Monday, 25 October 2021

Dipavali festival rangoli competition

 मताधिकार जागृतीसाठी लोकशाही दीपावली स्पर्धा

 

        मुंबईदि. 25 : नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

            मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण आणि मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पुनरीक्षण कार्यक्रम राबविणार आहेदिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर तसेच मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहेया कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी 18 किंवा अधिक वय असलेले नागरिक आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकणार आहेविशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

            महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात घरोघरी आकाशदिवा लावला जातो आणि रांगोळी काढली जातेयाच आकाशदिवा आणि रांगोळीच्या माध्यमातून यंदाची दिवाळी लोकशाहीमय साजरी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. ‘सक्षम लोकशाहीची पहिली पायरी – मतदार नोंदणी’ हे लक्षात ठेवून आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहन करावेआकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतिकांचा वापर करावाजसे डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन  इ. वापरावा. शिवाय, मतदार नोंदणी; नाव वगळणी; तसेच, मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशील अचूक आहेत हे मतदार यादीत पाहावेचुकीच्या तपशिलांत दुरुस्त्या कराव्यात, याकरिता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करावा.

            बऱ्याच मतदारांना असे वाटते की, आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे आपण मतदान करू शकतो. पण तसे नसून मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक आहे. तेव्हा सर्व मतदारांनी मतदारयादीत आपले नाव आणि इतर तपशील तपासून घ्यावेत, तपशिलात बदल असतील तर संबंधित अर्ज भरावा18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करावी, या दृष्टीने आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात यावे.

            स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धकांनी स्पर्धेचे साहित्य 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत  https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या दुव्यावर पाठवावे. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये  (प्रथम क्रमांक), सात हजार रुपये (द्वितीय क्रमांक), पाच हजार रुपये (तृतीय क्रमांक) आणि दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8669058325 (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा. स्पर्धेची आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यंदाची दिवाळी लोकशाहीमय करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आवाहन केले आहे.

स्पर्धेची नियमावली :

१.      स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत.

२.     स्पर्धकाला आकाशदिवा आणि रांगोळी यांपैकी एका किंवा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दोन्हींचे साहित्य गुगल अर्जामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र विभागात पाठवावे.

३.     आकाशदिवा (आकाशकंदील) स्पर्धा :-

अ.   आकाशदिवा तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरलेले असावे.

आ. लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांना अनुसरून तयार केलेल्या आकाशदिव्याचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत.

इ.      प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावतीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.

ई.       फोटोवर कोणाचेही नावलोगोचित्रफ्रेमडिजा, असे अधिकचे काही जोडू नये. 

उ.     आकाशदिवा स्पर्धेसाठी टांगलेल्या आकाशदिव्याची चित्रफीत पाठवावी, जेणेकरून आकाशदिव्याची सजावट चहुबाजूंनी दिसू शकेल. ही चित्रफीत कमीत-कमी ३० सेकंदांची आणि जास्तीत-जास्त एक मिनिटाची असावी.

ऊ.   आकाशदिव्याच्या चित्रफितीची (व्हिडिओची) साज जास्तीत-जास्त ०० MB असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफीत mp4 फॉरमॅटमध्ये असाव.

ऋ.   आकाशदिव्याची चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना, चित्रफितीत कोणाचेही नावलोगोचित्रफ्रेमडिजा, असे अधिकचे काही जोडू नये. चित्रिकरण करताना सजावटीचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल

 भाईंदर कोविड उपचार केंद्रात

महिलेचे चित्रीकरण व ब्लॅकमेल प्रकरणी कडक कारवाई करा

 उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांचे निर्देश

 

          मुंबई, दि 25 : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भाईंदर कोविड उपचार केंद्रात महिला  परिचारिकेचे चित्रीकरण व ब्लॅकमेलप्रकरणी तेथील कंत्राटी कर्मचाऱ्यावर दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे दिले आहेत.


 

 विद्यादानासाठी मदत करण्याचा मटा हेल्पलाईनचा उपक्रम प्रशंसनीय  

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

उद्यमी व्हापरिश्रम करा आणि इतरांना जीवनदान द्या’: राजभवन येथील भावपूर्ण सोहोळ्यात राज्यपालांचे विद्यार्थ्यांना आवाहन

 

            मुंबईदि. 24 : अतिशय कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश  प्राप्त केले आहे. आपले स्वतःचे लहानपण देखील अतिशय खडतर परिस्थितीत गेले आहे. मात्र जो स्वतःला मदत करतोदेव त्यालाच मदत करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खंबीर व्हावेकठोर परिश्रम करावेनोकरी – उद्योग करावे व यशस्वी झाल्यावर आपण देखील समाजातील गरजूंना शिक्षणाच्या माध्यमातून जीवनदान द्यावेअसे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            विपरीत परिस्थितीत उत्तम गुणांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र टाइम्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने उच्च शिक्षणासाठी मटा वाचकांच्या माध्यमातून मदत करण्यात आली. या विद्यार्थ्यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे प्रातिनिधिक स्वरुपात 'मटा हेल्पलाईन विद्यार्थी धनादेशदेण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.

