Monday, 4 October 2021

 विविध मागण्यांसंदर्भात ‘मार्ड’ पदाधिकाऱ्यांची

मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

·       योग्य तोडगा त्वरित काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

 

            मुंबई, दि. 4 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याबद्धल निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने समाधान व्यक्त केले आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा येथे भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा होऊन मार्डने मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले कीया डॉक्टरांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करुन निर्णय घेतले जातील. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेअतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिकसंचालकवैद्यकीय शिक्षणचे डॉ.दिलीप म्हैसेकरवैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजयअतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी  उपस्थित होते.

            वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क माफ करणेपालिकेच्या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून जीएसटी कपात बंद करणे यासंदर्भात मार्डने संप पुकारला होता.

            शैक्षणिक शुल्क माफी तसेच जीएसटीसंदर्भात  मुख्यमंत्र्यांनी वित्त विभाग तसेच पालिकेस तांत्रिक बाबींचा अभ्यास करून  योग्य कार्यवाही करण्यासंदर्भात त्वरित पाऊले उचलावी असे सांगितले. त्याचप्रमाणे शासकीय तसेच पालिकेतील निवासी डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल योग्य ती दखल घेऊन त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल ते निश्चित करण्याचेही निर्देश दिले.

            यावेळी मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व राज्यशासन योग्य ती पाऊले उचलेल असा विश्वास व्यक्त  केला.

 नवीन महाविद्यालयअभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे

वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय

 

            नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालयपरिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रमविषयविद्याशाखाअतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे.  कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.  या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.

-----०-----


 

मी धनंजय बोलतोयतुम्ही व्यवस्थितसुरक्षित आहात ना

काळजी करु नका - धनंजय मुंडेंचा पुरात अडकलेल्यांना धीर

शेतकऱ्यांना नुकसानीची सरसकट नुकसानभरपाई मिळावी

यासाठी पाठपुरावा करणार

- मंत्री धनंजय मुंडे

मांजरा काठी पूर परिस्थितीधनंजय मुंडे घटनास्थळी,

रात्रीतून वेगाने मदतकार्य झाल्याने जीवितहानी टळली

 

            अंबाजोगाई, दि. 28 : "मी धनंजय बोलतोयतुम्ही व्यवस्थितसुरक्षित आहात नाकिती जण व कुठे अडकलेले आहातबोट मदतीला आली आहे काकाळजी करू नका;" असे बोलून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांची विचारपूस केली.

            देवळा ता.अंबाजोगाई येथील 51 जण मांजरा नदीच्या पुरात अडकले असून त्यापैकी 27 जणांना आतापर्यंत सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर उर्वरित नागरिकांना सुरक्षा रक्षक जवान बोटीने बाहेर काढत आहेत. मांजरा नदीच्या काठी पूर परिस्थितीने नुकसान झालेल्या गावांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची व नुकसानीची पाहणी केली व एन डी आर एफ सह अधिकाऱ्यांकडून बचाव कार्याची माहिती घेतली.

            मागील 24 तासात जिल्ह्यात सर्वदूर तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाली असून बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांमध्ये घरात पाणी शिरले असून त्याठिकाणी नागरिकांना आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे.

            सबंध रात्रभर आपण जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून दर तासाला जिल्ह्यातील एकूण उपाययोजनेची व उपलब्ध यंत्रणांची माहिती घेत आहे व एन डी आर एफ सह अन्य बचाव पथकांना आवश्यक सूचना देत आहोतएन डी आर एफअग्निशमक सह पथके बचाव कार्यात तैनात आहेतहेलिकॉप्टर सुविधेसाठी वातावरण पूरक नसले तरी त्याचीही तयारी करून ठेवलेली आहेअसे श्री.मुंडे म्हणाले.

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी पाठपुरावा करणार

            काल रात्रीच या संपूर्ण परिस्थितीबाबत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री  श्री.अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून त्यांना जिल्ह्यातील एकूण परिस्थितीची माहिती दिली आहे.

            मागील पंधरवाड्यात तीनवेळा अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करताना आकडेवारी बदलत आहेत. मात्र, आता काही महसूल मंडळांमध्ये शेती मध्ये काहीच उरले नाही. अक्षरशः जमीन खरडून गेली आहेत्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे श्री.मुंडे म्हणाले.

            यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणेमाजी आमदार पृथ्वीराज साठेज्येष्ठ नेते राजेश्वर आबा चव्हाणदत्ता आबा पाटीलगोविंदराव देशमुखताराचंद शिंदेतानाजी देशमुखरणजित चाचा लोमटेअजित गरड यांसह अधिकारी व बचाव पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

0000


विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी

मतदार यादीत नावे नोंदविण्याची व दुरुस्तीची संधी

- राज्य निवडणूक आयुक्त

            मुंबईदि. 28 (रानिआ) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्याची आणि मृतदुबार अथवा स्थलांतरीतांची नावे वगळण्याची चांगली संधी आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी समन्वयाने व्यापक व प्रभावी जनजागृती मोहीम राबवावीअसे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिले.

            भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानाच्या तयारीबाबत श्री. मदान यांनी आज जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ काँफरन्सिंग) संवाद साधला. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेराज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकरबृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणीकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशीमुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील स्वीप सल्लागार दिलीप शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

             श्री.मदान यांनी सांगितले कीभारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदारसंघांचीच मतदार यादी महानगरपालिकानगरपरिषदा/ नगरपंचायतीजिल्हा परिषदा/ पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावित. त्याचबरोबर मृतदुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील. आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील. या कार्यक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्याकरिता मुद्रितइलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाबरोबरच विविध कल्पक बाबींचाही अवलंब करावा.

            श्री. देशपांडे यांनी सांगितले कीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीने आताच मतदार म्हणून आपले नाव नोंदविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार यादी अद्ययावत आणि अधिकाधिक बिनचूक करण्यासाठीदेखील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नावांमध्ये दुरूस्त्या असल्यास त्याही कराव्यात. मृतांची अथवा दुबार नावे वगळावयाची असल्यास नमुना क्रमांक 7 भरून तो संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा संबंधित ठिकाणी जमा करावा अथवा ऑनलाईन पद्धतीने www.nvsp.in या संकेतस्थळावर भरावा. या संकेतस्थळावर नवीन मतदार म्हणूनदेखील नाव नोंदणी करता येते.

            श्री. कुरुंदकर यांनी सांगितले कीआगामी काळात मोठ्याप्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी मतदार म्हणून नावे नोंदविण्याची किंवा मतदार यादीत दुरूस्त्या करण्याची ही शेवटची संधी आहे. याबाबत नागरिकांना व मतदारांना अवगत करणे आवश्यक आहेतसेच ही सर्व प्रक्रिया अधिकाधिक सुलभ केल्यास नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभेल. त्यादृष्टीने सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिकेच्या यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे.

Salutes to art

 


Balkrida


 


 

 


 *आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती  निवडणुकांसाठी शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस युती*  

अलिबाग-मुरुडसाठी महेंद्र दळवी यांची घोषणा; शेकापचा पराभव करण्यासाठी एकीचे बळ

अलिबाग, ता. 3: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी विधानसभेच्या अलिबाग-मुरुड मतदार संघासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. महेंद्र दळवी यांनी नवे समिकरण जुळवून आणले आहे. शेतकरी कामगार पक्षाला या मतदार संघातून हद्दपार करण्यासाठी बलाढ्य शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढविणार असल्याची घोषणा महेंद्र दळवी यांनी रविवार (ता.3) रोजी राजमळा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. 

या नव्या समिकरणाची जुळवणी मागिल काही दिवसांपासून सुरु होती. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच ही त्रिपक्षीय आघाडी झाली असल्याची माहिती आ. महेंद्र दळवी यांनी आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. या एकीच्या बळाने आपण शेकापला या मतदार संघातून हद्दपार करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. नव्या आघाडीमुळे शेकाप एकाकी पडला आहे. त्यांच्या नेत्यांना पराभव समोर दिसू लागल्यान शेकापचे नेते अर्थहिन आरोप करु लागले आहेत. त्यांच्या आरोपांना आणि धमक्यांना घाबरण्याची वेळ संपली असून शेकापचे अनेक वर्षांचे वर्चस्व संपवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहनही आ. महेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांना केले. राजमळा येथील मेळाव्यास जिल्हापरिषदेचे विरोधी पक्ष नेता सुरेंद्र म्हात्रे, शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, मुरुड तालुका प्रमुख श्रीकांत डोंगरीकर महिला जिल्हा संघटीका दिपेश्री पोटंफोडे जिल्हा खजिनदार सुरेश म्हात्रे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष निगडे ॲड.सुशील पाटील यांच्यासह अलिबाग मुरुड तालुक्यातील शिवसेना उप तालुका प्रमुख विभाग प्रमुख महिला आघाडी च्या पदाधिकारी संपर्क प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख उप शाखा प्रमुख आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi