभूती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कार्य व इच्छा शक्तीचे कुतूहल व आदर वाटतो असे म्हणत धनंजय मुंडे व राजेश टोपे यांनी सुप्रियाताई यांना कोविड मधून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

दिव्यांगांचा सामुदायिक विवाहसोहळा राज्यभर राबवावा – खा. सुप्रिया सुळे

            सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व आरोग्यमंत्री राजेश टोपे या दोघांच्या सहकार्याशिवाय हा लग्न सोहळा होऊच शकला नसता. हा सामुदायिक विवाह सोहळा हा केवळ एक टप्पा असून पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम राज्यभरात राबवायचे आहेत, यासाठी सामाजिक न्याय मंत्री व आरोग्यमंत्री यांनी आपल्या विभागांमार्फत सहकार्य करावे, अशी सूचना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली.

दिव्यांग नोंदणी व युडीआयडी राज्यव्यापी मोहीम

           खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने खासदार शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबर 2021 ते 12 मार्च 2022 या दरम्यान दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करून त्यांना आवश्यक असलेले वैश्विक ओळखपत्र (UDID Card) देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

            राज्य व केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हे युडीआयडी कार्ड असणे अनिवार्य आहे. त्यामुळे नोंदणी नसलेल्या दिव्यांग बांधवांची या विशेष मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त नोंदणी केली जावी यासाठी ही मोहीम राज्यभरात अधिक व्यापक पद्धतीने राबविली जाईल तसेच आरोग्य विभाग यासाठी आवश्यक सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

असा रंगला विवाह सोहळा...

            पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका मंगलकार्यालयात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, सर्व 12 जोडप्यांचा हळदी समारंभ व अन्य विधी संपल्यानंतर प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून सर्व नवदाम्पत्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या सोहळ्यादरम्यान मास्क वापरण्यासह कोविड विषयक नियमांचेही पालन करण्यात आले.

 शिवडी - न्हावा शेवा सी लिंक वरील ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या

पहिल्या गाळ्याची यशस्वी उभारणी

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवडी - न्हावा शेवा सी लिंकची पाहणी

प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण; डिसेंबर २०२३ पर्यंत सी लिंकचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

            मुंबई, दि. ३ - मुंबई शहराला नवी मुंबई शहर आणि रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या शिवडी- न्हावा शेवा पारबंदर प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला. या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची यशस्वीरीत्या उभारणी करण्यात आली. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पीड बोटीतून या कामाची पाहणी केली.

            या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            शिवडी आणि न्हावा शेवा या दरम्यान उभारण्यात येत असलेला पारबंदर मार्ग हा भारतातील सगळ्यात मोठा पारबंदर मार्ग आहे. तब्बल २२ किलोमीटर लांबीचा असा हा पारबंदर (सी लिंक) प्रकल्प असून १८ हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. आज या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची उभारणी करण्यात आली. टाटा प्रोजेक्ट्स- देवू जेव्ही यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येत असून असे ३२ गाळे बसवून हा ७.८१ किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या गाळ्याच्या फॅब्रिकेशनचे काम जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम, म्यानमार या देशात करण्यात आले असून १८० मीटर एवढ्या लांबीच्या अजस्त्र गर्डर तयार करण्यात आले आहे. या संपूर्ण स्ट्रक्चरचे लाँचिंग करण्यासाठी एका खास बार्जची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवाजी नगर येथील इंटरचेंजचे काम देखील करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम जवळपास ६५ टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

मुंबई - नवी मुंबई दरम्यानचे अंतर कमी होणार; ठाणे-रायगड जिल्हे एकमेकांना जोडले जाणार

 - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

            शिवडी- न्हावा शेवा पारबंदर प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरातील अंतर कमी होणार असून ते २० मिनिटात कापता येणे शक्य होणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील चिरले पर्यंत हा पारबंदर प्रकल्प जाणार असल्याने ठाणे आणि रायगड हे जिल्हे देखील एकमेकांना जोडले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मोठी मदत होणार असून त्याद्वारे जेएनपीटी बंदरातून होणारी वाहतूक अधिक वेगवान होणार असल्याचे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

            या गाळ्यांच्या लाँचिंगसाठी कारंजा येथे विशेष जोडणी यार्ड तयार करण्यात आले असून तिथे जोडणी करून ते समुद्रात नेण्यात येतात. त्यासाठी खास बार्ज तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अतिशय नियोजनबद्धरित्या हे महाकाय गाळे लाँच करण्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.

            आज करण्यात आलेल्या या कामामुळे हा पारबंदर प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

००००


 



Featured post

Lakshvedhi