Wednesday, 22 December 2021

 बैलगाडा शर्यतीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे

- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

            मुंबई दि. 22 : राज्य सरकारच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी मिळाली आहे.बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील बैलगाडा शर्यत सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, या संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले आहे

            पशुसंवर्धन मंत्री केदार म्हणाले, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कारण्याबाबत अधिनियम, 2017 च्यानियमांचे पालन करून राज्यात बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास राज्य सरकारने परवानगी दिली. या नियमांचा भंग झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

            उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशामुळे राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यंत बंद होती. या प्रकरणी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. गेल्याच आठवड्यात न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने मंजूर केलेल्या अधिनियम, 2017 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून बैलगाडी शर्यत आयोजनास पशुसंवर्धन विभागाने परवानगी दिली असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

000000


 मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे लाभार्थींना आवाहन

            मुंबई, दि. 21 : समाज कल्याण विभागामार्फत मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी यांनी केले आहे.

              सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पन्न व अर्ज अट नाही अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थींनी या योजनेचा लाभ घेवू शकतात. या शिष्यवृत्तीसाठी पाचवी ते सातवी या वर्गाकरिता 600 रूपये तर इयत्ती आठवी व दहावी करिता रूपये १०००/- रूपये वार्षिक लाभ देण्यात येतो. इयत्ता 9 वी व 10 वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी लाभार्थ्याचे उत्पन्न दोन लाखाच्या आत असणे आवश्यक आहे अनुसूचित जातीचे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेवू शकतात. त्यांना २२५० रूपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते. अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी जातीची अट नाही, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते दहावी करिता वार्षिक ३००० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते.

            मॅट्रिकपूर्व शिक्षण फी व परिक्षा फी करिता उत्पन्नाची अट नाही, तीन अपत्यपर्यंत या योजनेतंर्गत फी देता येते, वेळोवेळी विहीत केलेल्या दराप्रमाणे अनूसूचीत जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गमधील १० वीच्या विद्यार्थ्यांना रूपये 385/- इतकी वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते. माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थांना गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी ५०% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यानी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. अनुसूचीत जातीमधील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक 500/- रूपये, अनुसूचीत जातीच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक 1000/-, विमुक्त जाती भटक्या जाती विशेष मागास प्रवर्ग साठी 200/-रूपये तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग साठी रूपये ४०० वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.

            दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील मागासवर्गीय विद्यार्थांना शिक्षण शुल्क व परिक्षा फी करिता दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे शिधा पत्रिका, विना अनुदानित संस्थामध्ये शिक्षण घेणा-या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या घटकातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. इयत्ता पहिली ते चौथीसाठी १००/-रूपये इयत्ता पाचवी ते सातवी १५०/-रूपये, इयत्ता आठवी ते दहावी २०० रूपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.

            इयत्ता 5 वी-7 वीत शिकणा-या इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट नाही मुलींचे आधार संलग्न बँक खाते आवश्यक इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थीनीसाठी वार्षिक ६०० रूपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.इयत्ता 8-10 वीत शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थीनींना सावित्रिबाई फुले शिष्यवृत्ती योजना उत्पन्न अट नाही मुलींचे आधार संलग्न बॅक खाते आवश्यक आहेत. या योजनेसाठी इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यींनीना वार्षिक १००० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते.

          इयत्ता 1 ली ते 10 वीत शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी २ लाख उत्पन्न मर्यादा व ६० उपस्थिती आवश्यक आहेत विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेवू शकतात इ.1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना शंभर रूपये प्रमाणे वर्षभर ही शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच इयत्ताही नववी ते दहावीसाठी रूपये १५० प्रमाणे १५०० रूपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.

                 इयत्ता 1 ली ते 10 वीत शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी अडीच लाख रूपये उत्पन्न मर्यादा आहे. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १५०० वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते अशी माहिती समाजकल्याण विभाग मुंबई शहर व उपनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

******



 कतारचे नवे वाणिज्यदूत राज्यपालांना भेटले

वर्ल्ड कप फूटबॉल पाहण्यास येण्याचे राज्यपालांना निमंत्रण

कोरोना काळात द्रवरूप ऑक्सिजन उपलब्ध केल्याबद्दल

राज्यपालांनी मानले आभार

          मुंबई, दि. 22 : कतारचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

          सर्व जगाचे लक्ष लागून असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचे यजमानपद भूषविण्यास कतार सिद्ध झाला असून राज्यपालांनी वर्ल्ड कप पाहण्यासाठी कतारला यावे असे निमंत्रण अल-सुलैती यांनी यावेळी राज्यपालांना दिले. भारतीय लोक कतारच्या विविध क्षेत्रांत मोठे योगदान देत असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.

          कतारने दोहा येथे भारतीय दूतावासाला तसेच भारतीय राजदूतांच्या निवासस्थानासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे नमूद करून भारताने देखील कतारच्या वाणिज्य दूतावासासाठी मुंबई येथे जमीन उपलब्ध करून द्यावी अशी विनंती अल सुलैती यांनी केली.

