Tuesday, 16 November 2021

बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

            मुंबईदि. 15 : आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बिरसा मुंडा यांनी आपले जीवन अर्पण केले. त्यांचे कार्य प्रेरणादायी आणि अतुलनीय असून बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला जागृत करण्याचे कार्य करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले. त्यांचे हे कार्य अविस्मरणीय आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिकआर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी शासनही सकारात्मक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त पहिल्या जनजातीय गौरव दिनाचे आयोजन राजभवन येथे करण्यात आले होते. यावेळी आदिवासी बांधवांना संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी बोलत होते.

            या कार्यक्रमास राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमारआदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुडआदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे आदि उपस्थित होते.

            राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणालेबिरसा मुंडा यांच्या कार्याला अभिवादन म्हणून शासनाने त्यांचा जयंती दिन 'जनजातीय गौरव दिनम्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी समाज कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. देश निर्माणासाठी आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग आहे. आदिवासी समाजाची एक स्वतंत्र जीवनशैली आहे तसेच रुढीप्रथापरंपरा आहेत त्यांची जपणूक केली पाहिजे. आदिवासी बांधवांच्या पारंपरिक व्यवसायशेती यांना चालना दिली तर दुर्गम भागात राहणारा हा समाज प्रगती करेल. असेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

            यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते सामूहिक वन हक्क दावे लाभार्थीवैयक्तिक वन हक्क दावे लाभार्थीवनहक्क पट्टे  मिळालेले लाभार्थीप्रकल्प अधिकारी डहाणू अंतर्गत आश्रमशाळा येथील सर्वात लहान उपग्रह निर्मिती प्रकल्पातील सहभागी जागतिक विक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारमहाराष्ट्र शासनातर्फे सुपर 50 विशेष कार्यक्रमाअंतर्गत जे.ई.ई. आणि नीटमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थीराज्यातील एकलव्य निवासी शाळा मधील विद्यार्थीमाऊंट एव्हरेस्ट सर केलेले गुणवत्ताधारक विद्यार्थीनागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत तयारीसाठी प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेले विद्यार्थीआदिवासी समाजातील शासकीय योजनेचा लाभ घेतलेले यशस्वी उद्योजकचित्रपट कलाकार, धातूपासून शिल्प तयार करणारे कलाकारमहिला बचत गटधारक यांचा सत्कार करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना टॅबचेही वाटप करण्यात आले.

            कार्यक्रमाच्या सुरवातीला आदिवासी बांधवांनी ढोल नृत्य आणि तारपा नृत्य सादर केले,यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी आदिवासी बांधवांनी उभारलेल्या बचतगटाच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अनुपकुमार यादव यांनी केले. आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी आभार मानले

 तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविणार

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

·        स्टार्टअप प्रदर्शनातून तरुणांमधील संशोधननवसंकल्पनांना मिळाली चालना

·        साधारण ५० स्टार्टअप्स७० हून अधिक गुंतवणूकदारांचा सहभाग

            मुंबईदि. 15 : नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप प्रदर्शन (Startup Expo - VC Mixer) हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. प्रदर्शनात ५० स्टार्टअप्ससह साधारण ७० हून अधिक गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला. तरुणांनी शोधलेल्या विविध स्टार्टअप्सच्या नवनवीन संकल्पनांची गुंतवणूकदारांनी पाहणी केली व त्यामध्ये गुंतवणुकीत स्वारस्य दाखविले. तरुणांमधील संशोधननवसंकल्पना यांना चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतीलअसे कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.   

            हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मानाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाहसह मुख्य कार्यकारी अधिकारी मिथुन जॉनसिकोया कॅपिटल इंडियाच्या मुख्य सार्वजनिक धोरण अधिकारी श्वेता राजपाल-कोहली आदी मान्यवर उपस्थित होते. ­

            Startup Expo - VC Mixer च्या माध्यमातून स्टार्टअप्स व गुंतवणूकदार यांना एकमेकांशी जोडणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्र स्टार्टअप’ सप्ताहातील पन्नासहून अधिक विजेत्या स्टार्टअप्सना संभाव्य निधी उभारणीसाठी आघाडीच्या स्टार्टअप गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याची संधी आजच्या या प्रदर्शनातून मिळाली. यामध्ये Blume Ventures, Avanaa Capital, Sequoia Capital India, Equanimity, IvyCap Venture Advisors, १००X, Indian Angel Network, Tomorrow Capital, Mumbai Angels, Asha Impact, Ankur Capital, Venture Catalysts, Artha Ventures, Ah! Ventures, Lead Angels, Marico Innovation Foundation, IDBI Capital, Majority Fund, Social Alpha यांसारख्या नावाजलेल्या स्टार्टअप गुंतवणूकदारांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

            कौशल्य विकास मंत्री श्री. मालिक यावेळी म्हणालेस्टार्टअप्सला प्रोत्साहनासाठी विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्टार्टअप सप्ताहातून पुढे आलेल्या संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांना १५ लाख रुपयांची शासकीय कामे देण्यात येत आहेत. नविन संकल्पनांना पेटंट मिळविण्यासाठी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या क्षेत्राला अजून पाठबळ देण्यासाठी बीकेसी येथे जागतिक दर्जाचे इनक्युबेशन सेंटर चालू करण्यात येईल. स्टार्टअप्सना ग्रामीणतालुकाजिल्हा पातळीवरही प्रोत्साहन देण्यात येईल. महिला उद्योजकतेला चालनेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. स्टार्टअप्स व गुंतवणूकदारांना जोडून स्टार्टअप्सना त्यांच्या कल्पनांचे मोठ्या उद्योगात रूपांतर करण्यासाठी Startup Expo – VC Mixer हा उपक्रम फायदेशीर ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा म्हणाल्याभारतातील काही सर्वात मोठ्या स्टार्टअप्सच्या यशोगाथांचे  मूळ महाराष्ट्रात आहेज्या आज जागतिक स्तरावरही आपल्या यशाची पताका झळकवत आहेत. राज्य शासन आणि स्टार्टअप परिसंस्थेतील भागधारक  यांच्या संयुक्त भागीदारीने पारंपरिक तसेच नवीन काळातील क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची मोठी क्षमता आहे. प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सच्या क्षमता बांधणीसाठी सिकोया इंडियाचा सर्ज उपक्रम व त्याची मार्गदर्शक पुस्तिका अतिशय उत्तम आहे. सर्वसमावेश पाठबळामुळे महाराष्ट्रातून येत्या काळात जास्तीत यशस्वी स्टार्टअप्स निर्माण होतीलअसे त्यांनी सांगितले.

            नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह म्हणाले,  महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहांतर्गत विजेत्या स्टार्टअप्सना त्यांच्या उत्पादनसेवेच्या प्रकल्पांची शासनाच्या विविध विभागांबरोबर प्रायोजिक तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी १५ लाख रुपयांचे कार्यालयीन आदेश देण्यात येतात.  यामध्ये कृषीआरोग्य सेवास्वच्छ ऊर्जापाणी आणि कचरा व्यवस्थापनस्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलताप्रशासनशिक्षण आणि कौशल्य या क्षेत्रांचा समावेश आहे. या वार्षिक उपक्रमाच्या आजवर चार आवृत्या आयोजित केल्या गेल्या असून विजेत्या स्टार्टअप्सचे काम विविध विभागांसोबत चालू आहे. आज आयोजित प्रदर्शनातून या स्टार्टअप्सना नामांकीत गुंतवणूकदारांसमवेत चर्चा करण्याची संधी मिळाली असून यातून तरुणांमधील संशोधनाला मोठी चालना मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व सिकोया कॅपिटल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानेप्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सच्या क्षमता बांधणीसाठी Surge - Founder Starter Pack या मराठीतील  पुस्तिकेचे प्रकाशन झाले. पुस्तिकेतील स्टार्टअप यशस्वीतेची मूलभूत तत्वे महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील उद्योजकांना उपयोगी ठरणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती www.surgeahead.com या संकेतस्थळावर उपलब्ध

