Sunday, 10 October 2021

 कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील

निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये

·       मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर तातडीने शासन निर्णय जारी

 

            मुंबई, दि. ८ : शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालयतसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्णसेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसमवेत बैठक घेऊन त्यांच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला.

            तातडीने हा शासन निर्णय काढल्याबद्धल सेंट्रल मार्डतर्फे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

 बंगबंधूंच्या आत्मकथेमुळे युवकांना बांगलादेश मुक्ती लढ्याची माहिती होईल

                                                                      - राज्यपाल

 राज्यपालांच्या हस्ते बांगलादेश मुक्ती लढ्यातील वीरांचा सन्मान

 

          मुंबई, दि. 09 : बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांच्या 'अपूर्ण आत्मकथाया मराठी भाषांतरीत पुस्तकामुळे राज्यातील लोकांना विशेषतः युवकांना बांगलादेशचा प्रदीर्घ मुक्तीसंग्रामत्यातील भारताचे योगदान तसेच शेख मुजिबूर रहमान यांच्या व्यक्तित्वाबद्दल अधिक माहिती होईलअसे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

          शेख मुजिबूर रहमान यांची जन्मशताब्दी तसेच बांगलादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शेख मुजिबूर रहमान यांच्या 'अनफिनिश्ड मेमॉयर्सया पुस्तकाचे मराठी भाषांतर असलेल्या 'अपूर्ण आत्मकथाया पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेत्यावेळी ते बोलत होते.

          बांगलादेशच्या मुंबईतील उपउच्चायुक्तालयाच्या पुढाकाराने प्रसिद्ध झालेले 'अपूर्ण आत्मकथाअपर्णा वेलणकर यांनी मराठीत भाषांतरीत केले असून इंडिया प्रिंटिंग वर्क्सने ते प्रकाशित केले आहे.

          राज्यपालांच्या हस्ते यावेळी बांगलादेश मुक्ती संग्रामात प्रत्यक्ष व परोक्ष भाग घेतलेल्या निवृत्त नौदल प्रमुख अॅडमिरल विष्णू भागवतलेफ्टनंट जनरल  कुलदीप सिंह ब्रारलेफ्टनंट कमांडर अशोक बत्रा यांसह 20 युद्धवीरांचा सत्कार करण्यात आला. 

          कार्यक्रमाला बांगलादेशचे मुंबईतील उप उच्चायुक्त मोहम्मद लुत्फुर रहमानबांगलादेशचे नवी दिल्लीतील उप उच्चायुक्त नुरुल इस्लाममुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व ऑल इंडिया असोसिएशन फॉर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री  उपस्थित होते. यावेळी बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ ए के एम अब्दुल मोमीन यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला. 

          शेख मुजिबुर रहमान सच्चे धर्मनिरपेक्ष नेते होते. आपल्या पक्षाचे नाव त्यांनी 'मुस्लिम अवामी लीगअसे न ठेवता 'अवामी लीगअसे ठेवले असे राज्यपालांनी नमूद केले. अपर्णा वेलणकर यांनी शेख मुजीब यांच्या पुस्तकाचे मराठी भाषेत भाषांतर करून भारत व बांगलादेशातील मैत्रीसंबंध अधिक दृढ करण्यात मोठे योगदान दिले आहे असे राज्यपाल यावेळी म्हणाले.  शेख मुजीब यांच्या 'प्रिझन डायरीजया पुस्तकाचे देखील मराठीत भाषांतर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

          राज्यपालांच्या हस्ते अपर्णा वेलणकर तसेच इंडिया प्रिंटिंगचे आनंद लिमये यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बांगलादेश व भारताच्या राष्ट्रगीताने झाली.

 सिंधुदुर्ग विमानतळाचे लोकार्पण

कोकणच्या विकासाने भरारी घेतली,

कोकणची संपन्नता जगासमोर येणार

 

                                                                                                     -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

            सिंधुदुर्गनगरी दि. 9 (जि.मा.का.) - आजपासून सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. जगभरातील पर्यटक कोकणात येतील आणि कोकणची संपन्नता जगासमोर येणार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

            नागरी विमान वाहतूक मंत्रालयमहाराष्ट्र शासन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने उड्डाण प्रादेशिक संपर्कता योजनेंतर्गत ग्रीनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तेदिल्ली येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखालीसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेसामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातउद्योग मंत्री सुभाष देसाईकृषी मंत्री दादाजी भुसेपर्यटन मंत्री आदित्य ठाकरेपरिवहन मंत्री ॲड. अनिल परबपर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरेखासदार अरविंद सावंतजिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंतआमदार निरंजन डावखरेअनिकेत तटकरेदीपक केसरकरवैभव नाईकनितेश राणे आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री उदय सामंत यांनी विमानतळावर आगमन झाल्यावर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर कोनशिला अनावरण करण्यात आले.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेगेल्या अनेक वर्षापासून कोकणवासियांचे  स्वप्न पूर्ण झालेयाचा आनंद झाला आहे.  या  विमानतळामुळे जगभरच्या पर्यटकांबरोबरच उद्योजकही मोठ्या प्रमाणात येऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल. कोकणचे वैभव मोठे आहे. गोव्यापेक्षाही इथले समुद्र किनारे स्वच्छसुंदर आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. इथल्या स्थानिक उद्योजकांनाआंबाकाजूफणस तसेच मासे निर्यातीला प्रोत्साहन व चालना मिळेल.  या विमानतळाच्या निमित्ताने कोकणचे सौंदर्य जगासमोर जाणार असून येथील निसर्ग सौंदर्य आणि मातीचा सुगंध जगातील पर्यटकाला आकर्षित करेल.

            महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विमानतळांचा विकास करण्याच्या दृष्टीने शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून सिंधुदुर्ग विमानतळ आंतरराष्ट्रीय  होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. येथे विमानबरोबरच हेलिकॉप्टर सेवा ही सुरू झाल्यास पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येईल. शासनाने पर्यटनाला प्रोत्साहन व गती मिळण्यासाठी उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे उद्योजकांनाही या भूमीत चांगली संधी आहे. लवकरच मुंबई -गोवा महामार्गाचे काम तसेच राज्यातील अन्य महामार्गाची कामे सुरु करण्यात येणार आहेतअसे सांगून मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांना  शुभेच्छा दिल्या.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकोकणवासियांचे खूप दिवसांचे स्वप्न होते. या विमानतळाच्या उभारणीत अनेकांचे योगदान आहे. कोकणाला निसर्गाचे वरदान  लाभले असून  कोकणचे सौंदर्य पाहता सेथील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून हे विमानतळ महत्वपूर्ण ठरणार आहे. जगातून पर्यटक यावेततरुणांना रोजगार मिळावा, त्यातून आर्थिक सुबत्ता नांदावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

            महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण होत आहोत, पुढच्या उज्ज्वल समृद्ध भविष्यकाळाची सुरुवात होत आहे. पर्यटनाची खूप मोठी संधी असून नव्या युगाची सुरुवात आज होत आहे. या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.

            या विमानतळावरील येथून पुढची उड्डाणे ही फुल्ल असतील. एमआयडीसीने विमानतळासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा केल्या, याचा मला आनंद आहे. कोकणवासियांची स्वप्ने साकार होतील, असे यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले.

            पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणालेजगाला कोकण दाखवू शकतो. कोकण जगप्रसिद्ध आहेच. जगाला आजपासून दरवाजे खुले झालेत, पर्यटक कसे येतीलपर्यटन आणताना पर्यावरण कसे राखले जाईलयाची जबाबदारी आम्ही घेत आहोत.

            केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेया विमानतळामुळे जगभरातील पर्यटक इथे येतील आणि इथल्या लोकांना रोजगार मिळेल.

            केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे म्हणालेअतिशय आनंदाचा क्षण आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्ह्यात  पर्यटनाला उभारी मिळेल, इथल्या लोकांना रोजगार मिळेल.

            अध्यक्षीय भाषणात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणालेसिंधुदुर्गची भूमी ही केसरीया आहे. नव्या इतिहासाला सुरुवात झाली. कोकणआंबाफणसमासे यांचे उद्योग देशात प्रसिद्ध होतील. इथलं सौंदर्यभौगोलिकताइतिहास विश्वात पोहचवता येईल. पुढच्या पाच वर्षात 20-25 फ्लाईट सुरू झाले पाहिजेत. त्यासाठी माझा विभाग निश्चित काम करेल.

            कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री. सिंधिया यांना पहिला बोर्डींग पास वितरित केला. सिंधुदुर्ग येथून मुंबईला जाणाऱ्या विमानाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला.

            खासदार विनायक राऊत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्वांचे आभार मानले. या सोहळ्यास मुख्य सचिव सीताराम कुंटेपोलीस महासंचालक संजय पांडे,  प्रधान सचिव (विमानचालन) वल्सा नायर- सिंहएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगनमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टेआयआरबीचे व्यवस्थापकीय संचालक विरेंद्र म्हैसकर आदी उपस्थित होते.

 

Tounge exercise benefits

 खासकरून सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी


माझ्या अमेरिकन मित्राच्या मुलाचा संदेश ज्याचा मुलगा स्वत: डॉक्टर आहे


 🙏

 वयाच्या 50 व्या वर्षानंतर

 आपण अनुभवू शकतो

 अनेक प्रकारचे आजार.🤔



 एक दिवस, माझा मुलाने मला सांगितले

 की त्याच्या एका डॉक्टर मित्राने

 त्याला जिभेचा एक व्यायाम शिकवला आहे.


 हा जिभेचा व्यायाम अत्यंत प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे...