          कोरोना संसर्गाच्या काळात कतारने भारताला वैद्यकीय द्रवीभूत ऑक्सिजन निःशुल्क उपलब्ध करून अनेक लोकांना जीवदान दिल्याबद्दल राज्यपालांनी वाणिज्यदुतांकडे आभार व्यक्त केले.

          कतारने भारतात विविध क्षेत्रांत गुंतवणूक करावी व भारताच्या विकासात सहभागी व्हावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. मुंबईत पाहिजे असलेल्या जमिनी संदर्भात दुतावासाने प्रस्ताव दिल्यास आपण त्याचा पाठपुरावा करू असे राज्यपालांनी वाणिज्यदूतांना सांगितले.

0000

Qatar Consul calls on Maharashtra Governor

         Mumbai, Dt. 22 : The newly appointed Consul General of Qatar in Mumbai Ahmad Saad M H Al – Sulaiti called on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Wednesday (22 Dec).

          The Consul General told the Governor that Qatar is all set to host the much awaited FIFA World Cup football in 2022. He invited the Governor to visit Qatar during the World Cup. The Consul General told the Governor that people of Indian origin are making a handsome contribution to various walks of life in Qatar.

          The Governor thanked Qatar for making available Liquid Medical Oxygen to Maharashtra during the COVID – 19 pandemic. This helped in saving many precious lives, said the Governor. The Governor appealed to Qatar to invest in various sectors in India and become partners in development.

0000



 विधानसभा तालिका अध्यक्षांची निवड

            मुंबई, दि. 22 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तालिका अध्यक्षांच्या नावांची विधानसभेत घोषणा केली.

            सदस्य सर्वश्री भास्कर जाधव, संजय शिरसाट, बाळासाहेब पाटील, कुणाल पाटील, कालिदास कोळंबकर यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड केली.

००००

School punishment by exercise

 🔴 शाळेत आपल्या आदरणीय शिक्षकांनी केलेल्या काही शिक्षा आठवल्या कि, पुन्हा एकदा त्यांचे आभार मानावेसे वाटतात. कारण, त्यांतून त्यांनी काय शिकवले ते बघा..!

१) *बाकावर उभे राहा :-*

😳😳 आपली पातळी उंचवा. मोठे स्वप्न बघा. ☺

२) *हात वर करून उभे रहा :-*

😨😨 उच्च धेय्य ठेवा, उंची गाठा. 😊😊

३) *भिंतीकडे तोंड करून उभे रहा :-*

😱😱 आत्मपरीक्षण करा. 😀😀

४) *वर्गाबाहेर उभे रहा :-*

😁😁 चार भिंतीतून बाहेर या, जग बघा. 😄😄

५) *गुढगे टेका :-*

😔😒 विनम्र व्हा. 😀😄

६) *कोंबडा व्हा :-*

😁😳😟 शारीरिक सहनशक्ती वाढवा. 😀😄😃

७) *फळा पुसा :-*

😒😤😖 झाले गेले विसरा आणि नव्याने सुरुवात करा.😄😄😃

८) *तोंडावर बोट ठेवा :-*

😷🙊🙊 (स्वत:च्या) बाता कमी मारा. 😉😄😃

९) *कान धरा :-*

😁😁😳 लक्षपूर्वक ऐका.😀😄😄

१०) *वाका, अंगठे धरून उभे रहा :-*

😟😦😧 लवचिक बना.😉☺😃

११) *हा धडा दहा वेळा लिहा :-*

😁😁😳 अचूकतेसाठी सराव करा. 😀😄😃

१२) *शाळा सुटल्यावर थांबा :-*

😣😩😫 जीवघेण्या स्पर्धेत उतरू नका, विशेष व्यक्ती बना! 

👍👍 *एक लाईक आणि शेअर शाळेतील आठवणींसाठी* 

आवडलं म्हणून.

Antarnaad,manntramugadh

 


 औद्योगिक संबंध संहिता नियम -2021 च्या मसुद्याबाबत

 हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम 2021 चा मसुदा शासनाने 3 डिसेंबर 2021 रोजी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केला आहे. या मसुद्याबाबत हरकती व सूचना 45 दिवसांच्या आत सादर कराव्यात, असे कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक संबंध संहिता, 2020 अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, 2021 चा मसुदा नियम महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://maharashtra.gov.in तसेच कामगार विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://mahakamgar.maharashtra.gov.in यावर कायदा व नियम शिर्षाखाली प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या प्रारुपाबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी-20, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकूल, वांद्रे पूर्व, मुंबई – 400051 या कार्यालयात किंवा कामगार आयुक्तालयाच्या mahalabourcommr@gmail.com वर स्विकारण्यात येतील.

            या अधिसूचनेवर नमूद केलेला कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी या प्रारूपाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेकडून प्राप्त होणारे आक्षेप किंवा सूचना, राज्य शासनामार्फत विचारात घेण्यात येतील, असे कामगार आयुक्त यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Featured post

Lakshvedhi