Wednesday, 10 November 2021

 प्राध्यापक व प्राचार्य पदभरतीचा मार्ग मोकळा

प्राध्यापकांची 2088 तर प्राचार्यांची 370 रिक्त पदे भरण्यास मान्यता

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 

            मुंबईदि. 10 : उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील 370 प्राचार्य व 2088 सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

            आरोग्य विषयक कारणास्तव प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेउपमुख्यमंत्री अजित पवार आणि वित्त विभागाने भरती प्रक्रियेवरील निर्बंध शिथील करुन पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. ही भरती टप्प्याटप्प्याने होणार असून याबाबतचा शासननिर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईलअसेही श्री.सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणालेउच्च शिक्षण विभागांतर्गत प्राचार्यशिक्षक व शिक्षकेतर पदांपैकी राज्याच्या उच्चस्तरीय सचिव समितीने एकूण 4738 पदांना मान्यता दिली होती.  त्यापैकी १६७४ पदे आज रोजी पर्यंत भरण्यात आली. कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे दिड ते दोन वर्षापासून भरतीवर राज्य शासनाने निर्बंध घातले होते. आजपर्यंतच्या ३७० प्राचार्यांची १०० टक्के रिक्त पदे भरण्यास दि.२३ मार्च २०२१ रोजीच्या च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. तसेच त्याबाबतची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. आता यापुढे प्राचार्याची रिक्त होणारी पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

            १ ऑक्टोबर २०२० च्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे विभागाने सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला होता. परंतु २०८८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार असून यशस्वी उमेदवारांची नियुक्ती सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात करण्यात येणार असल्याचेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

बिगर नेट / सेट अध्यापकांना जुनी पेन्शन

            23 ऑक्टोबर 1992 ते दि. 3 एप्रिल 2000 या कालावधीत नियुक्त बिगर नेट/रोट अध्यापकांची सेवा खंडीत न करता सेवानिवृत्तीपर्यंत सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली होती. या कालावधीत नियुक्त बिगर नेट / सेट अध्यापकांना सेवानिवृत्तीवेतनाचे लाभ मिळत नव्हता. उच्च न्यायालयाने आदेशानुसार या कालावधीत नियुक्त बिगर नेट / सेट अध्यापकांना त्यांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक ग्राह्य धरून तत्कालीन प्रचलित धोरणानुसार जुनी सेवानिवृत्ती वेतन अनुज्ञेय करण्याबाबतचा २९ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसाधारण ४१३३ अध्यापकांना जुन्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ झाला असल्याचेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

तासिका तत्वावरील कनिष्ठ अधिव्याख्यातांच्या मानधनात 25 टक्के भरीव वाढ

            उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय व अनुदानित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदांसाठी घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या कनिष्ठ अधिव्याख्यात्यांच्या मानधनाचे दर सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मानधनाच्या दरात सर्वसाधारण 25 टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आली असून ही वाढ केवळ 3 वर्षाच्या कालावधीत करण्यात आलेली आहे. अशासकीय अनुदानित महाविद्यालयात सन २०१८-१९ मध्ये एकूण ९३३१२०१९-२० मध्ये ७२१२ व २०२०-२१ मध्ये एकूण २२६४ याप्रमाणे तासिका तत्वावर अध्यापक कार्यरत होते.

तासिका तत्वावरील नियुक्तीच्या नवीन पर्यायी धोरणाबाबत समिती

            तासिका तत्वावरील नियुक्तीच्या धोरणाचा आढावा घेवून नवीन पर्यायी धोरणाबाबत शासनास शिफारस करण्यासाठी संचालकउच्च शिक्षण पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईलअसेही श्री.सामंत यांनी सांगितले.

मिशन युवा स्वास्थ्य उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे लसीकरण

            दि. २५ ऑक्टोंबर२०२१ ते २ नोव्हेंबर२०२१ या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला असून उच्च शिक्षण विभागांतर्गत एकूण ८१८८० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तसेच तंत्र शिक्षण विभागांतर्गत एकूण २७०३१ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती श्री.सामंत यांनी यावेळी दिली.

००००

 

 भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी

12 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

 

          मुंबईदि. 10 : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदतसेच त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 17 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतीलअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

          श्री. मदान यांनी सांगितले कीभारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय (निवडणूक विभाग व निर्वाचक गण) विभाजित केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 17 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 24 नोव्हेंबर 2021 रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 26 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

          निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणेनावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकामतदाराचा चुकून विभाग किंवा निर्वाचक गण बदलणेविधानसभेच्या यादीत नाव असूनही निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतातअशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

०-०-०

(Jagdish More, SEC)


 

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत

द्विवार्षिक निवडणूक -2021 कार्यक्रम जाहीर

 

            मुंबईदि. 10 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित जिल्हे/विभागामध्ये तत्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे.

            महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्य सर्वश्री रामदास गंगाराम कदम (मुंबई मतदारसंघ)अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई)सतेज उर्फ बंटी पाटील (कोल्हापूर)अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार)गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम) आणि गिरीषचंद्र बच्छराज व्यास (नागपूर मतदारसंघ) यांची दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी सदस्यत्वाची मुदत समाप्त होत आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 (बुधवार)उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार)मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021 (शुक्रवार)मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतमतमोजणीचा दिनांक - 14 डिसेंबर 2021 (मंगळवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक - 16 डिसेंबर 2021 (गुरूवार).

            आयोगाने नमूद केल्याप्रमाणे कोविड-19 संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्वे तसेच यासंदर्भात दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजीच्या मार्गदर्शक सूचनांमधील परिच्छेद क्र.6 येथे नमूद केलेल्या सूचनांचे निवडणूक प्रक्रियेत भाग घेणाऱ्या व्यक्तींनी पालन करणे आवश्यक आहे.

            भारत निवडणूक आयोगाने मुख्य सचिवमहाराष्ट्र राज्य यांना उपरोक्त निवडणुकीसाठी कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने निवडणुकीचे संचलन तसेच आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिलेले आहेत,


 

 


 राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्या

- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

 

          मुंबईदि. 10 : केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत देशभरात शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement Survey) केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील तसेच सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाहीयाची दक्षता घ्यावीअसे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले.

          विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूकीचे तसेच देशाच्या शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करणे यासाठी होणाऱ्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या अनुषंगाने प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील शिक्षण संचालकउपसंचालकशिक्षणाधिकारीप्राचार्य आणि संबंधितांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा.गायकवाड यांनी संबंधित शिक्षणाधिकारीप्राचार्य यांच्याशी सर्वेक्षणाच्या तयारीबाबत संवाद साधला आणि आढावा घेऊन मार्गदर्शन केले.

            या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णाराज्य प्रकल्प संचालक राहूल द्विवेदीराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.डी.सिंहशिक्षण आयुक्त विशाल सोळंकीशिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकरशिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महेश पालकर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

          अपर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाबाबत मार्गदर्शन केले.

          प्रारंभी श्री.सिंह यांनी राज्यात होणारे सर्वेक्षण आणि त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. राज्य शासनामार्फत शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशभरात एकाच वेळी होणार असल्याने ग्रामीण व शहरी भागात प्रस्तुत सर्वेक्षणासाठी निवडलेल्या सर्व व्यवस्थापनमाध्यमाच्या शाळांतील तिसरीपाचवीआठवी आणि दहावीचे वर्ग दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू राहतील. सदर सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांतील संबंधित मुख्याध्यापकशिक्षकविद्यार्थी तसेच क्षेत्रीय अन्वेषक यांना या सर्वेक्षणाच्या प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वेक्षणासाठी राज्यातील इयत्ता तिसरीपाचवीआठवी आणि दहावीच्या एकूण 7330 शाळांमधील 2 लाख 34 हजार 55 विद्यार्थ्यांची निवड केंद्र शासनामार्फत करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००००

 डिजिटल काळातील शिक्षणाचे स्वरूप’ या विषयावर राजभवन येथे परिसंवाद संपन्न

आगामी काळात शिक्षणामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतींचा मिलाफ असावा'

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

            मुंबई, दि. 10 : कोरोना काळात सर्वच नकारात्मक गोष्टी घडल्या असे नसून मुलांच्या शिक्षणात पालक अधिक लक्ष द्यायला लागले ही निश्चितच जमेची गोष्ट या काळात झाली आहे असे आपण मानतो. कोरोना नंतरच्या आगामी काळातील शिक्षणात ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा मिलाफ असावा.  उभय पद्धतींचे मिश्र शिक्षण हाच शिक्षणाचा भावी मार्ग राहीलअसे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            नवभारत टाइम्स वृत्तपत्रातर्फे राजभवन येथे 'डिजिटल काळातील शिक्षणाचे स्वरूपया विषयावर मंगळवारी (दि. 9) एक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी राज्यपाल बोलत होते.  परिसंवादाला विविध शिक्षण संस्थांचे मुख्याध्यापकप्रशासक व विश्वस्त उपस्थित होते.

            गरज हीच शोधाची जननी असते. ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यासाठी अनेक वर्षे समाजात अनुत्साह होता. मात्र कोरोना काळात सर्वांनी ऑनलाईन शिक्षणाचा अंगीकार केला. अर्थातइंटरनेट सुविधा व स्मार्ट फोन सर्वांना उपलब्ध नसल्यामुळे काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे वर्गखोलीत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला सध्या तरी पर्याय नाही असे मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केले. 

विद्यार्थ्यांचा एकाग्रता अवधी अतिशय कमी झालाय : तज्ज्ञांचे मत

            ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे लाभ सर्वांनी पाहिले आहेत त्यामुळे ही पद्धती कायम राहणार आहे. मात्र विद्यार्थ्यांचा सामाजिक व भावनिक विकासकला व क्रीडा अभ्यास तसेच प्रात्यक्षिक कार्यासाठी प्रत्यक्ष शाळेतील  शिक्षण आवश्यक असल्याचे मत सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

            कोरोना काळात विद्यार्थ्यांचा एकाग्रता अवधी अतिशय कमी झाला असून विद्यार्थ्यांचे लक्ष गुंतवण्यासाठी शैक्षणिक सामग्री विद्यार्थ्यांच्या गरजेप्रमाणे विकसित करावी लागेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. सायबर सुरक्षा या विषयाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध शिक्षण संस्थांना शिक्षण योद्धापुरस्कार प्रदान करण्यात आले.

            कार्यक्रमाला नवभारत टाइम्सचे संपादक सुंदर चंद ठाकूरलतिका शर्माधर्मेंद्र त्यागीराहुल देशपांडेसुमित मेहता प्रामुख्याने उपस्थित होते.


 महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी

12 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

 

            मुंबईदि. 9 (रानिआ): विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतीलअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

            श्री. मदान यांनी सांगितले कीभारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या पोटनिवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 22 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर 23 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

            प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकामतदाराचा चुकून प्रभाग बदलणेविधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतातअशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

            विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे अशी: धुळे- 5,  अहमदनगर- 9नांदेड-वाघाळा- 13मीरा-भाईंदर- 10ड आणि 22सांगली-मिरज-कुपवाड- 16अ आणि  पनवेल- 15ड.

Featured post

Lakshvedhi