 * 1 * शरीराचे वजन संतुलित ठेवणे

 * 2 * रक्तदाब संतुलित ठेवणे

 * 3 * मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे

 * 4 * दमा कमी करणे

 * 5 * जवळची दृष्टी चांगली करणे

 * 6 * कान गुंजने कमी करणे

 * 7 * घसा कमी खराब होणे  

 * 8 * खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे

 * 9 *  झोप चांगली लागणे


 व्यायाम अगदी सोपा आणि करण्यास सुलभ आणि सोप्पा आहे....


दररोज सकाळी, खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करावा:

 

* आपली जीभ बाहेर काढा आणि 10 वेळा डावीकडे आणि उजवीकडे हलवा *


 मी दररोज हा व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यापासून, माझ्या स्मरणशक्तीमधे सुधारणा झाली.


माझे डोके हलके आणि मला ताजेतवाने वाटायला लागले आणि इतर सुधारणाही जाणवायला लागल्या जसे की


    1 जवळचे नीट दिसायला लागले

    २ शरीराचे संतुलन राहायला लागले

    3. तब्येत व्यवस्थित राहणे

    4. चांगले पचन

    5. सर्दी खोकला कमी होणे


 मी अधिक सामर्थ्यवान आणि चपळ झालो.


 टिप


जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते.


वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा मोठ्या मेंदूशी संबंध आहे. जेव्हा आपण वृद्ध होतो आणि प्रतिकार शक्ती कमी होते, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बर्‍याचदा आपण जीभ चावतो.


जिभेचा वारंवार व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल,

आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत करेल.


👱‍♂👱‍♂👱‍♂👨‍🔬वृद्ध मित्रानो 👱‍♂👱‍♂👱‍♂👨‍🔬🙏

"हा संदेश प्राप्त करणार्‍या प्रत्येक व्यक्तीस हे दहा लोकांकडे पाठविण्यासाठी प्रोत्साहित करतो , किमान एक जीव अल्झायमर होण्यापासून वाचेल ... मी माझा वाटा उचलला आहे, आशा आहे की आपण सुद्धा आपला वाटा उचलून इतरांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी मदत करू शकाल. धन्यवाद!🙏🙏

 खासकरून सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी


माझ्या अमेरिकन मित्राच्या मुलाचा संदेश ज्याचा मुलगा स्वत: डॉक्टर आहे


 🙏

 वयाच्या 50 व्या वर्षानंतर

 आपण अनुभवू शकतो

 अनेक प्रकारचे आजार.🤔



 एक दिवस, माझा मुलाने मला सांगितले

 की त्याच्या एका डॉक्टर मित्राने

 त्याला जिभेचा एक व्यायाम शिकवला आहे.


 हा जिभेचा व्यायाम अत्यंत प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे...


 * 1 * शरीराचे वजन संतुलित ठेवणे

 * 2 * रक्तदाब संतुलित ठेवणे

 * 3 * मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे

 * 4 * दमा कमी करणे

 * 5 * जवळची दृष्टी चांगली करणे

 * 6 * कान गुंजने कमी करणे

 * 7 * घसा कमी खराब होणे  

 * 8 * खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे

 * 9 *  झोप चांगली लागणे


 व्यायाम अगदी सोपा आणि करण्यास सुलभ आणि सोप्पा आहे....


दररोज सकाळी, खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करावा:

 

* आपली जीभ बाहेर काढा आणि 10 वेळा डावीकडे आणि उजवीकडे हलवा *


 मी दररोज हा व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यापासून, माझ्या स्मरणशक्तीमधे सुधारणा झाली.


माझे डोके हलके आणि मला ताजेतवाने वाटायला लागले आणि इतर सुधारणाही जाणवायला लागल्या जसे की


    1 जवळचे नीट दिसायला लागले

    २ शरीराचे संतुलन राहायला लागले

    3. तब्येत व्यवस्थित राहणे

    4. चांगले पचन

    5. सर्दी खोकला कमी होणे


 मी अधिक सामर्थ्यवान आणि चपळ झालो.


 टिप


जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते.


वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा मोठ्या मेंदूशी संबंध आहे. जेव्हा आपण वृद्ध होतो आणि प्रतिकार शक्ती कमी होते, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बर्‍याचदा आपण जीभ चावतो.


जिभेचा वारंवार व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल,

आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत करेल.


👱‍♂👱‍♂👱‍♂👨‍🔬वृद्ध मित्रानो 👱‍♂👱‍♂👱‍♂👨‍🔬🙏

"हा संदेश प्राप्त करणार्‍या प्रत्येक व्यक्तीस हे दहा लोकांकडे पाठविण्यासाठी प्रोत्साहित करतो , किमान एक जीव अल्झायमर होण्यापासून वाचेल ... मी माझा वाटा उचलला आहे, आशा आहे की आपण सुद्धा आपला वाटा उचलून इतरांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी मदत करू शकाल. धन्यवाद!🙏🙏

Meeting for next election

 *फार महत्वाची बैठक झाली,*

*विषय काय होता कळेना*

*आपल्याला कळाले तर सांगा..🙏😀*

Meeting for next election


 

Featured post

Lakshvedhi