Friday, 26 November 2021

 मैत्रेय कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा


मिळण्यासाठीच्या प्रक्रियेला गती द्यावी


- राज्यमंत्री शंभुराज देसाe

            मुंबई, दि. 25 : मैत्रेय कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा देण्यासाठी कंपनीच्या मालमत्ता न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने लिलावात काढण्यात याव्यात, असे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी दिले. यासंदर्भात राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरूद्ध एकूण ३२ जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. राज्यमंत्री श्री.देसाई यांनी फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने यावेळी निर्देश दिले.

            गृह राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, मैत्रेय कंपनीने राज्यातील लाखो गुंतवणुकदारांना फसविले असून संबंधित गुन्हेगारांपैकी एक फरार व एक तुरूंगात आहे. हे प्रकरण निकालात काढून मालमत्तेचा लिलाव करण्यासाठीची परवानगी मिळावी यासाठी संबंधित विभागाने न्यायालयास विनंती करावी. न्यायालयाच्या निकालानंतर तातडीने मालमत्ता लिलावात काढण्याच्या प्रक्रियेसंदर्भात सक्षम प्राधिकारी यांनी प्रस्ताव पाठवावा. आर्थिक गुन्हे शाखेने पुढील प्रक्रिया करुन मालमत्ता लिलावात काढावी आणि संबंधित गुंतवणुकदारांना दिलासा द्यावा, असे निर्देशही राज्यमंत्री श्री.देसाई यांनी दिले.

            या बैठकीस आमदार प्रकाश आबीटकर, आमदार किशोर पाटील, आमदार महेश शिंदे, गृह विभागाचे उपसचिव रमेश मनाळे व अन्य अधिकारी उपस्थित होते.


००

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार

परतावा मिळण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी

- राज्यमंत्री शंभुराज देसाई

            मुंबई, दि. 25 : पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळावा यासाठीच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. संबंधित सक्षम प्राधिकरण अधिकारी यांनी कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावासंदर्भातील प्रकिया तातडीने राबवावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासदंर्भात राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री श्री.देसाई यांनी आर्थिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या.


            राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, सिंधुदुर्ग, अमरावती, सातारा, नाशिक, नवी मुंबई, नागपुर येथे या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५१ लाख गुंतवणुकदारांची फसवणूक झाली आहे. या गुंतवणुकदारांना दिलासा देण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने मालमत्ता लिलावाची प्रक्रिया करण्यात यावी. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा असे निर्देशही राज्यमंत्री श्री.देसाई यांनी दिले.

            या बैठकीस आमदार प्रकाश आबीटकर, आमदार किशोर पाटील, गृह विभागाचे उपसचिव रमेश मनाळे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


०००



 राज्यात अधिक ठिबक क्षेत्र वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील

कृषिमंत्री दादाजी भुसे

फळबागेव्यतिरिक्त इतर पिकेही ठिबक सिंचनाखाली यावी यासाठी प्रयत्न करणार

 

               मुंबईदि. 25 : राज्यातील ठिबक सिंचन क्षेत्र अधिक वाढावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज आहेअसे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

               ठिबक सिंचन असोसिएशन सोबत विविध विषयांवर आज मंत्रालयात कृषिमंत्री श्री. भुसे यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कृषी सचिव एकनाथ डवलेसहसचिव सुशील खोडवेकरफलोत्पादन संचालक कैलास मोतेउपसचिव श्रीकांत आंडगे आदींसह ठिबक सिंचन साहित्य निर्मिती करणारे उत्पादक यावेळी उपस्थित होते.

               राज्य शासनाने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 55 टक्के अनुदाना व्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदाना व्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान कमाल 5  हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास मान्यता दिली आहे. त्याचा लाभ राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या फळबागेसाठी ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. इतर पिकांनाही ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ठिबक सिंचन साहित्य निर्मिती करणारे उत्पादकविक्रेते यांनीही त्याची निकड शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी कृषी मंत्री श्री. भुसे यांनी केले. राज्यामध्ये आतापर्यंत 25.72 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून या नवीन योजनेमुळे त्यामध्ये निश्चितपणे वाढ होईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

               विशेषता विदर्भ आणि मराठवाडा भागात कापूस पीक लागवडीपूर्वी कृषि विभाग तसेच या उत्पादकांनीही तसेच ज्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म तसेच ठिबक सिंचनाचा वापर केला आहे त्यांनी इतर शेतकऱ्यांना ही आवश्यकता पटवून देण्याची गरज आहे. केवळ विक्रीपुरते मर्यादित न राहता ठिबक सिंचन असोसिएशनने  विक्रीपश्चात व्यवस्थापन कसे करावेयासंदर्भातही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. ठिबक सिंचन प्रणालीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी कृषि विभाग लक्ष ठेवून आहे. शेतकऱ्यांच्याच लाभासाठी ही योजना आहे. मात्रयात साखळी निर्माण होणार नाहीयाची दक्षता कृषि विभाग घेईलअसे त्यांनी स्पष्ट केले.

