Wednesday, 3 November 2021

 *भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणसं..!!!* 


रायगड १००० वेळा चढून जायचा पण कोणी करेल का....???

पण *श्री सुरेश वाडकरांनी* तो केला, आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत. 

सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्षांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसाद देतात. 


*ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते.* 


ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात. 


*एक  जेधे नावाच्या तरुण आहे.* 

हा तरुण *२७ जानेवारी* आणि *१६ ऑगस्टला* एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. *हे सगळं कशासाठी तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून...!!!* कचऱ्यातून आपलं अन्न काढतो असे समजून कुत्रे त्याच्यावर भुंकतात. तो हे काम करतो तेव्हा वेडा वाटतो. त्याला ह्यातून काही मिळत नाही, तरीही तो कर्तव्य समजून दोन दिवस काम करतो.                                      


*डोंबिवलीतही एक वेडे आजोबा आहेत.* 

रेल्वे रूळ ओलांडायला कितीही मनाई केली, दंड केला तरी घाईत असणारे प्रवासी रूळ ओलांडतातच. आजच्या जीवनशैलीमध्ये इतकी धावपळ आहे की प्रसंगी जीवावर उदार होऊन जगावे लागते. पण डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत, ते काय करतात तर जिथून अनेक लोक रेल्वे रुळांवर शिरतात तिथे सकाळी आडवे उभे राहतात. दोन्ही हात लांब पसरवून ते रेल्वे रुळाकडे येणाऱ्यांना अडवतात. मधेच दोन्ही हात जोडून विनंती करतात की रूळ ओलांडू नका, पुलावरून जा. पण समोर लोकल लागली असल्यामुळे अनेकजण त्यांचे हात बाजूला करून रुळावरून धावत सुटतात. डोंबिवली हे तर मृत्यू समोर उभा असेल तरी धावणार शहर. तिथे ह्या आजोबांचं कोण ऐकणार...? तरीही आजोबा नेहमी येऊन उभे राहतात. त्यांना माहित आहे की आज हे रूळ ओलांडतील, पण तसे करणे धोकादायक होते इतके तरी मनात येईलच. आज रूळ ओलांडले तरी उद्या घरातून लवकर निघतील आणि पुलावरून सुरक्षितपणे जातील. 


*मुंबईच्या लोकलमधून फिरणारा एक असाच "वेडा" सिंधी दिसतो.*

 दिसायला खरंच गबाळा आहे. पण काम फार मोलाचं करतो. ऐन उन्हाळ्यात जेव्हा सगळी लोकल तापते, जीव तहानेने व्याकुळ होतो तेव्हा हा सिंधी डब्यात चढतो. त्याच्या हातात दोन मोठ्या थैल्या असतात. थैली उघडतो आणि आपल्या चिरक्या आवाजात *"जलसेवा"* असे ओरडत तो डब्यामध्ये फिरू लागतो. त्यावेळी त्याने थंड पाणी आणले आहे हे पाहून प्रवासी सुखावतात. पाणी पिऊन तृप्त होतात. एकदा एकाने  ह्या सिंध्याला बोलत केलं होतं. त्याने सांगितलं, 

"आम्ही सिंधी लोक तहानलेल्याला पाणी देणं ही झुलेलालची सेवा समजतो." आम्ही उल्हासनगरमध्ये खूप प्रॉडक्ट निर्माण केले. ते विकून पैसे कमावले. पण आम्ही कधी पाणी विकलं नाही. पण साहब, अब वक्त बदल गया..., आता प्यायला मोफत पाणी मिळत नाही, खरीदना पडता है.


*ही अशी वेडी मंडळी पाहिली की शहाणी माणसे खुजी वाटू लागतात.*


खरंच हे जग चालवतो कोण..??? 


स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री म्हणत; खंडाळा घाटात आडवा आलेला डोंगर फोडून त्यात बोगदा बनवण्याचं वेड काहींना लागलं होतं. म्हणून मुंबईची रेल्वे घाटातून वर चढून सगळीकडे गेली.  *ज्यांना वेड लागतं तेच हे जग घडवत आहेत, सुंदर बनवत आहेत.*


वरवर पाहता ही माणसे वेडी वाटतात. कारण जे चारचौघे करत नाहीत ते हे करत असतात. पण त्यांचं काम समजून घेतल्यावर लक्षात येतं की ते जे करतात ती माझीही जबाबदारी आहे. 


*एका दैनिकात एका वाचकाने लिहिले होते की मी आता ७२ वर्षांचा आहे. ह्या ७२ वर्षात मी एकदाही मातृभूमीवर थुंकलो नाही..!!!*


किती छोटी प्रतिज्ञा केली ह्या माणसाने. जमिनीवर न थुंकण्याची. 

आज घडीला भारतातील प्रत्येक भाषेत एक वाक्य भाषांतरित झाले आहे आणि ते म्हणजे; थुंकू नका...!!! आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणे जास्तच घातक बनले आहे. प्रत्येकाने वरील माणसासारखा *"वेडा"* विचार केला तर स्वच्छतेवर होणार प्रचंड खर्च वाचेल. 


एक छोटी प्रतिज्ञा देशाच्या अर्थकारणात बदल घडवेल.


अमेरिका, युरोप सुंदर आहेत हे आपण खूप ऐकलं. आता आपला देशही सुंदर घडवू. थोडा वेडेपणा करू. 


*अजून एक उदाहरण. शर्मा नावाचा एक असाच वेडा आहे. तो कुठेही चारचौघात गप्पा मारताना ऍसिडिटी टाळण्याचे उपाय सांगतो.* 

जेवल्यावर लगेच झोपू नका, अति तिखट खाऊ नका. जेलुसील, रॅनटॅक घेण्यापेक्षा डाळिंबाचा रस किंवा कोकमाचा रस प्या असे उपाय सुचवतो.


सतत मानसिक ताण असलेल्या व्यक्तीला हमखास ऍसिडिटी होते. म्हणून मानसिक ताण असणाऱ्यांनी कोणती योगासने करावीत हे भर रस्त्यावर करून दाखवतो. 

म्हणून ह्या माणसाला *"ऍसिडिटी मॅन"* नाव पडलं आहे. कोणाची ओळख असो वा नसो हा माहिती सांगितल्या शिवाय राहत नाही. हे सगळं तो का करतो...??? तो स्वतः एका मोठ्या कंपनीत केमिकल इंजिनिअर आहे. काही मित्रांना ऍसिडिटी होते हे पाहून ह्याने उपाय शोधले. त्यांना करायला लावले. त्यांचा त्रास कमी होताच ह्याने इतरांना सांगायला सुरुवात केली. रसायनशास्त्र शिकून पैसे मिळवून झाले, आता समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करायचा असे त्याला वाटते. वरवर पाहता हा वेडेपणाच आहे. पण ज्याला सतत आम्लपित्ताचा त्रास होतो त्याला शर्मा हवाहवासा वाटतो. 


*असेच एक आहेत डॉ. भरत वटवानी.*

 पती-पत्नी दोघेही *सायकिऍट्रिस्ट* आहेत. एकदा त्यांना एक भिकारी दिसला. तो गटारीचं पाणी पीत होता. वटवानींनी त्याला आधी प्यायला शुद्ध पाणी दिलं. मग त्यांना कळलं की हा मुलगा गावातून शहरात आला असून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पण मानसिक संतुलन बिघडले आणि तो शहरभर भिकाऱ्यासारखा फिरू लागला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पाठवले. पुढे वटवानी पती-पत्नी रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक मानसिक रुग्णांवर स्वतःच्या खर्चाने उपचार करत गेले. *म्हणून त्यांना  Ramon Magsaysay पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले.* 


*अशी ही बिघडलेली माणसे आहेत.* आपल्याला समाज, मातृभूमी, आपला देश खूप काही देत असतो. कृतज्ञता म्हणून आपणही खारीचा वाटा द्यायला हवा हा विचार त्यामागे असतो. *अशा वेड्या माणसांमुळेच जग सकारात्मक बनतं.* 

*आपणही पृथ्वीतलावर आलो, भारतात जन्मलो. ह्या समाजाचे, मायभूमीचे पांग फेडण्यासाठी थोडा वेडेपणा करायला हवा.*


एक अभंग आहे....;

*"आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना"*

नीट वाचलं की समजतं;  आम्ही *"बी घडलो,"*

तुम्ही *"बी घडाना..!!"*🙏

 संशोधन संस्थेच्या माध्यमातून तरुणाईच्या

 पंखांना बळ देण्याचे काम व्हावे

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

                                             ·         ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या  इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन

 

            बारामतीदि. 2: कल्पनांना पंख फुटण्याचे तरुणांचे वय असते. अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी या पंखांना बळ देण्याचे काम इनोव्हेशन सेंटरसारख्या संस्थांच्या माध्यमातून व्हावेअसे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

            ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती येथील अटल इन्क्युबेशन सेंटर योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या इन्क्युबेशनइनोव्हेशन ॲण्ड सायन्टिफिक रिसर्च सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेसौ. रश्मी ठाकरेपशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणेखासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेतरुणांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी त्यांच्या कल्पनांना पंख फुटले पाहिजेत. या पंखांना गरुडभरारी घेण्याचे बळ आपणा सर्वांना द्यायचे आहे. बारामतीमध्ये उभ्या राहिलेल्या संस्थांच्या माध्यमातून हे काम होत आहे. नूतन इन्क्युबेशन केंद्र हे देशातील सर्वोत्तम केंद्र व्हावेअशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

            परदेशात जाऊन तेथील नव कल्पना व आधुनिक तंत्रज्ञान आणणे महत्त्वाचे आहेअसे सांगून आपला महाराष्ट्र सर्व क्षेत्रात देशात अग्रेसर आहेचपण राज्याला जगातही सर्वोत्तम स्थानावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. राज्याच्या प्रगतीच्या आड येणारे सर्व अडथळे दूर करू असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.

            खासदार शरद पवार म्हणाले50 वर्षांपूर्वी कृषी विकास प्रतिष्ठान (ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट) आणि विद्या प्रतिष्ठानच्या स्थापनेतून बारामती येथे अनुक्रमे शेती क्षेत्रात मौलिक परिवर्तनाची आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची सुरूवात केली. आज शेतीवर अवलंबून असणारे घटक आणि शेती यामध्ये मोठी तफावत आहे. सुमारे 81 टक्के शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरच्या आत जमीन असून त्यापैकी 60 टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. त्यामुळे शेतीवरील भार कमी करणे तसेच शेतीपूरक व्यवसायावर भर दिला पाहिजेअसेही ते म्हणाले.

            स्थापन करण्यात आलेल्या इन्क्युबेशन सेंटरचा उद्देश हा नवीन कल्पना घेऊन येणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देऊनत्यांच्या संशोधनाला साथ देऊन नवीन उद्योजक निर्माण व्हावेत असा आहे. महाराष्ट्रातील अनेक संशोधन संस्थाशिक्षण संस्थांना भेट देऊन तेथील चांगल्या बाबी या इन्‍क्युबेशन सेंटरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून देश आणि जगातल्या उत्तम संस्थांमधील ज्ञान स्थानिक विद्यार्थी आणि अध्यापकांना मिळेलअसा विश्वासही श्री. पवार यांनी व्यक्त केला.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेशालेय विद्यार्थी आणि युवकांमध्ये ज्ञानविज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल. शेतीमध्ये सुधारणा होऊन गरीबांच्या घरी क्रांती व्हावी यासाठी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने सुरुवातीपासूनच काम केले. विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीबातील गरीब घरातील मुलांना शिक्षण घेता येत आहेअसेही ते म्हणाले.

            यावेळी ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. खासदार श्रीमती सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या शरद पवार इन्स्पायर फेलोशीप कार्यक्रमाची माहिती दिली. ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी तसेच अतुल किर्लोस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले.

            कार्यक्रमात ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या स्थापनेपासूनच्या कामाचा आढावा घेणारी चित्रफीत तसेच इन्क्युबेशन सेंटरवरील माहितीची चित्रफीत दाखवण्यात आली.

            यावेळी आमदार संजय शिंदेरोहित पवारमहात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटीलबी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक विजय शिर्केटोरंट फार्माचे चेअरमन समीर मेहताफिनोलेक्स केबल्सचे व्यवस्थापकीय संचालक दीपक छाब्रियासर दोराबजी टाटा ट्रस्टचे माजी व्यवस्थापकीय संचालक व्यंकट रमणनमहिको सीड चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र बारवालेपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरातसकाळ पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड चे चेअरमन व्यवस्थापकीय संचालक प्रतापराव पवारबारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते.

0000


 केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता

‘मार्जिन मनी’ उपलब्ध होण्यासाठी पात्र लाभार्थींना अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 1 : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेंतर्गत राज्याच्या अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यासाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरीता नवउद्योजक लाभार्थींनी ‘मार्जिन मनी’ भरण्याची क्षमता नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थींना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी इच्छुक नव उद्योजकांना या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर यांनी केले आहे.

            अर्ज करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत४ था मजलाआर. सी. मार्गचेंबुर (पूर्व)मुंबई ४०० ०७१, दूरध्वनी ०२२ - २५२२२०२३ ईमेल आयडी acswomumbaisub@gmail.com या पत्यावर अर्ज करावा असे सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर यांनी कळविले आहे.

००००

 बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित मच्छिमारांना

नुकसानभरपाईबाबतच्या धोरणासाठी अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

 

          मुंबईदि. 2 : राज्यातील सागरी क्षेत्रात होत असणाऱ्या बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या मच्छिमारांना नुकसान भरपाईबाबत राज्यस्तरीय धोरण तयार  करण्यात येणार आहे. या धोरणासाठी राज्यातील सर्व मच्छिमारमत्स्यव्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञया क्षेत्रात कार्यरत संघटना आणि मच्छिमार संस्थांनी त्यांचे लेखी अभिप्राय पाठविण्याचे आवाहन पशुसंवर्धनदुग्धविकासमत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रधान सचिवांनी केले आहे.

          उच्च न्यायालयाने रिट याचिका २०१६/२०२१ संदर्भात दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजीच्या आदेशान्वये राज्यातील सागरी क्षेत्रात होत असणाऱ्या बांधकाम प्रकल्पामुळे बाधित  मच्छिमारांना नुकसान भरपाईबाबत राज्यस्तरीय धोरण तयार  करण्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मत्स्यव्यवसाय आयुक्तराज्यातील महाराष्ट्र मच्छिमार संघमहाराष्ट्र मच्छिमार कृती समितीअखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती व पारंपरिक मच्छिमार बचाव कृती समिती यांचेशी चर्चा करण्यात आली. प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पारंपरिक मच्छिमारांना व इतर मत्स्यव्यवसायिकांना न्याय देण्यासह नुकसान भरपाईविषयी चर्चा करण्यात आली. जे मच्छिमार शासनाच्या अभिलेखामध्ये नसतील त्यांच्या शासनामार्फत नोंदी घेण्याविषयी देखील चर्चा झाली. सर्व मच्छिमारांचे अधिकार अबाधित रहावे व मासेमारी क्षेत्र कमी होऊ देऊ नयेअशा सूचना देऊन लेखी स्वरुपात त्यांचे म्हणणे विभागास कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

          राज्यस्तरीय धोरणासाठी राज्यातील सर्व मच्छिमारमत्स्यव्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञया क्षेत्रात कार्यरत संघटना आणि मच्छिमार संस्थांनी त्यांचे लेखी अभिप्राय  commfishmaha@gmail.com  या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन पशुसंवर्धनदुग्धविकासमत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रधान सचिवांनी केले आहे. प्राप्त अभिप्रायांची दखल राज्यस्तरीय धोरणामध्ये घेण्यात येणार असून यासंबंधीची सर्व माहिती fisheries.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

0000


 कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू

 

                                                                           ·         ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी

 

            मुंबईदि. 2 : कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत कोरोनामुळे घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावेत्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावीयासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)च्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण महिलांना समृद्ध व आत्मसन्मानाचे तसेच सुरक्षित जीवन जगता यावेयासाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती होण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून विविध योजनांमध्ये कृतीसंगमाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

            या शासन निर्णयान्वये जिल्हा स्तरावरून गावनिहाय माहिती प्राप्त करून एकल/विधवा महिलांना स्वयंसहाय्यता समुहामध्ये प्राधान्याने समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार विशेष बाब म्हणून एकल/विधवा महिलांचा किमान पाच महिला सदस्यांचा स्वतंत्र स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यात येणार असून त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या समुहातील सदस्यांना फिरता निधी व समुदाय गुंतवणूक निधीही अदा करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या एकल/विधवा महिलांना पीएमजेजेबीवाय व पीएमएसबीवाय योजनेचे 342 रूपये निधी भरण्यास बिनव्याजी कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या महिलांना आरोग्य विमा योजनेचाही लाभ देण्यासाठी पात्र महिलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे.