Sunday, 14 November 2021

Jai ho

 बालगोपाळांच्या कट्टी – बट्टीने राज्यपाल प्रभावित

राज्यपालांच्या हस्ते अतुल परचुरे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान

उषा नाडकर्णी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

संगीतकार ओंकार घैसासदिग्दर्शक जयंत पवारअनुश्री फडणीसप्रकाश पारखी

राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

            मुंबई, दि. १४:    लहान मुलांना संस्कार देण्याचे स्थायी कार्य कुटुंबसमाज व सांस्कृतिक संस्थांकडून होत असते. या संस्कारांच्या माध्यमातून समाज घडतो व समाजाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचे कार्य होतेअसे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            बालदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमीसाठी कार्य करणाऱ्या 'गंधारकला संस्थेतर्फे  लहान मुलांच्या 'कट्टी बट्टीया कार्यक्रमाचे  तसेच 'गंधार गौरवपुरस्कार सोहळ्याचे राजभवन येथे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.   

            बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते अतुल परचुरे यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आलातर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना 'जीवन गौरवपुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            आमदार आशिष शेलारआमदार संजय केळकर,  ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की  व गंधारचे अध्यक्ष मंदार टिल्लू व्यासपीठावर उपस्थित होते.

            संगीतकलानाट्य या गोष्टींचा ज्याला गंध नाही अश्या व्यक्तीला विना शेपटीचा पशु संबोधले जातेया अर्थाच्या सुभाषिताचा उल्लेख करून संगीत व नाट्यात दुःख विसरायला लावण्याची ताकत आहेअसे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.  

            'कट्टी बट्टीया कार्यक्रमात लहान मुलांनी सादर केलेल्या बालभारती पुस्तकातील बडबडगीतांना राज्यपालांनी कौतुकाची थाप दिली व बालनाट्य चमूला वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

            बालप्रेक्षक हा महत्वाचा प्रेक्षक आहे व त्याचे पुढे सादर करणे आव्हानात्मक काम असते. करोनाचे निर्बंध संपल्यावर आपण पुन्हा बालनाट्य घेऊन रसिकांपुढे येऊअसे अतुल परचुरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

            राज्यपालांच्या हस्ते दिग्दर्शक जयंत पवारनिवेदिका अनुश्री फडणीससंगीतकार ओंकार घैसास व प्रकाश पारखी यांना गंधार युवा गौरव पुरस्कार देण्यात आले.

            गंधार ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून कार्य करीत असून संस्थेने १०० च्या वर बालनाट्य सादर करून त्याचे हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले.   

Applauds Children’s theatre on Bal Din

Maha Governor presents Gandhar Gaurav Puraskar to Atul Parchure; senior actor Usha Nadkarni is honoured with Jeevan Gaurav Puraskar

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari applauded children’s musical performance and acknowledged the role of children’s theatre in shaping the personality of children at a function held at Raj Bhavan, Mumbai on Sunday (14th Nov).

The Governor also presented the Gandhar Gaurav Puraskar for 2021 to theatre and film personality Atul Parchure and gave the Lifetime Award to actress Usha Nadkarni for her contribution to theatre.

The Children’s programme and the awards presentation function was organized by Gandhar Arts, an organization promoting children’s theatre at Raj Bhavan Mumbai.

MLA Ashish Shelar, MLA Sanjay Kelkar, music composer Ashok Patki and Chairman of Gandhar Art Mandar Tillu were present. 

The Governor also presented the Gandhar Yuva Gaurav Puraskars to director Jayant Pawar, Anushree Fadnis, musician Omkar Ghaisas and theater personality Prakash Parkhi.

0000

Featured post

Lakshvedhi