            विद्यादान हा एक यज्ञ आहे. महाराष्ट्र टाइम्सने चौदा वर्षांपासून हेल्पलाईनच्या माध्यमातून केलेल्या विद्यादानाच्या या यज्ञामुळे जवळजवळ 500 होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत तेवत आहे. हेल्पलाईनचे हे कार्य अद्भुतप्रशंसनीय आहे. मटाने या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवे जीवन देऊन समाजापुढे एक चांगले उदाहरण प्रस्तुत केले आहेअसे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

            निस्वार्थ भावनेने वाचकांनी केलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश पडला आहे. परमेश्वराला आपण पाहू शकत नाही तसेच ज्या वाचक – दात्यांनी आपले नाव प्रकाशात येऊ न देता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली ते देवरुपच आहेत असे सांगत राज्यपालांनी सर्व वाचक-दात्यांचे कौतुक केले.

 

    
    मुस्कानच्या हुंदक्याने राजभवन गहिवरले 

 

आपली आई लोकांकडे घरकाम करून आपल्याला शिकवत आहे. वाचकांच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक मदतीतून आपण शिक्षण घेऊन स्वावलंबी होऊ आणि आईला घरकाम करू देणार नाहीअसे सांगताना मुस्कान शेख या मुलीच्या भावनेचा बांध फुटला. मुस्कानच्या हुंदक्यामुळे राज्यपालांसह सर्व उपस्थितांना गहिवरून आले.

 

 

            कोरोना काळात गरीब गरजू विद्यार्थ्यांसह ज्यांचे मातृछत्रपितृछत्र हरवले आहे अशा विद्यार्थ्यांना निवडले गेले. यावर्षी राज्यातून 45 विद्यार्थी निवडले व त्यांना 2.75 कोटी रुपये इतकी मदत झाली.  गेल्या 14 वर्षांत मटा हेल्पलाईनच्या माध्यमातून 483 विद्यार्थ्यांना 25 कोटी रुपयांची मदत झाली.  हे विद्यार्थी नागरी सेवेसह अनेक क्षेत्रात योगदान देत आहेतअसे मटाचे संपादक पराग करंदीकर यांनी सांगितले. आज मदत घेणारे हात उद्या मदत देणारे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

            विनायक राणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर निवासी संपादक श्रीकांत बोजेवार यांनी आभारप्रदर्शन केले.   

000

 

Governor presents cheque of 'MaTa Helpline' to

२५ deserving students

 

            Mumbai, २४ : Governor Bhagat Singh Koshyari presented a representative cheque of Maharashtra Times Helpline to २५ meritorious students at a function held at Raj Bhavan Mumbai on Sunday.

            The students who passed SSC examination with good marks despite severe financial constraints were extended financial support for higher education by the readers and donors through the medium of MaTa helpline.

            Editor of Maharashtra Times Parag Karandikar, Resident Editor Shrikant Bojewar, Vinayak Rane, student beneficiaries of MaTa Helpline and their parents were present.

0000


 मुख्यमंत्र्यांनी केलेल्या गौरवामुळे प्रोत्साहन मिळाल्याची विद्यार्थ्यांनी व्यक्त केली भावना

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गुणवंतांचा

बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीतर्फे कौतू सोहळा

 

राज्यातदेशात कुठेही काम करताना भ्रष्टाचार दूर करण्याचे आव्हान

शासन-प्रशासनात सुसंवाद ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावा

मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 

            मुंबई दि 24: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत महाराष्ट्राचे असतील किंवा अन्य कुठल्याही राज्यातलेपण या सर्वांनी देशाला आपला परिवार मानून प्रशासनात करिअर करायचे ठरविले आहेआपली कुठेही नियुक्ती होवो पण भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहेअशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यामुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वर्षा येथील प्रांगणात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2020 मधील परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आलाशिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीतर्फे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

            खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव झाल्याबद्धल गुणवंतांनी आपण भारावून गेलो असून पुढील जबाबदारीची प्रेरणा मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्यायावेळी श्रीमती रश्मी ठाकरेपरिवहन मंत्री अनिल परबपर्यटन मंत्री आदित्य ठाकरेउच्च  तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आदींची उपस्थिती होतीबाळासाहेब ठाकरे अकॅडमीचे विजय कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

 

देशाचे नावही मोठे करा

            अकादमीला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्धल अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांनी या अकादमीच्या माध्यमातून पुढच्या काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन मिळेल  ते अशा स्पर्धात्मक परीक्षेत कसे उत्तीर्ण होतील ते पाहावे अशी अपेक्षा व्यक्त केलीमुख्यमंत्री यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले कीराज्यात किंवा देशात कुठेही गेलात तरी सर्वोत्तम काम करून आपापल्या राज्याचेच नव्हे तर देशाचे नावही मोठे कराआपल्या यशात मोठा वाटा असलेल्या आईवडील आणि गुरूंना कधीही विसरू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.

            शासन आणि प्रशासनात सुसंवाद नसेल तर प्रश्न उभे राहतात असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीमला देखील प्रशासनाचा कोणताही अनुभव नव्हतापण मुख्यमंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी अंगावर पडल्यावर मीही प्रशासनातल्या अनेक गोष्टी शिकलो.

 

राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकावे

            आम्ही रस्त्यावर उतरणारे राजकारणी आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीप्रशासनातील अधिकाऱ्यांनी हो म्हणायला आणि राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकणे आवश्यक आहेमी मुख्यमंत्री झाल्यावर कोणतीही चुकीची फाईल माझ्यासमोर आली नाही पाहिजेअसे ठामपणे सांगितले होते.

 

आमची तर नेहमीच परीक्षा

            आपण नशीबवान आहात कारण एका कुठल्यातरी परीक्षेला सामोरे जात असताआपल्या मुलाखती घेणारे निवडक तज्ञ असतातआम्हा राजकारण्यांना वारंवार वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जावे लागतेआम्हाला हजारोलाखो लोक गुण देत असतातआमच्या मुलाखती घेत असतात असेही मुख्यमंत्री म्हणाले.



 

 *अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका*....


*एक घडलेली  गोष्ट*...    

 १९७९ सालची सत्यघटना .


सकाळची वेळ होती.त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता.फारशी गर्दी नव्हती.काही लोकांचीच ये-जा होती. 


*एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद् भगवत गीता वाचत होते*.तेवढ्यात एक  उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला, आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली.गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती. 


तो तरुण म्हणाला,एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता.  


त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण किती,व पुढे काय करणार आहेस ? इ.


त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की,तो कलकत्याहून आला आहे.सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे.. 

*पुढे मोठ्या तुसडेपणाने म्हणाला - तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत,तुम्हाला देशाची काळजी नाही,वगैरे वगैरे त्याने बरीच मुक्ताफळे उधळली.तरीही ती व्यक्ती शांतच होती*. 


थोड्या वेळाने - त्या गीता वाचणाऱ्या व्यक्तीने उठून आसन गुंडाळले.तसे एकदम ४ दणकट कमांडो बॉडीगार्ड धावत त्या व्यक्तीजवळ आले व एक मोठी मजबूत शासकीय लाल दिवा असलेली कार एक ड्रायव्हर घेऊन आला व आदबीने सलाम करून दार उघडून उभा राहिला. 


हे सगळं पाहिल्यावर मात्र तो तरुण पुरता गोंधळून गेला व त्या व्यक्तीची क्षमा याचना करू लागला. 


त्याने घाबरत घाबरत ओळख विचारली,तेव्हा ती व्यक्ती शांतपणे स्मितहास्य करून म्हणाली की,"ज्या संस्थेत तू  संशोधन करण्यास आला आहेस ना,त्या भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेचा मी चेअरमन आहे... डॉ. विक्रम साराभाई ."


मग मात्र तो नास्तिक,देवा धर्माची टिंगल करणारा तरुण ओशाळला व चक्क रडू लागला,माफी मागू लागला... 

तरीही डॉ.साराभाई शांतच.


*ते म्हणाले,जर या जगात एखादी गोष्ट आहे,तर नक्कीच त्याचा कोणीतरी निर्माता आहे,मग ती आजची असो की महाभारत कालीन असो.आणि हे त्रिकालाबाधित सत्य ही गीता सांगते*. तेंव्हा -टिंगल करण्यापूर्वी वाचून पहा,सर्व सायन्स देखील यातच आहे.


ही गोष्ट घडली तेव्हा भारतीय पातळीवरच्या विविध १३ संशोधन संस्था या डॉ. साराभाईंच्या नांवावर होत्या. 

तर तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी अणू संशोधन मंडळाचेही अध्यक्ष म्हणून डॉ. साराभाई यांची नियुक्ती केली होती. 


*चालू वर्ष हे डॉ.विक्रम साराभाई यांचे  100 वे जयंती वर्ष आहे*... 

म्हणून एक आठवण ...


 *त्या थोर राष्ट्रभक्त शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन* !

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐

प्रचार व प्रसार

*कृषिसेवा. ऑनलाइन*

शेतकरी वाचवा ग्राहक जगवा

9422385538

Featured post

Lakshvedhi