Monday, 29 November 2021

 कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा

केंद्राच्या सूचनांची वाट  पाहता तातडीने कामाला लागा

                        -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

--------------------

लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा

विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश

----------------------

'कुछ नही होता यारहे अजिबात चालणार नाही

            मुंबईदि. 28: कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहेमात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावीपरत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाहीत्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने  नियमित मास्क वापरणेअनावश्यक गर्दी  करणेसुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणेविशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय  देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेयासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट  पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

            आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. "कुछ नही होता यारअसा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मास्क  वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा.

करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित प्रकारामूळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीपोलीस आयुक्तपोलीस अधीक्षकमुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतलीत्यावेळी ते बोलत होतेयावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेवैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखराज्याच्या टास्क फोर्सचे डॉ संजय ओकडॉ शशांक जोशीडॉ राहुल पंडितडॉ अजित देसाईडॉ खुस्राव्ह बजानडॉ केदार तोरस्करडॉ झहीर अविराणी , डॉ वसंत नागवेकरडॉ नितीन कर्णिकमुख्य सचिव सीताराम कुंटेप्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास<span lang="HI" style="font-size: 12.0pt; line-height

कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा

केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा

                        -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

--------------------

लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा

विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश

----------------------

'कुछ नही होता यार' हे अजिबात चालणार नाही

            मुंबई, दि. 28: कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

            आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. "कुछ नही होता यार" असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा.

करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित प्रकारामूळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ अजित देसाई, डॉ खुस्राव्ह बजान, डॉ केदार तोरस्कर, डॉ झहीर अविराणी , डॉ वसंत


Sunday, 28 November 2021

 *👉 जेष्ठ नागरिकांन साठी रेल्वे प्रवासी सवलती सविस्तर माहिती👇🏼👇🏼*

1⃣➖ पुरुष जेष्ठ नागरिक सवलती चे वय ६० वर्ष पूर्ण किंवा त्या पेक्षा जास्त

2⃣➖ स्त्री जेष्ठ नागरिक सवलती चे वय ५८ पूर्ण किंवा त्या पेक्षा जास्त 

3⃣ ➖पुरुषांना 40 % रेल्वे प्रवासी भाडे सवलत 

4⃣➖ स्त्रीयांना 50% रेल्वे भाड़े सवलत 

5⃣➖मेल/ एक्सप्रेस/राजधानी/ शताब्दी/ जनशताब्दी/ दुरंतो या रेल्वे प्रवासी गाड्या मध्ये कोणत्याही श्रेणी मध्ये ही सवलत मिळणार

 6⃣➖रेल्वे आरक्षण / अथवा सर्व साधारण टिकीट काढताना कोणताही वयाचा दाखला द्यावयाची आवश्यकता नाही

7⃣➖परंतु रेल्वे प्रवास करतांना मात्र रेल्वे टिकीट तपासणीस ( TC ) ने मगितल्यास वयाचे दाखला संबंधित पुरावा म्हणून पैनकार्ड ,आधारकार्ड ,वाहनचालन परवाना, अथवा कोणतेही फ़ोटो असलेले शासनमान्य ओलखपत्र देणे अनिवार्य 

8⃣➖जेष्ठ नागरिक आपले रेल्वे टिकिट कोणत्याही टिकिट / आरक्षण कार्यालयातून अथवा इंटरनेट द्वारे खरेदी करू शकता

 9⃣➖प्रवासी आरक्षण पद्धति (PRS) मध्ये जेष्ठ नागरिक, गरोदर स्रीयां, तसेच जांचे वय 45 पेक्षा जास्त असणाऱ्या महिला अशांना रेल्वे त प्रवास करताना लोअर बर्थ ची आरक्षित सेवा दिली जाते 

🔟➖प्रत्येक रेल्वे प्रवासी गाड़ी मध्ये स्लिपर क्लास मध्ये 6 बर्थ, एसी -3 ,एसी-2 मध्ये 3 बर्थ राजधानी/दूरंतो मध्ये 4 बर्थ वरील आरक्षण साठी नियोजित राहणार आहेत 

🆓➖ जेष्ठ नागरिक ,आजारी प्रवासी, दिव्यांग प्रवासी यांना व्हील चेयर मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे

 🆕➖ तसेच जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शी मदतनिस ( अधिकृत कुली) हवा असल्यास त्याचे वेगळे शुल्क भरावे लागणार आहे