               ठिबक सिंचन अनुदानासाठी अधिक निधी कसा उपलब्ध होईलहे पाहिले जाईल. ज्यांचे अनुदान प्रलंबित आहेत्यांनाही लवकरच ते अनुदान देण्यासंदर्भातील कार्यवाही होत असल्याची माहिती, सचिव श्री. डवले यांनी दिली.

               यावेळी ठिबक सिंचनासाठी पूरक अनुदानाचा निर्णय घेतल्याबद्दल ठिबक सिंचन असोसिएशनच्या वतीने मंत्री श्री. भुसे आणि सचिव श्री. डवले यांचा सत्कार करण्यात आला.

                                                            

 संविधान दिनी 'महापुरुष डॉ. आंबेडकर' माहितीपटाचे

समाज माध्यमांवर प्रसारण

            मुंबई, दि. 25 : संविधान दिनानिमित्त 'महापुरुष डॉ. आंबेडकर' या दुर्मिळ माहितीपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर उद्या २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता एकाच वेळी प्रसारण करण्यात येणार आहे.

            डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या १६ मिनीटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्वाचा ऐतिहासिक दस्ताऐवज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केला आहे.

            या चित्रपटात डॉ.आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. तर, जी.जी. पाटील यांनी चित्रपटाचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते.

            महापुरुष डॉ.आंबेडकर यांची जीवनागाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी तसेच या दुर्मिळ माहितीपटास पाहता यावे यासाठी याचे प्रसारण करण्यात येत असल्याचेही महासंचालनालयामार्फत कळविले आहे.

मुंबई विभागाअंतर्गत महासंचालनालयाच्या

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR या लिंकवर हा माहितीपट पाहता येईल.


०००



 आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आज “महाराष्ट्र दिन”


 


            नवी दिल्ली, 25 : महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या दि.26 नोव्हेंबर रोजी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जाणार आहे. येथील प्रगती मैदानावर 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिना’चे उद्घाटन अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त (महाराष्ट्र सदन) शामलाल गोयल यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय माहिती प्रसारण विभागाचे सचिव अपुर्व चंद्र हे असणार आहेत.


            पिनॅक इव्हेंट्स ॲण्ड मॅनेजमेंट या संस्थेच्यावतीने ‘महाराष्ट्राची लोककला’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मेळाव्यातील एम्फी थिएटर (हॉल क्रमांक 2 ते 5 जवळ) येथे सांयकाळी 5:30 वाजता होणार आहे.


            भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या अंतर्गत व्यापार मेळाव्याच्या बाराव्या दिवशी शुक्रवारी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गणेश वंदना, भुपाळी, ओवी, भारूड, गोंधळ, गण, गवळण, पोवाडा, शाहिरी, लावणी, कोळी गीत, जागरण, जोगवा असे लोककलेचे विविध प्रकार सादर केले जाणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गायक स्वत: गायन करतील आणि त्यावर कलाकार त्यांची-त्यांची कला सादर करतील.


            या सांस्कृतिक कार्यक्रमास येथील दिल्लीकरांनी अधिकाधिक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे यांनी केले आहे.


००००



Jai hind


 

 *पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी उत्तम आरोग्यासाठी सांगितलेल्या उपयुक्त सूचना :*


*THE PERFECT LIFESTYLE"*


हे पाळल्यास तुमच्यापासून आजारपण खूप लांब राहील.... आपण *स्लिम अँड फिट राहाल....*


*कायम तारुण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ....*


1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे *9.30 ते 10.00* ला झोपणे.


2. सकाळी *5.00 -5.30* अगदी *उशिरा 6* बाजता किंवा त्याच्या आत उठणे.


3. ब्रश करायच्या *आधी एक ग्लास गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.*


4. 10 मिनिटे *वज्रासनात* बसणे.


5. कमीत कमी फक्त *10 सूर्यनमस्कार* जास्तीत जास्त 25 हळुवारपणे घालणे.


5. फक्त *10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी...5 मिनिटे ओंकार करणे*


6. रोज न चुकता एक *आवळा किंवा आवळ्याचा रस.*


7. *8.00-9.00 वाजता भरपूर नाष्टा* (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)


8. 12.30 ते 1.30 ला थोडे *हलके जेवण.*


9. ऑफिसमध्येच दर *1 तासांनी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.*


10. संध्याकाळी *7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.*


11. कंपल्सरी *15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.*


12. 9 ते 9.30 वाजता *1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 9.30 ते जास्तीत जास्त10.00 ला झोप.*


★ *खबरदारी घ्या...*


*रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे,* 

किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात....

*म्हणजे शंभर पावले चालणे....*


लोकं 5-5 किलोमीटर घाम गाळत चालून येतात रात्री....


* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण *नंतर एक तासाने पाणी पिणे,*


 *पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास, जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.*


* रोज कमीत कमी *3 लिटर पाणी प्यावे.*


* फक्त *सिजनल* फळेच खावीत.


* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि, *कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.*


 * *दररोज डाव्या कुशीवर* झोपावे.


* *सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.*


*एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही* 

आणि

 वर दिलेले सर्वच्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यांसाठीच आहेत.


संकलन व् प्रसारण 

।।क्रीडाभारती पुणे।।


*health शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*


(१) ९०% आजार हे *पोटातून* होतात, पोटात *अॕसिडीटी, कब्ज* नसला पाहिजे, पोट *स्वच्छ, साफ* तो आरोग्याचा *राजा*.


(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.


(३) *१६० प्रकारचे रोग ❌फक्त "मांसाहाराने" होतात हे लक्षात ठेवा.*


(४) ८० प्रकारचे आजार❓❌ *नुसत्या चहा पिण्याने* होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला *विषारी डोस* आहे.


(५) ४८ प्रकाचे रोग *अॕल्युमिनियम भांडी* वापरल्याने होतात. त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत.


(६) तसेच *दारू, कोल्ड्रिंक, चहा* याच्या अति सेवनाने *हदय रोग* होऊ शकतो.


(७) *मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे "सडते."*


(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये, यामुळे *पाचनशक्ती मंद होते,* शरीर *कमजोर* होते.


(९) *केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.*


(१०) *गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते.*


 गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये, *डोळे कमजोर* होतात.


(११) स्नान करताना कधीही *पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका.* कारण, *पॅरालिसिसचा, हदयाचा अॕटक* येऊ शकतो. प्रथम *पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर,* पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे, नंतर डोक्यावर पाणी घ्यावे. त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.


(१२) *उभ्याने कधीही पाणी पिऊ नये..* टाच कायमची दुखु लागते.


(१३) जेवताना वरुन कधीही *मीठ घेऊ नये.* त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.


(१४) कधीही *जोराने शिंकू नये,* नाही तर कानाला त्रास होऊ शकतो.


(१५) रोज सकाळी *तुळशीचे पाने* खावीत, कधीच *सर्दी, ताप, मलेरिया* होणार नाही.


(१६) जेवणानंतर रोज *जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॕसिडिटी होत नाही.*


(१७) सतत कफ होत असेल, तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.


(१८) नेहमी पाणी *ताजे प्यावे, विहीरीचे पाणी फार चांगले,* *बाटलीबंद, फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत* त्रास होतो.


(१९) पाण्याने होणारे रोग *यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग* या पासून *लिंबू* आपल्याला वाचवते.


(२०) *गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.*


(२२) *स्वयंपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा, नाही तर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.*


(२३) *मातीच्या भांडयात* स्वयंपाक केल्यास *१००%* पोषक, काशाच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९७% पोषक, पितळेच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९३% पोषक, *अॕल्युमिनियमच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते.*


(२४) *गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.*


(२५) *१४ वर्षाच्या खालील मुलांना मैद्याचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नयेत.*


 (२६) खाण्यास *सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ* 

त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण, हे मीठ फार *विषारी* असते.


(२७) भाजलेल्या ठिकाणी *बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी*, यातील काही लावले, तर थंड वाटते व व्रण पडत नाही


(२८) *पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.*


(२९) *खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.*


(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच *हळद* लावा.


(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल, तेव्हा दात घासू नये.


(३२) *फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते.* पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.


(३३) *सकाळचे भोजन राजकुमारा सारखे* तर *दुपारचे भोजन राजासारखे* आणि *रात्रीचे भोजन भिकाऱ्या सारखे असावे*

 *जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.*


 *आपलं जीवन म्हणजे अनमोल ठेवा आहे. त्याचा उत्तम सांभाळ करूया.*  


*जनहितार्थ*

Thursday, 25 November 2021

 धर्मादाय रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना

उत्तम आरोग्य सेवेसाठी समिती प्रयत्नशील

- विधि व न्याय राज्यमंत्री तथा समिती प्रमुख आदिती तटकरे

जास्तीत जास्त रुग्णांना लाभ मिळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याबाबत

समिती सदस्यांच्या धर्मादाय कार्यालयास सूचना

            मुंबई, दि. 25 : तदर्थ संयुक्त समितीच्या सूचनेनुसार धर्मादाय खाजगी रूग्णालयांमध्ये समिती सदस्यांची नावे, उपलब्ध बेडसंख्या, योजनेची माहिती रुग्णालयांच्या प्रवेशद्वारी दर्शनी भागात लावण्यात आली आहे. यामुळे योजनेंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील रूग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होत आहे. जास्तीत-जास्त गरीब रूग्णांना वैद्यकिय सहाय्य मिळण्याच्या दृष्टीने समिती सकारात्मक कार्यवाही करीत असल्याचे विधि व न्याय राज्यमंत्री तथा समिती प्रमुख कु. आदिती तटकरे यांनी सांगितले.

                        या बैठकीस आमदार ॲड.अशोक पवार, आमदार बालाजी किणीकर, आमदार अजय चौधरी, आमदार बबनराव शिंदे, आमदार राजू पारवे, आमदार राहूल कुल, आमदार अबू आझमी आदी समिती सदस्य तसेच विधान मंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे, सह धर्मादाय आयुक्त आर.यू. मालवणकर, सह धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई नि. सु. पवार, धर्मादाय उपायुक्त एस.एन. रोकडे, सह संचालक आरोग्य सेवा मुंबई डॉ. उल्हास मारुलकर आदी यावेळी उपस्थित होते.

            धर्मादाय खाजगी रुग्णालयात आर्थिक दृष्ट्या दृबल घटकांना वैद्यकिय सेवा देण्याबाबत तपासणी करण्यासंदर्भात तदर्थ समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. याबैठकीत समितीच्या प्रमुख राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी कामाचा आढावा घेतला.

            उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार धर्मादाय खाजगी रुग्णालयातील रुग्णांसाठी त्या रुग्णालयास मिळणाऱ्या दरमहा एकूण मिळकतीच्या 2 टक्के रक्कम निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयास या समिती सदस्यांमार्फत वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. त्यानुसार या योजनेंतर्गत खाजगी रुग्णालयांनी पात्र रुग्णांस आरोग्य सेवा दिल्याचा तपशिलवार अहवाल, रुग्णालयाचा लेखापरिक्षण अहवाल समितीस वेळोवेळी सादर करणे, रुग्णालयातील मेडीकल तथा बाह्य रुग्ण विभागामार्फत होणारे उत्पन्न रुग्णालयाच्या एकूण उत्पन्नात समाविष्ट असणे, समितीच्या विविध मागण्या व आवश्यकतांनुसार आरोग्य मंत्री यांचेसमवेत समितीची बैठक आयोजित करणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

            यावेळी उपस्थित समिती सदस्यांनी धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड व रेशन कार्ड याखेरीज अन्य प्रकारे उत्पन्नाची पडताळणी करण्यात येत असल्याबाबत माहिती बैठकीत समोर मांडली. योजनेंतर्गत खर्च केलेली रक्कम व शिल्लक रक्कम, पात्र उमेदवारांना सहज या योजनेंतर्गत आरोग्य सुविधा मिळाव्या. त्यासाठी समितीसदस्यांनी या रुग्णालयांना भेटी देणे आदी सूक्ष्म नियोजनातून जास्तीत- जास्त रुग्णांना याचा लाभ देण्यासाठी धर्मादाय कार्यालयामार्फत रुग्णालयांना सूचित करण्यात यावे, असे मत मांडले.

            धर्मादाय अंतर्गत गरजू रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी विभागीय स्तरावर समितीची स्थापना करण्यात यावी. त्या समितीमध्ये समन्वयासाठी अनुभवी डॉक्टरांचा समावेश असावा. तसेच सरकारी रुग्णालयांनी या योजनेंतर्गत वैद्यकीय सेवा देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव समितीमार्फत देण्यात येईल. तसेच आरोग्य मंत्री यांच्या समवेत समितीच्या विविध विषयांवर आधारित बैठकीचे आयोजन करण्यात लवकरच करण्यात येईल, असे विधि व न्याय राज्यमंत्री तथा समितीप्रमुख कु. तटकरे म्हणाल्या.




Featured post

Lakshvedhi