Wednesday, 27 October 2021

 खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत

सायकलिंग खेळाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन

            मुंबईदि. 27 : आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया निपुणता केंद्र अंतर्गत सायकलिंग या खेळाची निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून निपुणता चाचणीमध्ये खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई उपनगरजिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

            जिल्हास्तरावर २ मुले आणि २ मुलींची निवड करण्यात येणार आहे. यासाठी एकूण गुणानुक्रमे प्रथम आलेले २ मुली आणि २ मुले यांना राज्यस्तर निवडचाचणी करिता पाठविण्यात येणार आहे. राज्यस्तर निवडीसाठी जे खेळाडू सायकलिंग या खेळात राज्य व राष्ट्रीयस्तरावर सहभाग झालेले आहेत व ज्या खेळाडूंची जन्मतारीख जानेवारी २००७ ते २००९ दरम्यान आहे. अशा खेळाडूंना थेट राज्यस्तरावर जिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई उपनगर यांच्यामार्फत चाचणीस उपस्थित राहता येईल.

• जिल्हास्तर निवड चाचणी दि 09 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 8.00 वा. भारतीय खेळ प्राधिकरण कांदिवली येथील ट्रॅकवर घेण्यात येईल. चाचणीकरीता इच्छुक खेळाडू यांनी आपली संपूर्ण माहिती पूर्ण नावसंपर्क क्र. dsomumbaisub2020@gmail.com वर दि ०३ नोव्हेंबर 2021 पर्यंत ई -मेलद्वारे कळवावी

• चाचणीसाठी येणा-या खेळाडू यांची जन्मतारीख जानेवारी 2007 ते 2009 दरम्यान असावी. • राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सहभागी झालेले खेळाडू (जन्मतारीख जानेवारी २००७ ते २००९ दरम्यान असावी) यांना राज्यस्तर चाचणीकरिता थेट उपस्थित राहता येणार आहे अशा सर्व खेळाडू यांनी त्यांचे सायकलिंग या खेळाचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सहभाग व क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र सर्व तपशीलासह माहिती या कार्यालयास dsomumbaisub2020@gmail.com वर दि 03 नोव्हेंबर 2021 पर्यंत ई मेल द्वारे पाठवून निपुणता चाचणीमध्ये खेळाडूनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई उपनगर यांनी केलेले आहे.

 पदभरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणासंदर्भात

नियमाप्रमाणे कार्यवाही करावी

- सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 

 

            मुंबई, दि. 27 : प्रकल्पग्रस्तांसाठी पदभरतीमध्ये पाच टक्के समांतर आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या आरक्षणासंदर्भातील नियमांचे सक्तीने पालन करण्यात यावे. यापूर्वी झालेल्या पदभरतीमध्ये या नियमांचे पालन झाल्यासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

            राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अनुकंपाधारकप्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीतील आरक्षण आणि वन व्यवस्थापन समितीच्या कामकाजासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री श्री.भरणे यांनी आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा तसेच कामांना गती देण्यासंदर्भात निर्देश दिले.

            राज्यमंत्री श्री.भरणे म्हणालेप्रकल्पग्रस्तांना समांतर पाच टक्के आरक्षण असूनशासनाच्या आदेशानंतर झालेल्या भरतीसंदर्भातील अहवाल सादर करावा. तसेच तब्बल 11 हजार उमेदवार प्रतिक्षा यादीमध्ये असूनत्यांच्या भरतीसंदर्भात सर्व विभागांनी भविष्यात नियमांचे सक्तीने पालन करून कार्यवाही करावी.

वन व्यवस्थापन समितीच्या कामकाजाची आदर्श नियमावली बनवावी

            वन व्यवस्थापन समितींच्या कामकाजात सुधारणा होणे आवश्यक असल्याचे निर्देश राज्यमंत्री श्री.भरणे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील वनव्यवस्थापन समितींच्या कामांची एक आदर्श नियमावली बनवावी, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी केली.

            यावेळी आमदार प्रकाश आबिटकरवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीसामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णीसहसचिव श्री सुर्यवंशी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

0000

 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार

महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

           

            मुंबईदि. 26:  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने 26 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित केला आहे.

            ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021 या काळात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासानाच्या निधीमधून निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी 75 टक्के एवढा असा एकूण 2 हजार 860 कोटी 84 लाख 7 हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यात येणार आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. शेतकऱ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.


 

Vastav


 

 रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर द्या

- नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·       महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत

जळगाव शहरातील रस्त्यांसाठी 42 कोटी रुपये मंजूर

            मुंबईदि. 26 : जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 42 कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर देऊन दर्जेदार कामे करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत जळगाव शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पाचा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित बैठकीत आढावा घेतला. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलनगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठकपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांचेसह दूरदृश्य प्रणालीद्वारे जळगाव महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णीसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता आदी उपस्थित होते.

            जळगाव शहरातील रस्त्यांसाठी  नगरविकास विभागाने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 42 कोटी रुपये मंजूर केले आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत असून मुख्य रस्त्यांची कामे तातडीने सुरू करणे गरजेचे आहेत्यादृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी नगरविकासमंत्री  श्री. शिंदे यांनी दिल्या. शहरातील रस्त्यांची कामे सुचविण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. या समितीमध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांचा समावेश असेल. रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करणार असून रस्त्यांची कामे  करताना ती दर्जेदार करण्यावर भर देण्याचे निर्देशही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

            जळगाव शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने होणे आवश्यक आहेत.त्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या 42 कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्यासाठी महानगरपालिकेने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी दिल्या. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीपैकी उर्वरित ५८ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असता महापालिकेने निधी मागणीचा प्रस्ताव तात्काळ नगरविकास विभागाकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी नगरविकासमंत्र्यांनी दिले.

 अवयवदान वाढविण्यासाठी आराखडा तयार करा

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

 

            मुंबईदि. 26 : राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पण वाढण्यासाठी आराखडा तयार करावाअशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत आढावा बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे झालेल्या या बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यासप्रधान सचिव-2 निलीमा करकेटृटावैद्यकीय शिक्षण विभाग प्रधान सचिव सौरभ विजयआरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामीवैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त वीरेंद्र प्रताप सिंहआरोग्य सेवा संचालक डॉ.साधना तायडेवैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर आदी उपस्थित होते.

            श्री. टोपे यांनी सांगितले कीराज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत अद्यापही सुधारणा अपेक्षित आहे. सध्या राज्यातील प्रमुख शहरांमध्येच अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत कामकाज होते. पण याबाबत राज्यातील छोट्या शहरातही अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पण वाढायला हवे. अवयव दानाबाबत जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये अवयव दानाबाबत काम होते. शासकीय दवाखान्यातही अवयवदान व्हायला हवे. यासाठी एक आराखडा तयार करावा, असे निर्देशही श्री.टोपे यांनी दिले.

            अवयवदान बाबत काम करणाऱ्या विभागीय प्रतिरोपण समन्वय केंद्रांची संख्या वाढवावी. सध्या पुणेमुंबईनागपूर आणि औरंगाबाद येथे ही केंद्र आहेत. यापुढे कोल्हापूरनाशिकअमरावतीलातूर येथे ही केंद्र सुरू करावीअसे श्री. टोपे यांनी सांगितले.

            अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत लोकांत जागृती करावी. अवयवदानाबाबत लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेअसेही त्यांनी सांगितले.

            बैठकीस राज्य सल्लागार समितीचे सदस्य डॉ.सुजाता पटवर्धनडॉ.जी. बी. डावरडॉ.सुरेंद्र कुमार माथूरडॉ.राहुल पंडितआरोग्य विभागाचे उपसचिव शि. मी. धुळेडॉ.अरुण यादवडॉ.कैलास जावंदे आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi