Tuesday, 12 October 2021

Health tips

 *घरात गोमूत्र का शिंपडावे?👈*


*आपल्या हिंदू संस्कृतित गोमुत्राला महत्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात अशुभ  काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पुजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमुत्र शिंपडले जाते. तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो, अशी धारणा आहे.*


*सगळ्या परंपरांच्या मागे मनोवेज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे. घर-परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र  शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे*. 


*जुन्या काळापासून गोमुत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे. शास्त्रात गाईला पूजनीय आणि पवित्र मानले आहे. गाईला माता असे संबांधले आहे. त्यामुळे गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे.* *वास्तुनुसार गायीचे गोमूत्र घरातील सग़ळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते. गायीची पुजा केल्याने आपले पाप नष्ट होते, अशी धारणा आहे.*


*काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल, घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत. वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात. त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपडावे? गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात. अन्नातून युरिया, कीटकनाशके शरीरात जातात. पाणी आणि हवेतूनही दूषित घटक रीरात जातात. त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात. गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे.*


*आता गोमुत्राचे फायदे लक्षाते घेतले पाहिजेत. यात घरातील वास्तूदोष मिटण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे. गोमुत्रामुळे वातावरणातील सुक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते. तर ज्या घरात गोमुत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देव-देवतांचे कृपादृष्टी प्राप्त होते, अशी समजूत  आहे. गोमूत्र  शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही.*


     *श्री स्वामी समर्थ*🙏

Monday, 11 October 2021

 प्रयोगात्मक कला क्षेत्रातील कलाकार करणार कोविडबाबत जाणीव जागृती

सांस्कृतिक कार्य विभागाचा शासन निर्णय

            मुंबईदि. 11 : राज्यातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना गेल्या दीड वर्षापासून हाती घेण्यात आल्या आहेत. आता कोविड संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची काळजीतसेच लसीकरणाची आवश्यकता याबाबतची जाणीव जागृती प्रयोगात्मक कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकार मंडळीकडून करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 8 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित केला आहे.

प्रत्येक जिल्हयात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलाकारांद्वारे जाणीव जागृती करणे यासाठी तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची मान्यता देण्यात आली आहे. जाणीव जागृतीचे कार्यक्रम विविध लोककला प्रकारातील लोककलावंतप्रयोगात्मक कला सादर करणाऱ्या कलाकारांकडून करण्यात येतील.

            कोविडविषयक जाणीव जागृतीसाठी कार्यक्रम करीत असताना कोविडकाळात कमीत कमी व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसमारंभकमीत कमी व्यक्तींच्या उपस्थितीत धार्मिक बाबीसण-उत्सवप्रथा- परंपराकार्यक्रममहोत्सव यांचे आयोजन करीत असताना राज्य शासनाचे कोविडसंदर्भातील नियम पाळणेमास्कचा वापरसाबणाचा वापर करुन हात धुणेज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची काळजीशासनाची कोविडबाबत नियमावलीलसीकरण इत्यादी विषय तसेच स्थानिक परिस्थिती आणि आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी किंवा त्यांना प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून सुचविण्यात आलेल्या विषयांवर कलाकारांनी आपापल्या कलेतून जाणीव जागृती करायची आहे.

या जाणीव जागृती कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील कलाकारांची निवड माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयाच्या मदतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समित्या गठीत करण्यात येईल. कोविडबाबत जनजागृती कार्यक्रमांचे सनियंत्रण संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येईल. ही समिती या कार्यक्रमावर देखरेख आणि नियंत्रण ठेवतील.जाणीव जागृतीचे कार्यक्रम करणाऱ्या कलाकरांना संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून कार्यादेश देण्यात येईल. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत प्रति जिल्हाधिकारी 8 लाख 30 हजार रुपये इतका निधी वर्ग करण्यात येणार आहे.ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर समूह स्वरुपात किंवा एकल स्वरुपात कार्यक्रम सादरीकरण झाल्यानंतर गावातील तलाठी/ग्रामसेवक यांनी कार्यक्रम संपन्न झाल्याबाबतचे प्रमाणपत्र कलाकारांना देणे आवश्यक राहील.तर शहरी भागात समूह स्वरुपात किंवा एकल स्वरुपात कार्यक्रम सादरीकरण झाल्यानंतर संबंधित महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी/नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी यांनी कार्यक्रम संपन्न झाल्याबाबतचे प्रमाणपत्र कलाकारास देणे आवश्यक राहील.

            कोविड संसर्ग प्रतिबंध आणि लसीकरण जाणीव जागृती कार्यक्रमासाठी वासुदेवबहुरुपी इत्यादी एकल कलाकारास एका दिवसासाठी जास्तीत जास्त पाचशे रुपये मानधन प्रती कलाकार देय राहील. एका दिवसात एकल कलाकाराने किमान 3 सादरीकरण करणे अपेक्षित आहे. एका एकल कलाकारास जास्तीत जास्त 10 दिवस कार्यक्रम देता येतील. म्हणजेच एका एकल कलाकारास एकूण जास्तीत जास्त 5 हजार रुपये मानधन मिळू शकेल.दोन किंवा तीन कलाकारांच्या समूहास रोज कमीत कमी दोन सादरीकरण करणे आवश्यक राहील. समूहातील प्रत्येक कलाकारास प्रति कार्यक्रम पाचशे रुपये इतके मानधन देय राहील. एका समूहास जास्तीत जास्त 10 कार्यक्रम सादर करता येतील.

            प्रत्येक जिल्हयात जाणीव जागृतीपर कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची कमाल मर्यादा 166 असेल.जाणीव जागृतीपर कार्यक्रम सादर करताना राज्य शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. जाणीव जागृतीचा प्रचार व प्रसार करताना कलाकाराने स्वत:च्या जबाबदारीवर सहभाग घेत असल्याचे हमीपत्र लिहून देणे आवश्यक आहे. तसेच कोणावरही टीका होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित सादरकर्त्यां कलाकारावर राहील.

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडुन हिंदी संगीत रामायणाचे कौतुक

     

               आशा खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत रामायण हिंदीत

 

मुंबई, दि. 10 : रामाचे गुणगान कितीही केले तरीही ते कमीच आहेकारण त्यात नित्य नूतन असा आनंद आहे. राम सर्वांचा अंतर्यामी असल्यामुळे सर्वांच्या जवळच असतो. हिंदीतील संगीत रामायण मराठी गीत रामायणाप्रमाणेच अतिशय भावपूर्ण झाले असून त्याचे सादरीकरण उत्कृष्ट झालेअशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदी संगीत रामायणाचे भरभरून कौतुक केले. यावेळी राज्यपालांनी संगीत रामायणच्या चमूला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.  

            प्रिया सावंत यांच्या पुढाकाराने राजभवन येथे शनिवारी (दि. 9) हिंदी संगीत रामायण संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.

            सुनील सुधाकर देशपांडे यांनी हिंदी भाषेत लिहिलेल्या संगीत रामायणातील रचनांना ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरबद्ध केले असून अनेक युवा गायक व गायिकांच्या मदतीने त्याचे सादरीकरण करण्यात आले. वेदश्री ओक व निनाद आजगावकर यांसह चमूने यावेळी रामायणातील सुश्राव्य रचना सदर केल्या. यावेळी व्यक्तिविकास व लीडरशिप ट्रेनिंग तज्ज्ञ प्रिया सावंत यांच्या 'काव्यांजलीया काव्यसंग्रहाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

 

******

 

 

Governor applauds Hindi Sangeet Ramayana

 

Mumbai, 10: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has applauded the Hindi Sangeet Ramayana presented at Raj Bhavan Mumbai by various artists under the guidance of well known vocalist Vidushi Asha Khadilkar.

Stating that Lord Rama is eternal, the Governor said the boundless glory of Lord Rama reaches the masses through music. He praised the entire team of Hindi Sangeet Ramayana and announced a prize of Rs. lakh to the team. Vedashree Oak and Ninad Ajgaokar rendered the compositions of Ramayana on the occasion.

The programme Hindi Sangeet Ramayana was presented by Leadership Training Expert and motivational speaker Priya Sawant. The lyrics of Hindi Sangeet Ramayana have been written by Sunil Deshpande. The Governor released the book of poetry ‘Kavyanjali’ by Priya Sawant on the occasion. 

 

 मानसिक आरोग्य दिनानिमित्त राजभवन येथे नामवंत डॉक्टरांचा सत्कार

शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य महत्वाचे

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुबई:दि. 10: केवळ शारिरीक आरोग्य उत्तम असणे पुरेसे नाही. मानसिक आरोग्य तितकेचकिंबहुना अधिक महत्वाचे आहे. करोना काळात अनेक लोकांना शारिरीक व्याधींसोबतच मानसिक समस्यांचा देखील सामना करावा लागला. करोना  आला आणि जाईल देखीलपरंतु मानसिक आरोग्य जपणे आवश्यक असून डॉक्टरांनी रुग्णांना आत्मविश्वास व नवी उमेद देण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करावेअसे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 

            जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज रविवारी (दि. 10) राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नामवंत वैद्यकीय तज्ञ व डॉक्टरांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. लोढा फाउंडेशन व लोढा लग्झरीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            मनासिक आरोग्याचे महत्व सांगताना राज्यपालांनी महाभारत व गीतेचा दाखला दिला. भगवदगीता ही अर्जुन विषादयोगापासून सुरु होते. विषाद म्हणजे डिप्रेशन. भगवान कृष्णांनी अर्जुनाला विषादातून बाहेर काढून युद्ध करण्यास सज्ज होईल इतके समुपदेशन केले असे सांगून डॉक्टरांनी शास्त्रांमधील मानसिक स्वास्थ्याची उदाहरणे देखील तपासावीत्यातून त्यांना नवनवे दृष्टीकोन मिळतीलअसे राज्यपालांनी सांगितले.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयरा लोढा या मुलीने मानसिक आरोग्य या विषयावर तयार केलेले व्हाट आर यू वेटिंग फॉर’ हे गीत सादर केले.

 

राज्यपालांच्या हस्ते मानसोपचार तज्ञ डॉ झिराक मार्करडॉ झरीर उदवाडीयाडॉ शशांक जोशीडॉ मुझफ्फल लकडावालाडॉ चेतन भटडॉ अब्दुल अन्सारीडॉ गौतम भन्साळीडॉ पंकज पारेखडॉ मनोज मश्रूडॉ अंजली छाब्रियाडॉ मिलिंद कीर्तने यांसह 40 डॉक्टर्स व तज्ञांचा सत्कार या वेळी करण्यात आला. 

कार्यक्रमाला आमदार मंगल प्रभात लोढा व लोढा रिअलिटीचे मुख्याधिकारी अभिषेक लोढा उपस्थित होते.

000

 राज्यात दिवसभरात साडेआठ लाखांवर लाभार्थ्यांना लस

                                              अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची माहिती  

                                                                                       

मुंबई दि. 10 : राज्यात काल दिवसभरात सुमारे साडेआठ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोविड-19 लस देण्यात आलीअशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज दिली.

            राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘मिशन कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

पुणे जिल्हा आघाडीवर

            अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले कीकाल दिवसभरात 6 हजार 47 लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 8 लाख 63 हजार 635 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत 8 कोटी 72 लाख 93 हजार 844 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. काल दिवसभरात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 99 हजार 71 लस देण्यात आली. त्यापाठोपाठ ठाणे ( 90139) आणि मुंबईमध्ये (88991) लस देण्यात आली.

महापालिका आयुक्तांना सूचना

            शहरात लसीकरणाबाबत काटेकोर नियोजन करावेअशा सूचना अपर मुख्य सचिव श्री. व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील महानगरपालिका आयुक्तांकडून नियोजन केले जात आहे. शहरात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी डॉ. व्यास विशेष आढावा घेत आहेत.

‘मिशन कोरोना विजय’च्या माध्यमातून जनजागृती

            लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पुणेनंदूरबारजालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी ‘मिशन कोरोना विजय’ अभियानाची सुरुवात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सुरू केली आहे. अमेरिकन इंडियन फाऊंडेशन आणि आरोग्य विभागाच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे.

 🍋🎋लिंबू मिरची🎋🍋

ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक बैल गाडीतून प्रवास करीत असत. मैलो मैलाच्या ह्या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिब्बा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत की तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल. किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणार्या वाटसरूना तो लगेच मिळेल . 

पण हे का? 

असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल.

ह्याचे उत्तर असे आहे कि मैलोन मैल चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते ज्या मुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमावता येवू शकते.

त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणे करून हा साप विषारी होता कि बिनविषारी ह्याची माहित मिळे.

जर साप चावला असताना मिरची तिखट लागली तर साप बिनविषारी होता आणि तिखट नाही लागली कि साप हा विषारी होता. असा अंदाज बांधला जात

. बिब्बा हा उत्कृष्ट एंटीबायोटीक समजला जातो म्हणून जखम झाल्यास , कापल्यास बिब्बा लावला जात , आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जात जी तार पायातला काटा काढण्यास उपयोगात येई. अश्या प्रकारे हा प्रथोमपचार बैल गाडीवर , घराच्या दर्शनी भागात लावला जात कारण त्याचा उपयोग प्रथमोपचारा साठी लावला जात.

पुढे वाहने आली आणि हा प्रथमोपचार एक अंधश्रद्धा बनून अजून ही चालू आहे. 

ह्या प्रथमोपचारपद्धतीची कशी अंधश्रद्धा झाली ह्याची माहिती पोहोचावी हा एकच उद्देश….!

Featured post

Lakshvedhi