सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 24 December 2021
नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात
गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई, दि.24 : नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये "ओमिक्रॉन" ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये/रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक निर्गमित केले आहे.
या परिपत्रकानुसार कोवीड- 19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे. नाताळ / ख्रिसमस निमित्ताने चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर (Social Distancing) राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच चर्चमध्ये निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूच्या जीवनावरील देखावे. ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा (Choiristers) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करून सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे. चर्चच्या बाहेर/ परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नयेत. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटकोर पालन करण्यात यावे.
कोविड- 19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगर पालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष नाताळ उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.असे परिपत्रक गृह विभागाने निर्गमित केले असून हे शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
०००
Jai ho
आपल्या रायगड बस मालक यूनियनचे मेम्बर श्री.राजा अण्णा खारघर यांची टेम्पो ट्रॅव्हलर बस महाबळेश्वर येथून उरणकडे पॅसेंजर भरून येत असताना पेन रामवाडी ब्रिजवर असलेली पोलीस चौकी येथे ट्रॅफिक हवालदार यांनी रात्री 12.20 वाजता अडवली.ड्रायवरने गाडीचे पेपर दाखवले.पेपर ओके असताना देखील ड्रायवरला एन्ट्री मागितली असता त्याने 100/- रुपये एन्ट्री दिली आणि खारपाडा कडे रवाना झाला. हवालदारला 100/- एन्ट्री कमी झाल्यामुळे त्याने रागाने बसच्या मागून फोटो काढून 500/- रुपये दंड असलेले सिग्नल वायोलेशन हे चलन ऑनलाईन टाकले. या चलनाबद्दल बस मालक यांना 12.20 ला म्हणजेच 5 मिनिटात त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला व त्यांनी ड्रायवरला बस पुन्हा त्या चौकीजवळ घेऊन जायला सांगितले,त्याप्रमाणे ड्रायवरने गाडी चौकीजवळ नेऊन हवालदार यांना विचारना केली असता हवालदारने ड्रायवरला अपशब्द बोलून अरेरावी केली.ही माहिती बस मालक राजा यांना मिळाल्यावर त्यांनी आपल्या यूनियनचे अध्यक्ष श्री.समीर माखिजा व इतर कमिटी मेंबर श्री.अमित गावंड व श्री.संदीप म्हसकर यांना सोबत घेऊन रात्री 12.45 वाजता पेण गाठून चौकीवर असलेल्या हवालदार यांची चुकी व वाईट उद्धट वर्तणूक,चुकीचे चलन ऑनलाईन मेमो याबद्दल कान उघाडणी केली. संबंधित हवालदार यांनी त्यांच्याकडून झालेल्या चुकीबद्दल बस मालक,बस ड्रायवर,पॅसेंजर व रायगड बस मालक कमिटी मेंबर यांची माफी मागितली.
वातावरणीय बदलाची झळ कमी करण्यासाठी
लोकप्रतिनिधींचा पुढाकार महत्वाचा
- सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
मुंबई, दि. 24 : राज्यातील लोकप्रतिनिधींनी आयपीसीसीच्या (इन्टरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) अहवालाचा गांभीर्याने विचार करून आपल्या मतदार संघात पर्यावरणपूरक उपक्रम राबवून वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची झळ कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
विधानमंडळ सचिवालय, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आणि राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत वातावरणीय बदल या विषयावर आज विधानभवन येथे विधानसभा सदस्यांसाठी सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी श्री. रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. या कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदी उपस्थित होते.
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. ग्रामीण भागात वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ यामुळे शेती पिकांवर विपरीत परिणाम जाणवत आहे. याकरिता ग्रामीण भागातील तरूण लोकप्रतिनिधींनी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. राज्यातील विविध विभागांना ज्याप्रमाणे अर्थसंकल्पात निधी राखून ठेवला जातो. त्याप्रमाणे पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी नियोजनामध्ये निधी राखून ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. वातावरण बदलाशी संबंधित अहवालावरून गंभीर दुष्परिणामांना सामारे जावे लागेल असे सूचविले आहे. याकरिता सर्वांनी उपाययोजना करण्याविषयी जागरूक असणे गरजेचे असल्याचे श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शाश्वत विकासाची देशात 17 उद्दिष्टे देण्यात आली आहेत. त्यात पर्यावरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. वातावरणीय बदलाच्या गंभीर दुष्परिणामाची तीव्रता कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षात जे विविध उपक्रम राबविले आहेत त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. याचाच परिणाम म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला आहे.
श्री.आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने पर्यावरण विभागाने माझी वसुंधरा अभियान राबविले. यामध्ये दीड कोटी नागरिकांनी पर्यावरणपूरक सवयी अंगिकारण्यासाठी ई-शपथ घेतली. शालेय शिक्षणात माझी वसुंधरा हा अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. राखीव वनक्षेत्र, वृक्ष कायद्यात सुधारणा, इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021, आरे जंगलातील 808 एकर वनाचे संरक्षण, 24 हजार 179 एकर पेक्षा जास्त खारफुटीचे संरक्षण, 43 अमृत शहरांचा रेस टू झिरो मध्ये सहभाग आदी कौतुकास्पद उपक्रम राबविल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम आपल्या घरापर्यंत आले आहेत. आपण आपली जबाबदारी ओळखून पुढे जाणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी पर्यावरण संवर्धनाच्या वैश्विक कामाकरीता एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपण गावापासून सुरूवात केल्यास जागतिक स्तरावर त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल. पर्यावरणविषयक उपक्रम राबविण्याबाबत सांगतांना श्री.ठाकरे म्हणाले, वातावरण बदलाचे दुष्परिणाम काय होत आहेत, कसे होत आहेत हे सर्वांना माहिती आहे, परंतू ते का होत आहेत हे आता लक्षात आल्याने याविषयी गांभीर्याने काम करून आजच कृती करणे तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगिकार करणे गरजेचे आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी यावेळी आयपीसीसी अहवाल आणि वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम याविषयी सादरीकरण करून शासनाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी माहिती दिली.
शेवटी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव विद्यानंद रानडे यांनी जागतिक हवामान बदलाशी सुसंगत जलसंपदा व्यवस्थापन या विषयावर विवेचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी आमदार हेमंत टकले यांनी केले. तर पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
इन्टरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज च्या अहवालानुसार वातावरणीय बदलाविषयी सादरीकरणातील महत्त्वाचे मुद्दे
· वातावरणीय बदल ही वास्तविकता आहे. ते आपल्या दाराशी आले असून त्यावर आताच कृती करण्याची वेळ आली आहे.
· 1850 ते 1900 या कालावधीतील सरासरीपेक्षा जागतिक तापमान 1.1 अंश सेल्सियस ने वाढले आहे. याचे अनेक भयावह परिणाम (जसे- अतिवृष्टी, चक्रीवादळ, उष्णतेची लाट, तीव्र दुष्काळ, वणवे, बर्फाचे आवरण कमी होणे, समुद्राच्या पातळीत वाढ इ.) जाणवू लागले आहेत. 1.5 किेवा त्यापेक्षा अधिक तापमानवाढ झाल्यास त्याचे परिणाम महाराष्ट्रासारख्या उष्ण कटिबंधावर सर्वाधिक जाणवतील. मुंबई, कोकणचा भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण होईल. मध्य महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ निर्माण होऊ शकेल. जंगलांतील वणवे हे कार्बन शोषण्याऐवजी कार्बन उत्सर्जनाचे स्त्रोत बनतील.
· राज्यात पश्चिम किनारपट्टीवर नुकतेच वायू (2019), निसर्ग (2020), तौक्ते (2021), शाहीन (2021) ही उष्णकटिबंधीय चक्रीवादळे आली आहेत.
· पावसाच्या दिवसांची संख्या घटली असून पाऊस येण्या-जाण्याच्या वेळा अनिश्चित झाल्या आहेत. तर, ठराविक भागात अधिक पाऊस पडत आहे. कुठे अतिवृष्टी तर कुठे अतिदुष्काळ होत आहे. राज्यात दुष्काळ, अवकाळी पाऊस यांच्या संख्येत वाढ होत आहे.
· किनारपट्टी पाण्याखाली जाण्याचा धोका असलेल्या भारतातील 12 शहरांमध्ये मुंबईचा समावेश आहे.
· 2050 पर्यंत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील प्रमुख भूभाग पाण्याच्या खाली जाण्याची शक्यता असेल.
· राज्यात उष्णतेच्या लाटा निर्माण होतील, शेतीवर आणि जंगलांवर परिणाम होईल. प्राण्यांपासून होणाऱ्या रोगांचा प्रसार होईल.
