Saturday, 13 November 2021

 महाड शहरात भविष्यातील पूरसदृष्य परिस्थिती टाळण्यासाठी  सावित्री नदीच्या पात्रातील दगडमाती आणि वाळू उत्खननासंदर्भात परिसर सर्वेक्षणाचा अहवाल तातडीने सादर करावा

- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

 

            मुंबई, दि. 10 : महाड परिसरात भविष्यात पुरामुळे दुर्घटना तसेच वित्त आणि मनुष्यहानी होऊ नये यासाठी जलदगतीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. सावित्री नदीच्या पात्रातील दगडमाती आणि वाळू उत्खनन करण्यासंदर्भात तेथील परिसराचे पर्यावरणीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण करून तातडीने त्याचा अहवाल पर्यावरण विभागाच्या मान्यतेसह सादर करावागाळ काढण्याचे काम कालमर्यादेत पूर्ण करावे असे निर्देश महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

 

            महसूल मंत्री श्री. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सावित्री नदीच्या पात्रातील वाळू-दगड उत्खननाबाबतच्या कामाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भविष्यातील मनुष्यहानी व वित्तहानी टाळण्यासाठीच्या दृष्टीने जलदगतीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिका-यांना दिले. यावेळी बंदरे विकास विभागाचे मंत्री अस्लम शेखमाजी आमदार हुस्नबानो खलीफेमहसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीरपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे संचालक श्री. टोकेमेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनीकोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील हे उपस्थित होते.  याचबरोबर पालघररत्नागिरीसिंधुदुर्गरायगडचे जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

            महसूलमंत्री श्री. थोरात म्हणालेया वर्षी सावित्री नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दगडमातीवाळूचा गाळ असल्याने तेथे पाणी साचून ते महाड शहरामध्ये जाते यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्यहानी होते. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी या भागाचे पर्यावरणीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करावा. याचबरोबर गाळ उपसण्याच्या कामास गती द्यावी. आपत्ती टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कामासाठी सर्व विभागांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून व सहकार्याने काम करणे गरजेचे असल्याचेही मंत्री श्री. थोरात यांनी यावेळी सांगितले. नदी पात्रातील गाळ काढण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील स्थानिकांना सांगितले होते. या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा, असेही मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

            मुंबई, दि. 10 : एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहातबाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठीराज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे कीकृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

००००


 भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आत्मनिर्भर भारत;

14 नोव्हेंबर रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन

 

          नवी दिल्ली, 12 : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. आत्मनिर्भर भारत या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात देशातील सर्व राज्ये आपापल्या राज्याच्या प्रगतीचे दर्शन घडवीत आहेत. महाराष्ट्राने यंदा राज्यातील औद्योगिक वाटचालीचा आलेख आत्मनिर्भर संकल्पनेखाली साकारला आहे. या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते रविवारी दि. 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वा. होणार आहे.

            दि. 14 ते 27 नोव्हेंबर 2021 या कालावधीत प्रगती मैदान येथे 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या मेळ्याची मध्यवर्ती संकल्पना आत्मनिर्भर भारत  ही आहे. या मेळ्यात महाराष्ट्राने आपल्या प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन औद्योगिक वाटचालीतील महाराष्ट्राचा विकास या  संकल्पनेतून साकारले आहे.

            आत्मनिर्भर ही संकल्पना मांडताना यंदा उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी तसेच डिजीटलई-तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासनिर्यातलघुउद्योगस्टॉर्टअपला चालना देणारे धोरणआदी सर्वच विषयांना स्पर्श करणारे आकर्षक प्रदर्शन यंदा महाराष्ट्राने आयोजित केले आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणारे 13 स्टॉल्स असणार आहेत. बचत गटांचे 8 स्टॉल्सकारागीरांचे 7 स्टॉल्ससूक्ष्मलघुमध्यम उद्योगातंर्गत  येणारे उद्योग समुह (क्लस्टर) चे 8 स्टॉल्स आणि  स्टॉर्टअप चे 6 स्टॉल्स यंदा असणार आहेत.

            प्रगती मैदान येथील गेट क्रमांक 5 बीमधील नवीन बांधकाम इमारतीमधील 2 क्रमांक इमारतीतील दुस-या मजल्यावर महाराष्ट्र दालन आहे. या महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन रविवारी दि.14 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते होणार आहे. या उद्घाटनप्रसंगी उद्योग राज्यमंत्री कु. अदिती तटकरेमहाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडेअपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त श्यामलाल गोयल उपस्थित राहतील. यावर्षी भागीदारी राज्य बिहार असून फोकस राज्य झारखंड आहे.

००००


 आरोग्य विभागाच्या तत्सम योजना

जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर शासन निर्णय निर्गमित

 

            मुंबईदि. 12 : राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या तत्सम योजनांना जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण) म्हणून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. याबाबतचे शासन निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार निर्गमित झाले आहेत.

            या शासन निर्णयानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीउपकेंद्रांसाठी औषधी साहित्य व साधन सामुग्री खरेदी करणे. प्राथमिक आरोग्य केंद्रांचेउपकेंद्रांचे बांधकामविस्तारीकरणदेखभालदुरूस्ती व परिक्षण करणे. अग्न‍िसुरक्षा यंत्रणा खरेदी तसेच देखभाल दुरूस्ती करणे, रूग्णालयाच्या इमारतींचेविद्युत जोडणीचे लेखापरिक्षण करणे. पीट बरियल बांधकाम करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रमाणकानुसार (मंजूर संख्येनुसार) रूग्णवाहिकांची खरेदी करणे तसेच देखभाल दुरूस्ती करणे. प्राथमिक आरोग्य केंद्रांचेउपकेंद्रांचेआयुर्वेदिकयुनानी दवाखान्यांचे बळकटीकरणसोयी-सुविधांमध्ये वाढ करणे. जिल्हा परिषद दवाखानेप्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम करणे आदी योजनांना राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण)म्हणून राबविण्यात येणार आहे.

            राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत रूग्णालयासाठी औषधीसाहित्यसाधनसामुग्री खरेदी करणे. रूग्णालयांचे बांधकाम विस्तारीकरणदुरूस्ती व देखभालअग्न‍िसुरक्षा यंत्रणा खरेदी तसेच देखभाल दुरूस्तीरूग्णालयांच्या इमारतींचेविद्युत जोडणीचे लेखापरिक्षण करणे आदी योजना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)म्हणून राबविण्यात येणार आहे.

            या शासन निर्णयामुळे राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच सर्व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यवाही सुरू करतील. नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे या निर्णयामुळे शक्य होणार आहे.

*******


 

 

 

 यंदा राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार;

राज्याबाहेरील व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा

                                              - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

            मुंबईदि. 12 :कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेलीहीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबरपासून सुरू होईलअशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली. सांस्कृतिक कार्य संचालनालयमार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध केंद्रांबरोबरच राज्याबाहेरील संघांसाठी एक व देशाबाहेरील संघांसाठी एक अशी दोन नवीन ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतीलअसेही त्यांनी सांगितले.

            राज्याच्या हीरक महोत्सवी व देशाच्या अमृत महोत्सवी तसेच स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून  स्पर्धेची व्याप्ती अधिक वाढविण्यात येत आहे.  त्यामुळे राज्याबाहेरील व देशाबाहेरील मराठी रंगकर्मींना या स्पर्धेचा लाभ घेता येईल यामुळे मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होईल,असा विश्वास  श्री.देशमुख यांनी व्यक्त केला.

            सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले, की दर वर्षी या स्पर्धांमधून जवळजवळ एक हजार संघ सहभागी होतात. या सर्व संघांच्या माध्यमातून जवळपास 20 हजार कलाकार वीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. अनेक रंगकर्मीसंस्थासंघटना यांनी या स्पर्धा लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी केली होती. त्या मागणीस अनुसरूनकोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या डिसेंबर पासून संपूर्ण राज्यात नेमून दिलेल्या केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

            मराठी हौशी नाट्य स्पर्धाबालनाट्य स्पर्धासंगीत नाट्य स्पर्धासंस्कृत नाट्य स्पर्धाहिंदी नाट्य स्पर्धादिव्यांग नाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील रंगकर्मींनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घेऊन कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करूनप्रयोग सादर करावेत असेही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आवाहन केले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही लवकरच घेण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

००००

 राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

गृहमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून; पोलीस प्रशासनाला दक्ष राहण्याचे निर्देश

 

          मुंबई, दि. 12 : त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

            गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे   कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

            यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावेअशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.

            तसेच पोलीसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचनाही  त्यांनी दिल्या आहेत.

 दिलखुलासकार्यक्रमात नगररचना विभागाचे संचालक नोरेश्वर शेंडे

यांची मुलाखत

 

         मुंबईदि. १२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास या कार्यक्रमात नगररचना विभागाचे संचालक नोरेश्वर शेंडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एअरया ॲपवर शनिवार दि. १३  सोमवार दि.१५,मंगळवार दि.१६ आणि बुधवार दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

              नगररचना विभागाची कार्यपद्धती,प्रादेशिक योजना,विकास योजना आणि नगर रचना योजना कशा प्रकारे केल्या जातात आदि विषयांची माहिती श्री. नोरेश्वर शेंडे यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

०००

Featured post

Lakshvedhi