 🆕➖ रेल्वे प्रशासन द्वारे काही महत्वपूर्ण रेल्वे स्थानका मध्ये आजारी, दिव्यांग, आणि जेष्ठ नागरिक प्रवासी साठी बैटरी वर चालणारी आधुनिक व्हीलचेयर मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे 

➡➖जेष्ठ नागरिक ,दिव्यांग, आणि आजारी रेल्वे प्रवासी च्या सेवे साठी IRCTC विशेष ‼️यात्री मित्र सेवा‼️ अनेक मोठ्या रेल्वे स्थानकात सुरु केली आहे वरील सवलती साठी प्रवासी ऑनलाईन बुकिंग करू शकता

 ✅ रेल्वे प्रवासी गाडी सुटल्या नंतर वरील सवलती चे आरक्षित लोअर बर्थ रिकामे असल्यास रेल्वे टिकिट तपासणीस वेटिंग चार्ट मधील जेष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला यांना प्रथम प्राध्यान्य देवून उर्वरित बर्थ इतर सर्व सामान्य प्रवासी ना देऊ शकतात 

➖वरील सर्व महत्वपूर्ण माहिती सर्व रेल्वे प्रवासी पर्यंत पोहचवावी आणि गरजु नी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती.🌹दिनेश वावगे, वाशिम जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती सचिव.

 


 


 आता वेळ आली आहे की करदात्यांची अखिल भारतीय संघटना स्थापन करावी.

 जी जगातील सर्वात मोठी संघटना असेल!!

 आता देशात टॅक्स पेअर्स युनियनची स्थापना झाली पाहिजे. शासन कोणतेही असो, या करदाता संघाच्या मान्यतेशिवाय, ना मोफत वीज, ना मोफत पाणी, ना मोफत वितरण, किंवा कर्जमाफीची घोषणा कोणीही करू शकत नाही, ना कोणतेच सरकार. यासारखे काहीही अंमलात आणा.

 पैसा आपल्या कर भरणामधून येतो, त्यामुळे त्याचा वापर कसा करायचा हे सांगण्याचा अधिकारही आपल्याला असायला हवा.

 पक्ष मतांसाठी फुकट वाटून आमिष दाखवत राहतील, कारण त्याचा फायदा त्यांना होतो. ज्या काही योजना जाहीर करायच्या त्या आधी त्याची ब्ल्यू प्रिंट द्या, युनियनची संमती घ्या आणि हे अगदी खासदार आणि आमदारांचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या इतर सवलतींनाही लागू व्हायला हवे.

 लोकशाही फक्त मतदानापुरती मर्यादित आहे का?

 त्यानंतर आम्हाला कोणते अधिकार आहेत??


 राईट टू रिकॉल अशा कोणत्याही ‘फ्रीबीज’चीही लवकरच अंमलबजावणी व्हायला हवी.


 तुम्ही सहमत असाल तर कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. हे करण्यासाठी, पोस्ट शेअर करा.


 


 

Saturday, 27 November 2021

 मुंबई शहर मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवारी


विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा संबंधितांनी लाभ घ्यावा

-राजीव निवतकर जिल्हाधिकारी मुंबई शहर

            मुंबई, दि.26 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१ ते दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ( Special Summary Revision Programme) जाहिर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सदर कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करणे / मतदारांचे नाव, पत्ता, फोटो यामध्ये दुरुस्ती करणे आणि मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची वगळणी इ. बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदार, महिला आणि समाजातील वंचित घटकांतील मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी दि. २७ नोव्हेंबर, २०२१ व दि. २८ नोव्हेंबर, २०२१ रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

            मुंबई जिल्हयातील नवमतदार दिव्यांग/अपंग व्यक्ती, देह व्यवसाय करणाऱ्या महिला तसेच वंचित घटकातील व्यक्ती किंवा ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांच्यासाठी २७ व २८ नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी मतदारांनी जवळच्या मतदार मध्यवर्ती नोंदणी कार्यालयास भेट देवून आपले नाव नोंदणी करावी.

            मतदारांनी नाव नोंदणी करण्यासाठी जवळचे मध्यवर्ती मतदान केंद्र व पदनिर्देशित ठिकाणी भेट द्यावी मतदार केंद्रांची व पदनिर्देशित ठिकाणांची यादी electionmumbaicity.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन online पद्धतीने किंवा Voter Helpline App द्वारे मतदार यादीत आपले नाव नोंदणी करावे, असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, राजीव निवतकर यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi