Friday, 29 October 2021

 अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट

- महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 

            मुंबई, दि. 28 : एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत  अंगणवाडी सेविकामदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कर्मचा-यांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रूपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

            सन २०२१-२०२२ या वित्तीय  वर्षासाठी भाऊबीज भेट दोन हजार रूपये देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २८ ऑक्टोबर २०२१ रोजी जारी करण्यात आले आहे. यासाठी यंदाच्या वित्तिय वर्षात एकूण 37 कोटी 97 लाख 32 हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकामदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना ही भाऊबीज भेट अदा करण्यात येणार आहे.

०००


 

 कोविड-19 मुळे छत्र हरवलेल्या आठ बालकांना

5 लाख रुपयांच्या मुदत ठेवीचे संरक्षण

 

         ·         पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते मुलांना ठेव प्रमाणपत्राचे वितरण

         ·         मुलांच्या भविष्यासाठी राज्य शासन कायम पाठीशी असल्याची ग्वाही

 

            मुंबईदि. 28: कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष रुपये मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण वस्त्रोद्योगमस्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते करण्यात आले. माता-पित्याचे छत्र हरवलेल्या मुलांच्या भविष्यासाठी राज्य शासन कायम त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार राहुल नार्वेकरजिल्हाधिकारी राजीव निवतकरजिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलारबाल कल्याण समितीचे अध्यक्ष मिलिंद बिडवई यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

            यावेळी पालकमंत्री श्री. शेख म्हणालेकोविड काळाने आपल्यातील अनेकांना हिरावून नेले. आज आठ मुलांना पाच लाख रुपयांची मुदत ठेव त्यांच्या नावे ठेवून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. राज्य शासन अशा छत्र गमावलेल्या मुलांच्या शिक्षण आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याच्या प्रक्रियेत निश्चितपणे त्यांच्या समवेत असणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने राज्य शासन आणि प्रशासन कायम त्यांच्या पाठीशी राहीलअसे त्यांनी स्पष्ट केले.

            आमदार श्री. नार्वेकर म्हणालेखऱ्या अर्थाने या मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कायम या मुलांच्या पाठीशी राहूअसे ते म्हणाले.

            जिल्हाधिकारी श्री. निवतकर म्हणालेजिल्हास्तरीय कृति दलाच्या माध्यमातून दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची माहिती घेण्यात आली.त्याचप्रमाणे एकल पालक गमावलेली मुलेपती गमावलेल्या महिला या सर्वांची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यांनाही राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती शेलार यांनी केले.  या कार्यक्रमास छत्र हरविलेल्या मुलांचे जवळचे नातेवाईकबालकल्याण समिती सदस्य,  उपस्थित होते.

            जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती शेलारजिल्हा परिविक्षा अधिकारी  पी. व्ही शिनगारेपरिविक्षा अधिकारी स्नेहा जोशी,  विधी सल्लागार श्रीमती.सविता ठोसर यांच्यासह जिल्हा बाल संरक्षण कक्षमुंबई शहर कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

0000


 राज्‍यपालांची आदर्शगाव राळेगणसिद्धीला भेट

 

            अहमदनगरदि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- राज्‍यपाल श्री. भगत सिंह कोश्‍यारी यांनी पारनेर तालुक्‍यातील आदर्श गाव असलेल्‍या  राळेगणसिद्धी येथे भेट दिली. यावेळी त्‍यांनी पद्मभूषण अण्‍णा हजारे यांची भेट घेतली आणि त्‍यांच्‍या  संकल्‍पनेतून साकारलेले ग्रामविकासाचे आजपर्यंतचे सर्व उपक्रम व लोकसहभागावर आधारित नाविन्यपूर्ण कामाची माहिती जाणुन घेतली.

            राज्‍यपाल श्री. कोश्‍यारी यांनी स्‍वर्गीय नवलभाऊ मीडिया सेंटरला भेट दिली. त्‍यावेळी त्‍यांनी गावातील विकासकामांची माहितीअण्‍णा हजारेंच्‍या कार्याची माहिती सांगणाऱ्या छायाचित्र दालनाची पाहणी करुन माहिती घेतली. त्‍यानंतर जनआंदोलन संग्रहालयाला भेट देऊन त्‍यांनी 1980 ते 2020 पर्यंतच्‍या 40 वर्षातील अण्‍णा हजारेंच्‍या विविध आंदोलनाच्‍या इतिहासाची माहिती ज्‍येष्‍ठ  समाजसेवक अण्‍णा हजारे यांच्‍याकडुन जाणुन घेतली. तत्‍पुर्वी त्‍यांनी गावाच्‍या  सुरूवातीला असलेल्या कोहिणी नाला बंडींग (प्‍लास्‍टीक अस्‍तरीकरण)पाणलोट कामाचीगॅबियन कम्‍पोजिट बंधारा या उपक्रमांची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. त्‍यांनी आदर्शगाव राळेगणसिध्‍दी गावातील गावकऱ्यांशी संवाद साधला व गावाच्‍या विकासाबाबत त्‍यांची मते जाणून घेतली.

            गावाच्‍या भेटीनंतर राज्‍यपाल श्री. भगत सिंह कोश्‍यारी यांनी शासकीय हेलिकॉप्‍टरने मुंबईकडे प्रयाण केले.

****

 राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना

दिवाळीपूर्वी सर्व मानधन देण्यात येणार

-- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

            मुंबईदि. 28 : राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे ३०,००० पात्र लाभार्थींच्या खात्यात दिवाळीपूर्वी सर्व मानधन जमा होईलअसे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.

     श्री. देशमुख यांनी सांगितले कीऑक्टोबर २०२१ अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यात येत असूनयासाठी २८ कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झालेली आहे.राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी  राज्य शासनाकडून ही योजना सन १९५५ पासून राबवण्यात येते. अलीकडेच या मानधनधारकांच्या   मानधनात वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत श्रेणीनिहाय  (‘अ’ श्रेणी रुपये 3150,  ‘ब’ श्रेणी रुपये 2700‘क’ श्रेणी रुपये 2250 )  मानधन दरमहा अदा करण्यात येते.

००००

 *🌹एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात.*



*पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!*

         

      🌹🌻 *|| शुभ सकाळ ||*🌻🌹


 

 आपदग्रस्ताना एकूण ५ हजार २२१ कोटींची मदत

- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

 

            मुंबईदि. 28 : राज्यात २०२१ या वर्षामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात उदभवलेल्या पूरस्थितीमुळे जुलैमध्ये झालेल्या शेतपिकाच्या  नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख व ऑगस्ट - सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानिकरिता ४ हजार ८६४ कोटी असे  एकूण ५ हजार २२१ कोटी रुपये इतका निधी आपदग्रस्तांना मदत म्हणून उपलब्ध करून दिला असल्याची माहिती पत्रकारपरिषदेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

            मदत व पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणालेऑगस्ट व सप्टेंबर २०२१ मध्ये राज्यातील २३ जिल्हे अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झाले. या नैसर्गिक संकटामुळे २३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना सुद्धा शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात शासनाने मदत केली आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे या कठीण परिस्थितीत शेतकऱ्याला आधाराची गरज आहे. खचलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करून त्याला या संकटातून बाहेर काढता यावे व रब्बी हंगामासाठी त्याला आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यात आली असून ती मदत वितरित करण्याचे काम सुरु करण्यासाठी आदेश दिले असल्याचे श्री.वडेट्टीवार यांनी सांगिले. 

            अतिवृष्टी व महापुरामुळे राज्यातील २३ जिल्ह्यातील एकूण ४७ लाख ५५ हजार ७४७  हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बाधित क्षेत्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण रू.४८४६.६६ कोटीची मदत शासनाने घोषित केलेली आहे. देय असलेल्या एकूण रक्कमेच्या ७५% (3634.99 कोटी रुपये) मदतीचे वाटप सुरू झाले असून त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झाला आहे. जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानिकरिता दि. ६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ३६५ कोटी ६७ लाख रुपये, ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ पर्यंत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे  बाधित शेतकऱ्यांना दि. २६ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये १४ जिल्ह्याकरिता रू. २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपये तर दि. २७ ऑक्टोबर, २०२१  रोजीच्या शासन निर्णयान्वये ९ जिल्ह्याकरीता रू. ७७४ कोटी १५ लाख ४३ हजार रुपये  इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून  मदतीचे वाटप सुरू झाले असल्याचे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

              शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करताना २६ ऑक्टोबरच्या शासन निर्णयाप्रमाणे केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम वर्ग करण्याचे दिवाळीनंतरसुद्धा सुरु रहाणार आहे. २०१४ ते २०१९ दरम्यान शेतकऱ्यांना फक्त एनडीआरएफच्या निकषानुसार मदत करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव ठेवून शासनाने शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला असल्याचे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

००००

Featured post

Lakshvedhi