· मागील पाच वर्षात महाराष्ट्राला अतिवृष्टीमुळे पोहोचलेली झळ 21,068 कोटी रूपये इतकी आहे.
· या परिणामांचा विचार करून राज्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वातावरणीय बदल परिषद स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार वातावरण बदल रोखण्यासाठी पर्यावरण विभागाबरोबरच ऊर्जा, परिवहन, बांधकाम, उद्योग, कृषी, नगरविकास या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे.
· कार्बन शोषण वाढविण्यासाठी पाणथळ क्षेत्रे, हरित क्षेत्रे, खारफुटी क्षेत्रे आदींचा विकास करण्यास प्राधान्य.
· माझी वसुंधरा अभियानाद्वारे भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश आदींना केंद्रित करून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामाध्यमातून सकारात्मक बदल घडवून शाश्वत विकासाचा पाया रचला आहे. माझी वसुंधरा 2.0 मध्ये एकूण 11,968 संस्थांनी नोंदणी करून मोठा प्रतिसाद दिला आहे.
· इलेक्ट्रीक वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रीक वाहने वापरण्याचा निर्णय.
· राज्य शासनाच्या या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल. ग्लासगो येथील वातावरणीय बदल परिषदेत राज्याला प्रेरणादायी नेतृत्वाचा पुरस्कार.
· पुढील वाटचालीत- हरित क्षेत्राची निर्मिती, जैवविविधता व स्थानिक प्रजातींवर भर, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन; रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण, स्वयंपाकासाठी कमी कार्बन उत्सर्जन करणारी इंधने, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा; जलसंधारणासाठी रेन वॉटर हॉर्वेस्टिंग, ठिबक सिंचन, पाणवठ्यांची पुनर्स्थापना, सांडपाणी प्रक्रिया; अक्षय ऊर्जा, ऊर्जा बचत करणारी उपकरणे, बायोगॅसचा वापर, सौर पंप, हरित इमारती; पर्यावरण विषयक जागरूकता, माहिती प्रसारण, ग्रीन चॅम्पियन्स, ई-शपथेची पूर्तता आदींवर भर दिला जात आहे.
रिक्षा-टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांनो, इकडे लक्ष द्या🙏🐾
नॉर्मल मीटर आणि सेटिंग मीटर मध्ये फरक ओळखायचा असेल तर एक विशेष प्रकारचे बटन ड्राइवर च्या हाताखाली किंवा त्याच्या बाजूस लपवून ठेवलेले असते ते बटन आपल्या निदर्शनास येत नाही पण ते बटन दाबताच मीटर मध्ये एक्स्ट्रा डॉट येतो..तो तुम्हाला सुरवातीचे मीटरभाडे निरखून पाहिल्यावर दिसून येईल..
उदा.
रिक्षा - 18.00✔
18.00.❌
(दुसऱ्यामधे दोन डाॅट दिसतील)
इथे समजून जावे की मीटर मध्ये सेटिंग करण्यात आली आहे.. अशातच तो डॉट मधे मधे ब्लिंक होत राहतो आणि मीटर फास्ट चालते..आणि ग्राहकाला वाजवीपेक्षा ज्यादा पैसे मोजावे लागतात. हेच बटन बंद केल्यास तो डॉट पण नाहीसा होतो...
त्या साठी तुम्ही सर्वप्रथम मीटर मध्ये डॉट आला आहे की नाही याची खातरजमा करूनच मीटरची चौकशी/खात्री करून घ्या आणि अशा हरामखोरांस पोलिसांच्या ताब्यात द्या जेणे करून बाकी लोकांची आर्थिक लूट होणार नाही...
आम्ही पण रिक्षा चालवतो पण अशा हरामखोरांमुळे बाकी रिक्षा चालकांना पण नाहक त्रास सहन करावा लागतो, ह्यांच्या मुळेच बाकी रिक्षाचालकांचे नाव पण बदनाम होते हे दुर्भाग्य हे जे पण अशी मीटर मधे सेटिंग करून वाजवी पैसे कमवत असतील त्यांना कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे आणि गरीब जनतेची लूट थांबवली गेली पाहिजे...
*मुंबई रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघ*
*ही माहिती जास्तीस जास्त लोकांमध्ये शेअर करा.*
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...