            उमेदमार्फत एकल/विधवा महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीही प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक/युवतींना दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देतानाही प्राधान्य देण्यात येणार आहे. आरसेटी योजनेअंतर्गत 18 ते 45 या वयोगटातील युवक-युवतींना 10 ते 45 दिवसांचे कृषि विषयक प्रशिक्षणप्रक्रिया उद्योग विषयक प्रशिक्षणउत्पादक विषयक प्रशिक्षण असे विविध व्यवसायांचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

            केंद्र सरकारच्या उन्नती योजनामध्ये पात्र असलेल्या एकल (विधवा) महिलांना प्रशिक्षण देतांना प्रथम प्राधान्य असणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रशासन सहाय्यीत योजनेतही अशा एकल/विधवा महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे बिज भांडवल देण्यात येणार आहे.

            कोरोना महामारीत घरातील कर्त्या पुरूषांच्या कोरोनामुळे अकाली निधनाने कुटुंबांवर जी आपत्ती ओढविलीती या शासन निर्णयामुळे काही प्रमाणात तरी दूर होईलअसा विश्वास हा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर मंत्री श्री.मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

000


 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त

चैत्यभूमी येथील सुविधांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

 

            मुंबईदि. 2 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आढावा घेतला.

            सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीस खासदार राहुल शेवाळेमाजी राज्यमंत्री अविनाश महातेकरसामाजिक न्याय विभागाचे सहसचिव  दिनेश डिंगळेविशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारकेअपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाणमुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकरमहानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकरडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळेभदन्त डॉ. राहुल बोधी महाथेरोसिद्धार्थ कासारे आदी मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोविडचा संभाव्य धोका पाहता गर्दी कमी राहील यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले. कोविडमुळे मागील दोन वर्षी महापरिनिर्वाणदिनी अनुयायांसाठी ऑनलाईन अभिवादनाची सुविधा उपलब्ध करुन दिली होती तशीच सुविधा यावेळी देखील उपलब्ध करुन द्यावी लागेलअनुयायांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना पाणीजेवण आणि वैद्यकीय सुविधेसह इतर सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचनाही श्री.आछवले यांनी यावेळी दिल्या.

            महापरिनिर्वाणदिनी विविध प्रशासकीय विभागांनीमहानगरपालिकेने सर्व आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केले. कोविडच्या काळात अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने केलेल्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.

            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती यावेळी सहायक आयुक्त श्री. दिघावकर यांनी दिली. पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांविषयी डॉ. वारके आणि ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उपस्थितांना माहिती दिली.

            महापरिनिर्वाणदिनी शासनाच्या वतीने विविध सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी यावेळी केली.  बैठकीला सार्वजनिक आरोग्यपोलीसराज्य उत्पादन शुल्कपरिवहनमध्य रेल्वेपश्चिम रेल्वे आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

             इंदू मिल येथे साकारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या स्मारकाच्या कामाचाही यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आढावा घेतला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि या स्मारक प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार यावेळी उपस्थित होते.

००००


 राज्यात 30 नोव्हेंबर पर्यंत शंभर टक्के लसीकरण करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

                                         ·         नागरिकांनी दोन्ही डोसेस घेण्याचे मुख्यमंत्र्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 2 : विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावेअसे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तीन नोव्हेंबर रोजी कोविड लसीकरण आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी बैठक झाली.

            बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना येथून सहभागी झाले. वर्षा निवासस्थानावरील समिती कक्षात मुख्य सचिव सीताराम कुंटेसार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यासआरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामीवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंहमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगेकोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओकसदस्य डॉ. शशांक जोशीडॉ.राहुल पंडित आदी उपस्थित होते.

            कोरोनाची साथ अजून गेलेली नाहीज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. आपआपल्या जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व स्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सूचनाही केल्या.

नागरिकांनी बेफिकीर होऊ नये

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले कीकोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी बेफिकीर होऊ नयेयासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी टेस्टींगचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी आपण प्रयोगशाळा विकसित केल्या. त्याचा वापर करायला हवा.

            कोविडचे संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाहीयाची जाणीव नागरिकांना सतत करुन द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्त़न ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणाबाबत संदेश दाखविण्यात यावेतअसे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाईल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावेअसे सांगितले.

            मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लसीकरणाच्या सांख्यिकीचे जिल्हाधिकारी यांनी विश्लेषण करावे आणि त्याअनुषंगाने लसीकरणाबाबत धोरण ठरवावे. दीपावलीनंतर विशेष उपाययोजना आखून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेअसे सांगितले.

            टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओकडॉ. शशांक जोशीडॉ. राहुल पंडित यांनी ही सूचना मांडल्या. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाणनंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. 

00000


Featured post

Lakshvedhi